Login

अवनी एक प्रवास भाग ९०

गाडी चालू करून काहीच वेळ झाला असेल तोच त्याचा परत फोन वाजला. आता त्याचा फोन तर त्याच्या खिशात होता. तो कोणी केला? ते त्याला माहिती नसल्याने तो आलेल्या फोनला वैतागून भांडू लागला. कारण आता फोनवर बोलण्यासाठी त्याला त्याची बाईक हळू करावी लागणार होती. भले त्याने त्याचा मोबाईल ब्ल्यू टूथला जोडलेला असला तरी. त्याने त्याच वैतागत फोन उचलला. जस कानावर परीचा आवाज आला तसा त्याचा तो वैतागलेपणा दूर पळून गेला.
मागील भागात.

“पण एकदा बोलून घेतलं असतस ना.” तेजश्रीची आई

“पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला अजून त्या बाजूने कधीच काही विचारल नाही आणि तस मला जाणवूनही दिल नाही,” परी त्यांना समजावून बघू लागली. “त्यामुळे मी त्यांच्याशी अस थेट या विषयावर बोलण त्यांच्या मनात शंका निर्माण करेल आणि माझ्यामुळे त्यांनी तुमच्यावर शंका घेतलेली मला आवडणार नाही. कारण त्यांनी याबद्दल काही मला विचारलं तर मी खोट बोलू शकणार नाही.”

“पण त्याने विचारलच तर.” तेजश्रीच्या आईने त्यांच्या मनातली शंका विचारली.

“बोलली ना मी,” परी “मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीये.”

तस तेजश्रीच्या आईला जरा समाधान वाटलं. त्यांनी तसाच तिचा निरोप घेतला. तिने तेजश्रीच्या आईला समजावलं तर होत पण तिचं मन आतून खूप अस्वस्थ झाल होत. आपण अनाथ आहोत हे समजल्यावर तुषारच्या घरचे आपल्याला सहज स्वीकारणार नाही हे तिला आधीच माहिती होत. तेच आता तिला तेजश्रीच्या आईच्या बोलण्यावरून सहज समजून गेल आणि तिला तुषारपासून लांब होण्याचा निर्णय घेतल्याचे समाधान वाटू लागले.

आता पूढे.

तेजश्रीची आई गेल्यावर परी तडक डान्सची प्रॅक्टिस चालू असलेल्या ठिकाणी गेली. तिथे ती तेजश्रीला बघू लागली. त्या वेळेस तेजश्री तिच्या मोबाईलवर बोलत होती. तिला मोबाईलवर बोलताना बघून परी तिची वाट बघू लागली. बाकी मुली डान्सची प्रॅक्टिस करत होत्या. परी ती प्रॅक्टिस बघण्यात व्यस्त झाली.

काही वेळाने तेजश्रीच बोलण झाल तस परीने तिला एका बाजूला नेल.

“मी जे तुला तुझ्या दादाला सांगायला लावल होत ते तू त्याला सांगितलस का?” परी कडक आवजात विचारू लागली.

“नाही.” तेजश्री “ते मी त्याला नाही सांगू शकत. आजवर त्याने मला आमच्या घराला खूप संभाळल आहे. जसे तुमचे भाऊ तुमच्या शब्दाबाहेर जात नाही, तसंच मी माझ्या दादाच्या शब्दाबाहेर जात नाही.” तेजश्री अगदीच आत्मविश्वासाने बोलली. “तो त्याच मन कधी तुम्हाला सांगेल ते मला माहित नाही. पण मी आता इतक सांगू शकते की माझ्या दादाला तुम्ही....”

तेजश्री पुढे काही बोलणार तोच परी रागात बोलली. “एकदम चूप, लहान आहेस लहान राहा. उगाच मोठ्या माणसांच्या मध्ये यायची गरज नाही. जेवढ सांगितल तेवढचं कर.”

यावर तेजश्रीला आज्जीबात राग आला नाही. कारण तिने तिच्या आईला परीसोबत बोलताना पाहिलं होत आणि तेच तिने तुषारला फोन करून सांगितलं होत.

“हो मॅम,” तेजश्री अगदी शांतपणे बोलली. “मी लहान आहे. पण इतकी लहान पण नाही की दादाच मन मला समजणार नाही आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते.” आता ती पण एकदम कडक आवाजात बोलली.

क्षणभर परीला तर समोर रावी उभी आहे का अस वाटून गेल. ती देखील अशीच वाक्य बोलत होती.

“तुम्ही सगळे मिळून ना मला वेड कराल.” परी चिडून बोलली. “तुलाही त्या दगडाची हवा लागणारच ना.”

परीचे शब्द ऐकून तेजश्री चांगलीच रागाला आली. “त्याच दगडाने तुमच्या भावाचे प्राण वाचवले आहेत हे लक्षात ठेवा. तो पडला नाही त्याला पाडलं गेल आहे.”

त्याला पाडलं गेल आहे ऐकून परी स्तब्धच झाली. ती तेजश्रीला अविश्वासाने बघू लागली.

“आपण सगळेच घरी येत असताना तुमच्या भावाच्या मागे एक गाडी कधीचा त्यांना पाठलाग करत होती. एक दोन वेळेस तुमचा भाऊ वाचला. म्हणजे त्याने स्वतःला सांभाळून घेतलं. हे सगळ दादा मागून बघत होता. जशी त्याला खात्री झाली तस त्याने लागलीच तुमच्या भावाला फोन लावायला सांगितला. मग तुमच्या भावाने त्याच हेल्मेट त्या मागच्या गाडीच्या काचेवर मारलं. ती गाडी तर उलटली पण पुढे एक टर्न आल्याचे तुमच्या भावाला समजलेच नाही आणि ते समजेपर्यंत तुमचा भाऊ त्या डीव्हाईडरवर पडला.”

हे सगळ ऐकून परीला चक्करच आली. ती तेजश्रीला बघतच राहिली.

“हे बघा मॅम,” तेजश्री आता समजुतीच्या सुरात बोलली. “तुमच मन दुखावण्याच माझ काही इंटेन्शन नव्हत. पण मला माझ्या दादाची अवस्था देखील बघवली जात नाहीये.”

पण परीला तिचं वाक्य कुठे ऐकू जात होत. तिच्या मनात त्या एकाच वाक्याने थैमान घातलं होत की सुजयला पाडलं गेल आहे. ती खूपच टेन्शनमध्ये आली. तिला घाम यायला सुरवात झाली. एव्हाना तिला इतक तर समजून गेल होत की तिला काही पकडता आल नाही म्हणून तिच्या भावावर हल्ला झाला होता. तिला स्वतःला काहीही झाल तरी तिला काही फरक पडणार नव्हता. पण तिच्यामुळे तिच्या कुटुंबाला काही त्रास झालेला तिला अज्जिबात सहन होणार नव्हता.

परीची ती अवस्था बघून आपण परीला सगळ काही सांगून चूक तर केली नाही ना? अस तिला वाटून गेल.

“मॅम.” तेजश्रीने परीला भानावर आणल. तशी परी तिला बघू लागली. “तुमच्यामुळे त्यांना काही झाल हा विचार करू नका. जे कोणी आहेत त्यांना तुम्हाला कमजोर करायचं आहे. त्याच कारण तर मला माहिती नाही. पण इतक नक्की बोलेल की तुम्ही त्या माणसांना बळी पडू नका.”

परी तेजश्रीला बघतच राहिली. ही तिचं तेजश्री आहे का जिला मी लहान आहेस अस दम देत होते? हा विचार परीच्या मनात येऊ लागला.

“ठीक आहे,” परी “ते मी बघेल. पण प्लीज मी जे बोलली ते तू तुझ्या दादापर्यंत पोहोचव.” आता परीने थेट तिला हातच जोडले. “माझ आयुष्य फक्त माझ्या कुटुंबासाठी आहे. बाकी मला कोणत्याही भानगडीत पडायचं नाहीये.”

“मग ते तुम्हीच सांगा,” तेजश्री दीर्घ श्वास घेत बोलली. “माझ्यात तर हिम्मत नाही बाबा त्याच्यासमोर काही बोलायची.” तेजश्री आता नाटकी आवाजात बोलली.

तशी परीने नकारार्थी मान हलवली आणि डान्सची प्रॅक्टिस घेऊ लागली. ती प्रॅक्टिस तर घेत होती पण तिचं मन अजूनही सुजयला पाडलं गेल या वाक्याभोवती फिरत होत. मग तिला आठवलं की तुषारच सुजयसोबत होता. म्हणजे त्याने देखील तिच्यापासून सुजयची गोष्ट लपवली. तश्या तिच्या भूवया आकासल्या गेल्या.

जी गोष्ट त्याच्याकडून समजली पाहिजे होती ती गोष्ट त्याच्या बहिणीकडून समजली गेली होती. याचा तिला आता राग आला. एकवेळ तिच्या मनात आल की तेजश्रीलाच तुषारला फोन करायला लावून त्याला बोलावून घ्यावं. पण ती त्याच्या उलटा अर्थ काढून वेगळच काहीतरी धरून बसायची. त्यापेक्षा तिने स्वतःच तुषारला फोन करायचे ठरवले. मग ती लवकर लवकर प्रक्टिस घेऊ लागली. तसाही त्यांचा डान्स आता बऱ्यापैकी बसत आला होता.

काही वेळातच तिने त्यांची प्रॅक्टिस संपवली आणि तिने तिचा मोबाईल हातात घेतला आणि आधी तुषारला फोन लावला.

तुषार त्याच्या जिममध्ये आलेल्या त्याच्या कस्टमर्सकडून व्यायाम करून घेण्यात व्यस्त होता. त्याचा मोबाईल जरा बाजूला ठेवलेला होता. पहिले तर त्याच लक्षच नव्हत. म्हणून त्याला आलेला फोन काही समजला नाही. त्याने पहिला फोन उचलला नाही म्हणून परीने त्याला सारखा फोन लावायला सुरवात केली. आता तो सारखा व्हायब्रेट व्हायला लागल्यावर तुषारच त्याच्या फोनकडे लक्ष गेल.

मोबाईलवर नाव वाचून त्याच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल आली आणि लागलीच त्याने परीचा फोन उचलला.

“पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही मला भेटायला हवे.” परी कडक आवजात बोलली आणि सरळ फोन ठेवून दिला. परीच्या आवजात ऐकू आलेली गंभीरता बघून तुषारच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने तेजश्रीला फोन लावला.

तेजश्रीला वाटल की तिचा दादा तिला घ्यायला येत आहे म्हणून तो तिला फोन करत आहे, त्यामुळे तिने त्याच विचाराने तुषारचा आलेला फोन उचलला.

“हा दादू,” तेजश्री हलकेच हसत बोलली. “मी निघाले आहे. कुठे भेटशील?”

“आहे तिथेच थांब,” तुषार पण आता गंभीर होऊन बोलला. “मलाही नीट भेटायचं आहे तुला.”

तुषारच बोलण ऐकून तेजश्रीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिने तिची जीभ चावली. ‘मॅमने फोन केला वाटत दादाला. आता दादा मला काही सोडत नसतो.’ ती मनातच घाबरून बोलू लागली. पहिले तर तिने तिथून लगेच निघून जायचा विचार केला. पण नंतर ती घरात तर भेटणारच होती ना. आता काय कराव? ह्या विचारात ती असताना तिला एक रामबाण उपाय सापडला.

‘दादा मला भांडेल? पण मॅमला तर नाही.’ तेजश्री मनातच स्वतःवर खुश झाली आणि ती गालातच हसू लागली.

“अशी काय एकटीच वेड्यासारखी हसरत आहे गं?” मागून आलेल्या सुजाताने तेजश्रीला विचारलं.

मग तेजश्रीने जे आता काही झाल ते तिला सांगून दाखवलं. तशी ती पण हसू लागली. “म्हणजे आता तु पण मॅमला समोर करणार?” सुजाताने तिच्या मनातलं ओळखलं.

तस तेजश्रीने हसतच होकारात मान हलवली आणि त्या दोघी त्यांच्या मॅमकडे पळत सुटल्या. परी तर तिच्या स्टाफरूममध्ये बसून तुषारच्या येण्याची वाट बघत होती. पण नंतर तिला आठवलं की तिने तर तुषारला कुठे भेटायला यायचं ते ठिकाणच सांगितलं नव्हत.

‘परी वेडी झालीस का तू?’ परीने मनातच स्वतःला भांडून घेतलं. कारण आता परत तुषारला फोन लावावा लागणार होता. तिने तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून वर नेत केसांवरून मागे आणले आणि तोंड वाकड करत तुषारला फोन लावला.

तुषार तोपर्यंत त्याच आवरून निघाला देखील होता. आता परीने गंभीर होऊन फोन केला म्हणजे काहीतरी गंभीर विषय झाला असेल याची त्याला खात्री होती. तस तर तो तेजश्रीला देखील विचारू शकला असता. पण तेजश्रीने काहीतरी कारण सांगून तिथून पळ काढला असता. त्यामुळे त्याने तेजश्रीला काहीच सांगितले नव्हते.

गाडी चालू करून काहीच वेळ झाला असेल तोच त्याचा परत फोन वाजला. आता त्याचा फोन तर त्याच्या खिशात होता. तो कोणी केला? ते त्याला माहिती नसल्याने तो आलेल्या फोनला वैतागून भांडू लागला. कारण आता फोनवर बोलण्यासाठी त्याला त्याची बाईक हळू करावी लागणार होती. भले त्याने त्याचा मोबाईल ब्ल्यू टूथला जोडलेला असला तरी. त्याने त्याच वैतागत फोन उचलला. जस कानावर परीचा आवाज आला तसा त्याचा तो वैतागलेपणा दूर पळून गेला.

“ते कुठे भेटायचं ते सांगितलच नाही.” परी बारीक आवजात बोलली.

“मी कॉलेजमधेच येत आहे,” तुषार जवळ जवळ ऑर्डर देत बोलला. “तिथून कुठेच जाऊ नकोस.”

तुषारचा ऑर्डर देण्याचा सूर बघून चढल्या की आठ्या परीच्या. “मला ऑर्डर देणारे तुम्ही कोण?”

“तुझा बेस्ट फ्रेंड.” तुषार खट्याळ होत बोलला.

“एक मिनिट.” परी अजून चिडून बोलली. “माझा एकच बेस्ट फ्रेड आहे आणि मी त्याच्यासोबत खुश आहे.”

परीच्या ह्या वाक्याने तुषारच्या बाईकचे ब्रेक्स लागलीच करकचून लागले गेले. “व्हॉट?” त्याने चमकून विचारले. “तू खुश आहे त्याच्यासोबत?”

इकडे परी पण गोंधळून गेली. नंतर लागलीच जस तिला जाणवलं की तुषारचा वेगळाच काहीतरी गैरसमज झाला आहे. तशी तिला तुषारची मस्करी करायची अजूनच खुमखुमी आली.

“हा,” परी निवांत होऊन बोलली. “आता कोणीही त्याच्या बेस्ट फ्रेंडसोबत निवांत असत की. तुम्ही लवकर येता की मी त्याच्यासोबत जाऊ?”

हे ऐकून तुषारच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकायला लागले. “आलोच. जस्ट वेट अँड वॉच.” तुषार भलताच गंभीर झाला. तिकडे फोन ठेवल्यावर परी मात्र मनातच हसू लागली.

तर इकडे तुषारच्या बाईकचा वेग खूपच वाढला गेला आणि पुढच्या पाच मिनिटाच्या आत कॉलेजला पोहोचला. कॉलेजच्या गेटजवळ त्याने त्याची बाईक लावली आणि परीला कॉल लावू लागला. आता तर तिचा फोन व्यस्त सांगायला लागला. तसा तुषार अजूनच टेन्शनमध्ये आला. तिने तिच्या बेस्ट फ्रेंडला तर नसेल फोन लावला? हा प्रश्न त्याच्या डोक्यात घुमू लागला.

इकडे परी तिच्या वडिलांसोबत बोलण्यात व्यस्त होती. सुजयला पाडल्याबद्दल विजयला काही माहिती आहे का ती त्याचा अंदाज घेत होती. ती इकडून तिकडे फिरतच होती की तिची नजर तेजश्री आणि सुजातावर गेली. ज्या कधीच्या स्टाफरूमच्या दाराशी उभ्या राहून परीकडेच बघत होत्या. नंतर परीने त्यांना निरखून पाहीले तर त्या दोघी कधी दुसरीकडे नजर फिरवत काहीतरी बघण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच ते वागण बघून परी गोंधळात पडली. तिने इशारातच काय झाल? अस दोघींना विचारलं. तस त्या दोघींनी उगीच हसून दाखवत नकारर्थी मान हलवली.

तिचा फोन चालूच होता की तुषारचा फोन तिला वेटिंगवर दिसला. पहिले तर ती लगेच विजयचा फोन ठेवणार होती. मग तिला बेस्ट फ्रेंड हा विषय आठवला आणि जाणून तिने तिचा फोन व्यस्त ठेवला.

त्याचा सारखा सारखा येणारा फोन बघून परी गालातच हसत होती. आता तिच्याकडून अस का घडत होत? ते सध्या तिला समजत नव्हत. सध्या जे तिचं मन तिला सांगत होत ते ती करत होती. ते म्हणतात ना की मन एकदा का बुद्धीवर हावी झाल की ते कोणाचच ऐकत नाही. परीच अगदी तसच चालू होत.

काही वेळाने तुषारच परीला शोधत त्यांच्या स्टाफरूमकडे आला. तुषारला आलेलं बघून तेजश्री पटकन स्टाफरूमच्या आत पळाली. तिला अस पळत जाताना बघून सुजाता पहिले गोंधळून गेली. नंतर तुषारला येताना बघून ती हलकीच हसली.

तेजश्रीला अस धावत आपल्याजवळ येताना बघून परी पण पहिले गोंधळली. पण नंतर जसा तुषार आत आला तशी ती पण हलकीच हसली.

परीला अजूनही फोनवर बघून तुषार टेन्शनमध्ये येत तिला बघू लागला. शेवटी तिला तुषारचा तो पडलेला चेहरा बघवला गेला नाही आणि फोन ठेवताना ती मोठ्याने बोलली. “ठीक आहे बाबा. मी ठेवते आता.”

जसा बाबा असा शब्द ऐकला तस तुषारच्या जीवात जीव आला.

“तेजश्री तू जा बाहेर.” परीने तेजश्रीकडे पाहिलं.

पण तेजश्री कुठे बाहेर जात होती. तिने घाबरून नकारार्थी मान हलवली. सोबतच तुषारकडे इशारा करायला विसरली नाही. तस परीने एक दीर्घ श्वास घेतला.

“मिस्टर तुषार,” परी “का घाबरवता तुमच्या बहिणीला?”

“मी कुठे काय केल?” तुषारने त्याचे खांदे उडवले. “उलट घरात आमच जास्त जमत. आता तिने काहीतरी किडे केले आहेत म्हणून तुझ्याजवळ येऊन थांबली आहे.”

“जे काही असेल,” परी “उलट तिच्यामुळेच मला आज काही माहिती मिळाली. जी मला आधीच माहिती व्हायला हवी होती. त्यामुळे तिला काही बोलायचं नाही.”

आता तुषारने तेजश्रीकडे रोखून पाहिलं. तिनेच परीला सांगितल असल्याची त्याची शंका खरी ठरली आणि तेच त्याला नको होत. पण आता तिला कळल तर होत.

परीने तेजश्रीची बाजू लावून धरल्यावर ती थाटात त्या खोलीच्या बाहेर पडली.

मग परी तुषारजवळ आली आणि त्याला कॉलेजच्या मागच्या आवारातल्या एका मोकळ्या जागेत घेऊन गेली.

“का लपवलं माझ्यापासून?” परीने थेट मुद्याला हात घातला.

“कारण तुला माहिती आहे.” तुषार “तू टेन्शन घेत बसली असती आणि त्या टेन्शनमध्ये कोणताही निर्णय घेऊन मोकळी झाली असती.”

“मी लहान आहे का काहीही निर्णय घ्यायला?” परी कपाळवर आठ्या आणत बोलली.

“हो,” तुषार “जेव्हा तुझ्या ह्या माणसांचा विषय येतो तेव्हा तू काहीही करू शकतेस, याची मला खात्री आहे.”

“तुम्हाला काय माहित?” परी

“तितक मला माणसांना वाचता येत.” तुषार

आता परी तुषारला बघतच राहिली. मग तिला आठवलं की तिला तर तुषारपासून लांब राहायचं आहे. तेजश्री तर काही तिच्या भावाला परीचा निरोप सांगणार नव्हती. मग तिने स्वतःच तुषारसोबत बोलायचे ठरवले.

“आणि एक.” परी दुसरीकडे बघत बोलली. “अस नका समजू की तुमचे चालू असलेले प्रयत्न मला समजत नाहीत. पण एक गोष्ट सांगते. मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही माझा विषय सोडा.” परी हे सगळ एका दमात बोलून गेली.

“हेच माझ्याकडे बघून बोल.” तुषार तोऱ्यात बोलला.

तस परीने त्याला चिडून पाहिलं.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →