अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ४१
भाग ४१
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, जानकी मावशीला सोबत घेऊन राहुल मसुरीतून बाहेर चालला होता.आता पुढे..
या मावशीचे लोढणे तर गळ्यात आहेच, त्यात नेमप्लेट निखळलीय.ती बसवून घेतली पाहिजे.उगाच पोलिसांच्या डोळ्यांवर आपण यायला नको.आधीच ते आपला शोध घेत असतील.म्हणून त्याने गॅरेज दिसताच गाडी थांबवली.नेमप्लेट बसवून घ्यायला अर्धातास लागला.तेवढ्या वेळात त्याने ईस्माईलला फोन केला.
"मैं रात को तुम्हे मिलने आनेवाला था | पर एक जरुरी काम में अटका हूं | तुम्हें अकाऊंट पर पैसे भेज दिये है| अगर कमी हो तो बता दो | और भेज देता हूं |"
इस्माईल म्हणाला,
"जी नहीं | और भेजने की जरुरत नहीं| पर आप किधर है? मिलते तो अच्छा लगता|"

यावर "जल्द ही मिलते है | "असे बोलून त्याने फोन ठेवला.
नेमप्लेट बसवून झाली होती.आता पुढे जाऊन एखाद्या हाॅटेलमध्ये आसरा घ्यावा लागणार होता.त्याने बसल्या बसल्या मेकॅनिकशी गप्पा मारत मारत," इथे जवळपास रहाण्याची सोय होईल का?" असे विचारले. मेकॅनिकने सांगितले की,
" माझ्या दोन रुम्स आहेत.कधी कुणी भाड्याने मागितल्या तर मी देतो.तुम्हांला रहायचे असेल तर राहू शकता."
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी राहुलची गत झाली.हाॅटेलवर राहणे त्याच्यासाठी रिस्की होते.त्याचा रस्त्याने प्रवास करणे पण धोक्याचे होते.कारण पोलिसांनी त्याची माहिती सगळीकडे कळवली असण्याची दाट शक्यता होती. अशा आडबाजूला आपण राहिलो तर कुणाला समजणार नाही असे त्याला वाटले.त्याने मेकॅनिकला होकार दिला आणि जानकी मावशीला खाली उतरायला सांगितले.

गॅरेजच्या मागील बाजूस त्या मेकॅनिकचे घर होते.तो एकटाच तिथे रहात होता. त्याने रुम झाडून घेतली.एक चटई आणि पाण्याची घागर रुममध्ये आणून दिली.मागच्या बाजूस असलेले टाॅयलेट दाखवले. छोटीशी न्हाणी रुममध्येच होती.
आत एक लाकडी बाज होती. राहुल बाजेवर जाऊन बसला.जानकी मावशीला त्याने चटई अंथरुन झोपायला सांगितले. मावशीने चटई अंथरली व झोपून घेतले.
राहुल बाजेवर आडवा झाला. आज आपल्यावर ही कसली वेळ आली असे त्याला वाटले.याला पूर्णपणे मधु जबाबदार आहे असे त्याला वाटले.
माणसाचे कसे असते ना! चांगले झाले तर मी केले आणि वाईट झाले की इतरांना जबाबदार धरले जाते.
मावशी एव्हाना घोरायला लागली होती.तिच्याकडे पाहून राहुलच्या मनात विचार आला,
"या दोघांची आपल्याला खूप मदत झाली.हे दोघे नसते तर आपले बेत तडीस गेले नसते. आता सखाराम कुठल्या अवस्थेत आहे कुणास ठाऊक?"

सखारामची अवस्था बिकट झाली होती.पोलिसांनी मारुन मारुन त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.परंतु तरीही त्याने तोंड उघडले नव्हते.त्याची निष्ठा पाहून इन्स्पेक्टर साहेबांनी त्याच्यापुढे हात टेकले. आजपर्यंत एकही शब्द त्याने तोंडातून काढला नव्हता.तन्मयला फक्त मालक कुठे आहे त्या हाॅटेलचा पत्ता दिला होता.तिथून राहुल कधीच निसटला होता. मालकासोबत असलेल्या जानकीच्या काळजीपोटी खरं तर त्याने तोंड उघडले नव्हते.जानकी अतिशय साधीसुधी महिला आहे.तिला जर पोलिसांनी पकडले तर तिचे काही खरे नाही.त्यामुळे सखारामने गप्प राहण्याची गुळणी घेतली होती.पोलिसांना याबाबत काहीच माहीत नव्हते.
जानकीची काळजी हे त्याच्या गप्प असण्याचे खरे कारण होते.
रात्री जेवण झाल्यावर तन्मय म्हणाला,
"आता तुम्ही विश्रांती घ्या.मी शेजारच्या रुममध्येच आहे. आणि हो ! लवकर जाग आली म्हणून एकटीच माॅर्निंग वाॅकला जाऊ नकोस बाई. तू जरी तिथून सुटका करून आली असलीस तरी तुझ्या जीवाला धोका आहे.कारण तो नराधम अजून पोलिसांच्या तावडीत सापडला नाही."

मनिष म्हणाला,
"मी तिला आधीच सांगितले होते.आता तूही सांगितलेस बरे झाले.मगाशी आम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा तू त्याच्या घराकडे गेला होतास ना?तिथे काय झाले?"
"हो.गेलो होतो.पण तो सापडला नाही.मी जाण्याआधीच तो तिथून पसार झाला होता. हे मला माहीतच होते. पण पळून पळून किती पळतोय बघूया."
"आणि जानकी मावशी? ती सापडली का? मी बांधून ठेवले होते तिला." असे निकीता म्हणाली.
" नाही.घरात कुणीच नव्हते. दोन पोलिसांना तिथे घराची झडती घेऊन काही संशयास्पद सापडले तर कळवायला सांगितले आहे.पण फारसे काही सापडेल असे वाटत नाही."
"कपाटातच काही सापडले तरच !" असे निकीता म्हणाली.
"सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट झाला की मला सगळे सुसंगतपणे सांग. ही जानकी मावशी कोण आहे? सखाराम बद्दल तुला काही माहिती असेल तर तीही सांग. राहुलबाबत काही अधिक आठवले तर तेही सांग. म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये सांगायचे राहून गेले आणि नंतर काही आठवले असे काही असेल तरी सांग. मग पुढे काय करायचे ते ठरवू.आता जा झोपायला.नाहीतर तुझा नवरा आता मला जोड्याने मारेल." असे तन्मय म्हणाला.
"काहीही काय बोलतोस तन्मय? उलट गेले चार दिवस तुझे सगळे कामधाम सोडून तू आमच्यासाठी इथे मसुरीत मुक्काम ठोकून राहिला आहेस. तू नसतास तर माझे काय झाले असते असा विचार ही करवत नाही." असे मनिष म्हणाला.

"यारी की है निभानी तो पडेगी ही |" असे तन्मय म्हणाला.
"पण मी कोण ते सांग.लक्षा की सलमान?" असे मनिष म्हणाला.
"तूच ठरव तू कोण आहेस ते!" असे तन्मय म्हणाला.
"मी मात्र भाग्यश्री..." असे निकीता म्हणाली.यावर सगळेच हसले.

हसत हसतच तिघेही वर आले. आज कितीतरी दिवसांनी आपण हसतोय असे मनिषला वाटले.तन्मय त्याच्या रुममध्ये गेला.मनिष आणि निकीता त्यांच्या रुममध्ये आले.मनिषने आवेगाने निकीताला मिठीत घेतले.
"खरंच हे चार दिवस तू किती सोसलेस. मी तुझ्यासाठी काहीच करु शकलो नाही.मला माफ कर." असे मनिष म्हणाला.
"अरे,जे काही घडले तो एक अपघात होता. त्यात तुझा काय दोष?
एक मात्र खरे की मी जर हिम्मत हरले असते तर आज तुझ्यासोबत नसते एवढे नक्की! त्याच्या डोळ्यात उतरलेली वासना मी पाहिली होती.त्याला हनिमून साजरा करायचा होता. त्याने माझ्यासाठी लाल रंगाची विणकाम केलेली साडी आणली होती.त्यादिवशी बघ तुला आईंचा फोन आला म्हणून तू दुकानाच्या बाहेर गेलास.तेव्हा मी एक लाल साडी पसंत केली होती बघ...ती साडी त्याने माझ्यासाठी आणली होती."
"तू साडी पसंत केलेली त्याला कसे समजले?"
"अरे, तो तेव्हा त्या दुकानातच होता.त्यानेच सांगितले.
त्याने मला मिठीत घेतले होते.मला तर वाटले होते संपलेच आता सगळे. पण तो म्हणाला, आत्ताच तुझे सौंदर्य कुस्करावे असे मला वाटतेय. पण मला तुझ्यासोबत हनिमून साजरा करायचाय. जानकी मावशी तुला रात्री तयार करेल.लाल साडी नेसवेल. मी गजरे आणून ठेवलेत.ते केसांत माळ. त्यामुळे मी वाचले."
हे ऐकून मनिषने तिच्या ओठांवर बोट ठेवले.
"बस...आता आणखी काही सांगू नकोस. मला ते ऐकून त्रास होतोय." आणि त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.ती ही मनिषच्या मिठीत त्याचे आपलेपण अनुभवत शांत पडून राहिली.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

आता तन्मय आणि इन्स्पेक्टर सोहनी हात धुवून राहुलच्या मागे लागणार हे नक्की! पाहूया तो कुणाच्या तावडीत सापडतोय? आणि कधी?