अंत: अस्ति प्रारंभ : |
भाग ३६
भाग ३६
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले राहुल घराबाहेर उभा राहून आवाज देत होता. दार उघडण्यासाठी जानकी मावशीची खटपट सुरु होती.निकीता व जानकी मावशीची झटापट सुरू होती. आता पुढे या झटापटीत काय होते ते पाहूया...
निकीताने मावशींच्या कमरेला मागून मिठी मारली.आता मावशीला निकीताला ओरबाडता येईना. मग निकीताने मागून तिला रेटत रेटत रुम पर्यंत आणले.निकीता घामाघूम झाली होती.तिने मावशीला जवळजवळ उचलूनच आणले होते. आत गेल्यावर तिने सर्वात आधी तिचे हात पाय बांधण्याचा प्रयत्न केला. मावशीने खूप प्रतिकार केला.तिथेही पुन्हा दोघींची झटापट झाली. मावशीने पुन्हा एकदा निकीताचे डोके भिंतीवर आपटले.निकीताच्या कपाळावर भलीमोठी दोन टेंगुळे आली. डोके आपटल्यावर वेदनेची चमक निकीताच्या मस्तकापर्यंत गेली.

आता जर आपण मावशीला रोखू शकलो नाही तर आपली आजवरची लढाई वाया जाईल हे निकीताच्या लक्षात आले.तिने जोर लावून मावशीला जोरात ढकलले.मावशी बेडच्या कोपऱ्याला धडकून खाली पडली.हीच संधी साधून निकीता ने पटकन मावशीचे पाय बांधले. मावशीचे हात अजूनही मोकळेच होते. तिने हातांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.पण यावेळी निकीताने बाजी मारली. ती मावशीचे पाय बांधण्यात यशस्वी झाली.मावशींची निम्मी शक्ती कमी झाली.तरीही हाताने निकीताला ओरबडायचे काम ती करतच होती.तिकडे लक्ष न देता निकीताने तिच्या कमरेभोवती दोरखंडाचा वेढा दिला व तिला पलंगाच्या पायाशी जखडून टाकले.आता ती जागा सोडू शकत नव्हती.
पण अजूनही तिचे हात मोकळेच होते.ते बांधणे अत्यावश्यक होते.मावशीचे हात धरताना परत दोघींची झटापट झाली.आता निकीता ने आपली सगळी ताकद एकवटून मावशीला एका हाताने दाबून धरले व दुसऱ्या हाताने मावशीचे दोन्ही हात पकडले.एकदा मावशीचे हात हातात आले की निकीताने पटकन दोरखंडाचे वेढे हातांवर द्यायला सुरुवात केली.जसजसे ती दोरीचे वेढे आवळत होती मावशींचा प्रतिकार मंदावत चालला होता. मावशीला पूर्णपणे जायबंदी करण्यात निकीता यशस्वी झाली होती.
निकिताच्या तरुण रक्तापुढे मावशीला हार मानावी लागली. तिने खूप प्रयत्न केला,पण तिचे काही चालले नाही.
ती रागाने खाऊ का गिळू अशा नजरेने निकीताकडे पहात होती.आता तिच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही याची खात्री पटली की निकीता पुढच्या दाराजवळ आली. तिने कुलूप जैसे थे अशा अवस्थेत करून ठेवले. आता जर आपण झोपेत असतो तर आपले काही खरे नव्हते असे निकिताला वाटले.

बाहेरून राहुलने आवाज दिला पण आता निकिताने मावशींना आत नेले होते, त्यामुळे मावशींनी प्रतिसाद दिला नाही. थोडा वेळ वाट बघून राहूल तेथून बाहेर पडला. आता हे दार तोडावेच लागेल त्यासाठी किमान चार तरुण मुले हवीत असे त्याला वाटले. आता ही चार मुले कुठून आणायची जी दार तोडल्याबद्दल कुणाला सांगणार नाहीत? असे त्याला वाटले .आणि त्याचवेळी त्याला इस्माईल आठवला. त्याने इस्माईलला फोन केला आणि त्याला सांगितले,
"भैय्या ,किधर है आप? मुझे आपकी सहाय्यता की जरूरत है|" हे ऐकल्यावर पलीकडून आवाज आला,
" तुम बस बताओ क्या करना है?" यावर राहुलने सांगितले,
" मेरे घर का दरवाजा अंदर से लॉक है |और चाबी गुम हो गई है | मिल नही रही है | इसलिये दरवाजा तोडना है | चार हट्टे कट्टे बंदे चाहिये" | "बस इतनासा काम है? मैं खुद साथ ले के आता हूं |"असे तो म्हणाला.

निकीता ने घरात फर्स्ट एड चा बाॅक्स आहे का शोधले. तो बेसीनजवळच्या कप्प्यात सापडला.त्यातील कापूस घेऊन तिने डेटाॅलने तोंडावरील ओरबाडल्याच्या खुणा पुसल्या.त्यानंतर साबण लावून चेहरा धुतला.आता यावर काय लावायचे असे तिला वाटले. बेसीनजवळच्या कप्प्यात after shave lotion तिला सापडले.तिने ते हातावर घेऊन तोंडावर व हातांवर लावले.जरासे चणचणले, पण नंतर थंडगार पडले.
आता अजिबात हलगर्जीपणा करुन उपयोग नाही असे तिने स्वतःला बजावले.ती एकदा मावशीचे काय चालले आहे हे पहाण्यासाठी रुममध्ये डोकावली.मावशी तिच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होती.तिने मावशीकडे दुर्लक्ष केले आणि ती किचनमध्ये आली.दुपार झाली होती.भूक लागली होती.आता काय खायचे म्हणून तिने फ्रीज उघडला.आत रसरशीत पेरु तिला दिसले.तिने एक पेरु उचलला. किचनमधील बेसीनच्या नळाखाली स्वच्छ धुतला.सुरीने कट करुन त्यावर मीठ,तिखट घालून ती प्लेट घेऊन हाॅलमध्ये सोफ्यावर खात बसली.पेरु रसरशीत दिसत होता तसाच गोड होता.
खात खात ती विचार करत होती. आता अजिबात टेन्शन घ्यायचे नाही.डोके शांत ठेवून आलेल्या संकटाचा सामना करायचा.टेन्शन घेऊन संकट पळत नाही.त्याच्याशी दोन हात करावेच लागतात, नाही तर हार मानून पराभव स्वीकारावा लागतो.संकटाशी दोन हात करण्याची तयारी दाखवली तर यश मिळण्याची खात्री नसली तरी शक्यता तरी असतेच. आधीच पराभव स्वीकारला तर हातात काहीच उरत नाही.
निकीता एका मल्टीनॅशनल कंपनीत एच.आर. मॅनेजर होती.आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण तिने घेतलेले होते.त्यामुळे क्वीक निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे होती.तिच्याजागी दुसरी एखादी मुलगी असती तर आतापर्यंत स्वतःचा संयम गमावून बसली असती.
आतल्या रुममध्ये जानकीमावशीचा रागाचा पारा चढला होता.तिला निकीताचे स्वतःचे घर असल्यासारखे वावरणे आवडत नव्हते.किचनमध्ये आजपर्यंत फक्त तिचाच वावर होता.बाकीचे फक्त खाण्याच्या प्लेट्स नेणे, आणून ठेवणे आणि पाणी पिणे एवढ्यापुरतेच किचनमध्ये येत होते.किचनवर पूर्णपणे तिचा अधिकार होता.
कुठल्याही स्त्रीला आपल्या स्वयंपाकघरात इतर महिलांचा अधिकार दाखवणे सहसा रुचत नाही.बारकाईने पाहिले तर बऱ्याच सासुसुनांची यावरुनच भांडणे होत असतात.सासुला आपला स्वयंपाकघरावरचा अधिकार सोडायचा नसतो, अन् सुनेला स्वयंपाकघरावर आपला अधिकार स्थापित करायचा असतो. आता तोही मुद्दा निकालात निघाला आहे,कारण दोघींचाही किचनमधील वावर अत्यल्प झाला आहे.त्यामुळेच झोमॅटोचा वावर मात्र घरोघरी वाढला आहे.असो..विषयांतर झाले.
तर...निकीताने किचनमध्ये जाऊन स्वतः शिरा बनवणे जानकीला खटकले होते.आताही तिने मालकीण असल्यासारखे फ्रीज उघडून पेरु घेतला होता.जानकी सगळे पहात होती.आपले महत्व कमी होत आहे हे तिला रुचत नव्हते. निकीताने बांधून ठेवल्याने ती काहीच करु शकत नव्हती.

आजपर्यंत आपण इमानेइतबारे आपल्या मालकाचे काम केले .आजपर्यंत इतक्या मुली आल्या आणि गेल्या पण हीच अशी आहे की तिने सगळ्यांच्या नाकीनऊ आणले आहे.आपला नवरा पण कालपासून बेपत्ता आहे.यामागे हीच कारणीभूत असणार असे तिला वाटले आणि तिला निकीताचा अजूनच राग आला.आपला नवरा कुठे असेल? अशी काळजी तिला वाटली.आजवर कधीच तो इतकावेळ तिच्यापासून दूर राहिला नव्हता.
एवढ्या ताकदवान मालकांना पण हीने जेरीस आणले. आता बघा निवांतपणे पेरु खात बसलीय.मी हीला एक दिवस तरी उपाशी ठेवले का? पण ही बघा.मला काहीच खायला न देता स्वतःच एकटी खात बसलीय.असे विचार करत जानकी आपल्या रागाचा पारा अजूनच वाढवून घेत होती.
उपाशीपोटी तिची बुद्धी पण गहाण पडली होती.कारण काही तासांपूर्वीच निकीताने स्वतः बनवलेला शिरा जानकीलाही खायला आणून दिला होता.इतकेच नव्हे तर तेव्हा तिचे बांधलेले हातपाय सोडले होते.ती मोकळी असल्यानेच राहुलने बाहेरुन आवाज दिल्यावर ती दाराजवळ गेली होती. माणसे उपकार फार लवकर विसरतात हेच खरे.. क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
पुढे काय? हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे.राहुलही अडचणीत सापडला आहे. जानकी ही नवऱ्याच्या काळजीत पडलीय.निकीता,मनिष आणि तन्मयही आपापल्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.पाहूया पुढच्या भागात कुणाकुणाच्या प्रश्नांना उत्तरे मिळतात...