मागील भागात.
तिकडे हॉस्पिटलमध्ये सुजयच्या खोलीत बराच गोंधळ चालू होता. साहजिक आहे जिथे ही सगळी बंधू मंडळी जमा होतील तिथे कधीच शांतता नांदू शकत नव्हती. त्यांचा आवाज असा होता की आजूबाजूच्या तीन ते चार खोल्यांपर्यंत त्यांचा तो आवाज जात होता. डॉक्टर देखील त्यांना सांगून वैतागले. पण ती मुल काही सुधारायची नाव घेत नव्हती.
शेवटी नयन तिथे आली आणि सरळ तिला त्रास देतात अस त्यांच्या दीला सांगण्याची धमकी त्यांना दिली. तेव्हा कुठे ते शांत झाले. एवढ्यावरचं नयनच समाधान झाल नाही. म्हणून तिने ह्या सगळ्यांना थेट त्या खोलीच्या बाहेर काढलं.
काही वेळाने परी देखील तिथे जाऊन पोहोचली. कॉलेजमधून ती थेट तिथे आली होती. बाकी सगळी वरिष्ठ मंडळी तर होतीच. त्यात सायलीचे आई वडील देखील होते. बाकी वरिष्ठ मंडळीचे आई वडील आधीच सुजयला भेटून गेले होते.
एवढा मोठा गोतावळा बघून हॉस्पिटलचा सगळा स्टाफ अचंबित झाला होता. खर तर सुजयला फक्त खरचटलं होत. त्यासाठी आता जण आलेले बघून, त्याला समजा जास्त लागल असत तर किती जण आले असते? हा विचार त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे गेला होता. तरीही त्यांच्या ॲकेडमीमधले विद्यार्थी अजून तिथे आले नव्हते.
आता पूढे.
नयनने डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या परी आणि सायलीला समजावून सांगितल्या. त्याने एक जरी गोळ्यांचा डोस चुकवला तर ती थेट इंजेक्शन द्यायला घरी पोहोचेल असा दोघींसमोर तिने सुजयला दम दिला. बाकी डिस्चार्जची औपचारिकता नयननेच पूर्ण केली होती. तिच्यामुळे तिथे कामाला असणारे वार्डबॉय देखील डोक्याला हात लावून बसले होते. इतर वेळेस अगदी प्रेमाने काम करून घेणारी ती सुजयच्या वेळेस मात्र खूपच कडक वागत होती. पहिले तर ते तिच्यावर चांगलेच चिडले होते. पण नंतर जर समजल की तो पेशंट तर त्यांच्या ह्या लाडक्या नर्सचा बॉयफ्रेंड आहे. तेव्हा मग त्यांनी त्यांचा राग सोडला. वरून त्याची स्पेशल काळजी घ्यायला सुरवात केली. तो त्या बेडवरून फक्त बाथरूमला जाण्यासाठी उठला होता. बाकी सगळच त्याला हातात मिळत होत.
यामुळे सुजय खरं तर वैतागला होता. पण तिथले वार्डबॉय देखील नयनच्या पुढे जात नव्हते. मुळातच ती चागल्या मनाची असल्याने तिने तिथल्या सगळ्या स्टाफची मने जिंकलेली होती. मग तिला सहसा कोणीच नकार देत नव्हते.
सायलीने तिथल्या बाकी पेशंट आणि स्टाफकडून नयनच फक्त कौतुक ऐकल होत. हा ज्याच्यासोबत ती कडक वागत होती तेच फक्त वरवरचा राग दाखवत होते. मग तिच्या आईं वडिलांना देखील नयन आवडून गेली होती. आता फक्त तिच्या घरच्यांसोबत बोलण कस करावं? हा प्रश्न होता. मग सायलीला तिची मोठी लेक आठवली. सुजय तिच्यापुढे तर काहीच बोलणार नव्हता. एकदा का तो त्याच्या आजारातून पूर्ण बरा झाला की सुजयजवळ तिचाही विषय काढणार होते आणि याची जाणीव सुजयला देखील होती.
त्या आधी सुजयला आणखी एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावयचा होता तो म्हणजे त्याला जाणूनबुजून का पाडलं गेल? त्याने अजून कोणाजवळ विषय देखील काढला नव्हता. कारण विजय तर त्याला त्यात जास्त घुसू देणार नव्हता आणि तो हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्या आजूबाजूला सतत कोणीनाकोणी राहत होते. जरी दुसर कोणी नाही तरी नयन तर खास राहत होती. त्यामुळे त्याने हॉस्पिटलमध्ये असताना शांतच राहाण पसंत केल होत. पण मन मात्र खूप अस्वस्थ झाल होत.
आता तो घरी आला की त्याच्या खोलीत तो काही वेळ तरी एकटा रहाणार होता आणि तिचं संधी साधून तो त्याच्या बाकी बंधू मंडळीना सगळ काही सांगणार होता. बाकी विजय आणि तुषारला वाटत होत की सुजय सर्व काही विसरला असेल आणि सुजयच्या बाकी बंधू मंडळीना ‘सुजय घसरून पडला.’ हेच खर वाटल असेल. पण ह्या बंधू मंडळींच्या डोळ्यांनी मात्र गप्पा मारून घेतल्या होत्या. मग आता ते देखील सुजयची घरी जायची वाट बघत होते.
नयनला देखील सुजयच घर बघायचं होत. पण तिची ड्युटी सोडून तिला जाता येणार नव्हत. तरीही तिने काहीतरी उपाय काढायचा ठरवला आणि सुजयच्या घरी जाऊन सगळ काही स्पष्ट बोलायचं ठरवलं. मग ती देखील सुजयच्या घरी कस जायला मिळत हे बघू लागली.
तर परीला देखील सुजयला चांगलाच खडसवायचं होत. तो आधी तिच्याशी खोट जे बोलला होता की त्याला पुढे आलेलं वळण दिसलं नाही आणि तो घसरून पडला. मग ती देखील सुजयची घरी जायची वाट बघत होती.
विजयला देखील सुजयसोबत बोलायचं होत. आता जे काही घडून गेल ते विसरून जायला सांगणार होता. ते परीला काहीच कळू न देण्याबद्दल त्याला सांगणार होता. मग तोही सुजयच्या घरी जायची वाट बघत होता.
मनालीचे मामा देखील विजयला भेटायची वाट बघू लागले. आजची झालेली गोष्ट साधी नव्हती. गौतमला परीच्या वडिलांच्या सेक्रेटरीची मुलगी सापडली होती. त्यामुळे आता मनालीच्या मामांना देखील जास्त वेळ गौतमला गाफील ठेवता येणार नव्हत. आज ना उद्या तिच्या जीवावर काही आलच तर मनालीचे मामा कुठलाही विचार न करता उघड उघड गौतमच्या विरुध्द जाणार होते. पुढे काही विपरीत घडण्याआधीच मनालीच्या मामाला विजयसोबत बोलून घ्यायचं होत.
गौतम पण आता इरेला पेटला होता. त्याला हवी असलेली त्या सेक्रेटरीची मुलगी त्याला सापडली होती. आता त्याला बाकी संपत्ती कधी त्याच्या नवाावर होते याची घाई झाली होती. त्याला आज मनाली तर भेटली नव्हती. पण तिचा फोटो त्याच्या हातात आला होता. तो फोटो घेत तो थेट पोलीस स्टेशनला पोहोचला. आधीच त्याची त्या शहरात चांगलीच वचक होती. त्यामुळे त्या पोलीस स्टेशनचे पोलीस देखील त्याच्या शब्दाबाहेर जात नव्हते.
पण आज जसा गौतम तिथे पोहोचला तस तिथलं वातावारण त्याला जरा वेगळच जाणवलं. त्याने तिथल्या नेहमीच्या हवालदाराला तो सेक्रेटरी असलेलं जेल उघडायला लावलं. गौतमने त्याच्या वजनाने त्या सेक्रेटरीची अजूनही रिमांडच चालू ठेवली होती. त्यामुळे तो सेक्रेटरी अजूनही पोलिसांच्याच ताब्यात होता. याच कारणाने त्याची जमानत पण होत नव्हती.
त्या हवालदाराने आज सेक्रेटरीच जेल उघडायला सरळ मनाई केली. याच गौतमला जरा आश्चर्यचं वाटल. त्याने जरबेने त्या हवालदाराला दम दाखवायचा प्रयत्न केला. तसा तो हवालदार देखील कडक आवाजात नकार देऊन मोकळा झाला होता.
“कसला माज आला रे तुला?” गौतम खवळून बोलला.
“तो इमानदारीने कमावून खातो त्याचा माज आहे त्याला” गौतमला मागून आवाज आला.
गौतमने मागे वळून पाहिलं तर एक हट्टा कट्टा तरणाबांड मुलगा पोलिसाच्या वेशात त्याच्यापुढे येऊन उभा राहीला होता. डोळ्यात तेज, पावणेसहा फुटाची उंची, आवाजात जरबपणा. त्याच्या अश्या ह्या व्यक्तिमत्वाने गौतमही जरा चपापलाच.
त्या पोलीसस्टेशनमध्ये नव्यानेच नियुक्त झालेला तो एक पोलीस निरीक्षक म्हणजे मिस्टर शशांक. अत्यंत अभ्यासू, हुशार आणि तितकाच चलाख बुद्धीचा. महाविद्यालयात असतानाच राजकारण कोळून प्यायलेला. त्यामुळे त्याला माणस सहज वाचता येत होती. इथे रुजू होण्याआधी त्याची चार वर्षात दोन वेळा बदली देखील झाली होती. तो कोणाच्या वाटेला जात नव्हता. पण कोणी त्याच्या वाटेला गेला की तो कोणालाच सोडत नव्हता. थोडक्यात चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट होता. त्यात गौतमचा सूर ऐकून त्याचा चांगला झालेला मूड लागलीच बदलला गेला.
“तू कोण?” गौतम त्याच्याच तोऱ्यात आणखीनच रागात बोलून गेला. त्याच्या पुढच्या क्षणी गौतमच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. दोन क्षण तर गौतमला काहीच सुधारत नव्हत.
जेव्हा गौतम त्याच्या जाणीवेत आला तेव्हा शशांकने बोलायला सुरवात केली. “माझ्या पोलीस स्टेशनला येऊन मलाच विचारतो की मी कोण?”
“तुला माहित नाही की तू कोणावर हात उचलला आहेस ते?” गौतम रागाच्या भरात बडबड करू लागला.
“चांगलच माहिती आहे,” शशांक गूढ हसत बोलला. “मी फक्त तुझ्याचसाठी इथे आलो आहे.” एवढं बोलून शशांक तिरकस हसत बाजूच्या खुर्चीवर बसला.
शशांकच बोलण ऐकून गौतम गोंधळात पडला.
“कळेल कळेल,” शशांक “तुला सगळ काही कळेल. इथे कशाला आला आहेस? ते बोल.”
“मला त्या आरोपीला भेटायचं आहे.” गौतम
“कोणत्या?” शशांक
“ते माझ्या मोठ्या भावाचा सेक्रेटरी.” गौतम “कैलास.”
“का?” शशांक “काय काम आहे?”
“मला त्याच्याशी जरा बोलायचं आहे.” शशांक
“आधी काम सांगायचं.” शशांक कडक आवाजात बोलला.
“ते त्याची मुलगी सापडली आहे,” गौतम “तिचं बातमी त्याला द्यायची आहे.”
“ती हरवली होती का?” शशांकने चौकशी करायला सुरवात केली. “त्याची मिसिंगची तक्रार?”
“तस नाहीये ते.” गौतमला आता काय बोलावं तेच सुचत नव्हत.
“मग कस आहे?” शशांक “की काहीतरी लपवता आहात आमच्यापासून?”
“तस नाही,” गौतम “म.. म म.. मी नंतर येतो.”
“स्टॉप.” जाणाऱ्या गौतमला बघून शशांक जरा जोरात बोलला.
ते ऐकून गौतम जागीच थांवला आणि मागे वळून बघू लागला.
“तो आणलेला फोटो ठेवून जा,” शशांक “मी तपास करून देईल ती बातमी.”
फोटोच ऐकून गौतमला घामच फुटला. “काही गरज नाही. पण एक लक्षात ठेव, अजून एका बदलीची तयारीला लागायचं.”
“बघू ना.” शशांक “आणि तो फोटो जर दिला नाहीत. तर आताच तुम्हाला तुमच्या जामीनाची सोय करावी लागेल.”
तसा गौतम चरफडला आणि त्याने मनालीचा फोटो त्याच्या टेबलवर आपटला. शशांकने तो फोटो पहिला. त्यात दोन मुली होत्या. एक म्हणजे मनाली आणि दुसरी म्हणजे रावी. आता त्यातली त्या सेक्रेटरीची मुलगी कोण? हे काही त्या शशांकला समजल नाही. पण तिच्या बाजूला असलेली तिच्यापेक्षा उंच आणि तब्येतीने फिट अशी रावी त्याच्या नजरेत भरली गेली.
“जाधव.” शशांकने तिथल्याच एका हवालदाराला आवाज दिला.
तसा जाधव पटकन शशांकजवळ आला.
“त्या सेक्रेटरीची पूर्ण फाईल माझ्या टेबलावर पाहिजे.” शशांक
तसा जाधव पटकन ती फाईल घेऊन आला. शशांकने ती फाईल वाचयला सुरवात केली. त्यात अजूनही चालू असेलेले रिमांड बघून त्याला आश्चर्यचं वाटल. त्याने लागलीच जाधवला त्याबद्दल विचारलं तर त्या सेक्रेटरीला एकही वकील मिळत नसल्याचे शशांकला समजले. न्यायालयातर्फे जो वकील दिला होता तो देखील खास त्या केसमध्ये काही करू शकला नव्हता.
शशांकने पहिले ती केस हातात घेतली. ‘तू दिलेल्या कामाची मी सुरवात करत आहे.’ शशांक मनातच बोलू लागला. ‘लवकरच त्याचा निकाल लावेल. एकतर अस कोणाच्याही वाकड्यात घुसायला मला आवडत नाही. पण काय करणार?' त्याने एक दीर्घ श्वास घेतला. 'जिवलग मित्राच्या जीवलगाचा विषय आहे ना.' त्याने शेवटी एक उसासा टाकला.
एवढ बोलून ती मनातच असुरी हसला आणि तो त्याच्या कामाला लागला.
इकडे सुजयला डिस्चार्ज द्यायची प्रक्रिया पूर्ण झाली होती. तशी नयनची अस्वस्थता वाढू लागली. आता तो तिला कधी दिसेल? हा प्रश्न तिला पडला. त्याची काळजी घेणारे तर खूप जण आहेत याची तिला जाणीव होती. पण शेवटी त्याच्या प्रेमात पडलेलं तिचं मन मात्र ऐकायला मागत नव्हत.
आता तिथे फक्त विजय, सायली, परी आणि सायलीचे आई वडील इतकेच होते. बाकी सर्वाना हॉस्पिटलच्या आवारात जाऊन थांबायला लावलं होत. बंधू मंडळीना देखील परीने बाहेरच थांबायला लावल होत.
सुजयला निघताना बघून नयनच मन नाराज झाल. ते तिच्या सिनिअर डॉक्टरांनी पाहिलं आणि बाकी स्टाफने देखील नजरेनेच त्यांना विनंती केली. यावर त्या सिनिअर डॉक्टरांना जरा हसूच आल.
“ठीक आहे.” डॉक्टर नयनकडे बघून हलकेच हसत बोलले. “उद्या वेळेवर इथे मला तू पाहिजेस. एक महत्वाच ऑपरेशन आहे.”
आपल्या सिनिअरच बोलण ऐकून नाराज झालेली नयन लागलीच खुश झाली आणि तिचं आवरायला जाण्यासाठी मागे वळली. नंतर परत थांबली आणि सायलीकडे बघू लागली.
“चालेल ना मी आले तर?” नयन ओठांचा चंबू करून विचारू लागली.
“का?” सुजयच्या कपाळवर आठ्या आल्या. “मला परत इंजेक्शन टोचायला?”
“तुला नाही विचारलं मी,” नयन तोऱ्यात बोलली आणि सायलीकडे आशेने बघू लागली.
विजय आणि सायलीने जरा गंभीर व्हायचं नाटक केल. तशी खुश झालेली नयन जरा नाराज झाली.
“तुला नाही कोणी अडवणार आता,” आराध्या मधेच बोलून गेली. “तू नको त्यांच्या मागे लागुस.”
मग मात्र विजय आणि सायली हसू लागले. तशी नयन पटकन तिच्या स्टाफरूमकडे तिचं समान आवरायला पळाली.
“तिला का सांगितल यायला?” सुजय
“का म्हणजे?” परी “आता तुझ सगळ तिलाच बघायचं आहे नाही का?” परीने सायली आणि विजयकडे बघत डोळे मिचकावले. “आणि तिच्या घरच्यांसोबत पण बोलायचं आहे ना.”
“मी रिपेअर होऊ की नको?” सुजय त्याच तोंड वाकड करत बोलला. “कधीच उभा ठेवलं आहे मला.”
“अरे हो.” विजय “चल तोपर्यंत गाडीत जाऊन बस.”
तसे आरुष, जय आणि आदेश सुजयच्या खांद्याला पकडायला पुढे आले.
“मी फ्रॅक्चर आहे का?” त्यांची काळजी बघून सुजय अजूनच वैतागला.
“हो.” परी चिडून बोलली. “जा आता गप्प त्याच्यासोबत.”
तस बाकी तिघांनी त्याला पकडून घेतलं. मग मात्र सुजय जरा जास्तच लंगडायाच नाटक करत निघाला. तसे बाकीचे हसू लागले. सुजय गाडीत जाऊन बसला. तोपर्यंत नयनची सामान घेऊन पोहोचली सुद्धा होती.
गाडीत बसताना गाडी चालवयाला विजय बसला. त्याच्या बाजूच्या सीटवर सायली. मधल्या सीटवर एका बाजूला परी बसली. मध्ये सुजय बसणार होता. तर त्याच्या बाजूला कोण बसणार? म्हणून रावी तिच्या इतर बंधू मंडळींसोबत भांडत होती. त्यांची भांडण सुरु असेपर्यंत सुजयच्या बाजूची असणारी सीट पटकन भरली गेली. सुजयने पाहिलं तर तिथे नयन येऊन बसली होती.
नयनला तिथे बघून सुजयच्या कपाळवर परत आठ्या आल्या. तर बाकी तिघे हसू लागले. तिकडे चालू भांडणामध्ये मालाने त्यांना थांबवून त्यांच लक्ष गाडीकडे वळवल. त्यांनाही नयनला तिथे बघून आश्चर्यच वाटलं.
“ए डीस्पेन्सरी,” रावी जरा चिडून बोलली. “तू काय करत आहेस इथे?”
“मंद बदक कडून अजून दुसरी तरी काय अपेक्षा करणार.” नयन पण तितक्याच तोऱ्यात बोलली.
“तू परत हिला मंद बदक बोलली?” माला पण आता चिडून बोलली.
“ते रिकाम डोक यापेक्षा छान नाव आहे.” नयन तिरकस हसत बोलली. “चला ओ सर.” नयनने विजयकडे पाहिलं.
माला तर दोन क्षण नयन काय बोलली? ते समजून घेऊ लागली. मग तिला आठवलं की नयन तिला रिकाम्या डोक्याची हा शब्द बोलायची. माला रागात काही बोलणार तोच विजयने गाडी पुढे नेली देखील होती. कारण ह्यांची मस्ती भांडण काही थांबणार नव्हती.
विजयच्या गाडीच्या मागे बाकीच्या गाड्या निघाल्या. सायलीचे आई वडील आधीच घरी निघून गेले होते. त्यांच्या नातवाच्या स्वागताच्या तयारीसाठी हो. हे सगळे निघून गेल्यावर मात्र ते हॉस्पिटल अगदीच शांत होऊन गेल होत.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
