मागील भागात.
आता सुजयने सुटकेचा श्वास सोडला.
“एक मिनिट,” परीला काहीतरी आठवल. ती रावीकडे बघून विचारू लागली. “तू कॉलेजला नाही गेलीस?”
आता रावीने तिची जीभ चावली. “गेली होती पण मग लगेच निघून आली. ते कॉलेजमध्ये अन्युअल फंक्शनची तयारी सुरु झाली ना. मग लेक्चर काही होत नाहीयेत. मग आली मी इथे.”
“अरे हो,” परी पण आठवत बोलली. “त्या मुलींच्या डान्सचा फायनल टचअप पण करायचा आहे.”
“चालू आहे त्यांची प्रॅक्टिस,” रावी “पाहून आली मी कॉलेजमध्ये. दा बद्दल विचारत पण होत्या.”
“ठीक आहे.” परी “जाऊन बघावं लागेल.”
“मी आहे ना आता,” नयन परीकडे बघून बोलली. “तुम्ही जाऊन येऊ शकता.”
“मध्ये बोललच पाहिजे का?” रावी नयनकडे बघून परत सुरु झाली.
आता पूढे.
“मग तुला ते समजायला हवं ना आता मधेच बोलण्याआधी.” नयन पण मागे रहाणार नव्हती.
“जाऊदे मीच जातो.” सुजय वैतागून उठत बोलला.
“उठून तर बघ.” नयन थेट त्याला धमकी देत बोलली. तसा सुजय परत बेडवर पसरला गेला.
मग नयन परत रावीकडे बघू लागली. “आणि तुम्ही घरी गेले तरी चालेलं, मी आहे.”
“ते सांगणारी तू कोण?” रावी
“तुला उगाच मी मंद बदक नाही बोलत.” नयन तिच्या मानेला झटका देत बोलली.
“तू ना..” रावी अजूनच चिडून बोलली.
“रावी” परी कडक आवाजात बोलली. “तू जा बर घरी.”
“तू तिची बाजू नको घेउस.” रावी तिच्या कपाळवर आठ्या आणत बोलली.
“रावी.” परीने तिला रोखून पाहीले.
तशी रावीने नयनला रागात पाहिलं आणि त्या खोलीतून बाहेर पडली. पुढच्या क्षणी नयन देखील तिच्या बाकीच्या पेशंटकडे निघून गेली. आता परत त्या खोलीत शांतता पसरली. काही वेळाने तुषार तिथे येऊन पोहोचला. येता येता तो विजयला देखील भेटून आला. विजय त्या माणसाना भेटून आल्याचे त्याला समजले होते. मग त्याने तिथे काय झाल ते विजयला विचारलं. ते ऐकून परीला जरा सांभाळून घ्याव लागेल असा तो विजयला भावनेच्या भरात बोलून गेला.
तुषारला असलेली परीची काळजी बघून तो त्याला क्षणभर बघतच राहीला. आजवर तो माणस वाचायला कधीच चुकला नव्हता. जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तेव्हा तुषार वेळेवर पोहोचलेला होता. अगदी परीच्या वेळेस देखील आणि आता सुजयच्या वेळेस देखील. तस बघायला गेल तर तो त्यांच्या मुलांचा फक्त एक कोच होता. त्याचं बाहेरच्या गोष्टींशी काहीच देण घेण नव्हत, तरीही तो एका कुटुंबाप्रमाणे त्याच्या विद्यार्थ्यांच्या मागे उभा राहीला होता. पण परीचा तर याच्याशी काही संबंध देखील नव्हता. तरीही त्याच्या मनातली ती काळजी विजयला बरचं काही सांगून बघत होती.
विजयला भेटल्यावर तुषार आता सुजयला भेटला. परी तर तिथेच सुजयच्या बाजूला बसली होती. जसा तुषार आत आला तशी ती तिथून उठली आणि बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसली. तुषारने त्याची विचारपूस केली. त्याच भावनेच्या भरात सुजयने त्याचे आभार मानले.
“तुमच्यामुळे आधीच अलर्ट झालो नाहीतर..” सुजय बोलता बोलता थांबला. कारण तुषारने त्याचा पटकन हात दाबून धरला. मग तिथे असलेल्या परीला काहीच माहिती नसल्याचे त्याला आता आठवले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. परीच्या कानावर ते वाक्य जाऊन आदळलं होत आणि निवांत होऊन बसलेली परी पटकन उठून त्या दोघांजवळ आली.
“काय केल ह्यांनी?” परी बारीक डोळे करून विचारू लागली.
आता झाली का पंचायत. सुजयची तर बोलतीच बंद झाली. त्याला अस भांबावलेलं बघून परीच्या मनात शंकेच काहूर उठल. तिच्या मनात अजून दुसरे कुठले विचार येतील त्या आधीच तुषारने बोलायला सुरवात केली.
“ते पुढचा आलेला टर्न मीच त्याला सांगितला होता ना,” तुषार “म्हणून त्याला गाडी कंट्रोल करायला जरा वेळ मिळाला. म्हणून तर फक्त खरचटलं आणि त्याच डोक डीव्हाईडरमध्ये असलेल्या गवतावर टेकल गेल. त्यामुळे तो माझे आभार मानत आहे बाकी काही नाही.”
“मी तुम्हाला विचारलं?” परी कपळावर आठ्या पाडून बोलली आणि नंतर सुजयकडे पाहिलं. “आता तर तू तेच सांगशील ना जे तुझ्या कोचने तुला शिकवलं.”
यावर सुजयने फक्त त्याचे खांदे उडवले.
“तुमच्यामुळे बिघडली आहेत ती सगळी.” परीचा राग तुषारवर निघाला.
“हे बरं आहे,” तुषार नाटकी चिडत बोलला. “एकतर तुझ्या भावाला एवढ्या मोठ्या ॲक्सीडेंन्ट पासून वाचवल आणि एक तू आहेस की मलाच भांडत आहेस.”
‘अरे ती नयन कमी होती का आता सर पण सुरु झाले.” सुजय मनातच वैतागला.
“त्यासाठी नाही बोलत मी काही,” परी तोऱ्यात बोलली. “तुमच्यामुळे ते माझ्याशी पण खोट बोलायला लागली.”
“त्यांची एवढी हिम्मत?” तुषार “तुझ्यापुढे ते माझ पण काही ऐकत नाही. तुझ्यामुळे ते माझ्याशी किती खोट बोलले ते विचार ना. किती तरी वेळा त्यांनी प्रॅक्टिस बुडवली असेल त्यांच्या कॉलेजच्या वेळेला.”
“आता माझे भाऊ आहेत तर तेमाझंच ऐकतील ना.” परी अजूनच चिडून बोलली.
आता तुषार बसलेला असल्याने परीला काही मान वर करून बघायची गरज लागत नव्हती. पण तुषारला तर परीचा तो वर झालेला चेहरा बघायचा होता जो डोळेही वर करायचा. मग काय? उठला की तुषार त्याच्या जागेवरून. जसा तो उठत होता तशी परीचा चेहरा वर वर होत होता. काही वेळाने तिचा चेहरा पूर्ण वर होऊन तिचे डोळे देखील तिच्या वरच्या पापण्यांना भिडले.
बास ! तुषार तिथेच घायाळ झाला. तिचा हा चेहरा तो कितीही वेळ बघू शकत होता. पण अशी वर केलेली मान नंतर भरून येते ते आठवताच नाराजीने त्याची नजर दुसरीकडे करत होता. जेणेकरून परी देखील तिची मान खाली करेल.
तुषार आणि परीला बघून सुजयने मनातच सुस्कारा सोडला. ‘अरे मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि सरांना रोमान्स सुचत आहे. मग त्याची नजर परीवर गेली तर तो तिला बघतच राहीला. कारण परी पण तुषारला बघत राहिली होती. तिच्या बुद्धीने त्याच्यापासून कितीही लांब जायचा प्रयत्न केला तरी तिचं मन सारख त्याच्याजवळ जात होत. आता जरी ती त्याचा राग राग करत होती. पण तो फक्त वर वरचा होता. कारण त्याने तो तिच्यापासून दूर जाईल अस वाटत होत. पण त्याने तिच्या भावाचा जीव वाचवला ही गोष्ट देखील तितकीच खरी होती. जे तिचं मन तिला सांगत होत आणि त्यामुळेच तिचं ते मन आता त्याला बघत राहील होत.
‘अरे यार काय चालू आहे दीच?’ सुजयला आता तिथे जरा ऑकवर्ड वाटू लागल.
काही वेळातच बाकी बंधू मंडळी तिथे येऊन पोहोचली. आरुष तर नुकताच घरी गेलेला असल्याने तो काही आता आला नाही. ही बंधू मंडळी आलेली बघून बाहेर उभा असलेला विजय त्याच्या कामावर निघून गेला.
जसा दार उघडण्याचा आवाज आला तशी परी भानावर आली आणि वास्तवाची जाणीव होताच परत तिची बुद्धी तिच्या मनावर भारी पडली. ती पटकन तुषार पासून लांब झाली आणि परत तुषारला रागात बघू लागली. तिचं हे बदलेलं रूप बघून तुषारला हलकसं हसू आल.
आलेले ते तिघे सुजयजवळ येऊन बसले आणि मग त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
‘काय करते परी?’ परीने मनातच स्वतःच्या टपलीत मारून घेतली. ‘तुझ हे आयुष्य फक्त तुझ्या कुटुंबासाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचाही विचार करू नकोस.’
तुषारला बघता बघता तिच्या मनातल्या त्या भावनांनी उचल खाल्ली होती. तिचं उचल आता परी शांत करून बघत होती. मग तिला तिथे काही थांबवलं गेल नाही आणि ती सरळ त्या खोलीच्या बाहेर पडली. तिला आता तिचं मन मोकळ करण्यासाठी राजची आठवण आली. ण तो ही आज संध्याकाळीच येणार होता. तस तिने बोलावलं तर तो आहे तसाच आला असता. पण परीला ते बरोबर वाटल नाही. म्हणून तिने आता काही त्याला फोन केला नाही.
नयन जी तिच्या बाकी कामासाठी गेली होती ती परत सुजयच्या रूममध्ये आली. तिला तिथे बघून माला, जय, आदेश या तिघांच्या कपाळावर आठ्या आल्या. पण आज नयन काही त्यांना घाबरली नाही. कशी घाबरेल? तिने त्यांच्या लाडक्या दी लाच तिच्या बाजूने करून घेतलं होत. मग ती बिनधास्त तिथे आली आणि सुजयला गोळ्या देऊ लागली.
“ही काय करते इथे?” माला हळूच आदेशच्या कानात बोलली. कारण तिला वाटल होत की परीला काहीच माहिती नाही.
“ते तिने मला सांगितलं की सांगेल तुला.” आदेश त्याच तोंड वाकड करत बोलला. तस मालाने त्याला चिडून पाहिलं. “ती इथे काम करते म्हटल्यावर ती इथेच असणार ना.”
“ते तिने मला सांगितलं की सांगेल तुला.” आदेश त्याच तोंड वाकड करत बोलला. तस मालाने त्याला चिडून पाहिलं. “ती इथे काम करते म्हटल्यावर ती इथेच असणार ना.”
“हो,” माला “पण मग सुजय कसा तिला जवळ येऊ देत आहे?”
“थांब त्याला विचारतो.” आदेश कपाळावर आठ्या आणून सुजयकडे जायला निघाला.
“आहे तिथेच उभे रहा.” आदेशला सुजयजवळ येताना बघून नयन कडक आवाजात बोलली. “एकदा का गोळ्या आणि बाकी चेक अप झाल की त्याला भेटा.”
नयनला अस चिडून बोलताना बघून आदेश पण रागाला आला. तो काही बोलायला जाणार तोच सुजय बोलू लागला.
“तो दीचा माणूस झाला आहे आता.” सुजय दीर्घ श्वास घेत बोलला.
तस माला, आदेश आणि जय डोळे विस्फारून बघू लागले. तर नयन त्या तिघांना तोऱ्यात बघू लागली. सध्या ते तिघे तर शांत बसले. एकदा का नयन त्या खोलीतून बाहेर पडली की तिच्याबद्दल सुजयला ते विचारणार होते.
आता ह्यांची जुगलबंदी बघायची तुषारला आजीबात इच्छा नव्हती. त्याने ती आधीच त्यांच्या ॲकेडमीमध्ये चांगलीच पहिली होती. मग तो देखील तिथून बाहेर पडला आणि परीला शोधू लागला.
इकडे नयन मात्र सुजयच चेक अप खूपच मनापासून करत होती त्याला गोळ्या देखील खूपच काळजीने देत होती. ते बघून ह्या तिघांना नयन आणि सुजयचे आधीचे दिवस आठवले. तेव्हा देखील नयन त्याची अशीच काळजी घेत असायची. काल तिला हॉस्पिटलमध्ये पाहिल्यावर ती सुजयकडे लक्ष देते की नाही असा विचार ह्यांच्या मनात येऊन गेला होता. ज्याच उत्तर त्यांना ह्याच हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा मिळाल होत.
सुजयजवळच काम आटपून नयनने त्याच्यावर एक प्रेमळ नजर टाकली आणि तिच्या दुसऱ्या कामांकडे निघून गेली. जशी ती तिथून बाहेर पडली तसे हे तिघे सुजयजवळ आले आणि सुजयने देखील कालपासून जे काही झाल ते सगळ त्यांना सांगून दिल. मग ते तिघेही विचारात पडले.
जरा वेळ झाला तोच बाकीची वरिष्ठ मंडळी एक एक करून सुजयला भेटायला येऊ लागली. दुपार झाली होती तेव्हा सायलीचे आई वडील देखील तिथे येऊन पोहोचले. ते थेट गावावरून इथे आले होते. सायलीच्या आईची तर रात्रीच निघायची तयारी होती. पण विजयने त्यांना कसेतरी समजावून सकाळी निघायला लावलं होत.
इकडे बाहेर तुषार परीजवळ जाऊन थांबला. जी हॉस्पिटलच्या आवारातल्या एका खिडकीपाशी उभी होती. तुषारला ती कुठल्याश्या विचारात हरवलेली दिसली.
“इतका कसला विचार चालू आहे?” तुषारने अचानक विचारलं.
असा अचानक आवाज आल्याने परी जरा दचकलीच. नंतर तुषारला बघून तिच्या कपाळावर आठ्या आल्या.
“तुम्ही इथे काय करत आहात?” परी वैतागून बोलली. एकतर त्याच्यापासून लांब होता येत नाही म्हणून ती बाहेर निघून आली. तर तो देखील तिच्यामागे तिथे आला होता. “सुजयला भेटायला आलात ना? मग त्यालाच भेटा.”
“अच्छा,” तुषारला जरा मस्करी करायची लहर आली. “म्हणजे मी फक्त त्याला भेटायला आलो म्हणून तुला राग आला का? पण आता भेटलो की तुला.”
तशी परीच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच गडद झाल्या. “तुम्हाला आताही फ्लर्ट करायचं सुचत आहे? जेव्हा की तुमचा विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये आहे.”
“तो अगदीच ठीक आहे.” तुषार “आज संध्याकाळी त्याला सोडणार आहेत. म्हणून मग आता तुला भेटायला आलो.”
ते ऐकून परीने तिचं तोंड वाकड केल. “मला भेटायचं कारण?”
“का? फ्रेंडला भेटण्यासाठी कारण लागत का?” तुषार
“मी कधी फ्रेंड झाली?” परीला आता हलक हसायला आल होत.
“मिस अवनी,” तुषार पण मंद स्मित करत बोलला. “आपण एवढ्या वेळा भेटलो, बोललो. तर आता किमान मैत्री तर व्हायला पाहिजे ना.”
तुषारच अवनी बोलण परीच्या मनाला थंड हवेची झुळूक देऊन गेल. परी या नावाखाली तिचं अवनी हे नाव लपून गेल होत आणि ते तिने स्वतःहून केल होत. पण आज तुषारच्या तोंडून अवनी हे नाव ऐकून तिच्या मनाला एक थंडावा मिळाला होता. ज्याने तिच्या मनातल्या प्रेम या भावनेने परत उचल खायला सुरवात केली. त्याच उचल खाल्लेल्या मनाने त्याची मैत्री कधी स्वीकारली ते तिलाही समजल नाही.
ह्या दोघांना एकमेकांमध्ये गुंग झालेलं बघून नुकताच हॉस्पिटलमध्ये आलेला राजला जरा भरूनच आल. तो प्रसाद, राधिका आणि प्राजक्ता सोबत तिथे आला होता. प्राजक्ता आणि राधिका तर पटापट चालत कुठेही न बघता सरळ सुजयच्या खोलीकडे गेल्या होत्या. राज आणि प्रसाद मात्र त्या दोघींच्या मागून चालत येत होते. तेव्हा राजची नजर ह्या दोघांवर पडली होती. त्याने पहिल्यांदाच परीला अश्या कोणत्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बोलताना पाहिलं होत. नाहीतर तिच्या जवळ जाऊन बोलणारा मुलगा फक्त एकाच होता तो म्हणजे राज.
त्याच देखील परीवर मनापासून प्रेम होत. पण त्याने त्याची मैत्रीची पायरी कधीच सोडली नव्हती.
त्याच देखील परीवर मनापासून प्रेम होत. पण त्याने त्याची मैत्रीची पायरी कधीच सोडली नव्हती.
परीला देखील त्याच्या मनातल्या भावना माहित नव्हत्या अशातला ही काही भाग नव्हता. पण ती राज पेक्षा मोठी होती आणि तिच्या मते राजला तिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. ह्या दोन गोष्टींनी तिने राजला तिच्यापासून लांब ठेवलं होत. मग राजने देखील तिच्या मताचा आदर ठेवत तिच्याशी फक्त मैत्री ठेवली होती. हा, तिचं लग्न ठरेपर्यंत तिच्यासोबत फ्लर्ट करत रहाणार अस त्याने तिच्या समोर सांगितल होत आणि तो तसा वागत ही होता. पण आता त्याची ती फ्लर्ट करण्याची वेळ संपत आली आहे याची जाणीव त्याला झाली आणि त्याचे डोळे जरा भरून आले.
“काय झाल रे?” प्रसादने राजला त्याचे डोळे हलकेच पुसताना पाहीले.
“कुठे काय काही नाही.” राजने नेहमीप्रमाणे त्याच्या शैलीत उत्तर दिले.
“मी आज भेटलो आहे का तुला?” प्रसाद जरा चिडून बोलला आणि त्याच्यावरची नजर काढून प्रसादने समोर परीकडे पाहिलं. मग त्यालाही राजचे डोळे भरून येण्यामागच कारण समजल.
“काहीतरी चांगल होत आहे ना,” प्रसाद परी आणि तुषारकडे बघत बोलला. “तुझे भरलेले डोळे बघून ती ते पण सोडून देईल.”
तस राजने त्याच्या मोठ्या भावाकडे पाहिलं.
“तुला चांगलच माहिती आहे ती तिच्या माणसांच्या डोळ्यात तिच्यामुळे आलले अश्रू कधीच पाहू शकणार नाही.” प्रसाद
“हम्म ते पण आहे.” राज एक दीर्घ श्वास घेत बोलला. “त्यांना बोलू दे, आपण चल तिकडे.”
राजने परीवर नजर टाकली आणि ते दोघेही सुजयच्या खोलीकडे निघून गेले.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
