Login

आठवणींचा झुला

ईरा शब्दांचा सुरेल प्रवास
आठवणींचा झुला

आठवण तुझी येते
झुलतो हा मनांत झुला
काहूर माजते हृदयात
कसे समजावू तुला

कातरवेळी तु यावे
माझ्या घराच्या अंगणात
आठवणीत मी रमावे
स्मरण तुझे येते नित्य मनांत

तुझ्या गोड संवादाचा
लागला होता मला लळा
तुला पाहताच प्रेमाचा
उंच जाई हा झोपाळा

तुझे ते निरागस
मन मला आठवले
तुझ्या प्रतीबिंबाला पाहून
अश्रू गालावर ओघळले

किती किती आठवू
तुझ्या मर्मबंधातील आठवणीला
तुला हृदयात घेऊन
जाईल उंच हा प्रेमाचा झुला

©®नामदेवपाटील
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →