Login

अवनी एक प्रवास भाग ९४

इकडे परीने राजला मेसेज केला आणि राजकडे बघून त्याच्या मोबाईलकडे इशारा केला. राजने देखील विचार करतच त्याचा मोबाईल उघडला. त्यात परीने त्याला उद्या सकाळी भेटायला बोलावलं असल्याचा मेसेज आलेला त्याला दिसला. राजने देखील ओकेचा रिप्लाय दिला. इकडे आराध्याने नयनच्या आईला फोन लावला. ते बघून नयन अजूनच टेन्शनमध्ये आली.
मागील भागात.

सुनेला हा शब्द ऐकून नयनला जरा लाज चढली. रावी तिला भांडत जरी असली तरी तिने त्यां दोघांच्या नात्याला स्वीकारलेल असल्याची पावती होती ती.

“तुम्हाला काय गरज होती तिला अडवून ठेवायची?” आराध्या

“काय गरज म्हणजे?” रावी “दादूनेच सांगितलं होत. ती दीला रूड बोलली होती तर तिला भेटू देऊ नका.”

“त्यासाठी आधी ऐकायला शिकव लागत.” नयन तोऱ्यात बोलली. “मी कितीतरी वेळा रिक्वेस्ट केली. हात जोडले तरी नाहीच. आधीच ऐकल असत तर ..”

“तर आतापर्यंत सगळ ठरलं असत ना?” विजय बाहेर येत बोलला. त्याच्यापाठी त्याची मित्र मंडळी पण बाहेर आली.

“नसत झाल.” नयन तोंड बारीक करू बोलली आणि तिने जो काही गोंधळ घालून ठेवला होता तो विजयला सांगितला.

“हम्म,” विजय विचार करत बोलला. “आता ज्यांच्यामुळे हा प्रोब्लेम झाला त्यांनाच त्यातून मार्ग काढायला लाव.” विजयने सर्व बंधू मंडळीवर नजर टाकली.

ते ऐकून त्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले.

आता पूढे.

“मला ह्याच जन्मी लग्न करायचं आहे.” नयनने पुन्हा जाणून कळ काढली. “त्यांना सांगायचं म्हणजे...”

“आम्हला चॅलेंज?” माला चिडून बोलली.

“असच समजा.” विजयने अजून त्या आगीत तेल ओतल. “मी आलोच जाऊन.”

एवढं बोलून त्याने त्याच्या बाकी मित्रांना पाहिलं आणि घराबाहेर जायला निघाले.

“आत कुठे?” सायली

“आलोच तासाभरात.” विजय एवढं बोलून विजय आणि त्याची मित्रमंडळी घराबाहेर पडली.

आपल्या वडिलांना अस अचानक जाताना बघून सर्व बंधू मंडळी जरा आश्चर्यचकित झाली. परीला पण जरा टेन्शन आल. तिने राजकडे पाहिलं आणि त्याच्याशी बोलायचं आहे असा त्याला इशारा केला.

“काय बोलले रे मनालीचे मामा?” राहुल चालता चालता विजयला विचारू लागला.

“आज मनालीला पण पकडण्याचा प्रयत्न झाला,” विजय टेन्शनमध्ये येत बोलला. “त्या माणसासोबत मनालीचे मामा होते म्हणून ती आज वाचली. नाहीतर..”

“अस बोलण्यापेक्षा थेट त्यांच्या घरी जाऊन विचारू ना,” महेश चिडून बोलला. “प्रेमाने..” तो बोलता बोलता थांबला.

“तू आणि प्रेमाने?” राहुल हलकेच हस्त बोलला. “तू आणि संदेश अजूनही तसेच आहेत. अरे बोलून एक सेकंद पण वाट न बघता, का रे अस न विचारता थेट समोरच्यावर उडून पडणारे.”

“असच वागाव लागत.” संदेश चिडून बोलला.

“ठीक आहे.” विजय गाडी अनलॉक करत बोलला.

ते सगळेच गाडीत बसले आणि तिथून निघाले.

तिकडे मनालीचे मामा विजयने सांगितलेल्या जागी जाऊन पोहोचले होते. त्यांना आजच त्यांच्या गावी गौतमने बोलावले होते. पण मनालीच्या मामाने आज कसेतरी त्यांना थांबवलं होत.

दुसरीकडे शशांक देखील त्यांच्या जेलमध्ये असणाऱ्या त्या सेक्रेटरीला जाऊन भेटला. त्याने त्याची सगळी केस वाचून काढली होती. त्याला एक नजरेत त्याला ती केस समजून आली होती. जी त्या सेक्रेटरीवर दबाव टाकून त्याच्याकडून परीच्या खऱ्या वडिलांच्या संपत्तीचे कागदपत्र मिळवायचे होते. ते सगळच शशांकला समजून आल होत. तो देखील त्या सेक्रेटरीसोबत बोलायला आला. पण त्याने शशांकसोबत बोलायला देखील मनाई केली. कारण त्या सेक्रेटरीला आता कोणावरही विश्वास राहीला नव्हता.

शशांकने दोन ते तीन वेळा विचारलं पण त्याची इच्छा नसलेली बघून त्यानेही जास्त काही जोर दिला नव्हता. तो परत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि त्याने त्याच्या मोबाईलवर त्याच्या मित्राला फोन लावला.

सेक्रेटरीला भेटता आला नसल्याने गौतमने त्याच राजकीय वजन वापरून शशांकची बदली करायचा प्रयत्न केला. पण गौतमला त्यातही अपयश आल होत. कारण त्याची बदलीची शिफारस थेट दिल्लीवरून आलेली असल्याचे गौतमला सांगण्यात आले होते. मग त्याची अजूनच चिडचिड व्हायला लागली. एका सध्या ऑफिसरसाठी थेट दिल्लीवरून शिफारस आलेली बघून तो विचारातच पडला.

“काय करायचं आता?” हरीश टेन्शनमध्ये येत विचारू लागला.

“आता काय?” गौतम “आता अवनीला धरुयात. आता पाणी डोक्यावरून चालल आहे. लवकर काही केल नाही तर ती सगळीच संपत्ती आश्रमावर उधळून टाकतील.” गौतम चांगलंच रागाला आला.

“अजून एक बातमी मिळाली आहे.” हरीश

“कोणती?” गौतम

“तिच्या भावाची गर्ल फ्रेंड आहे,” हरीश “आपण तिलाच पकडूया का?”

“कोण?” गौतम “आणि तिला पकडून काय होईल? तिचे सगळेच भाऊ उलट्या डोक्याचे आहेत. अवनी राहील बाजूला आणि बाकीचे येऊन आपला गळा पकडतील.”

“आपण त्यांना का घाबरायचं?” हरीश

“कारण त्यांच्या डोक्यावर मोहिते साहेबांचा हात आहे.” गौतम “एकवेळ अवनी तिच्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून त्यांच्यापर्यंत जाणार नाही. पण ह्या मुलांच काहीच सांगता येत नाही.”

“तरी प्रयत्न करूया.” हरीश

“बघू.” गौतम

एवढ बोलून ते दोघेही त्यांच्या त्यांच्या कामाला लागले.

इकडे परीने राजला मेसेज केला आणि राजकडे बघून त्याच्या मोबाईलकडे इशारा केला. राजने देखील विचार करतच त्याचा मोबाईल उघडला. त्यात परीने त्याला उद्या सकाळी भेटायला बोलावलं असल्याचा मेसेज आलेला त्याला दिसला. राजने देखील ओकेचा रिप्लाय दिला.

इकडे आराध्याने नयनच्या आईला फोन लावला. ते बघून नयन अजूनच टेन्शनमध्ये आली. कारण तिने सकाळपासून तिच्या घरी फोनच लावला नव्हता. त्यात तिच्या आईचा आलेला फोन देखील तिने सुजयचं गडबडीत कट कलेला होता. आता तिला सगळ आठवू लागल आणि ती परत तिचं तोंड पाडून बसली.

पहिल्या रिंगमध्ये तर काही फोन उचलला गेला नव्हता. थोड्यावेळाने परत फोन लावला तर तो व्यस्त लागत होता. ते बघून सगळेच गोंधळात पडले.

इकडे नयनच्या खिशात तिचा मोबाईल थरथरू लागला. मग नयनला आठवलं की तिने तिचा मोबाईल सायलेंटवर ठेवला होता. आता आराध्याने लावलेला फोन व्यस्त का लागत आहे याच उत्तर नयनला मिळाल. तिने तिचा मोबाईल बाहेर काढला.

“आई मला फोन करत आहे.” नयन बाकीच्यांकडे बघून बोलली.

“अगं मग उचल आणि बोल ना त्यांच्याशी.” सायली

“अम्म,” नयन परत चाचरली. “म.. मी सकाळपसून तिला फोनच नाही केला आणि जो आला होता तो कट करून दिला होता. आता उचलला तर ती मला खूप ओरडेल.”

“बरोबर आहे ना मग आईच.” सायलीची आई कडक आवाजात बोलली. “तुमची काळजी असते आई बापाला. तू केला नाहीस म्हणून ती करत होती तर तो तरी उचलायचा. किमान मी कामात आहे नंतर करते किंवा घरी येऊन बोलते इतक सांगितलं तरी चालत. पण तुम्ही तर खूपच व्यस्त ना.”

इकडे निघाले की ओठ बाहेर नयनचे.

“आण इकडे, मी बोलते.” सायलीच्या आईने नयनकडून तिचा मोबाईल घेतला.

“खूपच कामात बिझी झालीस का की आईचा फोन पण उचलायला तुला वेळ नाही,” नयनची आई बोलायला लागली. “इकडे तू फोन करत नाहीस आणि आम्ही केला तर तो उचलत नाहीस. बरं माणूस कामात असतो माहिती आहे. पण इतका पण वेळ नाही का सांगायला. नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे. माहिती आहे तुला लोकांची सेवा करायची खूप इच्छा आहे, पण तुला घर आहे हे पण विसरते का? लोकांना जशी नर्सची गरज आहे ना आईला पण लेकीची गरज आहे.”

थोडा वेळ शांतता पसरली.

“बोल ना आता,” नयनची आई परत सुरु झाली. “आता का तोंड शिवल आहे? आणि कुठे आहेस ते तरी सांग. एकतर तू टिफिन पण घेऊन गेली नाहीस. जेवलीस की नाही? की रात्री पण हॉस्पिटलमध्ये मुक्काम आहे. करायचं आहे तेच कर तू. आईची काळजीच नाही तुला.”

“शेवटी सगळ्या आया आणि त्यांची मुल सारखीच.” सायलीची आई हलकेच हसत बोलली.

मोबाईलवर वेगळाच आवाज ऐकायला आलेला बघून नयनची आई लागलीच टेन्शनमध्ये आली.

“कोण बोलत आहे?” नयनची आई घाबरून बोलली. “आणि हा माझ्या मुलींचा मोबाईल आहे. तुमच्याकडे कसा आला? आमची मुलगी कुठे आहे?”

“अरे हो,” सायलीची आई “जरा दम खा. तुमची मुलगी सुरक्षित आहे आणि आमच्या घरी आहे.”

“अँ?" नयनची आई अजूनच टेन्शनमध्ये आली. “पण तुम्ही कोण?”

“मी सुजयची आज्जी.” सायलीची आई माहिती सांगू लागली. “आमच्या लेकाचा अपघात झाला होता. तर तुमच्या लेकीने त्याच्यावर छान उपचार केले. अगदी तिच्या अधिकाराबाहेर जाऊन. म्हणून म्हटलं घरी पर्यंत सोडायला चल. कारण आमचा दिवटा आमचा काही ऐकत नाही. निदान तिचं तरी ऐकतो.”

आपल्या लेकीच कौतुक ऐकून टेन्शनमध्ये असणारी नयनच्या आईचा उर अभिमानाने भरून आला. तिचं टेन्शन लागलीच पळून गेल. “आमची लेक आहेच तशी. तिला लहानपणापासून असा सेवेचा नाद होता. तिला डॉक्टर व्हायचं होत. पण नशिबाने तिला नाही करता आल. पण ती नर्स झाली आणि तिचं काम काही सोडलं नाही.”

“चांगलीच ओळख झाली आहे आमची तिच्याशी.” सायलीची आई

“एक मिनिट,” नयनच्या आईला काहीतरी आठवल. “तुम्ही सुजयच्या आज्जी म्हणजे तोच सुजय..”

“हो तोच सुजय,” सायलीची आई आता जरा गंभीर झाली. “जरा गैरसमज झाले होते त्यांच्यात...”

“कुठे आहे तो?” नयनची आई परत भांडणाच्या सुरात आली. “द्या तर फोन त्याच्याकडे. त्याच्यामुळे माझ्या लेकीने अन्न पाणी सोडलं होत. तिला साध भेटत पण नव्हता आणि आता थेट स्वतःच्या घरी घेऊन गेला तो.”

“आम्हीच सांगितलं तिला.” सायलीची आई

आपली घेतलेली बाजू बघून नयनला जरा भरून आल. कारण ती तर स्वतः तिथे आली होती. ते जर तिच्या घरी समजल असत तर पहिले तिला फटके बसले असते. याची जाणीव सायलीच्या आईला झाली होती. म्हणून त्यांनी ते स्वतःवर घेतलं.

“मुल आहेत ती,” सायलीची आई नयनच्या आईला समजावत बोलली. “झाली चुकी त्यांच्याकडून. आता त्यांना आपण सवरून घेणार नाही तर कोण घेणार?”

“बरोबर आहे ओ तुमच,” नयनची आई आता जरा नरमाईने बोलली. “त्या दिवसांत लेकीची झालेली अवस्था बघवली जात नव्हती.”

“आम्ही पण आमच्या लेकाचे चांगलेच कान ओढले आहेत.” सायलीची आई “त्याच्या लाडक्या दीने देखील त्याला चांगलच खडसावल आहे.”

“बरं कसा आहे आता सुजय?” नयनची आई

“जावयाला नावाने हाक मारता का?” सायलीची आई थेट बोलून मोकळी झाली.

“जावई?” नयनची आई गोंधळून गेली. नंतर तिला ते आठवलं. “अम्म ते अस झाल की नयनने मुलगा बघायला परवानगी दिली तर एका स्थळाला आम्ही उद्या घरी बोलवलं आहे.”

“तुमच्या लेकीने आमच्या लेकाची तुम्हाला चांगलीच ओळख करून दिली असेलच ना?” सायलीची आई

“ते झाल तुमच म्हणण,” नयनची आई “पण शेवटी लोकांना उत्तर आम्हाला द्याव लागेल ना? की घरी बोलवतात आणि अचानक नका येऊ पण बोलतात.”

“लोक काय ओ” सायलीची आई “ती फक्त नाव ठेवायला असतात. गरज असते तेव्हा ती वाऱ्याला देखील उभे रहात नाही.”

“पण तो म्हणे तिच्या बहिणीच लग्न झाल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणे.” नयनची आई

तस सायलीच्या आईने परीकडे पाहिलं. मोबाईल स्पीकरवर असल्याने ते सर्वाना ऐकू आल.

“माझ पण ठरलं आहे की.” परी अचानक बोलून गेली.

तसा सर्वाना ठसकाच आला. सगळे डोळे फाडून परीला बघू लागले.

“कोण?” नयनची आई वेगळाच आवाज आला म्हणून विचारू लागली. “सुजयची मोठी बहिण.”

लगेच परीने आराध्याच्या हातून मोबाईल तिच्या हाती घेतला. “हो, मी परी. म्हणजे अवनी.”

“अच्छा.” नयनची आई “ठरलं असेल तर मग माझी काही हरकत नाही. फक्त घरी ह्यांच्याशी बोलाव लागेल.”

“ठीक आहे ना,” परी हलकेच हसत बोलली. “मग सांगा आम्ही कधी यायचं ते.”

हे ऐकून नयनला खूप लाजायला झाल. तर बाकी महिला मंडळ खूपच टेन्शनमध्ये आल. तर तिची बंधू मंडळी देखील परीला डोळे फाडून बघू लागली. ते सगळेच परीला बघत राहिले. आता नयन समोर असल्याने परीला थेट काही विचारता येणार नव्हते. त्यामुळे आता ते सगळेच नयनच्या घरी जायची वाट बघत राहिले.

“सांगते तुम्हाला,” नयनची आई “बरं तेवढ तिच्याकडे फोन देता का?”
तस सुजयच्या आज्जीने तो फोन नयनला दिला. नयनने तो फोन जरा घाबरतच घेतला.

“तुझ काम झाल असेल तर लवकर घरी ये.” नयनची आई जरा कडक आवजात बोलली.

आईचा तो सूर ऐकून नयनने मनातच कपाळाला हात लावला. आता घरी गेल्यावर बोलणी तर खावी लागणार होती. म्हणून ठीक आहे बोलून फोन ठेवून दिला. तो मोबाईल तिने आराध्याला परत दिला आणि लागलीच निघायची तयारी केली.

तिच्या त्या पडलेल्या तोंडावरून तिची आई तिला नक्कीच ओरडली असणार किंवा घरी बोलावून तिला ओरडणार असल्याचे बाकीच्यांना जाणवले.

नयन उठली आणि तिची बॅग घेत सरळ सुजयच्या खोलीकडे गेली. सुजय नुसताच त्याच्या खोलीच्या छताला बघत राहीला होता. सध्या त्याच्या खोलीत तो एकटाच होता. बऱ्याच दिवसांनी ती त्याला दिसली होती. तिने त्याचा झालेला गैरसमज देखील दूर केला होता. त्यानंतर त्या दोघांना एकांतात भेटताच आल नव्हत. गैरसमज दूर झालेला असल्याने त्याला देखील नयनला भेटायची खूप ओढ लागली होती आणि घरात इतकी माणस असताना ती त्याला अशी एकांतात भेटू देखील शकणार नव्हती. त्यामुळे तो त्याच तोंड पाडून बेडवर पसरलेला होता.

“फिलिंग बेटर?” नयन मंद स्मित करत बोलली.

अचानक आलेल्या आवाजाने सुजय पहिले जरा दचकलाच. नंतर नयनला बघितल्यावर त्याच्या मनाला जे समाधान मिळाल. ते त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागलेलं नयनला जाणवायला लागल. मग त्याला आपण नयनसोबत कसे वागलो हे आठवलं आणि त्याच तोंड परत पडल.

“आता काय झाल?” नयन त्याच्या बाजूला बसत बोलली.

“सॉरी.” सुजयने तिचा हात त्याच्या हाती घेतला. “मी काहीच ऐकून न घेता तुला..”

नयनने त्याच्या तोंडावर तिचा हात ठेवला. “मी पण सॉरी. रागारागात तुला काहीही बोलून गेले.”

“तुझी आराध्य मावशी माझ्या आईसोबत बोलली.” नयन हलकीच हसत बोलली.

आता मात्र सुजयच्या कपाळवर परत आठ्या चढल्या.

“हो मला माहिती आहे की दीचा लग्न झाल्याशिवाय तू करणार नाहीस ते.” सुजयच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून नयन बोलली. “पण दी स्वतः बोलली की तिचं लग्न ठरलं म्हणून.”

“व्हॉट?” सुजयला झटकाच बसला.

सुजयची ही अनपेक्षित प्रतिक्रिया बघून नयन जरा गोंधळात पडली.

“तुला माहिती नाही का?” नयन

“तुला काय वाटत?” सुजय जरा चिडून बोलला.

“तस नाही,” नयन “पण बाकी कोणीच काही बोललं नाही यावर. अगदी तुमच्या आई पण नाही.”

“दी आता असे झटके द्यायला लागल्यावर त्यातून आम्हाला सावरायला वेळ तर लागणारच ना.” सुजय विचार करत बोलला.

आता नयनला जरा परीचा अंदाज आला. नक्कीच सुजय आणि तिचं लग्न लवकर व्हाव म्हणून परी खोट बोलली असणार.

“ठीक आहे,” नयन “मी आता घरी निघते. आई पण चिडली आहे माझ्यावर.”

“हम्म.” सुजयने तिला जवळ बोलावलं.

पण ती काही त्याच्याजवळ गेली नाही. कारण ते जरी खोलीत एकटे होते. तरी खोलीच्या बाहेर सगळीच मंडळी बसलेली होती. म्हणून तिने मानेनेच नकार नकार.

“प्लीज.” सुजयने आर्जव केली. “आता परत कधी भेट होईल ते माहिती नाही ना.”

तशी नयन जरा विचार करू लागली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →