अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग १८
भाग १८
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले निकीताचा शोध लागला नाही.मनिष खूपच अस्वस्थ आहे.तो तरुण निकीता बेशुद्धावस्थेत असताना तिला घेऊन त्याच्या घरी आलेला आहे.आता पुढे..
जानकी मावशी अस्खलितपणे मराठी बोलत होती. तो तरुणही मराठीत बोलत होता याचा अर्थ हा तरुण मराठी असावा असे तिला वाटले. पण त्याने आपल्याला अशा पद्धतीने का डांबून ठेवले असावे हे तिला समजेना. तिला शाहरुख खानचा डर सिनेमा आठवला. त्या सिनेमात शाहरुख खान किरणवर म्हणजे जुही चावलावर एकतर्फी प्रेम करत असतो. त्यातून तो तिचे अपहरण करतो. ती आपल्या बुद्धीला ताण देत या तरुणाला यापूर्वी कुठे पाहिले होते का हे आठवू लागली. पण तिच्या गतआयुष्यात तिला हा तरुण अजिबात आढळला नाही. आपल्या शाळेत, काॅलेजमध्ये, क्लासमध्ये हा होता का तिने आठवून पाहिले. त्यानंतर आपला शेजारी पाजारी, एखादा दुकानदार होता का याचा विचार करुन करुन ती थकून गेली पण तिला या तरुणाशी आपला पूर्वी कधी दुरान्वयानेही संबध आलेला आठवले नाही.त्यामुळे याने आपले अपहरण का केले हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला होता.
काल रात्री त्याच्या बाहुपाशात असताना ती शुद्धीवर आली होती तेव्हा प्रचंड घाबरली होती. त्यानंतर जेव्हा ती परत शुद्धीवर आली तेव्हा तिच्या तोंडावर रुमाल बांधून तिचे दोन्ही हात एकमेकांमध्ये दोरीने बांधून तो तिच्या हाताला धरून तिला आपल्या सोबत घेऊन निघाला होता.
दुकानातून खाली आपण एका भुयार वजा ठिकाणातून चाललो आहोत असे तिला जाणवत होते. त्याने एका हातात बॅटरी धरली होती आणि एका हाताने निकिताचा हात धरला होता. निकिता नुकतीच शुद्धीवर आली होती, तरीही सावधपणे बारकाईने इकडे तिकडे पाहत होती. तिच्यावर असलेला त्या गुंगीच्या औषधाचा अंमल अजून पूर्णपणे मिटला नव्हता.

त्यानंतर त्याने आपल्याला एका गाडीत बसवले आहे आणि आपण कुठेतरी चाललो आहोत एवढेच तिला समजले आणि परत ती गुंगीच्या आधीन झाली. सकाळी उठल्यावर आपण या घरात आहोत हे तिला समजले. म्हणजे त्या बाजारपेठेतून हा तरुण आपल्याला इथे बहुतेक त्याच्या घरी घेऊन आला असावा. आता मनीष आपल्याला कसे शोधणार ही चिंता तिला लागून राहिली होती.
त्या मावशीने तिच्या पुढ्यात पोह्याची डिश ठेवली आणि ती म्हणाली,
" खाऊन घे." निकिताने विचार केला, "उपाशीपोटी आपण आपली तब्येत बिघडून घेऊ. याच्याशी मुकाबला करायचा असेल तर आपण फिट असणे गरजेचे आहे. त्यामुळे मुकाट्याने तिने ती डिश पुढे ओढली आणि पोहे खायला सुरुवात केली. पोह्यांची चव तर अप्रतिम लागत होती. रात्रभर उपाशी असल्यामुळे तिला चव छान लागत होती की काय कुणास ठाऊक? तिचे पोहे खाऊन झाले की मावशीने तिला चहा आणून दिला. चहा पिल्यावर तिला खूप बरे वाटले. त्यानंतर त्या मावशी स्वयंपाक करू लागल्या. त्यांचा चपळाईने चालणारा हात पाहून निकिताला समजले की इथे नेहमी माणसांचा राबता असतो. तिथे बसल्या बसल्या ती किचनचे निरीक्षण करत होती.रोजच्या वापरातील स्वयंपाकघर आहे हे तिच्या लक्षात आले.

त्या तरुणाची आता काही चाहूल लागत नव्हती. बहुधा तो कुठेतरी बाहेर गेला असावा असे निकिताला वाटले. हीच संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन आपण इथून बाहेर पडू शकतो असे तिला वाटले. म्हणून ती सहज उठल्यासारखे दाखवून तिथून उठली आणि बाहेरच्या हॉलमध्ये आली. हॉलमध्ये मगाशी भाजी आणून दिलेला माणूस बसला होता. निकिता हॉलमध्ये आलेली पाहून तो बाबरला आणि उठून उभा राहिला. तो दरवाज्याकडे सरकला. निकिताने त्याच्याकडे एक नजर टाकली, पण तो निकिताला काहीच म्हणाला नाही. निकिता दरवाज्याकडे वळली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा बाहेरून बंद होता. तो माणूस तिच्याकडे पाहून हसला.
" साहेब बाहेरून दरवाजा लॉक करून जातात." असे तो म्हणाला. आता आपण काहीच करू शकत नाही हे निकिताला समजले. ती आत जाऊन बेडवर आडवी झाली.
" साहेब बाहेरून दरवाजा लॉक करून जातात." असे तो म्हणाला. आता आपण काहीच करू शकत नाही हे निकिताला समजले. ती आत जाऊन बेडवर आडवी झाली.
तो माणूस आत येऊन ती काय करते हे पाहून गेला. मावशीचेही स्वयंपाक करत असताना तिच्याकडे लक्ष होते. म्हणजे या दोघांना तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमले गेले होते हे तिच्या लक्षात आले. आपण काहीच करू शकत नाही हे तिला समजले. पण जर एखादी संधी मिळाली तर मात्र चटकन निर्णय घ्यायचा, यासाठी ती अत्यंत सावध होती.
मनीष आणि मुन्ना दोघेजण प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन निकिताचा फोटो दाखवून चौकशी करत होते. निकिताला पाहिले आहे असे कोणीच सांगत नव्हते. एक दुकान मात्र अजूनही बंद होते. त्यामुळे त्या दुकानातभोवती मनीष आणि मुन्ना यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. इथे आपल्याला काहीतरी धागा दोरा मिळू शकतो असे त्यांना वाटत होते. तेवढ्यात एका तरुणाने येऊन ते दुकान उघडले. दुकान उघडताच मनीष त्या तरुणापुढे जाऊन उभा राहिला.त्याला निकिताचा फोटो दाखवून म्हणाला,
" ये लडकी कल आपके दुकान में आई थी क्या?" यावर तो तरुण म्हणाला,
"हां आई तो थी |" यावर मनीष म्हणाला ,
"तो यहां से कहां गयी आपको पता है ?" यावर तो तरुण म्हणाला,
" मुझे क्या पता? इसे साडी अच्छी नही लगी तो वो बाहर गयी |" त्या तरुणाला काहीतरी आठवले. तो म्हणाला,
"उसने मेरे मोबाईल से किसी को फोन लगाया था | ये देखो |" मनीषने तो नंबर पाहिला, तर तो त्याचाच नंबर होता. त्यावर त्याने त्या तरुणाला विचारले,
" इसके बाद वो लडकी कहां गयी?" तो तरुण म्हणाला,
"वो तो बाहर चली गई | मुझे क्या पता वो कहां गयी? उसके जाने के बाद मैं भी दुकान बंद करके चला गया |"
त्यावर मनीष च्या मनात पालवलेली उरलीसुरली आशा सुद्धा नष्ट झाली. त्याचा चेहरा उतरला. मुन्ना त्याच्यासोबत होताच .
तेवढ्यात पोलीस स्टेशन मधून फोन आला. अननोन नंबर पाहून मनीष ने फोन उचलला आणि त्याने विचारले,
" हॅलो कौन बोल रहा है ?"पलीकडून आवाज आला,
" मिस्टर मनीष"? यावर मनीष म्हणाला,
" हां मै ही बात कर रहा हूं |"
"आप जरा पोलीस स्टेशन मे आ जाओ "| आणि त्याने पोलीस स्टेशन चा पत्ता सांगितला. यावर मनीष मुन्नाला तो पत्ता सांगून म्हणाला,
" चल आपल्याला तिकडे पोलिस स्टेशनमध्ये बोलावले आहे .तिकडे जाऊया." क्रमशः©® सौ.हेमा पाटील.
पोलिस स्टेशन,कोर्ट यांची पायरी चढण्याची वेळ आयुष्यात कधीच येऊ नये.त्या सनी देवलचा तो प्रसिद्ध डायलॉग आहे बघा.
"तारीख पे तारीख तारीख पे तारीख | " पण आता मनिष या चक्रात अडकला होता.निकीता सापडेपर्यंत त्याची यातून सुटका होणार नाही.