"स्वैराचार? सार्थक, मी तिथे जाऊन काम करत होते, मजा नाही. तू जेव्हा टूरवर जातोस, तेव्हा मी तुला कधी विचारलंय का की तू घर सोडून का जातोयस? उलट मी तुझ्या बॅगा भरून देते. कारण मला तुझ्या प्रगतीचा अभिमान असतो. मग तुला माझ्या बाबतीत तेच का वाटत नाही? का तुला असं वाटतं की स्त्रीचं स्वातंत्र्य हे पुरुषाच्या परवानगीच्या पेटीत बंद असावं?" तन्वीचा जीव अक्षरशः मेटकुटीस आला.
"मला सवय नाहीये ग... लहानपणापासून बाबांना बघत आलोय. बायकोने ऐकलं नाही की घरात महाभारत होतं, हेच बघितलंय मी." शेवटी सार्थकने देखील हात टेकले.
"मग ते बदलायचं कोणाकडे आहे? तुझ्याकडे की माझ्याकडे? सार्थक, आज जर मी झुकले, तर उद्या आपली मुलंही हेच शिकतील. मुलगा शिकेल की बायकोला दाबून ठेवायचं आणि मुलगी शिकेल की स्वतःच्या स्वप्नांचा बळी द्यायचा. तुला हेच हवंय का?" तन्वी चिडून म्हणाली.
दोघ ही बराच वेळ शांत होते. कुणी काहीच बोलत नव्हतं. खोलीत फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. शेवटी तन्वीने एक निर्णय घेतला होता. तिने सार्थकला स्पष्ट सांगितलं, "जर तुला माझ्या प्रगतीचा अभिमान वाटत नसेल, तर आपल्या नात्याला काही अर्थ नाही."
शेवटी तन्वीच निर्वाणीच बोलण ऐकून सार्थकने घाबरून माघार घेतली. "तन्वी... मला वेळ लागेल. माझा हा 'पुरुषी अहंकार' एका दिवसात मरणार नाही.पण जेव्हा तू घरी नव्हतीस, तेव्हा घर खूप शांत आणि रिकामं वाटत होतं. मला जाणवलं की तुझा आवाज, तुझा वावर या घरासाठी किती महत्त्वाचा आहे. तू प्लिज असं निरावांनीरवीच बोलू नकोस."
"सार्थक, मला तुझा हात धरून चालायचं आहे, तुझ्या मागे नाही. ज्या दिवशी तुला माझ्या यशात स्वतःचं यश दिसेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण एक होऊ."
"खरतर आईच बरोबर आहे. मी बदलायला हवं. पण तन्वी, पुढच्या वेळी जाताना मला 'सांगून' नाही, तर मला 'सोबत' घेऊन जाशील ?" सार्थक तन्वीचे गोबरे गाल ओढत म्हणाला.
"नक्कीच! पण माझी बॅग तुला उचलावी लागेल." तन्वीने मस्करी करण्याचा चान्स नाही सोडला.
"ही बॅगमध्ये वपु ची इतकी पुस्तकं? "
"आईसाठी आणलीय. त्यांना वाचनाची आवड आहे आणि वपु त्यांचे फेव्हरेट लेखक आहेत. "
दोघ ही खूप दिवसांनी हसत मनमोकळे गप्पा करत होते. सार्थकच्या अहंकाराचा बर्फ थोडा तरी वितळलेला होता.
"आईसाठी आणलीय. त्यांना वाचनाची आवड आहे आणि वपु त्यांचे फेव्हरेट लेखक आहेत. "
दोघ ही खूप दिवसांनी हसत मनमोकळे गप्पा करत होते. सार्थकच्या अहंकाराचा बर्फ थोडा तरी वितळलेला होता.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
