आयुष्यवर लिहू काही.....कवी सुनिल पुणे, 9359850065,
ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी
तरुण वयापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत
अखंड धावपळ केली,
त्यांच्यासाठी ही काही ओळी...
तरुण वयापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत
अखंड धावपळ केली,
त्यांच्यासाठी ही काही ओळी...
कधी सुरू झाली ही वाटचाल
आणि कधी इतके पुढे आलो
हेच कधी समजलं नाही...
आणि कधी इतके पुढे आलो
हेच कधी समजलं नाही...
हातात काय आलं,
आणि हातातून काय निसटलं
हे मोजायलाही वेळ मिळाला नाही...
आणि हातातून काय निसटलं
हे मोजायलाही वेळ मिळाला नाही...
लहानपण कधी मागे पडलं,
तरुणपण कधी सरलं,
आणि जबाबदाऱ्यांनी भरलेलं आयुष्य कधी अंगावर आलं
हे कळलंच नाही...
तरुणपण कधी सरलं,
आणि जबाबदाऱ्यांनी भरलेलं आयुष्य कधी अंगावर आलं
हे कळलंच नाही...
कालपर्यंत कोणाच्या आधारावर होतो,
आज कोणाचा आधार झालो,
हे परिवर्तनही नकळत घडलं...
आज कोणाचा आधार झालो,
हे परिवर्तनही नकळत घडलं...
कोणी कमी समजलं,
कोणी जास्त मान दिला,
पण खरं स्वतःचं स्थान काय होतं
हेच समजलं नाही...
कोणी जास्त मान दिला,
पण खरं स्वतःचं स्थान काय होतं
हेच समजलं नाही...
आधी आई वडिलांचा शब्द,
मग संसाराचा हुकूम,
आणि पुढे मुलांची इच्छा...
या सगळ्यात
स्वतःसाठी जगलो कधी
हेच कळलं नाही...
मग संसाराचा हुकूम,
आणि पुढे मुलांची इच्छा...
या सगळ्यात
स्वतःसाठी जगलो कधी
हेच कळलं नाही...
मन अजूनही तरुणच वाटतं,
पण काळ सांगतो आता शहाणपण आलं आहे,
या दोघांच्या ओढाताणीत
शरीर थकून गेलं
हेही लक्षात आलं नाही...
पण काळ सांगतो आता शहाणपण आलं आहे,
या दोघांच्या ओढाताणीत
शरीर थकून गेलं
हेही लक्षात आलं नाही...
हळूहळू रूप बदलत गेलं,
केस विरळ झाले,
डोळ्यांना चष्मा लागला,
पण वेळ निघून गेला
हे कधी जाणवलंच नाही...
केस विरळ झाले,
डोळ्यांना चष्मा लागला,
पण वेळ निघून गेला
हे कधी जाणवलंच नाही...
एकेकाळचं एकत्र कुटुंब
कधी तुकड्यांत विभागलं,
आपली माणसं दूर गेली
हेही हळूच घडलं...
कधी तुकड्यांत विभागलं,
आपली माणसं दूर गेली
हेही हळूच घडलं...
नाती उरली,
पण वेळ कमी पडली,
आणि आनंदी क्षण
कधी आठवणीत बदलले
हेही समजलं नाही...
पण वेळ कमी पडली,
आणि आनंदी क्षण
कधी आठवणीत बदलले
हेही समजलं नाही...
म्हणून...
आयुष्य मनापासून जगा,
उद्या उशीर झाल्यावर
“कळलंच नाही” असं म्हणावं लागू नये...
आयुष्य मनापासून जगा,
उद्या उशीर झाल्यावर
“कळलंच नाही” असं म्हणावं लागू नये...
खिशातून थोडे पैसे गेले
तर मन अस्वस्थ होतं,
पण आयुष्याची वर्षं निघून जातात
तेव्हा आपण शांत राहतो
हेच खरं आश्चर्य आहे ...
तर मन अस्वस्थ होतं,
पण आयुष्याची वर्षं निघून जातात
तेव्हा आपण शांत राहतो
हेच खरं आश्चर्य आहे ...
शेवटच्या प्रवासात
काहीही सोबत नेता येत नाही,
नाव, पैसा, ओळख काहीच नाही...
श्वासही नाही...
काहीही सोबत नेता येत नाही,
नाव, पैसा, ओळख काहीच नाही...
श्वासही नाही...
वेळ हळूहळू आयुष्य कमी करत असतो,
आणि आपण मात्र समजतो
की आपणच जग चालवतो...
आणि आपण मात्र समजतो
की आपणच जग चालवतो...
आपण संपत्ती मोजत राहतो,
आणि वर कुणीतरी
आपले श्वास मोजत असतो...
आणि वर कुणीतरी
आपले श्वास मोजत असतो...
चला मग,
जे आयुष्य उरलं आहे
ते वाया जाऊ देऊ नका...
ते खास बनवा ....
जे आयुष्य उरलं आहे
ते वाया जाऊ देऊ नका...
ते खास बनवा ....
खातं पैशाने भरतं,
पण जीवन
चांगल्या कर्मांनी भरतं...
पण जीवन
चांगल्या कर्मांनी भरतं...
म्हणून..
प्रामाणिकपणे कमवा,
नात्यांना जपा,
चुका माफ करा,
अहंकार बाजूला ठेवा,
आणि उरलेलं आयुष्य
हसत हसत जगा...
प्रामाणिकपणे कमवा,
नात्यांना जपा,
चुका माफ करा,
अहंकार बाजूला ठेवा,
आणि उरलेलं आयुष्य
हसत हसत जगा...
कवी: सुनिल पुणेTM 93 59 85 00 65, topsunil@gmail.com
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
