अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग १५
भाग १५
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले मुन्ना आणि मनीष दुकानाच्या दाराशी पोहोचले होते. आता आपण दोघांनी एकदमच दुकानात शिरायचे की हळूच पाय न वाजवता आत जाऊन कानोसा घ्यायचा याचा विचार मनीष करत होता. परंतु मुन्नाच्या अंगात त्वेष संचारला होता. त्यामुळे आपण डायरेक्ट आत जाऊन त्या तरुणाची गचांडी धरूया अशी मुन्नाची इच्छा होती. पण मनीषने संयम बाळगायला सांगितले म्हणून मुन्ना शांत होता. दाराशी पोहोचल्यावर आतून काय आवाज येत आहे का याचा मनीषने कानोसा घेतला .
आतून बारीकशी कुजबूज कानावर आली तेव्हा हळूच दार किलकिले करून मनीष आत डोकावला. तेव्हा त्याला दुकानाच्या पुढच्या भागातील मोकळ्या जागेत एक तरुण आणि एक स्त्री दिसली. ते पाहून मनीषला खूप राग आला. तोपर्यंत त्याच्या पाठोपाठ मुन्नाही दुकानाच्या आत शिरला होता. दोघेजण अजिबात पाय न वाजवता पुढे सरकत होते. मनीषचा एक हात चाकूवर होता. तो अतिशय सावधपणे पुढे पाऊल टाकत होता. तो तरुण त्याच्याच विश्वात दंग होता. हे दोघेजण आत आले आहेत याची त्याला कसलीही खबर लागली नव्हती. थोडेसे पुढे गेल्यानंतर तो तरुण आणि स्त्री एकमेकांच्या मिठीत आहेत असे मनीषला दिसले.आपण चुकीच्या जागी आलो आहोत का असे क्षणभर मनीषला वाटले . कारण ,
" ती निकिता असेल तर ती स्वेच्छेने या तरुणाच्या मिठीत कशी शिरेल?" असे त्याला वाटले.
" ती निकिता असेल तर ती स्वेच्छेने या तरुणाच्या मिठीत कशी शिरेल?" असे त्याला वाटले.
मुन्नाने ते समोरील चित्र पाहिले आणि तो मनीषला काही कळायच्या आत पुढे झाला. त्याने त्या तरुणाचे गचांडे धरले आणि त्याच्या कमरेत एक लाथ घालत मुन्ना म्हणाला,
" शरम नही आती है? ये सब करने की तुम्हारी हिम्मत कैसे हुई?"
त्या तरुणाला काहीच कळेना.अचानक झालेल्या या हल्ल्याने तो दचकला होता. तो मागे वळून मुन्नाकडे पाहू लागला .मुन्ना मगाशी मोबाईल मागण्यासाठी आला होता हे त्याने ओळखले .तो म्हणाला,

"भाईसाहब आपका क्या प्रॉब्लेम है? आपका मोबाईल तो मैने दे दिया ना? तो आप अभी इस तरह से क्यूं पेश आ रहे हो?" हे ऐकल्यावर मुन्ना म्हणाला,
" उपरसे मुझसे ही जबान लडाते हो? शरम नही आती?"
" उपरसे मुझसे ही जबान लडाते हो? शरम नही आती?"
" मै क्यू शरम करू? मेरा दुकान है मेरी औरत है | मेरी दुकान में तुम ही घुस गये हो | शरम तो तुम्हें आनी चाहिये |"
हे ऐकल्यावर मुन्नाने समोरच्या स्त्रीकडे पाहिले. ती अर्धवस्त्र असलेली तरुणी लाजून स्वतःच्या अंगाभोवती ओढणी लपेटून घाबरून मुन्नाकडे व मनीषकडे पहात होती. ती निकिता नाही हे मुन्नाच्या लक्षात आले. त्याच्या मागे उभ्या असलेल्या मनीषलाही समजले. आपण फार मोठी चूक केली आहे हे मुन्नाला समजले . तो त्या तरुणाला म्हणाला,
" भाईसाहब ,मुझे माफ करना | गलती हो गई | हमारी मेमसाब गुम हो गई है | हम उन्हें ढूंढ रहे है | हमे लगा शायद ये हमारी मेमसाब है |"

हे ऐकल्यावर तो तरुण म्हणाला," ठीक है | पर पहले देख तो लेना था | हमारा घर नही हैं | इसलिये हम यहीं दुकान पें रहते है | थोडासा वक्त मिलता है इसमें भी तुम आ गये | रंग का भंग कर दिया |"
हे ऐकल्यावर मनीष तिथून बाहेर आला. आणि त्याच्या मागोमाग मुन्ना पुन्हा एकदा माफी मागून बाहेर आला. बाहेर आल्यावर तो मनीषला म्हणाला ,
"मुझे माफ कर दो साहब | गलती हो गयी |" यावर मनीष म्हणाला,
" ठीक आहे मुन्ना . तुझ्या ठिकाणी मी असतो तर मलाही तसेच वाटले असते .पण आता निकिता कुठे असेल याची मला काळजी लागून राहिली आहे. त्यामुळे आपण तिचा शोध घेणे सुरू करूयात."

हे ऐकून मुन्नाने मान डोलावली. दोघेजण पुढची दुकाने तपासण्याच्या कामाला लागले. ते दोघे जेव्हा दुकानाबाहेर पडले तेव्हा तो तरुण अंगावर कपडे चढवून या दोघांच्या मागोमाग दुकानाबाहेर आला .व मनिषला म्हणाला,
"साब मै भी आपके साथ आपकी मेमसाब को धुंडने के लिए मदत करता हूं | मै यहा नया आया हू |मुझे पता तो नही है पर आप जो कहेंगे वो मे करुंगा|" यावर मनीष ने त्याला सांगितले ,
"आपका बहुत शुक्रिया !आप हमे मदद करने के लिए बाहर आ गये हो तो एक काम करो | आप इस गली के शुरुवात के रस्ते पे जाके बैठ जाओ | ताकि यहां से कोई अगर बाहर जा रहा हो तो तुम उसे देख सकोगे | अगर ऐसा कोई शक्स तुम्ही बाहर जाता हुआ दिखाई दे तो तुरंत हमे फोन कर देना |" असे म्हणून मनीषने आपला व मुन्नाचा मोबाईल नंबर त्याला सांगितला, व त्याचा मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये फीड केला.

तो तरुण गल्लीच्या तोंडाशी एका कोपऱ्यात जाऊन बसला. सहजासहजी तो दिसत नव्हता पण गल्लीतून कोणीही बाहेर पडायचे म्हणले तर त्याला ते दिसलेच असते, अशा ठिकाणी तो बसला होता. आता मुन्ना आणि मनीषने प्रत्येक दुकान पिंजायचे काम सुरू केले. त्यांना प्रत्येक दुकानापुढे आणि मागे कुलूप आहे असेच चित्र दिसत होते. हा काय प्रकार आहे हे मनीषला समजेना. निकिता येथून बाहेर गेलेली दिसली नाही. येथून बाहेर पडायला दुसरा रस्ता नाही. प्रत्येक दुकान आपण पाहिले, पण कुठल्याही दुकानात ती आपल्याला आढळून आली नाही. मग निकिता गेली कुठे? असा प्रश्न त्याला पडला.
आता फक्त दुकानाच्या मागे असलेल्या दरीमध्ये शोध घेणे बाकी राहिलेय असे मनिषच्या मनात आले. त्याने बॅटरीचा झोप दरीमध्ये टाकला .परंतु किर्र अंधार आणि दाट झाडी याव्यतिरिक्त तिथे काहीही दिसले नाही. दरीमध्ये इतका तीव्र उतार होता की तिथे कोणी चार पावले सुद्धा उतरून खाली जाऊ शकत नव्हते. आता मनीषचे डोके पार चक्रावले होते.निकीताला कुठे शोधायचे हा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा राहिला होता. तितक्यात सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी गाडीतून पटापटा खाली उड्या मारत दुकानांकडे शोधत नजरेने पाहायला सुरुवात केली. क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.