Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ४३

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ४३
©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले होते,अनिता राहुलच्या तावडीत सापडली आहे...पुढे..

    राहुलने तिचा मनसोक्त उपभोग घेतला. त्यानंतर त्याने तिला सांगितले,
" कपडे घाल". यावर ती तशीच पडून राहिली. तो म्हणाला,
" कपडे घातले नाहीस तर अशाच अवस्थेत मी तुला घेऊन जाईन. तुला चालणार असेल तर बघ." हे ऐकल्यावर तिने मुकाट्याने अंगावर कपडे  चढवले. नवऱ्यापासून तिने आजपर्यंत स्वतःला दूर ठेवले होते.त्याला अंगाला हात लावू दिला नव्हता.आपल्या प्रियकराची ती वाट पहात होती.तो उद्या इथे येऊन तिला घेऊन जाणार होता. पण त्याआधीच राहुलने डाव साधला होता.

तो तिला म्हणाला,
" आता मुकाट्याने माझ्या मागोमाग माझ्यासोबत चल. जर ओरडलीस तर माझ्या इतके वाईट नाही."
त्याने तिच्यासोबत जे काही केले होते ते पाहून तिला दशहत बसली होती. आपण परक्या ठिकाणी आहोत याचे तिला भान होते. तिचे सगळे शरीर पिळवटून गेले होते. अंगात चालण्याची सुद्धा शक्ती नव्हती. त्यात त्याने तिला धमकी दिली होती,
" मी तुझा फोन ऐकला आहे. तू जर माझे काही ऐकले नाहीस तर मी तुझे फोनवरचे बोलणे तुझ्या नवऱ्याला सांगेन. मग तू काय करायचे ते बघ." हे ऐकल्यावर तिला वाटले हे जर नवऱ्याला समजले तर तो आपली काय  अवस्था करेल? कुठल्या नवऱ्याला हे सहन होईल?  त्यामुळे राहुल जे काही सांगत होता ते केले नाही तर त्याचा गंभीर परिणाम होईल असे तिला वाटले. आपण आत्ता रस्त्यावर आहोत. याला विरोध करुन पळून गेलो अगर आरडाओरडा करुन माणसे जमवली तर हा काहीच करु शकणार नाही असा विचार तिच्या डोक्यात यायला हवा होता. पण अचानकपणे घडलेल्या प्रसंगामुळे तिची विचारशक्ती लुळी पडली होती. हिप्नोटाईज झाल्यासारखी ती निमूटपणे त्यांच्या मागे मागे चालली होती.

सकाळची वेळ होती राहुल तिला घेऊन सरळ त्याने रेंटवर घेतलेल्या रुमजवळ आला. आत येताना ती बाहेरच थबकली.त्याने तिला दरडावून सांगितले,
"आत चल."
त्याला नकार दिला तर तो खरंच नवऱ्याला सगळे सांगेल अशी तिला भीती वाटत होती. नवऱ्याच्या नजरेतून उतरणे तिला योग्य वाटत नव्हते. उद्या जर  मानस आलाच नाही तर तिला नवऱ्याच्या घरीच जाऊन रहावे लागणार होते. माहेरी कुणी ठेवून घेतले नसते. त्यामुळे ती मुकाट्याने आत शिरली.
तिचे  हातपाय बांधून तिच्या तोंडावर रुमाल बांधून तो बाहेर पडला.जेणेकरुन आपण परत येईपर्यंत तिने आरडाओरडा करुन नये.

आता तो निवांतपणे हाॅटेलच्या समोरील बागेतल्या बाकड्यावर बसला होता. तिथून त्याला हॉटेलकडून येणारा रस्ता दिसत होता. थोडा वेळ झाला आणि त्याला अनिताचा नवरा  हाॅटेलच्या बाहेर दिसला. कावऱ्याबावऱ्या नजरेने इकडे तिकडे पहाणाऱ्या त्याच्याकडे पाहून  राहुलच्या चेहऱ्यावर छद्मी हसू पसरले.  जिच्या काळजीने हा इतका  घाबरला आहे ती मात्र दुसऱ्याच्या मिठीत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होती. ह्या बायका अशाच असतात कृतघ्न... विश्वासघातकी ! असे त्याला वाटले. त्यानंतर मात्र तो तिथे थांबला नाही.

