अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ४५
भाग ४५
©® सौ.हेमा पाटील.
तन्मय निकीताला राहुल बद्दल अधिक माहिती विचारत आहे. जेणेकरून राहुलला पकडणे व अडकवणे सोपे जावे.खूपदा काय होते पोलिस तपास करतात, गुन्हेगारापर्यंत पोहोचतातही! गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होतो, पण सबळ पुराव्याअभावी त्या आरोपीची कोर्टात निर्दोष सुटका होते. न्यायदेवता आंधळी आहे म्हणतात ते याचसाठी.समोर आलेल्या आरोपीने केलेला गुन्हा कोर्टात सबळ पुराव्यांसह शाबित व्हायला हवा. तसा झाला नाही तर तो आरोपी कुठलीही शिक्षा न होता सुटतो, आणि उजळमाथ्याने समाजात फिरतो.पुन्हा नवीन जोमाने तो गुन्हे करतो कारण आता तो निर्ढावलेला असतो.यासाठी तन्मय राहुल भोवतीचा पाश आधी पुराव्यांनी आवळून तयार करत होता. म्हणजे मग राहुल सापडला की त्याची मान यात आवळली गेली पाहिजे.अशा नीच माणसाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे असे त्याला वाटत होते.
निकीता व तन्मय मध्ये चाललेले हे सगळे संभाषण बाजूला बसून ऐकत असलेला मनिष म्हणाला,
" किती किचकट आहे हे सगळे. सुतावरुन स्वर्ग गाठणे का म्हणतात ते आज समजले.पोलिस तपास करतात म्हणजे काय काय करतात हे तुझ्यामुळे जवळून पाहिले. आपण उगाचच त्यांना दोष देत असतो. गुन्हेगाराला शोधून काढणे किती अवघड आहे."

"असे काही नाही.काही पोलिसांनी खात्याला बदनाम केले आहे.पण सगळेच असे नसतात.प्रामाणिकपणे काम करणारेही बरेच असतात. आणि कामाचे म्हणशील तर सगळ्यांनाच ते करावे लागते.तू नाही का तुझ्या प्रोजेक्ट मधल्या त्रुटी शोधत? तसेच आहे हे. निरीक्षण तर सगळ्यांनाच करावे लागते. गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी आणि त्याला बोलते करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते.
तशीही माझ्या खबऱ्यांनी राहुलची मुंबईतील सगळी कुंडली मांडून मला पाठवली आहे. तो मुंबईत जाण्याचा अवकाश! एअरपोर्टवरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल.

या सातजणींची तू नावे सांगितली आहेस ती मी आता पोलिस रेकॉर्ड प्रमाणे चेक करतो. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून इथे हनिमूनसाठी आलेल्या जोडप्यातील सात मुली बेपत्ता झाल्या होत्या.आठवा तुझा नंबर होता."
हे ऐकल्यावर निकीता म्हणाली,
" मी ही हनिमूनसाठीच आले आहे असा त्याचा ग्रह झाला होता.त्याने मला तसे बोलूनही दाखवले होते.मी त्याचा ग्रह दूर करण्याच्या भानगडीत पडले नव्हते.त्यापेक्षा आपली सुटका कशी करुन घेता येईल तिकडे माझे सगळे लक्ष लागले होते."

"अच्छा! म्हणजे हनिमूनशी याचे काहीतरी मिस कनेक्शन आहे वाटते! हा पाॅईंट पण लक्षात ठेवायला हवा." असे म्हणत तन्मयने याचीही त्याच्या लॅपटॉपवर नोंद केली.
त्यानंतर त्याने निकीताला सांगितले,
"आता तू जी माहिती दिलीस, याव्यतिरिक्त आणखी काही आठवले तरी मला लगेच कळव. आणखी एक! आपण अजून दोन दिवस इथे असणार आहोत. त्यादरम्यान तुला पुन्हा एकदा पोलिस स्टेशनमध्ये बोलावतील.तिथे जाऊन जे विचारतील त्याची न घाबरता उत्तरे दे."
निकीता ने होकारार्थी मान हलवली.
"आता तुम्ही फिरायला गेलात तरी चालेल.राहिलेले पाॅईंटस् पाहून घ्या." असे म्हंटल्यावर निकीताने मनिषकडे पाहिले.
"तू माझ्यापासून अजिबात दूर जाणार नाहीस हे आधी कबूल कर.तरच आपण जाऊया." असे मनिष म्हणाला.
"इथे काय मोगलाई लागली आहे का रोज रोज किडनॅप व्हायला? आणि आता तो राहुल मसुरीत नाही. त्यामुळे बिनधास्त जा.तसेही त्याचे मोकाट फिरण्याचे दिवस संपत आलेतच. त्यामुळे काळजी करु
नका." असे तन्मय म्हणाला.

भट्टा फाॅल्स येथे जाण्याचे दोघांनी ठरवले . मसुरीतील भट्टा फॉल्स हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाचशे मीटरचा छोटा ट्रेक करावा लागतो. हा नैसर्गिक धबधबा 30 फूट उंचीवरून गोलाकार तलावात कोसळतो. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अद्याप व्यापारीकरण झाले नाहीय. तळाशी असलेल्या तलावात पोहण्यासाठी लोकांना या फॉलचे आकर्षण वाटते. त्यामुळे या दोघांनी भट्टा फॉल येथे जाण्याचे ठरवले.
मुन्ना त्या दोघांना घेऊन भट्टा फॉल्स येथे गेला. मात्र त्याने दोघांनाही ताकीद दिली,
मेमसाब, आप साब के साथ ही रहना | उनका हाथ बिलकुल भी मत छोडना | हे ऐकल्यावर निकिता मनीष कडे पाहून हसली.
" ओके भैय्या !"असे म्हणत तिने मनीषचा हात धरला आणि दोघे ट्रेकिंगच्या दिशेने चालू लागले. अर्धा किलोमीटर चालत जाताना रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडे ,हिरवीगार झुडपे दिसत होती .आणि त्याच्या मधून चालताना असीम शांततेचा अनुभव येत होता.

तेथे अजिबात गर्दी नव्हती दोघेजण भट्टा फॉल्स जवळ पोहोचले तेव्हा तिथे मोजून दहा-बारा पर्यटक दिसत होते . या दोघांनी वेगवेगळ्या अँगलमधून फॉल्सचे फोटो काढले. त्यानंतर मनीषने तलावात पोहूया अशी टुम काढली.
हो नाही करता करता मनीष आणि निकिता पाण्यात उतरले. पंधरा-वीस मिनिटे मनसोक्त पोहल्यानंतर दोघे बाहेर आले, परंतु दोघांकडेही दुसरे कपडे नव्हते. त्यामुळे तशाच अवस्थेत परत अर्धा किलोमीटर ट्रेकिंग करत ते पुन्हा ज्या ठिकाणी मुन्ना थांबला होता तेथे पोहोचले. गाडीच्या डिक्कीत असलेल्या बॅगेत दोघांचे कपडे होते.
मनीषने गाडीच्या पलिकडे असलेल्या झुडपांमध्ये जाऊन कपडे बदलले. निकिताला गाडीमध्ये बसूनच कपडे बदल असे त्याने सांगितले. आता तो कोणतीही रिस्क घ्यायला तयार नव्हता. निकिताने तसेच अवघडत गाडीत कपडे बदलले. त्यानंतर ओले कपडे एका बॅगेत टाकून डिकीत टाकले आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत त्यांनी एके ठिकाणी थांबून थोडेसे खाल्ले आणि कॉफी घेतली. त्यानंतर मात्र कुठेही न थांबता दोघेही हॉटेलवर परतले.

दरम्यान तन्मय चा फोन आला होता. "कुठे आहात ?"एवढेच त्याने विचारले. "संध्याकाळी बोलू" असे म्हणून त्याने फोन ठेवला.
दोघे हॉटेलवर पोहोचले तेव्हा तन्मय अजून परत आला नसल्याचे त्यांना कळले .थोड्यावेळातच तन्मय आला आणि तिघेजण एकत्र गप्पा मारत बसले. त्यावेळी मनीषने तन्मयला विचारले,
"त्या सखारामने गुन्हा कबूल केला का? त्याने काय सांगितले ?" यावर तन्मय म्हणाला,
" अजून तरी त्याने गुन्ह्याला कबुली दर्शवली नाही. परंतु त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा सापडला आहे. त्यामुळे त्याने गुन्हा कबूल केला नाही तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. यासाठी निकिताची साक्ष सर्वात महत्त्वाची ठरेल."
त्यानंतर फारसे काही बोलणे न होता तिघेही डायमिंग हॉल कडे गेले. जेवण करून आल्यावर तन्मय म्हणाला,
" उद्याचा दिवस मी इथे थांबणार आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे . उद्या सखारामला बोलते करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो कबूल झाला तर ठीक! नाहीतर इन्स्पेक्टर सोहोनी आहेतच! त्यांच्याने सुद्धा जमले नाही तर त्याला स्पेशल केसच्या अंतर्गत मुंबईला पाठवा असे सांगितले आहे. कारण घटना जरी मसूरी येथे घडलेली असली तरी संबंधित आरोपी आणि ज्यांच्या बाबतीत गुन्हा घडला त्या व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे मसूरी पोलिसांनी ही केस महाराष्ट्रातील पोलिसांकडे सोपवावी अशी मी विनंती केलेली आहे."
"आणि राहुल? त्याचे काय? त्याला कधी पकडणार?" असे निकीताने विचारले. क्रमश: ©® सौ.हेमा पाटील.
निकीताच्या प्रश्नाचे तन्मय काय उत्तर देतो ते पुढच्या भागात पाहू.