मागील भागात.
“काय झाल रे?” प्रसादने राजला त्याचे डोळे हलकेच पुसताना पाहीले.
“कुठे काय काही नाही.” राजने नेहमीप्रमाणे त्याच्या शैलीत उत्तर दिले.
“मी आज भेटलो आहे का तुला?” प्रसाद जरा चिडून बोलला आणि त्याच्यावरची नजर काढून प्रसादने समोर परीकडे पाहिलं. मग त्यालाही राजचे डोळे भरून येण्यामागच कारण समजल.
“काहीतरी चांगल होत आहे ना,” प्रसाद परी आणि तुषारकडे बघत बोलला. “तुझे भरलेले डोळे बघून ती ते पण सोडून देईल.”
तस राजने त्याच्या मोठ्या भावाकडे पाहिलं.
“तुला चांगलच माहिती आहे ती तिच्या माणसांच्या डोळ्यात तिच्यामुळे आलले अश्रू कधीच पाहू शकणार नाही.” प्रसाद
“हम्म ते पण आहे.” राज एक दीर्घ श्वास घेत बोलला. “त्यांना बोलू दे, आपण चल तिकडे.”
राजने परीवर नजर टाकली आणि ते दोघेही सुजयच्या खोलीकडे निघून गेले.
आता पूढे.
ते दोघेही जसे आत शिरले तसा सुजय त्या दोघांना वैतागलेला दिसला. एका बाजूला त्याची आज्जी तर दुसऱ्या बाजूला त्याच्या दोन्ही आत्या. इतकी सारी काळजी आणि प्रेम बघून सुजयला ते अति वाटायला लागल होत. कारण त्याला इतक लागल देखील नव्हत जेवढी त्याची काळजी घेतली जात होती. त्यात आता नयन पण त्यांना जोडली गेली होती. तरी नशीब ती इथे नव्हती. नाहीतर ह्या खोलीच चीडीयाघर झालेलं बघून ती नक्कीच ह्या सर्वांवर चांगलीच चिडली असती. तरी त्याची सगळी फॅमिली तिथे जमा झाली नव्हती. ते एक एक करून येऊन भेटून गेले होते.
अजून काही वेळाने सायली आणि प्रणाली तिथे येऊन पोहोचल्या. त्यांच्या एकत्र येण्याचा योगच जुळून आला होता. जश्या त्या दोघी सुजयच्या खोलीत आल्या तशी सायलीची आई उठली आणि ह्या दोघींच्या जवळ जाऊ लागली. सायलीचे आई वडील थेट घरी न जाता इथे आले होते. त्यामुळे ती पण तिच्या आईला भेटायला उत्सुक होती. जितक्या लवकर तिचे हात तिच्या आईकडे पसरले गेले होते तितक्याच लवकर तिचे गाल देखील फुगले गेले. कारण सायलीच्या आईने पहिले प्रणालीला मिठी मारली होती आणि प्रणालीने नेहमीप्रमाणे सायलीला जीभ दाखवून चिडवून घेतलं होत.
“नॉट फेअर आई.” सायली
“नॉट फेअर काय?” सायलीची आई तिचं तोंड वाकड करत बोलली. “ही किमान दिवसातून एक फोन तरी करत होती. पण तू, तू तर मला विसरूनच गेली होती ना.”
“जाऊदे,” सायली गाल फुगवून बोलली आणि तिच्या वडिलांकडे वळली. “बाबा.” एवढं बोलून ती पटकन त्यांच्या कुशीत शिरली आणि प्रणालीकडे तोऱ्यात बघू लागली.
“ॲकच्युली ती मला इथे येण्याआधीच भेटली होती.” सायलीचे वडील हलकेच हसत बोलले. “ते येता येता मी एका दुकानात चाललो होतो तेव्हा ती मला भेटली. मला जे घ्यायचं होत ते ती आणेल सांगून मला परत पाठवून दिल. तेव्हा तुझी आई फक्त गाडीत बसून राहिली होती. म्हणून ..” ते बोलता बोलता थांबले. कारण सायली त्यांना पण गाल फुगवून बघू लागली.
तिला बघून प्रणाली खळखळून हसू लागली. “मी पण तेव्हाच आली असती पण बाबांना सुजयच्या आवडीचा केक घ्यायचा होता. मग म्हटलं की तुम्ही चला पुढे मी आलेच तो केक घेऊन.” एवढं बोलून तिने बाजूला ठेवलेला केक बाहेर काढला.
तरीही सायलीने तिचं तोंड वाकड केल. कारण तिच्या आधी प्रणाली आई बाबांना भेटली होती आणि त्या दोघींमध्ये ही स्पर्धा चालूच राहायची की आधी आई बाबांना कोण भेटत? कधी सायली बाजी मारत होती तर कधी प्रणाली. मागच्या वेळेस जेव्हा मोहिते साहेब आले होते. तेव्हा मोहिते साहेबांनी सायलीच्या वडिलांना थेट घरी बोलावून घेतले होते. तेव्हा सायली पहिल्यांदा तिच्या वडिलांना भेटली होती तर आज प्रणालीने ती संधी साधली होती.
“कोणाला केक आणला आहे? आणि कोणाला विचारून?” ... मागून आवाज आला.
सायलीने तर तो अवज ओळखला पण प्रणालीला ते वेगळच वाटल.
“कोणाला विचारून म्हणजे?” प्रणाली लागलीच चिडून बोलली. “मी माझ्या लेकाला आणला आहे तुला काही प्रोब्लेम?”
“हो,” ती पण तितक्याच ठसक्यात बोलली. “इथे हॉस्पिटलचे काही नियम आहेत. जे पाळावे लागतात. तुमचे लाड तुमच्या घरी.” नंतर ती सुजयकडे वळली. “आणि तुला आता केक खायचा आहे?” ती कमरेवर तिचे हात ठेवत बोलली.
“ही का त्याच्यावर दादागिरी करत आहे?” प्रणाली अजूनच चिडीला आली आणि सायलीकडे बघून बोलू लागली. “आणि तो फक्त ऐकून घेत आहे? नर्स आहे तर नर्स सारखी राहा ना.”
सायलीला हसू येत होत. तर सायलीचे आई वडील देखील गोंधळून गेले होते. त्या नर्सने सुजयला अस ओरडलेलं त्यांनाही आवडलं नव्हत.
सायलीला हसू येत होत. तर सायलीचे आई वडील देखील गोंधळून गेले होते. त्या नर्सने सुजयला अस ओरडलेलं त्यांनाही आवडलं नव्हत.
“म.. म.. मी .. कुठे,” सुजय चाचरत बोलला. “ते मावशीनेच आणला आहे.”
मग ती पुन्हा प्रणालीकडे वळली. “ठीक आहे ना, मग घरी गेले की खावा. पण इथे नाही.”
प्रणाली काही बोलायला जाणार तोच सायली पटकन पुढे आली आणि प्रणालीच्या कानात बोलू लागली. “आतापासून सुनेचा जाच करायचा आहे का?”
“सुनेचा?” प्रणाली गोंधळून गेली. इथे ती नर्स डोक लावत होती आणि सायलीच वेगळच काहीतरी चाललेलं बघून ती सायली वर पण चिडली. “काय येताना डोक्यावर पडली होती का?”
“मी तुला पहिले भेटली नाही याचा खूप त्रास झाला का तुला?” सायलीची आई काळजीने सायलीकडे बघत बोलली.
आता मात्र सायलीने डोक्याला हात लावून घेतला. “आपल्या लेकाची गर्लफ्रेंड आहे ती.”
“असुदेना,” प्रणाली भावनेच्या भरात बोलली. “असेल ती तिच्या घरी, पण इथे नर्स....” आता तिने चमकून सायलीकडे पाहिलं. “काय बोलली तू?”
“जे तू ऐकलस.” सायली हसतच बोलली.
मग प्रणालीने नर्सकडे पाहिलं.
“मावशी,” सुजय बोलू लागला. “ही नयन आणि नयन ही माझी मावशी.”
“हाय.” नयनने मंद स्मित केल.
“अरे,” प्रणाली “ही तर आता चिडली होती ना आणि आता हसून दाखवते. काय मला चिडवत आहे का?”
“अम्म तस नाही,” नयन “तेव्हा मी नर्स म्हणून बोलत होते आणि आता त्याची ग..” तिने जीभ चावली. “आता त्याची मैत्रीण म्हणून बोलत आहे.”
“इतक्या लवकर तर सरडा पण रंग बदलत नाही.” प्रणाली
“कारण तो माणूस नाही.” नयनने तितक्याच हजरजबाबीने उत्तर दिल.
“मावशी तिच्यासोबत बोलण्यात कोणीच जिंकू शकत नाही.” सुजय
“शांत बसा रे,” सायलीची आई मधेच बोलली. “इथे काय चालल आहे आणि तुमच काय?”
“मग काय तर?” सायलीचे वडील “आज सून मिळाल्याची एवढी चांगली बातमी मिळाली आणि तुमचं काय मधेच?”
मग प्रणालीच्या डोक्यात प्रकाश पडला. “अरे हो,” तिने आता नयनकडे आनंदाने पाहिले. “इकडे ये तू.” आता प्रणालीने तिला तिच्या बाजूला घेतलं.
“अरे यार,” सुजय वैतागून बोलला. “मी जाऊ का घरी?”
“अरे यार,” सुजय वैतागून बोलला. “मी जाऊ का घरी?”
“तुला सांगितला का जायला?” कोणी बोलण्याआधी नयन बोलली. “नाही ना. मग गप्प पडून राहा. विसरू नकोस की तुला बरं नाहीये”
“ते तुम्ही विसरू नका.” सुजय कपाळावर आठ्या आणत बोलला.
“तिकडे नको लक्ष देऊ.” प्रणाली नयनचा हात धरून बोलली. नंतर ती सायलीकडे वळली. “आता तुला वेगळ सांगू?” तशी सायली पण तिच्याकडे आली.
मग त्या तिघी सायलीच्या आईजवळ जाऊन बसल्या. सायलीने राधिकावर नजर टाकली. तश्या प्राजक्ता आणि राधिका त्या दोघी देखील त्यांच्यात येऊन बसल्या आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. इकडे सुजय त्यांना बारीक डोळे करून बघू लागला. पण त्यांच्या गप्पांचा काहीच अंदाज त्याला येत नव्हता.
सायलीचे वडील तर राहुलच्या वडिलांना फोन लावायला त्या खोलीतून बाहेर पडले. बरेच दिवस झाले त्यांची भेटच झाली नव्हती आणि आता तर सुजय हॉस्पिटलमध्ये आहे तर ते येणारच होते. ते कधी पोहोचतील याची माहिती घ्यायला ते फोन लावत होते.
मग राज आणि प्रसाद त्याच्याजवळ जाऊन बसले.
“हे असच असत,” प्रसाद एक दीर्घ श्वास घेत बोलला. “एकदा का सून घरी आली की मुलगा लांब केला जातो.”
सुजय त्याच्याकडे बघू लागला. “म्हणजे तिकडे माला आली की तुला पण घरात विसरून जातात?”
तशी राज आणि प्रसाद दोघांनी होकारात मान हलवली.
“ती अजून तरी घरी आली नाहीये,” राज “पण फोन चालू झाले आहेत आणि त्यातच ही सुरवात झाली आहे.”
आता सुजय घाबरून जात रंगलेल्या गप्पांकडे बघू लागला. नंतर त्याची नजर बाजूला गेली. त्यातली एक नजर प्रसादकडे रागात बघत होती. ते बघून सुजयला हसू आल आणि त्याने प्रसादकडे पाहिलं.
सुजयला अस हसताना बघून प्रसाद गोंधळून गेला.
“आज काही खरं नाही तुझ.” सुजय हळूच प्रसादच्या कानात बोलला.
तसा प्रसाद विचारात पडला आणि खाडकन त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.तसे त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले.
इकडे बाहेर तुषार परीची पाठ काही सोडत नव्हता, ती जिथे जाईल तिथे तो जात होता. एकतर तिची सुरक्षा महत्वाची होती आणि ती आता एकटीच फिरत होती. जी माणस सुजयवर हल्ला करू शकतात ते परीला देखील नुकसान पोहोचवू शकत होते. त्यामुळे तुषार काही तिला एकटीला सोडायलाच मागत नव्हता आणि दूसरी गोष्ट म्हणजे त्याला तिच्यासोबत वेळ घालवायची संधी मिळत होती. ती त्याला सोडायची नव्हती.
“मिस्टर तुषार काय चालू आहे तुमच?” परी वैतागून कमरेवर हात ठेवत बोलली. “काही हवं आहे का माझ्याकडून? की काही चूक झाली माझी?”
“तस तर काहीच नाही.” तुषार त्याचे खांदे उडवत बोलला.
“मग माझ्या मागे का येत आहात?” परी
“मागे कुठे तुझ्या सोबत चालत आहे.” तुषार सहज बोलून गेला.
“तेच ते,” परी मानेला झटका देत बोलली. “पण का?”
“का म्हणजे?” तुषार “मी माझ्या फ्रेंडला अस एकट थोडीच सोडू शकतो.”
“मग मी जाते सुजयकडे.” परी तिचे पाय आपटत बोलली.
“तिथे आधीच खूप गर्दी झाली आहे,” तुषार “तुझी आत्या पण आली आहे. बाकी तुझी बंधू मंडळी तर आहेच.”
“काय आत्तु आली आहे?” परीने चमकून विचारलं.
तशी तुषारने होकारात मान हलवली. ते बघून परी पटकन सुजयच्या खोलीकडे पळाली. तिथून जाता जाता मात्र मागे वळून तुषारवर नजर टाकायला विसरली नव्हती. ह्या एका गोष्टीने तुषारच्या मनाला इतक समाधान मिळाल की त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमलले आणि तो देखील त्याच्या घरी निघून गेला.
परी सुजयच्या खोलीत पोहोचतच होती की दारात तिला माला दिसली जी चिडून बाहेर चालली होती. तिच्यापाठी प्रसाद देखील येताना तिला दिसला. तस परीने मालाला दाराच्या बाहेरच पकडून घेतलं.
“काय झाल माला?” परीने मालाचा चिडलेला चेहरा पाहून तिला विचारलं.
“त्यालाच विचार ना.” माला लहान मुलीसारखी बोलली.
मग परीने प्रसादकडे पाहिलं. तस प्रसादने आत जे काही झाल ते तिला सांगून दाखवलं.
“जा मनवं तिला.” परी इतकच बोलली.
तशी माला अजूनच तोऱ्यात येत तिथून चालली गेली आणि तिच्यापाठी प्रसादही गेला.
प्रसाद तिथे आल्यापासून मालाला नाही भेटला होता आणि नाही काही बोलला होता. एकतर कालच त्यांच्या नात्याला अधिकृतरित्या मान्यता दिली होती आणि ह्या दुसऱ्या दिवशीच त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यात सुना आल्या की घरचे मुलांना लांब करतात हे वाक्य ऐकून मालाला जरा रागच आला. कारण ह्यात तर मुलींची काही चूक नसते ना. मुलाच्या घरच्यांनी मुलीला स्विकारण ही तर तिच्यासाठी चांगली गोष्ट असते. पण त्यांच चालू असलेल बोलण ही एक मस्करी होती जी लग्न ठरल्यावर प्रत्येकाची होत असते. ते आपल्या मालाला कोण समजवून सांगेल नाही का? ते तिने समजून घेतल नाही आणि प्रसादला रागत बघत तिथून बाहेर चालली गेली. डोक्यात प्रकाश पडलेला प्रसाद देखील पटकन तिच्या मागे मागे जाऊ लागला.
आता मात्र माला काही थांबायचं नाव घेत नव्हती. आता ती अशी सहज थांबणार नाही हे प्रसादला समजून चुकल. दुसऱ्याच क्षणी त्याचा पाय मुरगळला गेला आणि त्याने कळवळून त्याचा पाय पकडून खालीच बसला.
प्रसादचा वेगळा आलेला आवाज बघून मालाने देखील पटकन मागे पाहिलं. प्रसादला अस कळवळताना बघू मालाला धडकीच भरली आणि ती पटकन प्रसादजवळ आली. तिने प्रसादला बाजूच्या खुर्चीवर बसवायला म्हणून त्याला उभ राहायला मदत केली. तिने तिच्या एका हाताने त्याचा हात पकडला आणि तिचा दुसरा हात त्याच्या मानेच्या मागून नेत त्याच्या खांद्यावर ठेवला. ती त्याला एका रुमच्या बाजूला असणाऱ्या खुर्चीवर त्याला बसवणारच होती की माला अचानक हवेत उचलली गेली आणि प्रसादने तिला त्याच बाजूच्या खोलीत उचलून नेल. ज्या खोलीत कोणीच नव्हत.
हे सगळ काही एका सेकंदात घडलं. त्यामुळे ते मालाला समजून यायला जरा वेळ गेला. ती आश्चर्याने प्रसादला बघू लागली. प्रसादने लागल्याच नाटक केल्याचे माला समजताच ती त्याला रागात बघू लागली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. माला त्या खोलीत प्रसादच्या दोन्ही हातांमध्ये कैद झाली होती. त्याची ती कैद सोडवायची हिम्मत मालामध्ये नव्हती. त्याच्याजागी दुसरा कोणी असता तर तो त्याच हॉस्पिटलच्या एका बेडवर पट्टी बांधत असता.
“माझ्याशी अशी मस्करी आज्जीबात करायची नाही.” माला चिडून बोलली. तिचं हृदय अजूनही जरा जोरात धडकत होत. तिने प्रसादचा एक हात काढला आणि तिच्या हृदयावर ठेवला. “हे बघ किती घाबरली होती मी.”
प्रसादने तिच्या हृदयावरचा तो हात काढला. त्याच्यासोबत भिंतीवर असणारा दुसरा हात देखील काढला आणि त्याचे दोन्ही हात तिच्या गालवर ठेवले.
“मग माझ बोलण पूर्ण ऐकून न घेता अस मला सोडून ही जायचं नाही,” प्रसाद भावूक होऊन बोलला. “तू फक्त घाबरली होती. पण जर अशी गेलीस तर माझ हृदय बंद पडेल..” प्रसाद पुढे काही बोलूच शकला नाही. कारण मालाचा एक हात त्याच्या तोंडावर आला होता.
“सॉरी.” मालाने त्याला घट्ट मिठी मारली. प्रसादने देखील तिला तसाच त्याच्या मिठीत कवटाळून घेतलं.
इकडे परी त्या खोलीत आली. तस तिने पाहिलं तर महिला मंडळ एका बाजूला बसलं होत तर सुजय, राज, आदेश, जय, आरुष एका बाजूला बसले होते.
नयनला पडलेला घेराव बघून त्यांना सगळ काही समजून गेल आहे याची कल्पना परीला आली. मग ती देखील त्यांच्यात जाऊन बसली.
इकडे हा सगळा गोंधळ चालू असताना तिकडे मनाली मात्र एका फोनची आतुरतेने वाट बघत होती. रावीने जस तिला घरी सोडलं होत तसा तिच्या मोबाईलवर एक फोन आला होता. पहिले तर अनोळखी नंबर बघून तिने काही तो उचलला नाही. पण तो सारखाच वाजत असल्याने तिने शेवटी तो उचललाच.
“तुला जर तुझ्या खऱ्या आई वडिलांची माहिती हवी असेल तर मी जो पत्ता पाठवेल त्या पत्त्यावर येऊन भेट. थोड्यावेळाने मी पत्ता सांगायला तुला परत फोन करेल आणि हो ही गोष्ट कोणाला सांगितलीस तर तू तुझ्या खऱ्या आई वडिलांना कायमच गमावशील.”
एवढं बोलून तो फोन कट झाला होता. समोरच्या माणसाने मनालीला बोलायला संधी देखील दिली नव्हती. मनाली तिच्या मोबाईलला बघतच राहीली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
