अंत:अस्ति प्रारंभ: |
भाग ५१
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले,मावशी राहुलच्या कृत्यांबाबत पोलिसांना जबाब देत आहे.राहुलने रश्मीला आणले आहे.पुढे पाहू...
बेशुद्धावस्थेत असलेली रश्मी सकाळी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा राहुल धावतच आला.तिला रुममध्ये घेऊन गेला. दार लावल्यामुळे आत काय झाले ते मला समजले नाही. मी गॅसवर चहा ठेवला होता. त्या चहा मधील चहा पावडर जसजशी उकळत होती तसतसा चहाचा रंग बदलत होता.तसाच माझ्या मनात राग खदखदत होता.पण काय करणार?
थोड्यावेळाने मालक बाहेर आले.मी त्यांना चहा दिला.आत जाऊन रश्मीला चहा नेऊन दे असे त्यांनी सांगितले म्हणून मी आत चहा घेऊन गेले.रश्मी रडत होती.मला खूप वाईट वाटत होते.तिला जवळ घ्यावे.तिच्या डोक्यावरुन हात फिरवावा असे मला वाटत होते.पण मी तिथे चहा ठेवला आणि बाहेर आले.
मी माझ्या कामाला लागले.संध्याकाळचा स्वयंपाक झाला.मालक कुठेतरी बाहेर गेले होते.ते आले तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक साडी आणि गजरे ठेवले. त्यांनी सांगितले,
"रात्री जेवण झाल्यावर रश्मीला तयार करायचे.नवरीसारखे सजवायचे.ही लाल साडी नेसवा.गजरे घाला.मेकअप करा.वरुन ही चुनरी डोक्यावर घाला आणि बेडवर बसवा.बेडवर या लाल गुलाबाच्या पाकळ्या अंथरा.तिने जर तयारी करु दिली नाही तर मला बोलवा."

"मग काय झाले ?" सजवले का तुम्ही तिला?"
"हो.मी आधी जेवणाचे ताट घेऊन गेले होते.पण तिने जेवायला नकार दिला. थोडावेळ मी वाट पाहिली.मी जेवून मागचे आवरले व पुन्हा गेले.तरीही ती जेवली नव्हती. मग तिचे आवरायला घेतले.तर ती विरोध करु लागली. मी तिला सांगितले,
" बाई, मला माझे काम करु देत." आणि मी तिला साडी नेसवायला घेतली.ती रडत होती, ते पाहून मला वाईट वाटत होते. पण मालकांच्या भीतीमुळे मी तिचे आवरायला घेतले होते. तिला साडी नेसवून केस विंचरुन त्यावर गजरे माळले.चेहऱ्यावर मेकअप करण्यास तिने नकार दिला.तिच्या डोक्यावर चुनरी देऊन मी बाहेर आले.

मला बाहेर आलेले बघून मालकांनी दुधाचा ग्लास भरुन द्यायला सांगितले.मी दुधाचा ग्लास तिथे टेबलावर ठेवून आले.मालक आत शिरले व त्यांनी दार लावून घेतले.आतून आवाज येत होता.रश्मी विरोध करतेय हे समजत होते.पण ऐकून न ऐकल्यासारखे करत आम्ही आमच्या अंथरुणावर पडलो.माझी झोप उडाली होती.कधीतरी माझी झोप लागली.
सकाळी मालक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्ततेचे भाव दिसत होते.चेहऱ्यावर लिपस्टीक लागली होती. ते पाहून मला खूप चीड आली.पण मी काहीच करु शकणार नाही हे मला माहीत होते."
" असे कसे काहीच करु शकत नव्हता? पोलिसांत तक्रार करु शकला असता.तेव्हा तक्रार दाखल केली असती तर पुढचा अनर्थ टळला असता.अजून चार- पाच मुली वाचल्या असत्या.तुम्हीही सही सलामत सुटला असता." मॅडम म्हणाल्या. इन्स्पेक्टर सोहनी बारकाईने जानकी मावशींचा जबाब ऐकत होते. त्यांनीही मान डोलावली.
" तुम्हारे पती को तो समझना चाहिए था | तुम घरपें रहती हो वो तो बाहर घुमता है | या फिर यहांसे नौकरी छोडकर जाना चाहिए था |
अपनी थोडीसी लापरवाही अपने ही सर पर सवार होती है | अब तुम दोनोंको लेने के देने पड गये ना | " यावर जानकी मावशी चिडीचूप झाली.मॅडमनीच विचारले,
"मग पुढे काय झाले?"
" काय होणार होते? मी रुममध्ये शिरले तर रश्मी बेडवर पडून होती. बेडवर चे बेडशीट चुरगाळले होते.रात्री बेडवर टाकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या चुरगाळून कोमेजून गेल्या होत्या. तशीच रश्मी ही कोमेजून गेली होती. मग पुढचे काही दिवस असेच चालू राहिले.रश्मीने हे स्वीकारले.ती कुणाशीच काहीही बोलायची नाही.अखेर तो दिवस उजाडला आणि मालक तिला घेऊन मुंबईला गेले.ते गेल्यावर आम्ही निःश्वास सोडला."
"आजच्या पुरते एवढेच पुरे.राहिलेला जबाब उद्या घेऊया." असे इन्स्पेक्टर साहेब म्हणाले.त्यामुळे पोलिस लेखनिक कर्मचारी तिथून उठला. मॅडमनी मावशीला तिच्या बराकीत जायला सांगितले.

मुन्ना सकाळी सात वाजता हाॅटेलवर पोहोचला.दहा वाजता फ्लाईट होती.आठपर्यंत तर पोहोचणे आवश्यक होते. मुन्नाने आपण आलो आहोत असा फोन केला.मनिषने हाॅटेलच्या कर्मचाऱ्याला सामान गाडीत ठेवायला वर पाठवून द्या असा मॅनेजरला फोन केला. सामान गाडीत ठेवून झाले की दोघे खाली आले.स्टाफचा निरोप घेऊन दोघे मुन्नाच्या मुमताजकडे वळले.
मुन्नाचा चेहरा पडला होता हे सहजच लक्षात येत होते.त्याने एक बरणी निकीताच्या हातात दिली.
" मेरी बिबीने ये अचार आपकें लिये भेजा है | खाना जरुर |"

"हां हां ! जरुर |" असे म्हणत निकीताने ती बरणी हातात घेतली.एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी बॅगेत टाकली.
मुन्नाची मुमताज एअरपोर्टच्या दिशेने धावू लागली. मुन्ना गप्प गप्प आहे हे दोघांच्या ही लक्षात आले.
मनिष म्हणाला,
"हम अगले साल जब यहां आयेंगे तो हमें आपकी मुमताज में ही घुमना है | याद रख लो |"
हे ऐकून मुन्नाला आनंद झाला.
"आप जब आनेवाले होंगे तब मुझे फोन कर देना | आपके लिये हैं कोई और सवारी नहीं लूंगा |"
"आप भी बच्चोंको और बिबीको लेकरं बंबई घुमनेकें लिये आ जाओ | हम वहां आपको घुमायेंगे |"
हे ऐकून मुन्नाला खूप आनंद झाला.तो म्हणाला,
आप तो दर्यादिल हैं साहेब | हम कहां इतनी दूर जायेंगे | पर अपने बुलाया यहीं बहोत हैं हमारे लिये |"

त्यानंतर मुन्नाने त्यांना एअरपोर्टवर सोडले.सगळे सामान उतरवून झाल्यावर मुन्नाने निरोपासाठी हात जोडले. ते पाहून मनीषने त्याला आलिंगन दिले. जेव्हा निकिता हरवली होती त्यावेळी मनीषला तन्मय आणि मुन्ना या दोघांचाच आधार होता. वेळप्रसंगी संकट समयी जो माणूस उपयोगी पडतो, त्याचे उपकार आयुष्यभर विसरायचे नसतात असे मनीषला वाटत होते. त्याने मुन्नाला आलिंगन देताच मुन्नानेही त्याला मिठी मारली.
" आप तो मेरे भाई जैसे हो | मुझे भूल मत जाना | फोन करते रहना |" असे तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. हे पाहून निकितालाही वाईट वाटले. मनीषने मुन्नाच्या हातात दोन हजार रुपये कोंबले. मुन्ना पैसे घेत नव्हता. तो म्हणत होता,
" भाई साहब,आप तो मुझे पराया बना रहे है | मुझे पैसे नही चाहिये | मैं अपने भाई को छोडने के लिये यहां आया हूं |"
हे ऐकून मनीष म्हणाला,
" रहने दो | तुम्हारे बच्चों को इस पैसे से कुछ जरुरी सामान ले के जाओ |" त्यांच्या निरोप घेण्याची वेळ आली होती. कधीतरी त्यांना दूर होणे भाग होते. ट्रॉली ओढत मनीष आणि निकिता एअरपोर्टच्या आत निघाले. मुन्ना बाहेर उभा राहून हात हलवत होता. मधूनच डोळे पुसत होता. ते दोघे दिसेनासे होईपर्यंत मुन्ना तिथेच उभा राहिला होता. त्यानंतर त्याने गाडी घराकडे वळवली आणि तो माघारी फिरला.
क्रमश:©® सौ.हेमा पाटील.