पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात जन्म ही महान देणगी आहे.स्वच्छ निर्मळ हवा , प्रसन्न वातावरण , गर्दिचा अभाव, मराठी भाषेचीष समृद्धता व भरभराट, शिक्षणात अग्रेसर अशा सर्वत्र वेगळा ठसा उमटणा-या पुणेशहरात लेखिका सायली कुलकर्णी यांचा जन्म झाला. लहाणपणापासून आईवडिलांचे सुयोग्य संस्कार व चांगली वागणूक यामुळे सायलीजी यांचे खूप लाड होई. शालेय जीवनात त्यांनी खूप चमक दाखवली. सहावी , सातवीला असताना त्यांना शास्रीय संगीताजी आवड होती.महाविद्यालयीन शिक्षणात कॉमर्स शाखेत शिक्षण घेतले. बारावीनंतर त्यांनी इंटीरियर डिझायनिंग करायचे ठरवले. महर्षी धोंडो केशव कर्वे या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला पहिल्या पाचमध्ये आल्यामुळे कॉलेजमधून नोकरी मिळाली. सुरवातीच्या काळात अनेक नोक-या बदलल्या आर्किटेक , डिझायनिंग , फ्रिलान्सिंग व लिफ्टच्या कंपनीत स्ट्रक्चरल ड्राईंग अशा विविध नोकरीतून वेगळा अनुभव मिळवला यातून त्यांची सक्षमता दिसून आली.
यादरम्यान त्यांचा विवाह झाला. आयुष्यात सोनेरी दिवस आले. सुखाचा संसार सुरु झाला. संसार वेलीवर सुंदर अशा आरोहीचे आगमन झाले. हा त्यांच्या आयुष्यातीला परमोच्च क्षण होता. आरोहीच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण झाले. घरी बाळाच्या जोपासनेत वेळ जात होता. अशावेळी रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून सायजींनी कविता लिहायला सुरवात केली. येथूनच त्यांचे लिखाण गती घेऊ लागले. मॉम्सप्रेसो , ईरा व अक्षरधन यासारख्या व्यासपीठावर लिहायला सुरवात केली. लिखाणाच्या आवडीमुळे त्यांचे लिखाण आता बहरु लागले होते. ईरावर त्यांचे लेखन गती घेऊ लागले. तिचे आस्तित्व, दुरावलेल्या रेशीमगाठी, नाती सांभाळताना, तिची फरफट स्रीत्वाची लढाई , अगतिक , त्या वळणावर , कुरुप, नवरा बायकोचा पुर्नजन्म, वाट ती अनोळखी , भाग्य दिले तु मला अशा बहारदार कथामालिका ईरावर लिहून त्यांनी वाचकांना सजग केले आहे. ईरा चॕम्पियन ट्राॕफीमध्ये सांघिक लेखनात आपला ठसा उमटवला. ईराच्या विविध स्पर्धेतील त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा असतो.
लेखनातून निर्माण झालेली नाती त्यांनी मनापासून जपली आहेत. गोड ,सालस व प्रेमळ स्वभावाने त्यांनी मैत्रीचे धागे गुंफले आहेत.आपल्या कुटुंबातील सासू ,सासरे, पती , मुलगी यांच्याबरोबर छान संवादाने जीवनाचा आनंदउत्सव चालू ठेवला आहे. नेहमी हसतमुख असणा-या, दिलखुलास व दिलदार सायलीजी यांना पुढील निरामय आयुष्यासाठी खूप शुभेच्छा …!! तुमचे लेखन सदैव बहरत रहावे ही सदिच्छा ..!!
©®नामदेवपाटील
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