 रुमवर येताच त्याने टॅक्सी बोलावली आणि तो तिला घेऊन नैनितालकडे जाण्यासाठी बसमध्ये बसला. त्या दोघांकडे पाहून  कुणालाही नवीन लग्न झालेले जोडपे आहे असेच वाटले असते. तोही तिच्याशी तशाच पद्धतीने लगटून बसला होता. अनिताला हे काय चालले आहे ते समजत नव्हते. राहुलने तिचा मोबाईल मगाशीच  ताब्यात घेतला होता आणि मोबाईल स्विच ऑफ केला होता. आता त्याने त्यातील कार्ड काढून त्याचे दुमडून दोन तुकडे करुन खिडकीतून खाली टाकून दिले. ते पाहून अनिताला खूप वाईट वाटले. पण ती काहीच करू शकत नव्हती. खरंतर  तिने आपल्या नवऱ्याला सगळे खरे खरे सांगायला हवे होते. त्याने काय केले असते? शिक्षा दिली असती का? टाकून बोलला असता का? ते वेगळे!  पण आता मात्र ती राहुलच्या कचाट्यात पुरती सापडली होती. यातून आता आपली सुटका कशी होणार हे तिला समजत नव्हते.

नैनितालला गेल्यावर राहुलने एका घरामध्ये एक छोटीशी रूम महिनाभरासाठी भाड्याने घेतली. त्या घरात त्याने अनिताला ठेवले. तो जेव्हा बाहेर जात असे तेव्हा बाहेरून कुलूप लावून जात असे.तेव्हा अनिताला तो बांधून ठेवत असे.तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबत असे.बाहेरुन येताना तिच्यासाठी जेवण घेऊन येत असे.

दिवसरात्र यापैकी कशाचाच विधीनिषेध तो पाळत नसे.त्याला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तो तिच्याजवळ येऊन तिचा मनसोक्तपणे उपभोग घेत असे.प्रत्येकवेळी तिच्यापासून दूर होताना तो तिच्या कानाच्या पाळीचा चावा घेत असे व तिच्या कानात पुटपुटत असे,
"झाला का हनिमून साजरा?"
महिना झाला तरीही तो दररोज ते वाक्य प्रत्येक वेळी तिच्या कानात पुटपुटत असे.अनिता एकदम कोमेजून गेली होती.आपण फार मोठी चूक केली हे तिच्या लक्षात आले.पण आता पश्चात्ताप करुन काहीच उपयोग नव्हता. तेव्हाच आपण नवऱ्याला सगळे खरे सांगायला हवे होते.त्याची माफी मागितली असती तर त्याने कदाचित माफ केलेही असते.कदाचित डिव्होर्स घेऊया म्हणाला असता.ते परवडले असते.पण आता ही जी विटंबना सुरु आहे ती फार भयंकर आहे.

'  प्रेम करणे चुकीचे आहे का? आणि माझे आयुष्य आहे. यावर माझा अधिकार आहे. आईवडिलांना दाताच्या कण्या करुन विनवणी करत होते.त्यांनी ऐकले नाही.'
" होणाऱ्या नवऱ्याला जर काही सांगितलेस तर मी जीव देईन" अशी आईने धमकी दिली होती.त्यामुळे नाईलाजाने ती लग्नाला तयार झाली होती.
  "मी नवऱ्याला फसवले म्हणून या तिऱ्हाईत माणसाला राग येण्याचे काय कारण? मी आणि माझे आयुष्य ! याला मध्ये कडमडायचे काय कारण?" असे तिला वाटत होते.नाहीतरी हा सायको आहे हे त्याच्या वागण्यावरुन  तिच्या लक्षात आले होते.पण आता ती पुरती अडकली होती.
जवळपास महिना उलटून गेला होता.या महिनाभरात तिने रुमच्या बाहेर अजिबात पाऊल टाकले नव्हते.रुममध्येच टाॅयलेट बाथरुम होते. जेवण तर तोच घेऊन येत होता.तो रोज न चुकता तिच्यासाठी गजरा घेऊन येत असे. तिच्याजवळ आल्यावर तो अतिशय आक्रमक होत असे. तिला आधी केसांत गजरा माळायला लावत असे.तिच्याजवळ आल्यावर तो गजरा आपल्या हाताने एक एक कळी तो कुस्करुन टाकत असे.त्यावेळची त्याची नजर पाहून अनिताला भीती वाटत असे.त्यानंतरचा त्याचा आवेश तिला पेलवत नसे.परंतु ते सहन करण्यावाचून तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

एक दिवस तो बाहेरुन रुमवर आला आणि त्याने आणलेला गजरा तिच्याकडे भिरकावला.रोजच्या सवयीने तिने तो केसांत मावळला व ती डोळे मिटून बसून राहिली.आता तो आपल्यावर झडप घालेल हे तिच्या सवयीचे झाले होते.झालेही तसेच! पण आज तिची त्याच्या तावडीतून लवकर सुटका झाली. त्याने सांगितले
" तयारी कर.आपल्याला बाहेर जायचे आहे.तुझे सगळे सामान बॅगमध्ये भर ."
तिने आपले सगळे सामान भरले.तो तिला घेऊन एअरपोर्टकडे निघाला. दोघे मुंबईला जाणाऱ्या विमानात बसले होते.क्रमश:
©® सौ.हेमा पाटील.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →