मागील भागात.
“खरचं?” नयनने लागलीच परीचे हात स्वतःच्या हातात घेतले. “खरंच खूप प्रेम करते मी सुजयवर. त्याच्याशिवाय मी माझ आयुष्य इमॅजीनच करू शकत नाही.”
“हो डोन्ट वरी.” परीने नयनचे प्रेमाने गाल ओढले.
तशी नयनच्या गालावरची काळी खुलली आणि इकडे आरुषला भित्री मांजर शेरनी कशी झाली याच उत्तर आता परीने दिलेल्या खुलाश्याने मिळाल. कालपासून तिने सुजयच्या तिन्ही भावांना चांगलीच खुन्नस दिली होती. जणू काही सुजयपासून इतके दिवस लाबं ठेवल्याबद्दल ती त्याचा बदला घेत होती.
परीच बोलण ऐकून सुजयला जरा वाईट वाटल. कारण त्याने नयनच बोलणच पूर्ण ऐकून घेतलं नव्हत. त्याला इतक तर माहिती होत की त्या दोघांच प्रेम खरं होत. अगदी त्यांच्या ह्या बंधू मंडळीत तोच सर्वात आधी प्रेमात पडला होता. पण परी रूड वागते का? ह्या प्रश्नाने त्या खऱ्या प्रेमावर जरा धूळ साचली गेली होती. जी नयननेच संधी साधून परीसोबत बोलून घेत दूर सारली होती.
आता सगळेच नयनकडे बघत होते. तर ती तिची मान खाली घालून उभी होती. मग सायली तिच्याजवळ गेली. ते बघून सुजयने अंगावरची चादर थेट डोक्यावरून घेतली.
आता पूढे.
“कस आहे ना बेटा,” सायलीने नयनच्या खांद्यावर हात ठेवला. तशी नयन जरा दचकली. “ही आमची मुल त्यांच्या दीला म्हणजेच परीला खूप जीव लावतात. तिच्याविरुध्द त्यांना एक अक्षरही ऐकून घ्यायचा नसतो. मग ते काहीही असो. कधी कधी तर ते आम्हाला पण भांडतात.” सायलीने सूजयवर नजर टाकली.
तस परी आणि आरुषने त्यांच तोंड वाकड केल. तर सुजयने डोक्यावरून घेतलेली चादर परत काढली आणि कपाळावर आठ्या पाडून त्याच्या आईला बघू लागला.
“त्यामुळे त्याच बोलण तू मनावर घेऊ नकोस,” सायली परत बोलू लागली. “आता दीबद्दलचा गैरसमज तर दूर झाला आहे. मग सुजयला काहीच हरकत नसावी.” सायलीने परत सुजयवर नजर टाकली. सुजय मात्र यावर काहीच बोलला नाही.
“मग पुढे बोलणी करायची?” सायली थेट बोलून मोकळी झाली.
“अगं,” विजयने डोक्याला हात लावला. “आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. एवढी काय घाई आहे?”
“मग परत त्याच मन बदललं म्हणजे.” सायली कपाळवर आठ्या आणत बोलली.
“हेच नको आहे मला.” नयन
तसे सर्व तिच्याकडे गोंधळून बघू लागले.
“म्हणजे?” सायली
“त्याला ऐकून घेण जमतच नाही,” नयन आता जरा गंभीर होऊन बोलली. “यापुढे पण तो माझ ऐकून घेईल याची काय खात्री आहे?”
तसे बाकी सगळे अजूनच गोंधळून गेले.
“आता गैरसमज दूर झाला, म्हणजे मी तो दूर करून घेतला,” नयन स्पष्टीकरण देत बोलली. “पण प्रत्येक वेळेस मला तो करायला संधी देणार का?”
आता सगळेच नयनच्या बोलण्याचा विचार करू लागले.
“काल याला अश्या अवस्थेत पाहिलं आणि माझा माझ्यावर ताबा राहीला नाही,” नयन “आता मन स्थिर झाल तेव्हा परत हा विचार करू लागल. यापुढे असच होणार असेल तर बोलणी करून फायदाच नाही ना. त्यापेक्षा वेगळ गेलेलं काय वाईट?”
“एक मिनिट,” सुजय लगेच बोलू लागला. “विषय फक्त दीचा होता. त्याआधी मी तुला कोणत्या गोष्टीवर टोकल तरी होत का? आणि तूच आठव, तू मला किती बोलू देत होतीस? साधी मस्करी पण तुला समजत नव्हती.”
“आता तरी तुला समजली का?” नयन कमरेवर हात ठेवत बोलली. “अशी मस्करी केल्यावर किती त्रास होतो ते आता समजल असेलच.”
“म्हणजे?” सुजय गोंधळून गेला.
तर परी आणि नयन गालात खुदकन हसल्या होत्या. मग बाकीच्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ते पण हसू लागले.
“अजून काही?” परी सुजयला चिडवत बोलली.
यावर सुजयने त्याचे डोळे फिरवले. नयनचा गळा भरून आलेला असल्याने परीने लागलीच तिला पाणी प्यायला दिल होत आणि तिला एका जागेवर बसवून ते प्यायला लावलं.
“अरे हॉस्पिटलमध्ये मी आहे आणि काळजी तिची घेत आहेस?” सुजयला लागलीच जेलस वाटायला लागल.
“मग तिला कशाला रडवतो?” परी
“मी कुठे रडवलं?” सुजय गोंधळून गेला. “आता पाहिलं नाही का तिने कशी मस्करी करून आपल्याला टेन्शनमध्ये टाकल.”
“तुला असच पाहिजे,” विजय “कारण तुम्हाला सरळ सांगून काहीच उपयोग होत नाही.”
यावर आरुषच्या कपाळवर पण आठ्या चढल्या. कारण विजयच वाक्य ह्या सगळ्या बंधू मंडळींसाठी असलेलं त्याला समजून गेल.
“मला तर आवडली बाबा आमची होणारी सून.” सायली प्रेमाने नयनच्या गालावरून हात फिरवत बोलली.
आता सुजयला जरा लाजल्यासारख झाल. तर नयन पण लाजून इकडे तिकडे बघू लागली. अजून कोणी काही बोलेल त्याआधीच तिथे डॉक्टर आले. त्यांच्यासोबत अजून एका माणसाला आलेलं बघून सायली आणि विजय जरा टेन्शनमधेच आले.
“ते मला जरा एका मिटिंग बाबत कंपनीमध्ये बोलायचं आहे,” विजय सुजयकडे बघून बोलला. “तर मी आलोच.”
“म.. मला पण आराध्याने कॉल केला होता,” सायली पण लागलीच बोलली. “मी आलेच.”
“कोणलाही कुठे जायची गरज नाहीये,” नंदू काका गरजले. “सगळ समजत मला. एवढी वर्ष राजकारणात उगाच केस पांढरे नाही झाले.”
नंदू काकांचा तो भारदस्त आवाज ऐकून नयन घाबरूनच गेली.
“एवढी मोठी गोष्ट झाली आणि साध मला कळवायचं पण महत्त्वाच वाटल नाही?” नंदू काका चिडून बोलले.
“ते एवढ काही झाल नव्हत,” विजय उगाच हसून दाखवत बोलला. “आणि तुम्ही ते मंत्रालयात गेले होता ना. म्म्हणून म्हटलं की सांगू तुम्ही मोकळे झाले की.”
“एवढे मोठे झाले तरी साधी अक्कल नाही आली तुम्हाला,” नंदू काकांमधला आजोबा जागा झाला. “तुमच्यापेक्षा ही पोर बरी. लागली मदत की थेट फोन करतात.”
आता आरुष आणि सुजयची कॉलर ताठ झाली.
ते बघून सायली आणि विजयने मनातच सुस्कारा सोडला. त्याची बाकी मित्र मंडळी दुपारी का येणार होती ते आता विजयला समजून आल होत.
“ते मीच बोलली होती की नंतर सांगूयात म्हणून.” परीने लगेच तिच्या आई वडिलांची बाजू लावून धरली.
“तू तर बोलूच नको,” नंदू काका “तुला पण त्यांची हवा लागली आहे. नाहीतर बाकी मुलांसारख तू पण मला फोन केला असतास.”
मग परी पण शांत बसली.
“सोडताय ना आज त्याला??” नंदू काकांनी डॉक्टरांना विचारलं.
“हो,” डॉक्टर “आज सकाळच इंजेक्शन दिल ना?” डॉक्टरांनी नयनकडे पाहिलं. “काही गोळ्या लिहून दिल्या जातील. त्या घेऊन या आणि त्या समजावून दिल्या की डिस्चार्जची फॉरमलिटी पूर्ण करून घ्या.”
इंजेक्शनच ऐकून बाकी सगळेच नयनकडे बघू लागले. मग ती पण सुजयकडे तोऱ्यात बघू लागली.
डॉक्टरांनी नयनला काही सूचना दिल्या आणि तिथून ते चालले गेले.
“कुठलं इंजेक्शन ते दिल का?” नंदू काकांनी नयनकडे बघून विचारलं.
"तेच देत होती तर मला तो देऊच देत नव्हता.” आता नयन हक्काने बोलून गेली. त्याच्या आई वडील आणि बहिणीने तिला स्वीकारलं होत. मग तिला आता कसलीही भीती नव्हती. सुजयच्या बाकी बंधू मंडळींची तर आज्जीबातच राहिली नव्हती.
“म्हणजे तू अजून घाबरतोस इंजेक्शनला?” नंदू काका हसतच विचारू लागले.
