अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ३९
भाग ३९
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले,निकीता कैदेतून सुटली आहे.दरवाजा तोडण्यामागचा राहुलचा उद्देश सफल झाला नाही.परंतु दरवाजा तोडला नसता तर आज ना उद्या पोलिस तिथे पोहोचलेच असते.त्यामुळे राहुलने घेतलेला निर्णय त्याच्या दृष्टीने योग्यच होता.आता पुढे...
मुन्नाची मुमताज निकीता व मनिषला घेऊन पोलीस स्टेशन कडे निघाली. ते पोलीस स्टेशन जवळ पोहोचतायत तोवर पाठोपाठ इन्स्पेक्टर सोहनी आले. त्यांनी मनीष आणि निकिताला आत येण्यास खुणावले. त्यांच्या पाठोपाठ मनिष व निकिता आत शिरले. त्यांनी खुर्चीकडे बोट दाखवून बसा असे मनीष आणि निकिताला सांगितले. मनीष आणि निकिता इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर बसले. इन्स्पेक्टर सोहनींनी चहा आणायला काॅन्स्टेबलला पिटाळले. निकिताकडे पाहून इन्स्पेक्टर सोहोनी साहेबांना मनिषने सांगितले,
"ही निकिता! जिच्यासाठी मी हरवल्याची तक्रार केली होती." इन्स्पेक्टर सोहनी यांनी निकिताकडे पाहून नमस्कारासाठी दोन्ही हात जोडले. निकितानेही त्यांना नमस्कार केला. त्यानंतर इन्स्पेक्टर सोहनींना मनिष म्हणाला,
" जे काही सोपस्कार आहेत ते आपण आधी उरकून घेऊया. आणि त्यानंतर निकिता मॅडमकडून सगळी माहिती ऐकून घेऊया. जेणेकरून आपल्याला आरोपीपर्यंत सुलभपणे पोहोचता येईल असे तन्मयने सांगितले आहे."
इन्स्पेक्टर साहेबांनी मान डोलावली.

इन्स्पेक्टर साहेबांनी मनीषने दिलेली मिसिंगच्या तक्रारीची फाईल काढली. त्यानंतर त्यावर निकिता सापडल्याचा उल्लेख करून तिथे निकिता आणि मनीषची सही घेतली. त्याची एक प्रिंट मनीषकडे दिली. एक प्रिंट पोलीस जिल्हाप्रमुख ऑफिसकडे पाठवण्यासाठी ठेवली. आणि एक प्रिंट पोलीस स्टेशनच्या दप्तरी ठेवली.
त्यानंतर त्यांनी निकिताकडे आपला मोर्चा वळवला.
"बोलो मॅडम ! तुम ही अब आरोपी के बारे में बता सकते हो | क्योंकी तुम चार दिन तक उनके साथ थी |" हे ऐकल्यावर निकिता म्हणाली,
"हां | मैं चार दिन तक वहां कैसे दिन काटे थे इस को याद करना भी मुझे अच्छा नहीं लगता है | लेकीन मुझे मालुम है अगर मेरी तरह और किसी लडकी का अपहरण ना हो तो मुझे वो यादें दोहरानी पडेगी | आप बेझिझक सवाल पुछिये | मैं जबाब दूॅंगी|"

त्यानंतर निकीताने घडलेले सगळे अगदी बारकाव्यांसह इन्स्पेक्टर सोहनी साहेबांना सांगितले. ते ऐकताना मनिषच्या अंगावर काटा आला.चार दिवसांत निकीताने किती सोसले असे त्याला वाटले.
राहुलचा फोटो इन्स्पेक्टर साहेबांनी निकीताला दाखवला. निकीताने "हा तोच आहे"असे सांगितले.
यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी मनिष व निकीताला त्यांच्या रुमवर जायला सांगितले.मला न सांगता मसुरीबाहेर जायचे नाही असे त्यांनी दोघांना बजावले.
दोघेजण तिथून बाहेर पडले. मुन्ना गाडी जवळच उभा होता. तो दोघांना घेऊन रुमवर निघाला.गाडीत कुणीच काही बोलत नव्हते. मेमसाहेब परत आल्या म्हणून मुन्नाला आनंद झाला होता.परंतु आत्ता त्यांना डिस्टर्ब करु नये एवढे त्याला कळत होते.गेले चार दिवस तो सावलीसारखा मनिषसोबत होता.मेमसाहेबांना शोधण्यासाठी त्यानेही खूप प्रयत्न केले होते.

मनिषची अवस्था वेगळी नव्हती.निकीता सापडत नाही म्हणून आपण बेचैन होतो. पण निकीताने किती सोसलेय ते पहाता ती सुखरूप परत आली ही किती मोठी गोष्ट आहे असे त्याला वाटत होते.इतक्यात त्याचा मोबाईल वाजला.त्याने पाहिले तर निकीताच्या आईचा फोन आला होता.त्याने फोन उचलण्यापूर्वी निकीताला सांगितले की,
"त्यांना इकडे काय घडले आहे ते मी सांगितलेले नाही. त्यामुळे तू त्यांच्याशी अगदी नाॅर्मल बोल." निकीता ने मान डोलावली व मोबाईल घेतला.

निकीताचा आवाज ऐकून तिच्या आईला आनंद झाला.चार दिवसांनी ती निकीताचा आवाज ऐकत होती.निकीताने तिला अजिबात काही जाणवू दिले नाही.दोघींच्या नेहमीसारखा गप्पा सुरू होत्या.त्या चालू असतानाच ते हाॅटेलवर पोहोचले.आता फोन ठेवते असे म्हणत निकीता ने फोन ठेवला.
मनिषने मुन्नाला सांगितले,
"गरज पडली तर तुला फोन करेन.आता तू ही घरी जा.जरा विश्रांती घे.आणि हे पैसे घे.घरी मुलांना मिठाई घेऊन जा.मेमसाहेब परत आलेत याचा आनंद साजरा करा." असे म्हणत त्याने मुन्नाच्या हातात हजार रुपये ठेवले.
निकीताला पाहून हाॅटेलच्या स्टाफला ही आनंद झाला.सगळे निकीता व मनिष भोवती गोळा झाले.
"मॅडम आप आ गयी |" या वाक्याचा निकीता वर सर्वांनी भडिमार केला.त्या सर्वांजवळ थोडावेळ थांबून दोघेजण वर रुममध्ये गेले.

रुममध्ये गेल्यावर मनिषने निकीताला घट्ट मिठी मारली.
"कुठे गेली होतीस गं मला सोडून! माझ्या जीवात जीव नव्हता."
निकीताही मनिषाला घट्ट बिलगली होती.ते चार दिवस दोघांनाही चार युगासारखे वाटले होते.आज निकीता परत आलेली पाहून मनिषला वाटले होते की, सगळे जग एका बाजूला आणि निकीता एका बाजूला!
तो म्हणाला," आज मला प्राॅमिस कर.एक सेकंद ही माझ्यापासून कधीच दूर जाणार नाहीस."
निकीता म्हणाली,
"मी थोडीच दूर गेले होते? मला तो घेऊन गेला होता. माझी अवस्था तिथे इतकी वाईट झाली होती. पण तो सायको आहे.अजूनही तो माझा शोध घेईल अशी भीती मला वाटते.त्यामुळे लवकरात लवकर आपण परत मुंबईला जाऊया.माझी हौस भागली. या जगाच्या पाठीवर तुझा हात फक्त मला हातात हवा, बाकी काही नको."

हे ऐकून मनिष अजूनच भावनावश झाला.त्याने निकीताच्या डोक्यावरुन हात फिरवला.
"तू घाबरु नकोस. तो आता परत कधीच तुझ्याजवळ येऊ शकणार नाही.कारण मी आता तुला एकटीला कधीच सोडणार नाही.आणि आपला तन्मय आहे ना ! तो त्याचा हिशोब क्लिअर केल्याशिवाय थोडाच शांत बसणार आहे?"
हे ऐकल्यावर निकीताला बरे वाटले.तरीही ती मनिषला बिलगून बसली होती.आपल्या माणसाच्या स्पर्शातील ममत्वाने ती शांतवली होती.गेले चार दिवस तिने केलेला संघर्ष आज पूर्णत्वाला गेला होता.ती तिच्या मनिष जवळ होती.
दोघे अशा अवस्थेत कितीवेळ होते ते त्यांच्या लक्षात आले नाही. मनिषचा मोबाईल वाजला म्हणून ते भानावर आले.तन्मयचा फोन आला होता.
"अरे, जेवायला खाली या.मी कधीपासून तुमची वाट पहातोय.तुमचे पोट एकमेकांना भेटून भरले असेल, पण पाहुण्याला उपाशी ठेवणार आहात का?"
तन्मयचे हे मिश्कील बोलणे ऐकून मनिषच्या चेहऱ्यावर हसू पसरले.तो म्हणाला,
"आलोच पाच दहा मिनिटांत."
निकीता आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये शिरली.ती परत आली की लगेच दोघे खाली डायनिंग हॉल मध्ये जेवण्यासाठी गेले.तिथे तन्मय त्यांची वाट पहात होता.तिघेजण हसतखेळत जेवले.जेवताना तन्मयने तो विषय कटाक्षाने टाळला. आजचा दिवस निकीताशी या विषयावर काहीही बोलायचे नाही असे त्याने ठरवले होते.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

आता निकीता परतली आहे.परंतु राहुलचे काय? तो तन्मयला सापडला का? तसेच राहुल असे का वागतो?असे अनेक प्रश्न वाचकांना पडलेत हे माहीत आहे. हळूहळू कथा त्या दिशेने वाटचाल करणारच आहे.फक्त थोडीssशी वाट पहा.