Login

आदरणीय आरती पाटील - गाडीगावकर : लेखणीला सर्वांगसुंदर जपणारी लेखिका

स्री लेखनातून समाज समृद्ध होत आहे.

अनंत साथ हवी लेखणीला
बहरते ही मनमुराद कला
अनमोल आहे ही कृती
सुखीसंपन्न रहावी आरती
……. ✍️
----------------------
अनेक टक्के टोणपे खात पांथस्थ वाटेने जात असतो. भुकेने व्याकूळ झालेला जीव गर्द सावलीची वाट पाहत असतो.झपझप पावले टाकून पायात त्राण उरलेला नसतो.नागमोडी वळणे पायांना नुसतीच गरगर फिरवत असतात.अशातच एक आशेचा किरण त्या पांथस्थाला दिसतो. वाटेच्या कडेलाच हिरवागार गर्द झाडी असलेला व लगतच नितळ पाणी असलेला छोटासा डोह नजरेस पडतो. लगबगीने पांथस्थ गर्द झाडाच्या सावलीत विसावा घेतो. मनसोक्त पाणी घटाघटा पितो व आपण आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेत या डेरेदार वृक्षाला आशिर्वाद दितो ...!! नेमके अशाच प्रकारे वाचक आदरणीय लेखिका सौ. आरती पाटील मॕडम यांच्या लिखाणाला लुब्ध व तृप्त होतो. ईरा या व्यासपिठावर जेंव्हा वाचक नजर खिळवतात तेंव्हा त्यांंच्या समृद्ध लेखनकलेने मनोमन सुखावतो व भरभरुन प्रतिसाद देतो.प्रत्येकाची लिहण्याची शैली असते त्या शैलीला आपल्या भावनेचा ओलावा देऊन लेखन सुरु असते त्यात आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब नक्कीच उमटते.एका सार्वत्रिक ओघवत्या शैलीचे नवे रुप त्यांच्या लेखणीत सामावलेले आहे.कथेचा बाज, श्रृंगार , संवाद, भाषाशैली मनाचा ठाव घेतात.व्यस्त कामातून गुंतलेली स्री लिखाणातूनही सामाजिक भान राखते हे स्री जीवनाचे सार्थक आहे.या सर्वगुणसंपन लेखिकेचे ईरा या व्यासपीठावर सर्वांगसुंदर लेखन केले आहे .आपल्या कथेतून विविधअंगी विषय मांडताना त्यांची लेखणी थांबलेली नाही.चौफेर लेखन करताना त्यांनी ईरा व्यासपीठावरील वाचकांना दर्जेदार लेखनाची मेजवानी दिली आहे.

अनेक जबाबदा-या सांभाळून आरतीजी यांनी ईरावर सदाबहार लेखन केले आहे.माझा पैसा उधळण्यासाठी नाही, कठोर ममता, अपेक्षांचे ओझे, संघर्ष आस्तित्वाचा ,सुतावरुन स्वर्ग,गंध फुलांचा , मालकीण, जैसे त्याचे कर्म ,आरसा,कर्तृत्व ,कर्मफळ,माहेरचा मोह ,वल्लरी,सूनवास, अग्नीपरिक्षा, शापित सौंदर्य , मान - अपमान,दोघात तिसरा,नणंदचा हक्क,प्रेम , सेवा ,आईची माया, सहनशक्ती, हुंडा बळी,सीमारेषा यासारख्या कथा व कथामालिकेतून त्यांची वैचारिक लेखणी अधिक गतिमान झाली आहे.त्यांची ' अनोखी गाठ ' ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. भविष्यात याची पुस्तकरुपात नक्कीच वाचकांना भेट मिळेल.

ईरा व्यासपीठावर सदाबहार लेखन करताना ईराच्या विविध स्पर्धेत त्यांचा सहभाग मोलाचा असतो. लहान मुलाचा सांभाळ करुन त्यांनी लेखनकलेला प्राधान्य दिले आहे.त्यांच्या या छंदाला व वैविध्यपूर्ण लेखनाला खूपसा-या शुभेच्छा ..! यापुढेही अशीच साहित्यसंपदा बहरत रहावी यासाठी सदिच्छा ..!!

© नामदेव पाटील





0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →