Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग १४

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कहाणी
अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग १४

©® सौ.हेमा पाटील


  ‌इथे निकीता सापडेल अशी आशा मनिषला वाटली होती, पण तसे न झाल्याने तो जरा निराश झाला. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवले म्हणून त्याने मोबाईल काढून वाॅटसअप चेक केले. मगाशी जिल्हा पोलिस प्रमुखांच्या असिस्टंटने माहिती पाठवतो सांगितले होते, ती माहिती आली होती. त्याने वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या लक्षात आले की खरंच फक्त महाराष्ट्रातूनच आलेल्या मुली या एका वर्षात बेपत्ता होऊन मग त्यांची डेडबाॅडी अगर त्या जिवंत आजवर सापडल्या नव्हत्या. अशा एकूण सात तरुणींची नावे व फोटोंसह माहीती आली होती.ते पाहून मनिषला निकीताची खूप काळजी वाटली.

   हे वर्णन वाचून निकीता खूप मोठ्या संकटात सापडली आहे हे त्याला समजले. त्याने त्या नंबरवरही लाईव्ह लोकेशन पाठवले व पोलिसांना लवकर पाठवावे असा विनंतीवजा मेसेज पाठवला. त्यानंतर त्याने याबाबत मुन्नाला थोडक्यात सांगितले.ते ऐकून मुन्ना ही शहारला.तो म्हणाला,
" माॅं कसम साब ! अगर वो कातिल मुझे मिल जाये तो मैं उसकी बुरी हालत करुंगा! ये तो इन्सान नही हैवान है |"

  यावर काहीच प्रत्युत्तर न देता मनिष उठला.आता अजिबात वेळ घालवता उपयोगी नाही, नाही तर  निकीता आपल्या हाती लागणार नाही हे लक्षात आल्याने त्याने मुन्नाला पलिकडची दुकानांची ओळ चेक करायला सांगितले आणि तो याबाजूने दुकाने व आसपासची मोकळी जागा पाहू लागला.

थोडावेळ गेल्यावर निकीता शुद्धीवर आली तेव्हा तिने पाहिले की आपले हात आणि पाय दोरीने बांधले आहेत व तोंडावर ही रुमाल बांधला आहे.तिची हालचाल जाणवली की तो तरुण तिच्या जवळ आला...पण त्याला पाहून तिने तोंड फिरवले.

दोन दुकाने ओलांडून गेल्यावर त्याला मुन्नाचा मिस्डकाॅल आला.तो पाहून मनिष रस्त्यावर आला व अजिबात आवाज न करता मुन्नाच्या दिशेने चालू लागला.तो जेव्हा त्या दुकानाजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपल्या भाचीसाठी आपण याच दुकानातून खेळणी घेतली होती.दुकानाचे मागील दार उघडे होते व आत मेणबत्तीचा उजेड दिसत होता.लाईटचा बल्ब सुरु असता तर चुकून बटन बंद करायचे राहिले असेल असे वाटले असते,पण आत ज्याअर्थी मेणबत्ती सुरु आहे त्याअर्थी आत नक्कीच कुणीतरी आहे आणि त्यांनीच मेणबत्ती लावली आहे हे लक्षात आल्याने मनिषने मुन्नाला वाॅटसअप वर मेसेज केला की ,
"तू पुढे जा.तू येथील रहिवासी असल्याने आत जे कुणी असेल त्याचे काय चालले आहे? आता कितीजण आहेत आणि निकीता आत आहे का याचा अंदाज घे." असे सांगितले.त्याने खुणेने मुन्नाला अगदी आवाज न करता पुढे जायला सांगितले.मुन्नाने मेसेज वाचला व तो पुढे झाला.त्याने दुकानाच्या दाराजवळ खाली वाकून हळूच आपला मोबाईल दुकानाच्या आत सरकवला. आणि त्याचवेळी  अगदी मोठ्याने हाका मारत आवाज करत मुन्ना दुकानाच्या दारात उभा राहिला.
"भैय्या, कोई है क्या? मेरा मोबाईल शायद यहाँ दुकान में रह गया है! थोडी देर पहले मैं अपने बच्चे के लिये खिलौने खरीदने यहाँ आया था | भैय्या..ओ भैय्या |"

अचानक इथे कुणी येईल अशी कल्पना नसल्याने आतील तरुण गाफील होता. तो त्याची कामे उरकत होता. एकदम दुकानाच्या दाराजवळ हालचाल जाणवली व हाका ऐकू आल्या त्यामुळे तो दाराजवळ आला. तो तरुण मुन्नाला म्हणाला,
"कौन हो तुम?  दुकान तो कभी का बंद हो चुका है|  भैय्या,कल सुबह आ जाओ |"

हे ऐकून मुन्ना म्हणाला,
"भैय्या,मेरा मोबाईल शायद यहाँ गिर गया है |  मुझे वो दे दो, मैं चला जाता हूं |"

यावर तो तरुण घाईघाईने म्हणाला,
" अभी नहीं सुबह आ जाओ | अभी कितना अंधेरा है दिखाई  नहीं देता हैं क्या |"

मुन्ना म्हणाला,
" भैय्या, मैं तो टॅक्सी ड्रायव्हर हूं | अगर मोबाईल लेकर गया नहीं तो मेरा मालिक मुझे आजकी तनख्वाह नहीं देगा | आपकों तो मालूम हैं ना टुरिस्ट को घुमाने के हिसाबसें हमें पैसे मिलते है | प्लीज मना मत करो | मैं यहीं पे रुकता हूं | आप  ढूंढकए मुझे लाकर दो, बडी मेहेरबानी होगी |"

हे ऐकल्यावर त्याने मुन्नाला तिथेच थांब अशी खुण केली व तो मोबाईल शोधायला लागला. मुन्नाने तेवढ्यात सगळीकडे नजर फिरवली.मेणबत्तीच्या उजेडात दुकानाच्या पलिकडच्या बाजूला एक व्यक्ती  आडवी जमिनीवर झोपली आहे असे सावट पडद्यावर पडलेले त्याला दिसले.झोपलेली व्यक्ती झोपलेली नसून जागी आहे व हालचाल करतेय हे त्याच्या नजरेने टिपले.

तो तरुण त्याच्यावर लक्ष ठेवून मोबाईल शोधत होता.तेवढ्यात आतून अस्पष्टसा आवाज आला.अन त्याचवेळी ती व्यक्ती एका कुशीवर झाली, त्यामुळे तिच्या शरीररचनेच्या पडलेल्या सावलीवरुन ती स्त्री आहे हे मुन्नाच्या लक्षात आले. त्याचे काम झाले होते त्यामुळे त्याने त्या तरुणाला हाक मारली व स्वतः च मगाशी खाली टाकलेला मोबाईल आत्ताच पहात असल्यासारखा म्हणाला,
" भैय्या, ये देखो, शायद यहाँ पें गिर गया है |" त्याबरोबर तो तरुण मागे फिरला व खाली पडलेला मोबाईल उचलून हातात घेत अंधारातच तो उलटापालटा करुन पाहू लागला.
ते पाहून मुन्ना म्हणाला,
" भैय्या,यही मेरा मोबाईल है |" आणि असे म्हणत त्याने बॅटरीचे बटन दाबले.त्याच्या उजेडात त्याला आत झोपलेली व्यक्ती ही मेमसाबच आहे का हे कन्फर्म करायचे होते.

अचानक त्याने बॅटरी सुरु केल्यामुळे तो तरुण भलताच रागावला व त्याने त्याला ढकलत दरवाजाबाहेर काढले व आतून दार लावून घेतले.

मुन्नाचे काम झाले होते त्यामुळे तो ही तिथून दूर झाला.मनिषला खुणावून तो  पलिकडील रांगेतील दुकानाच्या मागे जाऊन उभा राहिला.मनिष येताच त्याने दबक्या आवाजात निकीता तिथे असल्याचे सांगितले.
निकीता आत आहे हे समजल्यावर मनिषाला जरा बरे वाटले.किमान ती इथेच आहे , त्यामुळे तिच्यापाशी लवकर पोहोचणे सोपे जाईल असा विचार त्याच्या मनात आला.

अजूनही पोलिसांचा पत्ता नव्हता.त्याने मुन्नाला विचारले,
"आत तो तरुण आणि निकीता सोडून अजून कुणी आहे का? म्हणजे तुला तसे जाणवले का?"
" नहीं साब! मुझे वो दोनों ही दिखायी दिए | वहा दुकान के अंदर और कोई नही दिखाई दिया था |"
मग तो मुन्नाला म्हणाला,
"आपण आता एक काम करूया. पोलिसांची वाट न पाहता आपण आत जाऊया. न जाणो, पोलिसांना यायला जर वेळ लागला तर आत काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो."
मुन्नालाही मनीषचे बोलणे पटले. त्याने मान हलवली आणि तो म्हणाला,
" आप ठीक बोल रहे हो | हमारे यहा रहते अगर अंदर कुछ हो गया तो? इसलिये हम दोनो अंदर जाते है | एक साथ अगर हम अंदर गये तो वो लडका कुछ कर नही पायेगा | और हम उसे जखड लेंगे |"हे ऐकून मनीष म्हणाला,
" चल तर मग". दोघेजण त्या दुकानाच्या दाराशी पोहोचले.क्रमश:
©® सौ.हेमा पाटील.
काय होणार पुढच्या भागात..निकीता सही सलामत सापडते का? मनिष आणि मुन्ना त्या तरुणाशी कसा मुकाबला करतात हे पुढील भागात पाहू यात.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →