मागील भागात
“तू नको तिच्याकडे लक्ष देऊस.” सायली मनालीकडे बघून तोऱ्यात बोलली.
“नाही देत मी.” मनाली पण तितक्याच तोऱ्यात बोलली.
“म्हणून, म्हणून आम्ही आमच्या दी ला जास्त जीव लावतो.” रावी आता जरा चिडून बोलली.
तसे आरुष, परी, सायली आणि विजय हसू लागले. तर मनाली तिला गोंधळून बघत राहिली.
बोललो ना तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस.” विजय मनालीच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून बोलला.
“चला आता घरी.” सायली रावीला तिच्या कवेत घेत बोलली. “तुला तर आता आत्तुच प्रेम दाखवते.”
तशी रावी तिच्या मिठीतून सुटायला बघत होती. पण सायली कुठे तिला सुटू देत होती. त्यांची ही गंमत बघत ते सगळेच घरी जायला निघाले.
पण मनालीची पावलं जरा तिला साथ देत नव्हती. कारण आरुष परत हॉस्पिटलला चालला होता. तिला आता त्याच्यापासून दूर रहावस वाटतच नव्हत आणि आज तर त्यांना जास्त बोलयला देखील मिळाल नव्हत. ती तोंड पाडून आरुषला बघत राहिली.
आता पूढे.
“चल,” विजयने मनालीच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती पहिले दचकलीच. नंतर विजयला बघून जरा ओशाळली. “उद्या परत तिथेच जायचं आहे. नाहीतर तुमची स्पेशल डेट अरेंज करेल. पण आता उशीर झाला आहे.”
“तस काही नाही.” मनाली चाचरत बोलली.
“हे चुकीच आहे हं,” आता विजय नाराज व्हायचं नाटक करत बोलला. “तिला लगेच आतु बोलली आणि मला?”
तशी मनाली लाजली गेली आणि तिने तिचे हात झटकले. “शि बाबा.” एवढं बोलून ती पटकन रावी जवळ गेली आणि तिचा हात पकडून पटकन घराकडे पळाली.
“आता ह्यात लाजण्यासारख काय आहे?” विजय विचार करण्याच नाटक करत बोलला.
“चला घरात सांगते.” सायली नकारार्थी मान हलवत बोलली.
“हो, नीट बघ बर.” आरुष खट्याळ होत बोलला.
“विसरू नकोस तुझा माणूस आज इथे मुक्कामाला आहे.” सायली त्याला बारीक डोळे करून बोलली.
‘चला म.. मी जातो,” आरुष पटकन बाईकवर बसत बोलला आणि निरोप घेऊन निघून देखील गेला.
त्याला अस गडबडीत जाताना बघून विजय आणि परी हसले. मग सायली त्या दोघांकडे बघायला लागली. तसे ते दोघे ही गपचूप घरी जायला लागले. मग त्यांच्या मागे सायली गेली.
काही वेळाने सोनाली देखील त्यांचे कपडे घेऊन विजयच्या घरी पोहोचली. मग ती गेस्टरूममध्ये झोपली. तर रावी आणि मनाली मागच्यावेळे प्रमाणे परीच्या खोलीत जाऊन झोपले.
तुषारने सांगितल्याप्रमाणे तेजश्रीने घरी काही सांगितलं नव्हत. पण तिच्या आईने त्यांना काही विचारलं देखील नव्हत. ती तिच्या मनाचा काहीच थांगपत्ता लागू देत नव्हती. तुषारच्या वडिलांनी तुषारच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण तुषारची आई त्यांच्याशी देखील या विषयावर काहीच बोलली नाही. मग त्यांनी पण सध्या तो विषय सोडून दिला.
जेवण तर आधीच झाली होती. म्हणून जो तो आप आपल्या खोलीत गेले होते. तेजश्री तिच्या खोलीत बेडवर पसरून तिचा मोबाईल चाळत असताना तिला सुजाताचा फोन आला. घरात एक टेन्शन असताना सुजाताचा आलेला फोन बघून तेजश्री जरा वैतागली. पण तरी तिने तो उचलला.
“हा बोल.” तेजश्री
“ते विचारायचं होत.” सुजाता जरा चाचरत बोलली.
“काय विचारायचं होत?” तेजश्री
“ते सुजय..” सुजाता बोलता बोतला थांबली.
तशी तेजश्री कुत्सित हसली. “एवढीच काळजी होती तर तेव्हा लगेच का निघून गेलीस? साध तू मागे वळून देखील पाहिलं नव्हत.”
“त.. खूपच घाबरून गेली होती मी.” सुजाता स्वतःची बाजू सावरायला बघत होती. “अस आयुष्यात कधीच पाहिलं नव्हत ना.”
“सिरीअसली?” तेजश्री “आपण कॉलेजवरुन येता जाता बरेच ॲक्सिडेन्ट पाहिले आहेत. तेव्हा तर तुला काही वाटल नव्हत? आता तुला सुजयच्या जवळ जायची संधी मिळाली होती तर तू लांब पळालीस आणि आता त्याच्याबद्दल विचारात आहेस? जेव्हा की तो शुद्धीत आला.”
“हो गं,” सुजाता हताश होत बोलली. “सगळ समजत होत मला. पण ते रक्त पाहिलं आणि मला कसतरीच होऊन आल.”
“आयुष्यात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच होत असतात,” तेजश्री तिला समजवत बोलली. “त्या बघून तू अशी थेट पळ काढशील तर कस चालेल यार?”
यावर सुजाता काहीच बोलली नाही.
“तो ठीक आहे आता.” तेजश्री “आणि आता तरी तू त्याचा विषय सोडला असशील. जरी नसशील तर तुझ्या माहितीसाठी सांगते की त्याचं आधीच प्रेम परत त्याच्या लाईफमध्ये आल आहे. आय होप तू समजून घेशील.”
“हो.” सुजाता कशीबशी बोलली आणि तिने फोन ठेवून दिला.
इकडे तेजश्रीने देखील दीर्घ श्वास घेतला आणि थोड्याच वेळात झोपी गेली. तुषार देखील आजचं घटनेचा विचार करत करत झोपी गेला.
इकडे हे सगळेच झोपी गेलेले असताना तिकडे गौतम आणि त्याच्यासोबत आलेले सर्व मात्र मख्ख जागे होते. ते देखील एका हॉस्पिटलमध्ये होते जिथे त्या पालटलेल्या गाडीतल्या माणसांवर प्रथमोपचार झाले होते.
गौतमला वाटल होत की सरळ त्याच्या अंगावर गाडी घातली की तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. त्याचे मोडलेले हात पाय बघून ते परीला ब्लॅकमेल करणार होते. पण गौतमला त्याच्याकडून अश्या काही उलट वाराची अपेक्षाच नव्हती. तो हॉस्पिटलमध्ये तर पोहोचला होता पण अगदीच नीट होता. थोडफार खरचटलं होत. त्यामुळे त्याची खूपच चीडचीड चालू होती. त्यात त्याच्या माणसांना झालेली दुखापतीवरील उपचाराचा खर्च वाढला होता.
त्या गाडीत त्याची तीन माणस होती. एक चालक होता तर एक त्याच्या बाजूला बसला होता. तर एक मधल्या सीटवर बसलेला होता. ते दोघेही पुढे चालणाऱ्या त्याच्या बाईकवर लक्ष ठेवून होते. पण ह्या दोन्ही माणसांच्या अंदाजापुढे त्याची स्कील जिंकली होती. तो घसरून पडण्याआधी ह्या माणसांची गाडी पालटली गेली. आता पुढे येणार वळण अचानक आल्याने तो घसरून पडला होता.
आपली पालटलेली गाडी बघून गौतम त्याच्या बाकी माणसांसोबत पटकन पुढे आला आणि त्यांची पालटलेल्या गाडीतून पटकन त्यांची माणस बाहेर काढली. पालटलेली गाडी सरळ केली. जखमी झालेल्या माणसांना गौतमने त्याच्या गाडीत घेतलं. त्याच्यासोबत आलेला माणसाने सरळ केलेली गाडी पहिली आणि ती पटकन चालू करून पाहिली. जशी ती चालू झाली तशीच त्याने ती पळवायला सुरवात केली. तर गौतमने देखील जखमी झालेली माणस गाडीत टाकली आणि सरळ मुंबईच्या बाहेर पडून दुसऱ्या शहरातल हॉस्पिटल गाठल.
गौतम हॉस्पिटलमध्ये वैतागून येरझारा घालत होता. तर हरीश त्याच्यासोबत होता. चालता चालता ते हॉस्पीटलच्या बाहेर आले..
“मी काय म्हणतो,” हरीश हळूच बोलला. “तो तर हॉस्पिटलला पोहोचला आहे ना. तेच तर हवं होत ना आपल्याला.”
“पण कसा पोहोचला?” गौतम जर चिडून बोलला. “फक्त खरचटलं आहे त्याला. किमान तीन चार हाड मोडली असती तर तिच्यावर प्रेशर टाकता आला असता. ***** आपलच नशीब फुटक.”
“एकदा वाचला म्हणजे नेहमीच वाचेल का?” हरीश
“तुझ्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकार आहे का नाही?” गौतम रागात बोलला. “आपण अवनीच्या मागावर आहोत ते त्यांना माहिती आहे आणि ही मागे सोडलेली गाडीच्या मार्फत जर ते आपल्यापर्यंत पोहोचले ना तर आपल अस्तित्वच शिल्लक रहाणार नाही.”
“तुम्ही का एवढे घाबरत आहात त्यांना?” हरीश पण चिडून बोलला.
“ती माणस जरी ते नाव वापरत नसले तरी त्यांच्या मागे मोहिते साहेब यांच नाव आहे,” गौतम “त्यांचा फक्त इशारा जरी झाला ना तरी दिल्लीतून आदेश निघतील. पक्ष कोणताही असो मोहिते साहेब कोणालच सोडणार नाहीत.”
“मग कस करायचं?” हरीश
“बघू आधी इथून तर निघू.” गौतम “आपली काही माणस त्याला ठेवलेल्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्याकडून माहिती आली की पुढच बघू.”
“का आता तुम्हा स्वतःला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं आहे का?” ... त्या दोघांना मागून आवाज आला.
त्या दोघांनी मागे वळून पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारले गेले. कारण तिथे विजय आणि राहुल जाऊन पोहोचले होते. तस तर महेश आणि संदेशने देखील येऊ का विचारल होत पण विजयने त्यांना यायला मनाई केली होती. कारण त्या दोघांची फक्त वय वाढली होती त्यांचा तापट स्वभाव अजूनही तसाच होता.
विजयला तिथे आलेलं बघू गौतम आणि हरीशची तर बोबडीच वळली. त्यांना कल्पना पण नव्हती की विजय थेट त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचेल.
“बोला.” विजय कडक आवाजात बोलला.
“तु काय करत आहेस इथे?” गौतमने उलट त्यालाच प्रश्न विचारला.
“तु काय करत आहेस इथे?” गौतमने उलट त्यालाच प्रश्न विचारला.
“ते महत्वाच नाही,” विजय “तुझी माहिती काढायला मला फक्त काही क्षण लागले आणि मी इथे येऊन पोहोचलो. त्यामुळे तुला लास्ट वार्निंग देत आहे आणि ते पण प्रेमाने बोलत आहे. आमच्या आयुष्यापासून लांब रहा. मी शांत आहे फक्त आमच्यासाठी, आमच्या लेकांसाठी नाही. यापुढे तुमच्याकडून आमच्या मुलांना कोणत्याही प्रकारच नुकसान झाल तर मी कोणत्याही थराला जाईल. त्याची तू कल्पना पण करू शकणार नाहीस.”
“काय बोलत आहेस तू तुला तरी समजत का?” गौतम जणू त्याने काहीच केल नाही या अविर्भावात बोलू लागला. “इथे आमची काही माणस उपचार घेत आहेत. त्यांना बघायला आलो आहे.”
यावर विजय तिरकस हसला. “हे असले खेळ ना मी लहान होतो तेव्हा खेळत होतो. त्यामुळे तू इथे काय करत होता ते मला नको सांगू. मी जे सागंत आहे ते ध्यानात ठेव.”
विजयचा लागलेला तो सूर आणि चेहऱ्यावरच हे आसुरी हसू बघून गौतमही जरा विचारात पडला. त्याच्याही डोक्यात बरचं काही चालल होत पण आताची वेळ त्याची चांगली नव्हती. उगाच काही बोलून अथवा करू गेल आणि इथेच फसले तर त्यांना इथून निघण कठीण झाल असत. त्यात विजय इथे काही वेळातच पोहोचलेला बघून त्याची देखील पोहोच वर पर्यंत असल्याचे गौतमला जाणवले. मग मात्र गौतम त्याला काहीच बोलला नाही. हरीश तर गप्पच बसलेला होता.
विजय त्याच्या घरी झोपलेला असताना त्याला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला. ज्यांनी पालटलेल्या गाडीचा सीसीटीव्ही मार्फत मागोवा घेतला होता. ज्यात एका ठिकाणी गौतमची गाडी त्याना दिसून आली होती. त्यामुळे त्यांनी त्या गाडीचा मागोवा घेऊन गौतमचा इथला पत्ता काढला होता आणि तो विजयला दिला होता. विजयने देखील सायली आणि बाकी मंडळी झोपली असल्याची खात्री केली आणि राहुलला सोबत घेत हे हॉस्पिटल गाठल होत.
गौतमला नीट समजावून विजय आणि राहुल परत घरी निघून गेले होते. तर गौतम मनातच चरफडत राहीला.
“तुम्ही पण त्याला ऐकवायच ना.” हरीश
तशी गौतमने त्याच्यावर एक नजर टाकली. “तेव्हा तर तुझ्या तोंडातून एक शब्द निघाला नाही आणि मला शिकवत आहेस की ऐकवायचं म्हणून?”
“तस नाही,” हरीश लगेच स्वतःला सावरत बोलला. “ते सरळ सरळ धमकी देऊन गेले.”
“आता त्यांच्या त्यांच्या भागात कुत्रे पण वाघ होतात.” गौतम उसासा टाकत बोलला. “भुंकू दे. आपण फक्त अवनीवर फोकस करूयात.”
“त्यांच्या बोलण्यावरून वाटत आहे की त्यानी अवनीला काहीही सांगितल नाहीये.” हरीश विचार करत बोलला.
“मलाही असच वाटत आहे,” गौतम “आधी घरी पोहोचुयात.”
मग ते दोघेही परत त्यांच्या माणसांजवळ निघून आले. इकडे विजय आणि राहुल पण विजयच्या घराजवळ आले. विजय पण जरा टेन्शन मधेच होता.
“नको काळजी करू रे,” राहुल त्याला आश्वस्त करत बोलला. “ते नाहीच ऐकले तर बाबांच्या कानावर घालुयात.”
“तो प्रोब्लेम नाही रे,” विजय दीर्घ श्वास घेत बोलला. “ह्या गोष्टीची भनक जरी आपल्या लेकांना लागली ना तर तो गौतम मुंबईच्या बाहेर जाणारा एकही घाट चढू शकणार नाही.”
“सुजयसोबत बोलला का?” राहुल
“त्याच्या कानावर तर घातलं आहे,” विजय “की परीला काहीच सांगू नकोस म्हणून. तिला तर तो काही सांगणार नाही. असही तिच्यासाठी त्याला पाडलं आहे ते त्याला माहिती नाही. पण जेव्हा ही तो बरा होईल तेव्हा त्याच्या बाकी बंधू मंडळींना तो घेऊन नक्कीच चर्चा करेल. मग मात्र त्यांना अडवण जरा कठीण होईल.”
“बघू,” राहुल “त्याच्याशी उद्याच परत बोलू. बरं अजून कोणाला काही माहिती नाही ना?”
“तुषारला माहिती आहे,” विजय “मागे परीला किडनॅप करायचा प्रयत्न झाला होता तेव्हा पासून त्याला माहिती आहे आणि हे पण त्याच्यासमोरच घडलं. त्याने सुजयला सावध केल म्हणून त्याला फक्त खरचटलं आहे. नाहीतर ..” विजय बोलता बोलता थांबला.
“काही नाही होणार.” राहुलने विजयला मिठी मारली. मग ते दोघेही ज्याच्या त्याच्या घराकडे निघून गेले.
विजय त्याच्या खोलीत पोहोचलाच होता की त्याला बेडवर सायली जागीच दिसली. जी विजयला रोखुब बघत होती. ती पाणी पिण्यासाठी उठली होती. तेव्हा तिला विजय काही तिच्या बाजूला दिसला नाही. तो घरात असेल म्हणून तिने सगळ घर चाळून पाहिलं. पण विजय काही दिसला नाही. मग तिने विजयला फोन देखील लावला. पण तो फोन देखील उचलत नव्हता. शेवटी वैतागून त्याची वाट बघत बसली आणि काही वेळातच विजय घरी पोहोचला होता.
“कुठे गेला होता?” सायली
“ते राहुल सोबत गेलो होतो जरा.” विजय बाथरूममध्ये शिरत बोलला.
तोपर्यंत सायली बाथरूमच्या दाराशीच उभी राहिली. जसा तो बाहेर आला तस तिने तिच्या प्रश्नांची मालिका सुरु केली.
“काय काम होत?” सायली “आणि इतक म्हत्वाच होत की साध मला उठवलं पण नाहीत.”
“तस नाही,” विजय तिला समजावत बोलला. “तू आताच कुठे शांत झोपली होतीस म्हणून म्हटलं..”
“काय लपवत आहात?” सायलीने विजयच बोलण पूर्ण होण्याआधीच विचारलं.
“कुठे काय?” विजय बेडवर पसरत बोलला. “काही नाही. चल झोप. उद्या परत जायचं आहे ना त्याला घरी घेऊन यायला.”
“विषय बदलू नका.” सायली जरा चिडून बोलली.
आता विजय जरा विचारात पडला. तिला काय उत्तर द्याव? तेच त्याला समजत नव्हत. एकतर तो तिच्याशी खोट बोलू शकत नव्हता. जरी प्रयत्न केला तरी सायलीला ते समजून जात होत आणि तो आताची खरी परिस्थिती सांगू देखील शकत नव्हता.
“तुमच शांत रहाण मला टेन्शनमध्ये टाकत आहे,” सायली हळवी होत बोलली. “प्लीज काय ते खर सांगा.”
मग मात्र विजयचा नाईलाज झाला आणि त्याने सुजयसोबत जे काही झाल ते तिला सांगून दाखवलं. आताही तो गौतमला भेटून आल्याच सांगितलं.
ते सगळ ऐकून सायलीला धक्काच बसला. “तुम्ही त्या गौतमला असच का सोडून आलात?” सायली रागात बोलली. “त्याने सुजयला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त त्याला बोलून आलात? का?” सायली रागात थरथरत होती.
“कारण सुजय जरी पडण्याचा प्रयत्न झाला असला तरी सुजयने तो चुकवून त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.” विजय एक दीर्घ श्वास घेत बोलला.
“म्हणजे?” सायली
मग विजयने तिला झालेली घटना परत विस्तारून सांगितली. मग टेन्शनमध्ये असलेल्या सायलीच्या डोक्यात प्रकाश पडला. पण त्याच्यावर हल्ला झाला होता ही गोष्ट तर खरी होती. आता त्याचच टेन्शन सायलीच्या मनात परत उभं राहील.
“पण त्यांनी अस का केल?” सायली “पुन्हा अस काही केल तर?”
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