यावर बाकी सगळेच हसू लागले. तर सुजय सगळ्यांना आठ्या पाडून बघू लागला. मग नयनने त्याला इंजेक्शन द्यायची तयारी केली. ते बघून सुजय खूपच घाबरून गेला. तो आता चीड चीड करू लागला. आता अशी परिस्थिती आली होती की सुजयला लहान मुलासारखं धरून ठेवायची वेळ आली होती. पण सुजय चांगलाच हट्टा कट्टा असल्याने तो बाकीच्यांना ऐकतच नव्हता.
शेवटी परी बाकीच्यांना सांरत पुढे आली. तिने एकच वेळा सुजयला इंजेक्शन घेणार का विचारलं? तरीही त्याची नकारार्थी मान सारखी हलतच होती. तो इतका घाबरून गेला होता की तिथे परी आहे ते सुद्धा त्याने पाहिलं नव्हत. सुजयची नकारार्थी मान हलायची थांबत नसलेली बघून परीने त्याच्या एक कानाखाली मारली. तसा सुजय भांबावून परीला बघू लागला.
परीने त्याचा हात पुढे केला आणि नयनकडे पाहिलं. तिला परीचा इशारा समजला आणि तिने पटकन सुजयला इंजेक्शन दिल.
“द्या ना आता पटकन,” सुजय नुसताच परीकडे बघत होता. कोणीच हलताना दिसत नाही बघून तो वैतागून बोलला होता. “आता काय नस शोधत आहे की ती?”
सुजयच्या ह्या वाक्यावर बाकी सगळे परत हसू लागले.
“मी जोक मारला का?” सुजय जरा चिडून बोलला.
“झाल रे इंजेक्शन देऊन.” परीने त्याचा हात खाली केला.
तस सुजय पटकन त्याचा हात बघू लागला. “कधी? मला तर समजल पण नाही?”
“तुला ती त्रासात बघू शकली नाही ती तुला इंजेक्शनचा तरी त्रास होऊ देईल का?” परी प्रेमाने बोलली.
तसा सुजय आणि नयन दोघे जण लाजले.
“म्हणजे?” नंदू काकांनी गोंधळून विचारलं.
मग बाकीच्यांना तिथे नंदु काका पण आहे याची आठवण आली. मग परीने तिची परत नंदू काकांना ओळख करून दिली. मग त्यांनी पण नयनच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि ते परत त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायला निघाले. ते मागेच फिरले होते की सायलीने त्यांना मोहिते साहेबांना काहीही न सांगायची विनंती केली.
“ठीक आहे मी तर काही सांगणार नाही,” नंदू काका “पण त्यांच्या नजरेतून तुमच्या गोष्टी लपून राहाण जरा अशक्यच आहे.” ते मंद स्मित करत बोलले आणि तिथून निघून गेले.
आता सुजयला जरा आराम म्हणून सायली आणि विजय त्या रूममधून जरा बाहेर आले. त्याने सायलीला तिच्या कामावर जायला सांगितले. तर तो थोडावेळ तिथेच थांबणार होता. आरुष पण त्या खोलीतून बाहेर आला होता. कालपासून तो तिथेच होता. आता विजयने त्याला पाहिलं आणि त्याला देखील घरी जायला सांगितलं.
आता त्या खोलीत परी आणि सुजय हे दोघेच होते. ते बघून परी सुजयजवळ जाऊन बसली.
“दी यार नको ना आता,” सुजयला परीच पुढचा विषय समजून गेला होता. “आता कंटाळा आला आहे.”
“माझाच ना?” नयन आता येत बोलली.
“अरे यार,” सुजय अजूनच वैतागून बोलला. “ही अशी करते बघ. काहीही झाल की स्वतःवर ओढून घेते.”
“आता दी माझाच विषय घेणार होती ते तुला समजून गेल होत.” नयन सुजयच्या दुसऱ्या बाजूला बसत बोलली. “म्हणून तू तिला नंतर बोलू असा बोलला.”
नयनने ओळखलेला सुजय बघून परी आश्चर्यचकित झाली. ती डोळे विस्फारून नयनला बघू लागली. नंतर तिने सुजयकडे पाहिलं तर तो नयनला आठ्या पाडून बघत होता. म्हणजे तिने सुजयच मन बरोबर ओळखलं होत.
“हे बघ सुजय,” परी आता प्रेमाने बोलू लागली. “तिला जर खरचं माझ्यापासून काही प्रोब्लेम असता तर तिने तुझ्यावर उपचार करायचं टाळलं असत. त्यासाठी तिला बरीच कारण मिळाली असती. ती माझ्या मागे येऊन मला मनवत पण बसली नसती. माझ्याशी बोलताना देखील तिचा सूर फक्त तक्रारीचा होता. ती कोणालाही भांडत नव्हती. एवढी चांगली मुलगी असताना तू तिच्याशी सरळ ब्रेक अप केलस?”
सुजय पुढे काही बोलायला जाणार तोच परी परत बोलू लागली.
“तू वाचावा म्हणून डॉक्टर नसताना तिने तिच्या अधिकाराबाहेर जाऊन तुझ्यावर फर्स्ट एड केल,” परी “ह्याने तिची नोकरी पण जाऊ शकली असती. तरी तिने मागचा पुढचा कसलाही विचार न करता तुझ्यावार उपचार केले. त्यामुळे आता मला नाही वाटत की तुला अजून काही प्रोब्लेम असावा.”
मग सुजय शांत बसला. थोडी शांतता प्रस्थापित होणारच होती की तिथे रावीचा आवाज घुमला.
“ही डीस्पेन्सरी इथे काय करत आहे?” रावी चिडून बोलली.
तसे सगळेच तिच्याकडे गोंधळून बघू लागले.
“तरीच म्हटलं मंद बदक अजून कशी आली नाही?” नयन पण तितक्याच तोऱ्यात बोलली.
तसे रावीचे गाल फुगले गेले.
“रावी,” परी समजुतीच्या सुरात “आता ती नर्स आहे म्हटल्यावर ती हॉस्पीटल मधेच असणार ना?”
“मग ती सरळ पण बोलू शकते ना.” रावी नयनकडे चिडून बघू लागली. “आता पूर्ण शहरात हे एकच हॉस्पिटल आहे का? जिथे ही डीस्पेन्सरी काम करेल.”
“पण दिसली तर ह्याच हॉस्पिटल मध्ये ना?” नयन तिरकस हसत बोलली. “पण करणार काय? कॉमन सेन्स नावाचा काही प्रकारच नाही ना.”
“दिसायला काय?” रावी पण तितकीच चिडून बोलली. “आली असशील त्याच्या मागे मागे त्याला त्रास द्यायला.”
ह्या दोघींची चालू झालेली जुगलबंदी बघून सुजयने डोक्याला हात लावला. मागे देखील कधी ह्या दोघी भेटल्या की फक्त एकमेकांसोबत सतत भांडत राहायच्या. दोघींना आवरता आवरता सुजयच्या नाकी नऊ येत होत. थोडे दिवस जरा मनाला शांती मिळाली होती जी आज पुन्हा भंग पावली होती.
“आता तू तर काही आम्हाला भेटू देत नाही,” नयन पण आता चिडून बोलली .”मग याव लागत अस त्याला शोधत शोधत.”
“गरजच नाही ना,” रावी “त्याने विषय सोडला ना आता. मग कशाला आलीस?”
आता मात्र नयनच्या डोळ्यात टचकन पाणी आल. रावीने थेट तिच्या वर्मावर घाव घातला होता.
“एकदम चूप.” परी रावीकडे बघून एकदम कडक आवाजात बोलली. तशी रावी गप्प तर बसली पण रावीला खुन्नस देत राहिली होती. “मीच तिला आता परवानगी दिली आहे, काही प्रोब्लेम?”
हे ऐकून मात्र रावीच तोंड वासल गेल. ती पुढे काही बोलेल तोच नयनने झालेला गैरसमज कसा दूर केला हे परीने तिला सांगून दाखवलं. मग रावी जरा शांत झाली. नंतर नयनने सुजयवर केलेले उपचार ऐकून तिला भरून आल. पण इतक्या वेळेस भांडलेली ती अशी थोडीच लगेच भावनेच्या भरात नयनची माफी मागणार होती. म्हणून तिने फक्त नजरेनेच नयनचे आभार मानले.
आता सुजयने सुटकेचा श्वास सोडला.
“एक मिनिट,” परीला काहीतरी आठवल. ती रावीकडे बघून विचारू लागली. “तू कॉलेजला नाही गेलीस?”
आता रावीने तिची जीभ चावली. “गेली होती पण मग लगेच निघून आली. ते कॉलेजमध्ये अन्युअल फंक्शनची तयारी सुरु झाली ना. मग लेक्चर काही होत नाहीयेत. मग आली मी इथे.”
“अरे हो,” परी पण आठवत बोलली. “त्या मुलींच्या डान्सचा फायनल टचअप पण करायचा आहे.”
“चालू आहे त्यांची प्रॅक्टिस,” रावी “पाहून आली मी कॉलेजमध्ये. दा बद्दल विचारत पण होत्या.”
“ठीक आहे.” परी “जाऊन बघावं लागेल.”
“मी आहे ना आता,” नयन परीकडे बघून बोलली. “तुम्ही जाऊन येऊ शकता.”
“मध्ये बोललच पाहिजे का?” रावी नयनकडे बघून परत सुरु झाली.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
