आजही सासूबाईंनी, सकाळी सकाळी फर्मान सोडलं, देवीला जाण्याचं. खरंतर आज त्या दोघांचा तिथल्याच एका आश्रमाला भेट देण्याचा मानस होता. पण पुन्हा एकदा, घरात वाद नकोत हा विचार करून ते दोघे तयार झाले.
पूजेचे सर्व सामान, साडी वगैरे तिकडेच जाऊन घेण्याचं ठरलं.
पूजेचे सर्व सामान, साडी वगैरे तिकडेच जाऊन घेण्याचं ठरलं.
मंदिरापासून जवळच एका दुकानात ते गेले. साड्या, ड्रेस, लहान मुलांचे कपडे... छान मांडलं होतं. दुकानात गेल्याबरोबर तिचं लक्ष तिथल्या फीडबॅक मशीन कडे गेले. त्यावर काही ईमोजी होते.... कस्टमर ने आपल्याला हवा तो पर्याय दाबून सर्विस कशी ते सांगायचं. खरंतर आजकाल सगळीकडेच या मशीन्स असतात, पण ही काही खास होती. त्या मशीन मधून, पर्यायनुसार वेगवेगळे आवाज यायचे. सोबत डिस्प्ले वर दिसणाऱ्या ईमोजी. 'खूप आवडलं' यासाठी उड्या मारत, टाळ्या वाजवत मोठ्याने हसणारा ईमोजी, 'आवडलं' यासाठी फक्त हसणारा ईमोजी, 'नाही आवडलं' साठी तोंडं पाडून शांत बसलेला ईमोजी आणि 'अजिबात नाही आवडलं' साठी सॅड वाला ईमोजी. शेवटच्या दोन पर्यायांसाठी सॅड मुसिक वाजायचं. आणि ईमोजी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सॅड फेस करत चालायचे.
निशा मशीन पाहण्यात व्यस्त होती, तेवढ्यात एक मुलगी आली. काउंटर वरच्या माणसाकडे पाहत, "काका, झालं सगळं काम. मी जाऊ आता?" विचारले.
काउंटरवरच्या काकांनी तिच्या हातात दहा ची नोट ठेवत म्हणाले, "अरे वा... हे घे आजचं बक्षीस. जा पटकन दुकान मांड... बघ आज किती कस्टमर आहेत. पळ पळ...." ती खुष झाली, त्यांना 'थँक यू' म्हणत पटकन कोपऱ्यात ठेवलेलं सामान उचलून बाहेर पळाली.
तोपर्यंत सासूबाई साड्या शोधण्यात व्यस्त झाल्या. निशाचं लक्ष पुन्हा त्या एक ९-१० वर्षांच्या मुलीकडे गेलं. ती पोतं अंथरुणं आणलेली फुलं, हार, हळदी कुंकू, ओटीचं सामान, शृंगाराचं सामान त्यावर मांडत होती. अगदी मन लावून ती तिचं काम करत होती. अंगावर एक जुना फ्रॉक होता. केसांच्या दोन वेण्या तिला छान दिसत होत्या. पण केसांना बरेच दिवस तेलाचा हात लागला नाही हे स्पष्ट दिसत होतं. #avyaktmianamika
तिने, सर्व सामान नीट मांडलं आणि गिर्हाईकांची वाट पाहत बसली. कुणी जवळ येताना दिसलं गोड हसून "या ना ताई... घ्या ना ताई.... मावशी" म्हणायची. तिचं वागणं बोलणं पाहून निशाच्या चेहऱ्यावर हसू आलं.
काउंटर वरचे काका निशाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होते. स्वतःहून तिच्याशी बोलायला लागले. "तिची आई झाडूपोचा करायला येते आमच्याकडे. मग बाहेर दुकान मांडते. मागच्या आठवड्यात आईला एका गाडीवाल्याने धडक दिली. पाय फ्रॅक्चर झाला. गाडीवाल्याने खर्च केला त्या दिवशी. पण नंतरचा खर्च कसा भागवणार? तिला त्रास होऊ नये म्हणून ही येते कामाला."
क्रमश :
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
