अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग १७
भाग १७
©® सौ.हेमा पाटील.
पोलिसांनी येऊन निकीताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.पण त्यात यश आले नाही.मनिषचा पाय त्या ठिकाणावरुन निघत नव्हता.त्याने रात्री काहीही खाल्ले नव्हते.पण त्याचे इतर कशाकडेच लक्ष नव्हते.निकीताच्या काळजीने त्याचा जीव वरखाली होत होता.तन्मयने मुन्नावर संशय व्यक्त केला होता. आता पुढे पाहूया..
मनिषने शेजारी बसलेल्या मुन्ना कडे एक नजर टाकली. तो गाढ झोपला होता. "हा गुन्हेगाराला सामील असेल का?" असा विचार मनीषच्या मनात आला , पण त्याच्या मनानेच याला नकार दिला. एखाद्या व्यक्तीबाबत आपले प्रारंभीच मत बनते. कधी ते अनुकूल असते तर कधी विपरीत असते. मुन्नाबाबत त्याच्या मनात आपुलकी निर्माण झाली होती. दिवसभरातील मुन्नाचे वागणे बोलणे पाहून तो सरळ मार्गी असावा असे मनीषला वाटले. रात्री जेव्हा निकिता सापडत नाही हे समजले तेव्हा तो घरी जा असे सांगितल्यावर घरी जाऊ शकला असता. परंतु माणुसकीखातर तो आपल्या सोबतच इथे थांबला. दिवसभर गाडी चालवून तोही कंटाळला होता. परंतु तरीही तो आपल्या सोबत आपल्या मदतीसाठी इथे उभा राहिला . या पोलिसांना आपण काय सांगणार ?
आपल्यामुळे या बिचाऱ्या गरीब मुन्नाला त्रास होऊ नये असे त्याला वाटले. गाडी चालवून चार पैसे कमावणे आणि आपला चरितार्थ चालवणे अशी वृत्ती असलेल्या माणसांना अशावेळी खूप त्रास होतो. त्यांचे कामाचे दिवस बुडतात. पोलिसांनी पोलीस स्टेशनला जबाब द्यायला बोलवले की वेळ जातो. याने काहीतरी झंझट केली असावी असा समज होऊन मालक नोकरीवरून काढून टाकतात. परत नवीन ठिकाणी नोकरी शोधायची म्हटले की अवघड होऊन बसते. घरात खाणारी तोंडे असतात. त्यांना रसद कुठून पुरवायची हा प्रश्न निर्माण होतो. असे सगळे विचार मनीषच्या मनात आले.
त्यामुळे त्याने मनाशी ठाम निश्चय केला की आपण मुन्नावर संशय दाखवायचा नाही. पोलिसांनी विचारले तरीही ठामपणे नकार द्यायचा. तो असा विचार करत असतानाच मुन्नाची झोप चाळवली. मुन्ना जागा झाला आणि त्याने मनीषकडे पाहिले. तो मनीषला म्हणाला,
" साब आप सोये नहीं?" यावर मनीषने नकारार्थी मान हलवली.
मुन्नाने आळस दिला आणि तो म्हणाला,
" रुको साहब | मै आपके लिए चाय लेके आता हूं |" असे म्हणून तो गाडी बाहेर पडला.
"अरे पैसे तो लेके जाओ |"असे मनीष म्हणेपर्यंत तो पुढे निघाला होता. थोड्याच वेळात तो आणि त्याच्या मागे चहावाला असे दोघे येताना दिसले. मुन्नाच्या हातात एक पाण्याची बाटली होती. ती त्याने मनीषच्या हातात दिली.
" साब, हाथ मूॅंह धो लो|" मनीष गाडीतून खाली उतरला. तोंडावर जरा पाणी मारल्यावर त्याला बरे वाटले. तोपर्यंत चहावाल्याने कपबशीत चहा ओतला होता. मुन्ना क्रीम रोल घेऊन आला होता. त्यातील दोन रोल त्याने मनीषसमोर धरले. मनीष ने नको म्हणून मान हलवली. यावर मुन्ना म्हणाला ,
"साब, आपने रात को भी खाना खाया नही | मेमसाब की चिंता में आपको कुछ सुझ नही रहा था | लेकिन अभी तो थोडासा खा लो | थोडा तबियत का तो खयाल करो |" हे ऐकल्यावर मनीषने त्यातील एक क्रीम रोल घेतला आणि चहात बुडवून तो खाऊ लागला. त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला,
"निकिता कुठे असेल? कशी असेल? तिने काही खाल्ले असेल का?"

निकिता अजून तरी सुखरूप होती, परंतु ती कैदेत होती. तो तरुण तिच्या शेजारीच खुर्चीवर बसला होता. तिचे दोन्ही हात बांधले होते, आणि तिच्या तोंडाला रुमाल बांधला होता. ती रागाने त्या तरुणाकडे पहात होती. पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. थोड्यावेळाने तेथे एक पन्नाशीच्या वयाची महिला आली. तिने निकिताचे हात सोडले. तोंडावरील रुमाल सोडला आणि तिला तिने सांगितले,
" जा. आंघोळ करून घे." हे ऐकूनही निकिता तेथून तसूभरही हलली नाही. त्या तरुणाकडे पाहून ती रागाने विचारू लागली,
" कोण आहेस तू? मला येथे का घेऊन आला आहेस?" यावर तो तरुण तिच्याकडे पाहून हसला. आणि म्हणाला,
"डार्लिंग, बहुत समय अभी हमारे पास है | तुला उत्तर जाणून घेण्याची एवढी गडबड का झाली आहे ?जा. मस्तपैकी अंघोळ वगैरे करून घे. फ्रेश हो. रात्री सुद्धा काही खाल्ले नाहीस. त्यामुळे मावशी जे देतील ते खाऊन घे. मग तुझ्या प्रश्नावर आपण सखोलपणे बोलूया."

हे ऐकून त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकत निकिता आत निघून गेली. आंघोळ केल्यावर नाही म्हटले तरी गरम पाण्याच्या तुषारांनी तिला जरा बरे वाटले. मनावरील ताण थोडासा कमी झाला.
"मनीष कसा असेल? कुठे असेल? आपल्या काळजीने त्याची काय अवस्था झाली असेल?" असा विचार तिच्या मनात आला. आपली ताटातूट करणाऱ्या त्या तरुणाचा तिला आणखीनच राग आला. ती आंघोळ करून बाहेर आली तेव्हा त्या मावशीने तिला दुसरे कपडे आणून दिले. ते पाहून निकिताने नाक मुरडले. ती म्हणाली ,
"माझ्या अंगावर आहेत ते माझे कपडेच मी घातले आहेत. मला नको दुसऱ्याचे कपडे."
यावर ती मावशी म्हणाली ,
"हे दुसऱ्याचे कपडे नाहीत. हा नवा कोरा ड्रेस आहे." यावर निकिता म्हणाली,
" एकदा सांगितले ना मला नकोय म्हणून !" हे ऐकल्यावर मावशी मुकाट्याने बाजूला झाली. निकिताने आपण कोठे आहोत यासाठी इकडे तिकडे बघितले. तो एक छोटेखानी बंगला होता. चार रूम होत्या. तिला आतल्या रूममध्ये ठेवले होते. शेजारच्या रूममध्ये त्या तरुणाचे कपडे दिसत होते, याचा अर्थ ती रूम त्या तरुणाची होती. निकिता आत्ता उभी होती ते किचन होते. आणि पुढे हॉल दिसत होता. हॉल मधून पन्नाशीच्या वयाचा एक माणूस आत आला. त्याने निकिताकडे बघितले आणि काही न बोलता त्याने हातातून आणलेली पिशवी किचनमध्ये ठेवली, आणि तो बाहेर निघून गेला.
त्या मावशीने आत येऊन त्या पिशवीतील दूध, भाजी असे सगळे सामान बाहेर काढले. आणि ते व्यवस्थित ठेवण्याच्या मागे लागली. निकिता तिथेच एका बाजूला बसून राहिली. आपला मोबाईल सोबत असता तर बरे झाले असते असे तिला वाटले.

मनीष आणि मुन्ना चहा पिल्यावर पुन्हा एकदा दुकानांसमोर फेरफटका मारायला गेले. आता एकेक करून दुकाने उघडायला सुरुवात झाली होती. उघडलेल्या दुकानात मनीष डोकावत होता. तेथील दुकानदारांना निकिताचा फोटो दाखवून तो विचारत होता की, "आपण यांना पाहिलेत का?"क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
आपण यांना पाहिलेत का? या प्रश्नचिन्हाला सोबत घेऊन आजचा भाग तर संपला. पण या प्रश्नाची तीव्रता आज ध्यानात आली.दूरदर्शनवर गजरा हा कार्यक्रम लागायचा.त्यानंतर छाया गीत हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लागायचा.या दोन्ही कार्यक्रमांच्या मध्ये आपण यांना पाहिलेत का? हा कार्यक्रम लागायचा.तिथे हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवून यांना पाहिलेत तर अमूक ठिकाणी संपर्क साधावा असे त्या कार्यक्रमाचे स्वरुप असायचे.त्यावेळी तो कार्यक्रम पहाणे कंटाळवाणे वाटायचे.पण त्या कार्यक्रमाचे महत्त्व आता निकीता नाहिशी झाल्यावर जाणवतेय.असो..
पाहूया पुढे काय होते ते..
पाहूया पुढे काय होते ते..

ळी छायागीत पहाण्याची घाई झालेली असायची.कधी एकदा हा कार्यक्रम संपतेय असे व्हायचे.आज मनिष आणि निकीता ची ताटातूट अनुभवताना त्या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात आले.असो...पाहूया पुढील भागात काय होते ते..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने