अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ४२
भाग ४२
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, राहुल चंबाला निघाला होता.वाटेतच मेकॅनिकच्यापाशी रुम भाड्याने घेऊन तो तिथेच मुक्कामी राहिला होता.आता पुढे...
बाजेवर पडल्या पडल्या राहुलच्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या. अंजू त्याच्या चांगलीच लक्षात राहिली होती.सात तरुणींपैकी अंजूने त्याला थोडाफार त्रास दिला होता. त्यामुळे निकिताने जेव्हा त्रास दिला तेव्हाही त्याला अंजू आठवली होती.
आता मात्र त्याच्या नजरेसमोर सगळ्या सातही तरुणी उभ्या राहिल्या. त्यांची नावे आजही त्याला स्पष्टपणे आठवत होती.अर्थात गेल्या वर्षभरातील घटना होत्या त्या ! अंजू तीन नंबरची तरुणी होती. तिच्या आधीच्या दोघीजणींमध्ये सर्वात पहिला नंबर अनिताचा होता. अनिता तिच्या पतीसोबत हनिमूनला मसूरी येथे आली होती. ती दोघे नाशिक वरून आली होती. त्यावेळी राहुल मसूरी मध्येच होता. तो ज्या हॉटेलमध्ये राहिला होता त्याच हॉटेलमध्ये हे जोडपे त्याला काउंटर वर एन्ट्री करताना दिसले होते.तो नेमका हाॅटेलमधून चेकआऊट करत होता.तेव्हाच त्याच्या लक्षात आले होते की हे जोडपे महाराष्ट्रातून आलेले आहे. त्यामुळे तो तिथेच खुर्चीवर बसून राहिला होता. ते किती दिवस रहाणार आहेत याचा कानोसा त्याने घेतला होता. दुपारी दोघे जेव्हा जेवायला हॉटेलच्या हॉलमध्ये आले तेव्हा त्यांच्या मागोमागच राहुलही जेवणाच्या हॉलमध्ये शिरला होता. त्या दोघांचे एकमेकांशी काय बोलणे होते याकडे त्याचे लक्ष होते.त्यांच्या मागच्या टेबलवरच तो बसला होता.
थोड्यावेळाने दोघे रूमवर परतले तेव्हा राहुल बाहेर गेला होता. चार वाजता राहुल परत हाॅटेलच्या जवळ आला. ती दोघे कधी खाली येतात याकडे तो लक्ष देऊन होता. थोड्यावेळातच दोघे खाली आले. आणि गाडीतून फिरायला गेले. राहूलही त्यांच्या मागोमाग गेला. थोडा वेळच फिरायचे असे त्या जोडप्याने ठरवलेले असावे त्यामुळे फक्त जवळचे संग्रहालय पाहून ते हॉटेलवर परतले. राहुल ही त्यांच्या मागोमाग परतला. त्यांना हाॅटेलमध्ये शिरलेले पाहून तो तिथून बाहेर पडला. आता आज आपल्याला मसुरीतच रहावे लागेल हे त्याला समजले.त्याने एका एजंटला फोन करून एका दिवसासाठी घरगुती रुम हवी आहे हे सांगितले. अर्ध्या तासात एजंटने पाठवलेल्या पत्त्यावर तो गेला. तिथे आपले सामान ठेवून तो बाहेरून जेवून आला.
सकाळी लवकर राहुल बाहेर पडला. त्याला मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय होती. त्यामुळे तो चालत नदीकडेला गेला. त्याच्या मागोमाग त्याला आवाज आला म्हणून त्याने पाहिले, तर त्याला अनिता एकटीच दिसली. तो झाडामागे लपला. अनिता फोनवर बोलत बोलत पुढे आली. तिचे इकडे तिकडे कुठेही लक्ष नव्हते.सगळे लक्ष फोनवर बोलण्यात एकवटले होते .परंतु तिथे राहुल तिचे सगळे बोलणे ऐकत होता. हे तिच्या गावीही नव्हते.
ती फोनवर तिच्या प्रियकरासोबत बोलतेय हे राहुलच्या लक्षात आले.
त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती फोनवर बोलत होती,
"शोनु मी इकडे हनिमून साठी आले आहे. तुला मी आधीच सांगत होते, आपण पळून जाऊन लग्न करूया. पण तू माझे ऐकले नाहीस. आता माझी अवस्था किती वाईट झाली आहे? या नवऱ्या सोबत हनिमून साजरा करावा लागणार आहे.अजून मी त्याला माझ्या अंगाला हात लावू दिला नाही. पण हे फार काळ मी करु शकणार नाही.त्याच्या आत तू मला तुझ्यासोबत घेऊन जा. मला फक्त तुझ्यासोबत हनिमून साजरा करायचा आहे मानस."
तिचा प्रियकर बहुधा तिला समजावत असावा असे एकंदरीत तिचे बोलणे ऐकून राहुलला वाटले. एकदा लग्न झाले की मागचे सगळे विसरून जायला हवे. हनिमूनला नवऱ्यासोबत यायचे आणि फोन मात्र प्रियकराला करायचा. आठवण मात्र प्रियकराची काढायची, हे योग्य नाही असे राहुलला वाटले.

बोलण्याच्या नादात आपण जंगलाच्या दिशेने चाललो आहोत हे अनिताच्या लक्षात आले नाही. झाडांच्या आडोशाने लपत लपत राहुल तिच्या मागोमाग चालला होता. थोडेसे पुढे गेल्यावर आता इथे कोणीही येणार नाही हे कळल्यावर राहुल न लपता तिच्या मागोमाग बिनधास्तपणे चालत होता.
अनिताचा फोन झाला आणि त्यानंतर ती भानावर आली. तिने इकडे तिकडे पाहिले. आपण भर जंगलात उभे आहोत हे पाहून तिला भीती वाटली व दरदरुन घाम फुटला.
ती मागे वळली तर मागे पाच दहा पावलांच्या अंतरावर एक तरुण उभा होता. त्याला पाहून ती दचकली. राहुल तिच्याकडेच पाहत होता. त्याने पुढे होऊन सणकन तिच्या थोबाडीत मारली. या अनोळखी तरुणाने आपल्याला का मारले असावे याचा तिला काहीच बोध झाला नाही.ती राहुलकडे रागाने पहात होती. तिने विचारले,
" कोण आहेस तू ? मला का मारलेस? तुझा माझा काय संबंध?
मला ओळखतोस का तू?"
"तू मला ओळखतोस का?" या अनिताच्या प्रश्नावर राहुल म्हणाला,
"तुझ्यासारख्या बायकांना मी चांगलाच ओळखतो. लाज नाही वाटत वरुन विचारायला का मारले म्हणून ? मगाशी तुझा फोन ऐकला तेव्हाच मी तुला ओळखले. त्यामुळेच तुला कानाखाली वाजवली."

" मी कोणाला फोन करायचा हे तू कोण सांगणार? माझी मर्जी ! "
"हो ! तुझी मर्जी. दाखवतो आता तुला तुझी मर्जी! थांब तुझा माजच उतरवितो आता." असे म्हणून त्याने तिचा हात पिरगाळला. खिशातून रुमाल काढून तिच्या तोंडावर बांधला. तिचे दोन्ही हात खिशातून दोरी काढून बांधले.ती सुटण्याचा खूप प्रयत्न करत होती ,पण त्याने तिचे अजिबात काहीही चालू दिले नाही.

तो तिला आणखी आत जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिचे हात सोडून दोन झाडांना दोन दिशेने तिचे हात बांधले. तिच्या तोंडावरचा रुमाल सोडला.
"सोड सोड मला" असे ती किंचाळली. पण त्या जंगलात तिची किंकाळी कोणाला ऐकू जाणार होती? झाडांनी थोडीशी सळसळ केली इतकेच ! बाकी तिला सोडवण्यासाठी तेथे कोण येणार होते?
त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला किस केले.ती खूप विरोध करत होती ,पण त्याच्या ताकदीपुढे तिचे काहीच चालले नाही. त्याने तिच्या अंगात असलेला ड्रेस काढून बाजूला फेकला. तिच्या सर्वांगावर तो बराच वेळ किस करत होता. तिला खूप वाईट वाटत होते, पण तिचे काहीच चालले नाही. त्याने तिचा मनसोक्त उपभोग घेतला.त्याचे पूर्ण समाधान झाले तेव्हाच तो दूर झाला.
तिने मानससाठी अजून आपल्या नवऱ्यालाही अंगाला हात लावू दिला नव्हता. मानस येईल आणि आपल्यासोबत मला घेऊन जाईल अशी आशा तिच्या मनात होती. अन् या तिऱ्हाईताने मात्र तिची ही दयनीय अवस्था करुन ठेवली होती.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.