Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग १६

अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या महिलांची कहाणी

अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग १६

©® सौ.हेमा पाटील.
पोलीस फोर्स आल्यामुळे मनीषच्या जीवात जीव आला. तो पुढे आला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली.  पोलीस इन्स्पेक्टरनी त्याला जुजबी माहिती विचारली. निकिताचा फोटो दाखवायला सांगितले. मनीषने आपल्या मोबाईल वरील निकिताचे फोटो दाखवले. इन्स्पेक्टरने निकिताचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठवायला सांगितले. त्याचा नंबर घेऊन मनीषने निकिताचा फोटो फॉरवर्ड केला.

आता पोलिसांनी प्रत्येक दुकानात रेड टाकायला सुरुवात केली. परंतु प्रत्येक दुकानातून ते जेव्हा बाहेर  येत होते तेव्हा मनीषच्या आशा पल्लवीत होत  होत्या. पण त्याची निराशाच होत होती. निकिताचा पत्ता लागत नव्हता. हळूहळू एक एक करत प्रत्येक दुकान पालथे घालून झाले, पण तेथे कुठेच निकिता सापडली नाही. आता काय करायचे हा मोठा प्रश्न मनीषसमोर पडला. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टरनी मनीषला सांगितले,
" साब आप हॉटेलमे जाके आराम कर लो | आपने एफ. आय. आर. सबमीट की है | फोटो भी भेजा है |अब पोलीस अपना काम करेगी | आप चिंता मत करो |"
हे ऐकून मनीष म्हणाला,
" आप ऐसे कैसे बोल रहे हो ? वो मेरी पत्नी है |  मेरी आखों के सामने से आधे घंटे मे वो लापता हो गई है | इस अंजान शहर मे वो कहां होगी ये खयाल मुझे खा रहा है |और आप कहते हो कि मै आराम करू!"
  यावर इन्स्पेक्टर म्हणाले,
" देखो साहब जो हो गया है वो तो आप या मे कोई भी टाल नही सकते है | आपने तो देखा हमने यहां पे सभी दुकानों मे कस के देख लिया | लेकिन यहां कुछ भी नही मिला | अभी हम शहर मे नाकाबंदी करके आये है | तो यहां से जो बाहर गया होगा तो सीसीटीव्ही कॅमेरा में कैद हो गया होगा |  अब  ये आपकी पत्नी का फोटो भेज देंगे | अगर टोल नाके पर या सिग्नल पर इनको लेकर कोई जाता हुआ सीसीटीव्ही में कैद हो गया हो तो पता लग सकता है | आप निश्चिंत रहो |"
  
   हे ऐकून मनीष विचारात पडला. मगाशी निकिता इथेच सापडेल असा विश्वास त्याला वाटत होता . तो सगळा भाग पिंजून काढला तरी निकिता इथे सापडली नाही. आणि तो तर गल्लीच्या तोंडाशीच उभा होता. त्याला निकिता जाताना दिसली नाही. त्यामुळे निकिता नेमकी कशी गायब झाली असावी असा प्रश्न त्याला पडला. पोलीस आले होते तसे गाडीत बसून माघारी निघून गेले. जाताना त्याला हॉटेलवर विश्रांती घ्या असा सल्ला देऊन गेले.

पोलिसांसाठी ही नित्याची बाब होती. त्यांच्यासाठी ही एक केस होती. मनिष चे मात्र अख्खे भावविश्व निकीता भोवती सामावले होते.त्यामुळे मनीषचा पाय तेथून निघत नव्हता. त्याच्या डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते झाले होते. त्याची निकिता बेपत्ता झाली होती. तिला वेळ द्यावा यासाठी ते दोघे मसूरीला आले होते, आणि पहिल्याच दिवशी निकिता त्याच्यापासून दुरावली होती.

पोलीस प्रमुखांच्या असिस्टंटने पाठवलेल्या माहितीनुसार सात युवती बेपत्ता झाल्या होत्या. त्या आजवर सापडल्या नव्हत्या. निकिताचे काय होणार हा प्रश्न त्याला सतावत होता. त्या दुकानाच्या गल्लीच्या तोंडाशी बसवलेल्या दुकानदाराला त्याने दुकानाकडे परत पाठवले. मुन्नाला तो म्हणाला,
" तू ही दिवसभर कंटाळला असशील. तू आता घरी जा." यावर मुन्ना म्हणाला,
" साब, आपको अकेला छोडके मे कैसे जा सकता हूं? मै भी आपके साथ रुकता हूं |"  हे ऐकून मनीष म्हणाला,

  " तू तरी घरी जाऊन विश्रांती घे .उद्या जर आपल्याला मसूरी मध्ये फिरायची वेळ आली तर गाडी तुला चालवायची आहे. त्यामुळे तुझी झोप होणे गरजेचे आहे तू घरी जा."
हे ऐकून मुन्ना म्हणाला,
" आप तो ठीक बोल रहे हो | लेकिन मैं घर नही जाऊंगा |  मै मुमताज में जाकर बैठता हूं | थोडी देर नींद लेता हूँ | आप भी चलो | थोडी देर अगर लेट जाओगे तो आपको भी थोडा चैन मिलेगा | मैं आपका दर्द समझ सकता हूं | लेकिन आप भी थके हुए हो |"
   हे ऐकून मनीष त्याच्यासोबत गाडीकडे निघाला .गाडीच्या पुढच्या  सीट पूर्ण मागे करून दोघेजण सीटवर कलंडले .दमल्यामुळे मुन्नाची लगेच झोप लागली. दिवसभर गाडी चालवण्यामुळे तो दमला होता. मनीषाही कंटाळला होता ,परंतु निकिताच्या काळजीने त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. निकिता कशी असेल? कुठे असेल ?
हे प्रश्न त्याला भेडसावत होते.

  पहाटेचे चार वाजले होते. दूर कुठेतरी मंदिरातील घंटानाद ऐकू येत होता .आणि मनीष मात्र हताश नजरेने सभोवताली पहात होता.तो विचारांच्या आवर्तनात बुडाला.निकीताची आठवण त्याला येत होतीच. आपण तिला एकटीला दुकानात सोडून आलो याचेही शल्य होते.निकीता सापडेल का अशी भीतीही होती.या सगळ्या विचारात  सकाळचे सहा वाजले . त्याच्या मोबाईलवर तन्मयचा फोन आला. त्याने पटकन फोन रिसिव्ह केला. तन्मयने विचारले,
" काय झाले ? सापडली का निकिता?" यावर मनीषने सांगितले,
" नाही. रात्रभर आम्ही शोध घेतला ,पण निकिता सापडली नाही. पोलिसांनीही कसून चौकशी केली ,परंतु तिचा पत्ता लागला नाही. तिचा फोटो पोलीस इन्स्पेक्टर घेऊन गेले आहेत."
"तू कुठे आहेस ?झोपलाच नाहीस का रात्रभर?" हे ऐकल्यावर मनीष म्हणाला,
" कसे शक्य आहे मला झोप येणे? निकिताचे असे नाहीसे होणे यामुळे मी अगदी भांबावून गेलो आहे . काय करावे मला समजत नाही.  निकिता कुठे असेल? कशा अवस्थेत असेल? ठीक असेल का? या विचारांनी माझे डोके चालेनासे झाले आहे."

तो असे बोलत असताना त्याचे डोळे भरून आले .त्याचा आवाज रुद्ध झाला. तन्मयला समजले की मनीष रडत आहे. तेव्हा तन्मय त्याला समजावत म्हणाला,
" आपण प्रयत्न करतोय ना?  निकिता नक्की सापडेल. तू शांत रहा. तू जर संयमाने स्वतःच्या भावना हाताळल्या नाहीस तर काहीच उपयोग होणार नाही. तू स्थिर रहा म्हणजे नेमके काय घडले असेल ते लक्षात येईल. आता मला सांग तुम्ही मसुरी मध्ये गेला तेव्हापासून आत्तापर्यंत तुला खटकण्यासारखी कुठली गोष्ट घडली होती का?"

   यावर मनीषने सांगितले,
" नाही. तसे खटकण्यासारखे काहीच घडले नाही. रात्री आम्ही हॉटेलवर शांतपणे झोपलो. सकाळी नाष्टा करून मुन्ना सोबत फिरायला बाहेर पडलो."
" मला एक सांग हा जो ड्रायव्हर तुझ्यासोबत आहे त्याच्याविषयी तुझे काय मत आहे ? तो यात सामील नसेल ना?" असे म्हटल्यावर मनिष म्हणाला ,
"छे छे! तो आत्ताही माझ्यासोबत आहे. तो असे काही करेल असे वाटत नाही." यावर तन्मय म्हणाला,
"गुन्हेगार कसा वागतो यावरून आपण कयास बांधू शकत नाही. कदाचित तो गुन्हेगाराला सामील असू शकतो. सध्या अशी परिस्थिती आहे की आपण कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे तू मुन्ना पासून सुद्धा सावध रहा, एवढेच मी तुला सांगत आहे".क्रमश:
©® सौ.हेमा पाटील.
कुठे असेल निकीता? मुन्ना खरंच गुन्हेगाराचा साथीदार असेल का? अशा प्रश्नचिन्हाने हा भाग संपला आहे. वाचकहो ! माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे तुम्हाला वाटतेय का?



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →