Login

अवनी एक प्रवास भाग ८५

काल जशी परी सुजयच्या खोलीतून बाहेर पडली. तशी नयन देखील तिच्या मागे आली. मागच्या वेळेस तिच्याबद्दल जो गैरसमज झाला होता तो तिला दूर करायचा होता. रात्री जेव्हा सुजयला हॉस्पिटलला आणल गेल होत. तेव्हा त्याची ती अवस्था बघून नयनच्या पायातले त्राण जणू गळून गेले होते. कालपर्यंत त्याच्याशी बोलणार नाही या रागात असणारी नयन सुजयला त्या अवस्थेत बघून खूपच घाबरून गेली.
मागील भागात.

“तुमच शांत रहाण मला टेन्शनमध्ये टाकत आहे,” सायली हळवी होत बोलली. “प्लीज काय ते खर सांगा.”

मग मात्र विजयचा नाईलाज झाला आणि त्याने सुजयसोबत जे काही झाल ते तिला सांगून दाखवलं. आताही तो गौतमला भेटून आल्याच सांगितलं.

ते सगळ ऐकून सायलीला धक्काच बसला. “तुम्ही त्या गौतमला असच का सोडून आलात?” सायली रागात बोलली. “त्याने सुजयला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त त्याला बोलून आलात? का?” सायली रागात थरथरत होती.

“कारण सुजय जरी पडण्याचा प्रयत्न झाला असला तरी सुजयने तो चुकवून त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.” विजय एक दीर्घ श्वास घेत बोलला.

“म्हणजे?” सायली

मग विजयने तिला झालेली घटना परत विस्तारून सांगितली. मग टेन्शनमध्ये असलेल्या सायलीच्या डोक्यात प्रकाश पडला. पण त्याच्यावर हल्ला झाला होता ही गोष्ट तर खरी होती. आता त्याचच टेन्शन सायलीच्या मनात परत उभं राहील.

“पण त्यांनी अस का केल?” सायली “पुन्हा अस काही केल तर?”

आता पूढे.

“आता त्यांनी अस का केल? ते तर त्यांनाच माहिती,” विजय “पण पुन्हा अस काही करणार नाहीत.”

“अश्या माणसांचा काही भरोसा नसतो.” सायली विजयच्या कुशीत शिरत बोलली.

“माझ्यावर तर आहे ना?” विजय मंद स्मित करत बोलला.

तस सायलीने होकारात मान हलवली आणि ते दोघे देखील झोपी गेले. तिकडे माला तिच्या आई वडिलांवर जरा फुगून बसली होती. एवढी मोठी घटना झाली तरी त्यांनी तिला काहीच सांगितल नव्हतं. तिच्यामते तिची पहिली जरी डेट होती तरी सुजयसोबत घडलेल्या घटनेपेक्षा महत्वाची नव्हती. त्यात प्रसादने तर तिला नक्कीच समजून घेतलं असत. शेवटी सुजय पण त्याचा भाऊच लागत होता ना.

शेवटी मालाच्या आजोबांनी मालाची समजूत घातली तेव्हा कुठे मालाने तिचा रुसवा सोडलेला होता. त्यात प्रसादने देखील मालाला समजावलं होतच. त्या नंतर तिचा रुसवा सोडला होता. यावरून ही प्रणालीने मालाची मस्करी करायला सुरवात केली. जेणेकरून टेन्शनमधलं असणार वातावरण थोड मोकळ झाल होत.

“एवढा वेळ आम्ही समजावत होतो तेव्हा ऐकली नाहीस,” प्रणाली नाटकी रुसत बोलली. “आणि एकदा त्यांनी काय सांगितल तर लगेच समजलं? वाह काय बात हे.”

“काय गं मॉम,” माला वैतागून बोलली. “तुला आता मस्करी सुचत आहे.”

“तूच तशी वागतेस,” प्रणाली “मी सांगितलं, तुझ्या डॅडने सांगितलं. एवढं काय आई बाबांनी पण सांगून पाहिलं. तेव्हा का नाही राग सोडला? आणि आता एक फोन काय येऊन गेला त्याचा,” प्रणालीने जरा पोज घेतला. “अम्म सॉरी त्यांचा, तर लगेच राग सोडला. आतापासून त्यांच जास्त ऐकायला लागलीस ना? खरं खरं सांग. तुमच आधीपासूनच तर काही नव्हत ना?”

एवढ सगळ ऐकून मालाने डोक्यालाच हात लावला. नंतर महेशकडे पाहिलं. “कस संभाळल तुम्ही हिला?” प्रणालीच्या शेवटच्या प्रश्नाने मालाच्या गालावर हलकीशी लालसर छटा पसरली होती.

आता बायको समोर उभी आहे तर महेश थोडीच काही बोलू शकणार होता. त्यात तिच्यात भरलेली नौटंकी आठवून त्याने फक्त त्याचे खांदे उडविले होते.

“त्यांच्याकडे नको बघूस,” प्रणाली “माझ्या प्रश्नाच उत्तर दे. बघ तर गाल कसे लाल होऊन चालले आहेत. म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होत ना.”

“मॉम तू पण ना.” माला आता लटक्या रागात तिथून उठली आणि सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली.

तिला अस लाजून जाताना बघून प्रणाली आणि महेशने एक दीर्घ श्वास घेतला होता. तिच्या डोक्यावरचं टेन्शन आता तरी थोड कमी झाल होत. ते बघून दोघांच्या जीवात जीव आला होता. माला तिच्या खोलीत गेली म्हणून महेशचं आई वडिलांनी ह्या दोघांना देखील जाऊन झोपायला सांगितलं.

दुसरा दिवस उजाडला. सुजयला सकाळीच स्पेशल रूममध्ये शिफ्ट केल होत. असही त्याला फक्त खरचटलं होत. त्याच प्रमाण जरा जास्त असल्याने त्याला एक रात्र आयसीयुमध्ये ठेवलं होत. डॉक्टरांनी सकाळीच येऊन त्याची तपासणी केली आणि त्याला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केल.

तस तर डॉक्टरांचा हॉस्पिटलमध्ये यायची नियमित वेळ नऊ वाजेची होती. काही इमर्जन्सी आलीच तर ते लगेच येऊन पोहोचत होते. तसाच एक इमर्जन्सी फोन त्यांना सकाळीच आला होता. जो की नंदू काकांनी केला होता. विजयने किंवा इतर कोणी जरी त्यांना काही सांगितलं नव्हत तरी सकाळी सकाळीच ती बातमी त्यांच्या कानावर गेली होती. मग त्यांनी तसाच डॉक्टरांना फोन लावला. आता थेट त्यांचा फोन आला म्हणून उगाच आयसीयुमध्ये ठेवलेला सुजय लागलीच स्पेशल रूममध्ये हलवला गेला.

परी, सायली आणि विजय तर सकाळीच तिथे जाऊन पोहोचले होते. रावी आणि मनालीला तर कॉलेजला जायला लावलं होत. सोनाली देखील तिच्या कामावर गेली होती. ती दुपारी तिथे येणार होती. तसेच बाकी वरिष्ठ मंडळी देखील दुपारीच येणार होती. दुपार पर्यंत सुजयला सोडणार देखील होते.

सकाळीच ही बातमी ऐकून सायली आणि विजय जरा विचारात पडले. तोच सायलीला आराध्याचा फोन आला आणि तिला नंदू काकांनी चांगलच भांडल असल्याच सांगितलं. आता तिला भांडून झाल्यावर पुढची पाळी सायली आणि विजयची होती ते समजायला दोघांना वेळ लागला नव्हता.

जसे हे तिघे सुजयला ठेवलेल्या रूममध्ये पोहोचले आतला तो नजारा बघून सायली आणि विजय जागीच थिजले. परीला तर त्याची जरा कल्पना होतीच त्यामुळे ती फक्त गालात हसत उभी राहिली. आरुषने जय आणि आदेशला फ्रेश व्हायला पाठवून दिल होत. तो पण आता त्याच डोक खाजवत नुसताच उभा होता.

त्या खोलीत कालची नर्स उभी होती जिच्या हातात एक इंजेक्शन होत आणि ते इंजेक्शन बघून सुजय खूपच घाबरत होता. दारात सायली आणि विजयला बघून सुजयला जरा धीर मिळाला.

“बघ ना मॉम,” सुजय केविलवाण्या आवाजात बोलला. “ही.. ही.. हीना विनाकारण मला इंजेक्शन टोचत आहे. मी आता पूर्ण बरा झालो आहे ना.”

“अरे,” सायली काळजीने बोलली. “ती नर्स आहे ना ती थोडीच काही विनाकरण टोचेल आणि तिला ते टोचून मिळणार काय?”

“काही नाही बदला घेत आहे ती.” सुजय हळूच बोलला.

“बदला?” विजय गोंधळून बोलला.

यावर सुजयने त्याच फक्त तोंड वाकड केल. आता परी जराशी हसतच पुढे आली आणि त्या नर्सच्या खांद्यावर हात ठेवला. ते बघून सुजयने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले. परीच्या ह्या एका कृतीने तिला कालच सगळ काही समजल आहे हे सुजयला समजून गेल. आरुषने पण बाजूलाच बसून घेतलं. आता तो फक्त सुजयची होणारी गंमत बघणार होता.

सायली आणि विजय देखील परीला गोंधळून बघत राहिले.

“तर हिची ओळख करून देते” परी मंद स्मित करत बोलली. “ही आहे नयन. इथल्या हॉस्पिटलमध्ये दोन वर्ष झाली नर्स आहे. सगळ्यात हुशार नर्स आहे. काल जेव्हा ह्याला इथे आणल तेव्हा त्याच वाहणार रक्त थांबण्यासाठी हिनेच फर्स्ट एड केल होत.”

“अच्छा,” सायली प्रेमाने बोलली. “थ्यांकू बेटा.”

“जरा थांब आई,” परी तिची अजून एक ओळख करून द्यायची आहे.”

“नको ना दी,” सुजय तोंड वाकड करत बोलला. “ती काहीही बोलते.”

“गप्प तू.” परी जरा चिडून बोलली. नंतर ती नयनकडे वळली. “तर ही आहे आपल्या घराण्यातली सून क्रमांक दोन.”

तसे सायली आणि विजय परीला गोंधळून बघू लागले. तर सुजयने परत एक दीर्घ श्वास घेतला. आरुष तर डोक्याला हात लावून बसला होता.

“काय म्हणायचं आहे तुला?” विजय परीकडे बघत बोलला.

“तुम्ही सगळे गेल्यानंतर ही मला भेटली.” परी कालचा दिवस आठवत बोलली.

काल जशी परी सुजयच्या खोलीतून बाहेर पडली. तशी नयन देखील तिच्या मागे आली. मागच्या वेळेस तिच्याबद्दल जो गैरसमज झाला होता तो तिला दूर करायचा होता. रात्री जेव्हा सुजयला हॉस्पिटलला आणल गेल होत. तेव्हा त्याची ती अवस्था बघून नयनच्या पायातले त्राण जणू गळून गेले होते. कालपर्यंत त्याच्याशी बोलणार नाही या रागात असणारी नयन, सुजयला त्या अवस्थेत बघून खूपच घाबरून गेली. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्यासारखी वेळ आली की बाकी सगळ्या भावना गळून जातात आणि त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. तिच्यासोबत तसच झाल. तिने तेव्हा तर पटकन सुजयवर फर्स्ट एड केला. पण जेव्हा त्याला ऑपरेशन थेटरमध्ये नेल तेव्हा तो अजूनच घाबरून गेली. मग तिला काहीच सुचेनास झाल.

त्यानंतर परीला आलेलं बघून तिने लागलीच तिच्याशी बोलण्याचे ठरवले आणि परीला जाताना बघून लागलीच तिच्या मागे मागे आली.

“दी.” नयनने पुढे जाणाऱ्या परीला आवाज दिला.

आली बंधू मंडळी सोडली तर तिला असा दी म्हणून कोणीच हाक मारत नव्हत. म्हणून पहिले तर तिने त्याकडे दुर्लक्ष केल. पण नंतर परी थांबत नाही म्हणून नयनने पुन्हा दी म्हणून आवाज दिला. तेव्हा पुन्हा आलेला आवाज ऐकून परीने थांबून मागे वळून पाहिलं.

आयसीयुमधल्या नर्सला आवाज देताना बघून परी पहिले तर घाबरलीच. तिला वाटल की सुजयला काही झाल.म्हणून ती लगेच तिच्याजवळ गेली.

“जरा बोलायचं आहे.” नयन जरा चाचरत बोलली.

“बोला ना.” परी

“अस अहो जो नका करू,” नयन “मी लहान आहे तुमच्यापेक्षा.”

“पण सध्या नर्स आहत ना,” परी “मग..”

“मी सुजयची गर्लफ्रेंड.” नयन परीच बोलण तोडत बोलली.

तशी परी आ वासून नयनला बघत राहिली.

“हो,” नयन अवघडून बोलू लागली. “सुजय तुमची आणि माझीच भेट घालून देणार होता.”

“हो,” परी आठवत बोलली. “पण नंतर त्याने सांगितलं की तुमच ब्रेकअप झाल म्हणून.”

“तेच ना,” नयन बारीक तोंड करून बोलली.. “त्याने माझ पूर्ण ऐकूनच घेतलं नाही.”

“तो तर त्याचा लहानपणापासूनचा प्रोब्लेम आहे,” परी दीर्घ श्वास घेत बोलली. “काय नाही ऐकल त्याने.”

“मला कोणीतरी सांगितल होत की तुम्ही त्यांची सख्खी बहिण नाही आहात म्हणून,” नयन जरा चाचरत बोलू लागली. “आणि तुम्ही त्याच्यासोबत घरी खूप रूड पद्धतीने वागता म्हणून. समोर असल्यावर की खूप चांगल असल्यासारखं वागता.”

तसे परीचे डोळे विस्फारले गेले. “मग?”

“एकतर त्याने माझी त्याच्या घरच्या कोणासोबत ओळखच करून दिली नव्हती. जे की मी खरं काय? आणि खोट काय? ते विचारेल,” नयन “पण तस कोणी भेटलच नाही. त्यात तुम्ही रावीला भर कॉलेजमध्ये ओरडला होतात. मग मला त्यांच बोलण जरा खरं वाटलं. म्हणून मी फक्त त्याला विचारायला गेली. तर तो माझ्यावर खूप ओरडला.” नयनचा आताचा चेहरा खूपच निरागस झाला होता.

“आणि तू त्याला रागात विचारलस?” परी तिला बारीक डोळे करून बोलली.

तशी नयनने हळूच होकारात मान हलवली. “पण माझा उद्देश तुम्हाला काही बोलण्याचा नव्हता. तेच तर त्याने मला बोलू दिल नाही. त्याला एवढच विचारलं की तुम्ही त्याच्या सख्या बहिण नाहीत का?”

“अस विचारल्यावर कोणीही चिडेल की.” परी

“अस सगळीकडे नसत ना,” नयन एक उसासा टाकत बोलली. “आमच्या चुलत काकांनी पण त्यांच्या एका लांबच्या भावाची मुलगी दत्तक घेतली होती. माझे काका तर तिला खूप जीव लावत होते. पण त्यांच्या घरचे सरळ बोलायचे की तू सख्खी नाही म्हणून. मग ती बाकीच्यांसोबत रूड वागत होती.”

“हम्म ते तर आहे,” परी “काश प्रत्येक माणूस माझ्या घरच्यासारखा असता.”

“तेच बोलायला मला दिल नाही,” नयन “ती पण म्हटलं रूड वागते का? एवढं बोलून मीच घाबरून गेली. त्याचा चेहरा एका सेकंदाच्या आता रागाने लाल झाला. मग पुढे काही बोलायला मला सुचलच नाही आणि त्याने तडकाफडकी ब्रेकअप केला.”

“मग त्याचा राग शांत झाला की बोलायचं ना त्याच्यासोबत.” परी

“ते पण केल,” नयन जर वैतागून बोलली. “त्याचे बाकीचे भाऊ माझी त्याच्याशी भेटच होऊ देत नव्हते. काही बोलायला गेली की मला टोमणे मारायचे.”

“ते पण त्याच्यासारखेच आहेत,” परी हलकीच हसत बोलली. “ऐकून घेण त्यांना जमतच नाही.”

“मग तुम्हाला कॉलेजमध्ये भेटायचा प्रयत्न केला तर तुमची बहिण मधेच यायची.” नयन तक्रारीच्या सुरात बोलली.

“रावी?” परी

तशी नयनने होकारात मान हलवली. तिचे डोळे आता भरून आले होते. “माझ्या मनात तुमच्याबद्दल वेगळ काहीच आल नव्हत. उलट मोठी बहिण म्हणजे आपली दुसरी आईच असते ना. पण तो काहीच ऐकून घेत नव्हता. इतके दिवस मी कसे काढले? माझ मलाच माहित. दिवसाची सुरवात त्याच्या मेसेजने व्हायची आणि रात्रीची झोपही त्याच्या बोलण्याने यायची. आता ते काहीच नव्हत तर मलाही त्याचा खूप राग आला होता..” बोलता बोलता तिचा गळा भरून आला. “त्या दिवसापासून आज मी त्याच्या इतक्या जवळ गेली होती. तेही त्याच्या अश्या अवस्थेत.”

“तो नीट आहे ना आता,” परी तिला दिलासा देत बोलली.

“पण माझ्यासोबत नीट नाही ना तो,” नयन तक्रारीच्या सुरात बोलली. “आताही बाकी भावांना मी इथे आहे ते आधी समजल असत तर त्यांनी मला त्याच्या जवळ पण जाऊन दिल नसत.”

“आता तू माझ्याजवळ आलीस ना,” परीने तिला प्रेमाने कवेत घेतलं. “आता बघ एकेकाला कशी नीट करते.”

“त्यांना काही नका बोलू,” नयन घाबरून बोलली. “नाहीतर ते मला इथून पण लांब करतील.”

“असे कसे लांब करतील?” परी तोऱ्यात बोलली. “मी आहे ना. बघ आता उद्या त्यांची गम्मत. उद्या तेच तुझी माफी मागतील.”

“पण एक गोष्ट खरं खरं सांगशील??” परीने तिच्या डोळ्यात बघू विचारल.

तशी नयन देखील तिच्या डोळ्यात हरवली.

“तुझ आणि त्याच दोघांच एकेमकांवर खरं प्रेम आहे ना?”

तस नयनने जरा तिची मान खाली केली आणि होकारात मान हलवली.

“ठीक आहे,” परीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. “आता तुझी केस माझ्याकडे आली आहे. सगळ काही नीट करून देणार.”

“खरचं?” नयनने लागलीच परीचे हात स्वतःच्या हातात घेतले. “खरंच खूप प्रेम करते मी सुजयवर. त्याच्याशिवाय मी माझ आयुष्य इमॅजीनच करू शकत नाही.”

“हो डोन्ट वरी.” परीने नयनचे प्रेमाने गाल ओढले.

तशी नयनच्या गालावरची काळी खुलली आणि इकडे आरुषला भित्री मांजर शेरनी कशी झाली याच उत्तर आता परीने दिलेल्या खुलाश्याने मिळाल. कालपासून तिने सुजयच्या तिन्ही भावांना चांगलीच खुन्नस दिली होती. जणू काही सुजयपासून इतके दिवस लाबं ठेवल्याबद्दल ती त्याचा बदला घेत होती.

परीच बोलण ऐकून सुजयला जरा वाईट वाटल. कारण त्याने नयनच बोलणच पूर्ण ऐकून घेतलं नव्हत. त्याला इतक तर माहिती होत की त्या दोघांच प्रेम खरं होत. अगदी त्यांच्या ह्या बंधू मंडळीत तोच सर्वात आधी प्रेमात पडला होता. पण परी रूड वागते का? ह्या प्रश्नाने त्या खऱ्या प्रेमावर जरा धूळ साचली गेली होती. जी नयननेच संधी साधून परीसोबत बोलून घेत दूर सारली होती.

आता सगळेच नयनकडे बघत होते. तर ती तिची मान खाली घालून उभी होती. मग सायली तिच्याजवळ गेली. ते बघून सुजयने अंगावरची चादर थेट डोक्यावरून घेतली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →