अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग २२
भाग २२
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, अजून निकीताचा शोध लागलेला नाही.तन्मयने हाॅटेलमध्ये स्टाफची चौकशी सुरू केली आहे.सुरक्षारक्षकाची चौकशी सुरू आहे.त्याने निकीताला माॅर्निंग वाॅक वरुन परतताना पाहिले होते...पुढे..
तन्मयने मनीष कडे पाहिले, आणि विचारले,
" निकिता मॉर्निंग वॉकला गेली होती का ?"यावर मनीष म्हणाला,
" मला माहित नाही. मी झोपलो होतो. तिला लवकर उठायची सवय आहे. जाग आली असेल तर गेली असेल." यावर सुरक्षारक्षकाला तन्मयने आणखी काही प्रश्न विचारले.
" निकिता जेव्हा हॉटेलमध्ये परत आली तेव्हा तिच्या मागोमाग आणखी कोणी हॉटेलमध्ये शिरले होते का? आठव जरा." असे सांगितले. यावर सुरक्षारक्षकाने "काही आठवत नाही" असे सांगितले.
"मला जर परत आठवले तर नक्की तुम्हाला सांगेन ."असे तो म्हणाला.

यानंतर तन्मयने मॅनेजरची चौकशी केली. इथे सध्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातील किती पर्यटक आहेत याची चौकशी केली .परंतु तेथे सध्या फक्त मनीष आणि निकिता हे दोघेच महाराष्ट्रातून आलेले पर्यटक होते. आता वेटरला बोलावले आणि निकिताचा फोटो दाखवून विचारले,
" या मॅडमना पाहिले होतेस का?" यावर तो वेटर फोटो निरखून पहात म्हणाला,
" नाही. मी यांना पाहिले नाही .काल कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टच्या वेळी तू हजर होतास ना?" यावर तो म्हणाला,
" हो मी हजर होतो. पण प्रत्येक जण आपापली डिश हातात घेऊन जे हवे आहे ते खाद्यपदार्थ स्वतः घेत होते. त्यामुळे माझे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. फक्त कुठला पदार्थ संपतोय का हे पाहणे ही माझी ड्युटी होती. त्यामुळे उपस्थित असलेल्या लोकांकडे माझे लक्ष नव्हते." हे त्याचे उत्तर पटण्यासारखेच होते. त्यामुळे तन्मयने त्याला अधिक प्रश्न विचारले नाहीत.

जी माहिती मिळाली होती ती त्याने आपल्याला लॅपटॉपवर फीड केली होतीच. त्यानंतर दोघेजण हाॅटेलच्या बाहेर आले. दरम्यान मनीषने मुन्नाला फोन करून हाॅटेलवर बोलावून घेतले होते. मुन्ना आपल्या मुमताजसह हॉटेलवर येऊन पोहोचला होता. तन्मयने मुन्नाकडे रोखून पाहिले. मुन्ना ने त्याला नमस्कार केला. तन्मय मनीषला म्हणाला,
" तू गाडीत मागे बस. मी पुढे बसतो." यावर मनीषने मान हलवली. त्याने असे का सांगितले आहे याचा अर्थ मनीषला समजला होता. त्याला मुन्नाशी बोलायचे होते. मुन्ना कसा आहे हे पारखायचे होते. मुन्नाचा यात हात आहे का? याचा तपास करायचा होता. मुन्नाच्या बोलण्यातून एखादा धागा दोरा सापडतोय का हे पाहायचे होते. त्यामुळे तो यावर काहीच बोलला नाही.

मुन्नाने पुढचे दार उघडले .तन्मय आत बसला. मनीष मागे बसला. तन्मयने मुन्नाला सांगितले,
" जिथे मॅडम बेपत्ता झाल्या तिथे आम्हाला घेऊन चल." प्रवासात तन्मय मुन्नाशी गप्पा मारत होता. बोलता बोलता त्याच्या बोलण्यातून काही महत्त्वाचे दुवे सापडतात का हे तो शोधत होता. परंतु मनीषने जे काही सांगितले तेच मुन्ना सांगत होता. त्याच्या बोलण्यात वेगळे काही आढळले नाही. मनीषने काल काढलेले फोटो तन्मयने आपल्या लॅपटॉप वर घेतले होते. मुन्नाशी बोलणे झाल्यावर तो लॅपटॉप वरील ते फोटो बारकाईने पहात होता. फोटोंमध्ये एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा दिसते का हे तो पाहत होता. कारण प्रेक्षणीय स्थळी फोटो काढताना आसपासची माणसे फोटोमध्ये येतात. या दोघांवर कोणी नजर ठेवून होते का? हे लक्षात आले असते. यासाठी तो पुन्हा पुन्हा फोटो बारकाईने पहात होता. बाजारपेठेपाशी पोहोचल्यानंतर मुन्नाने गाडी थांबवली. आणि त्याने सांगितले,
" यही है वो प्लेस, जहां मैने इन दोनों को शॉपिंग के लिए छोडा था |" हे ऐकल्यावर तन्मय गाडीतून खाली उतरला. गाडी थांबली त्या ठिकाणी दोन-तीन छोट्या चहाच्या टपऱ्या होत्या. तिकडे एक नजर टाकून तो दुकानांच्या गल्लीत शिरला. त्याच्या पाठोपाठ मनीषाही तिथे शिरला. दुकानांमध्ये गर्दी होती. तन्मय फक्त नजर टाकत पुढे पुढे सरकत होता. प्रत्येक दुकानाची आतील बाजू त्याने नजरेखालून घातली, आणि ते दोघे परत गाडीकडे आले. दरम्यान त्याने फोन करून पोलिसांना सांगितले होते की इथल्या सर्व दुकानदारांच्या नावांची यादी मला हवी आहे .स्थानिक पोलिसांनी सांगितले,
" थोडा वेळ लागेल ."त्यानंतर ते गाडीकडे परतले.

तन्मयच्या हाती फारसे काही लागले नव्हते. परंतु रात्री निवांतपणे यावर विचार करून तपासाची दिशा ठरवायची होती.
तन्मयने त्यानंतर गाडी पोलीस मुख्यालयाकडे घ्यायला सांगितली. तेथे गेल्यावर त्याने पोलीस प्रमुखांची गाठ घेतली. त्यांच्याशी मनिषची ओळख करून दिली, आणि या प्रकरणात जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली. त्यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले,
" आजपर्यंत सात युवती नाहीशा झाल्या आहेत .त्यामुळे आमची आधीच नाचक्की झाली आहे. कुठून कसा तपास करायचा हेच आम्हाला समजत नाही, कारण गुन्हेगाराने कसलेच धागेदोरे मागे ठेवले नाहीत. त्यामुळे तपास पुढे सरकत नाही. आता आपण यात लक्ष घातले आहे तर तुम्ही आणि इथले स्थानिक पोलीस सर्वजण मिळून याचा तपास करूयात." त्यांचे आभार मानून तन्मय आणि मनीष रूमवर परतले.

मनीषला आईचा फोन आला होता, पण मनीषने आईला अजून पर्यंत काहीही सांगितले नव्हते. त्याने निकिताचा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे निकिताच्या आईचा फोनही त्याच्या मोबाईलवर आला होता .तेव्हा निकिताचा फोन का लागत नाही असे तिच्या आईने मनीषला विचारले होते. तेव्हा मनीष ने सांगितले,
" तिचा मोबाईल हरवला आहे. त्यामुळे तो लागत नसेल ."
"निकिताकडे फोन द्या "असे जेव्हा निकिताची आई म्हणाली, तेव्हा मनीषपुढे प्रश्न पडला की आता काय उत्तर देऊ ? पण निकिता बाथरूम मध्ये आहे असे सांगत त्याने वेळ मारून नेली. कारण दोघांच्या ही घरच्यांना याबाबत काही समजू नये अशी मनिष ची इच्छा होती.
"मी तिला परत फोन करायला सांगतो. तुम्ही काळजी करू नका. सारखे फोन करू नका .आम्ही इथे चार दिवस फिरायला आलो आहोत. आम्ही दोघे सोबत आहोत. आनंदात आहोत. त्यामुळे फोनची वाट पाहू नका.सारखा सारखा करु ही नका. पण मी तिला फोन करायला सांगेन."

यावर निकिताची आई म्हणाली,
" हो .तुम्ही सांगताय ते बरोबरच आहे. तुम्ही चार दिवसासाठी बाहेर आला आहात. त्यात आमच्या फोन मध्ये आणखी तुमचा वेळ कशासाठी वाया घालवायचा? एन्जॉय करा. आता तुमच्याशी बोललीच आहे मी. त्यामुळे निकिताने फोन केला नाही तरी चालेल. जेव्हा सवड मिळेल तेव्हा फोन करा." हे ऐकल्यावर मनीषला हायसे वाटले. कारण निकिता कुठून आईला फोन करणार होती?
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.