आळीपाळी.. -2 अंतिम
"मग आपण काय करायचं ?" पल्लवीने विचारलं.
रेवती फोन घेऊन गॅलरीत आली होती. समोर पुण्याची सकाळ. तिने क्षणभर विचार केला. "पल्लवी, आपल्या नवऱ्यांनी हा हिशोब केला. तो त्यांना पटलाय. समजावून काही होणार नाही, कारण त्यांना काही चुकलंय असंच वाटत नाही. आई-बाबांना विचारलं होतं ना, म्हणतील." ती थांबली. "आपल्याला हिशोब बदलायचाय. आणि तो आपण दोघीच बदलू शकतो, कारण घर आपण चालवतो."
"म्हणजे ?"
"म्हणजे पुढच्या महिन्यापासून आई-बाबा एकत्र. एका घरात. सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे. दोघं. वाटणी नाही."
"पण वहिनी, खर्चाचं.. हेच म्हणतील ना, दोघांचा खर्च एकाला.."
"खर्च मोजू या पल्लवी." रेवती म्हणाली. "बाबांच्या गोळ्या महिन्याला अठराशे. आईंच्या बाराशे. जेवण, दोन माणसांचं, फार तर चार हजार. सगळं मिळून सात आठ हजार. दोन्ही घरं जर सहा महिन्यांनी बदलणार असतील तर वर्षाला प्रत्येकाला तेवढाच खर्च, जो आत्ता आहे. फरक शून्य. फक्त एक फरक.. रात्री दोन वाजता कुणी फोनवर कुजबुजणार नाही."

पल्लवी हसली. "वहिनी, तुम्ही बँकेत असायला हवं होतात."
"आणि पल्लवी, अजून एक. हे 'दोघांचा खर्च एकाला जड' हे वाक्य आहे ना, ते खरं आहे का ? तू सांग. आईंचा तुझ्याकडे काय खर्च होतो महिन्याला ? जेवणाचं एक ताट आणि गोळ्या. बाबांचं इथे तेवढंच. दोघं एकत्र आले तर दोन ताटं आणि दोघांच्या गोळ्या. आपल्या घरात रोज चार पाहुण्यांचं जेवण होतं, तेव्हा जड जात नाही, आणि आई-बाबांचं एक ताट जड जातं ?" रेवती थांबली. "हिशोब खर्चाचा नव्हता ग. सोयीचा होता. आणि सोय आपली, गैरसोय त्यांची."

"आपण दोघी घरखर्चाचे हिशोब ठेवतो ना. त्याहून मोठं खातं नाही." रेवती म्हणाली."
"आज रात्री तू राजन भावजींशी बोल, मी प्रशांतशी बोलते. दोघी एकाच वेळी. आणि ऐकून घेतल्याशिवाय सोडायचं नाही."
रात्री प्रशांत जेवायला बसला तेव्हा रेवतीने ताट वाढलं आणि समोर बसली.
रात्री प्रशांत जेवायला बसला तेव्हा रेवतीने ताट वाढलं आणि समोर बसली.
"तुम्हाला एक सांगायचं आहे. पाच मिनिटं फक्त."
"काय ग ?"
"बाबा रोज रात्री दोन वाजता आईंना फोन करतात. वर्षभर. आई नाशिकला रोज रात्री दोन वाजता फोनची वाट बघतात. बाबा सात वाजता गॅलरीत नाशिकच्या दिशेला उभे राहतात, कारण आईंची दिवा लावायची वेळ असते. आणि जेवताना एक पोळी तशीच ठेवतात, कारण आई ती त्यांच्यासाठी ठेवायच्या."
रेवतीचा आवाज सपाट होता. "मी काल दारात उभी होते. मी ऐकलं. आणि पल्लवीनेही ऐकलं, नाशिकला. एकाच रात्री."
प्रशांतचा घास थांबला.
प्रशांतचा घास थांबला.
"तुम्ही दोघांनी हिशोब केलात. बरोबर केलात. पैशाचा. पण एक रकाना राहिला. चाळीस वर्षं एकत्र झोपलेल्या दोन माणसांना वेगळं ठेवण्याची किंमत. ती कुठे लिहिलीये ?" तिने कागद पुढे केला. "हा माझा हिशोब. दोघं एकत्र, सहा महिने इथे, सहा तिथे. खर्च तेवढाच. पल्लवी आत्ता राजन भावजींना हेच सांगतेय. तुम्ही दोघं भाऊ आहात. आम्ही दोघी जावा आहोत. हिशोबात आमचंही मत असतं."
प्रशांत बराच वेळ ताटाकडे बघत राहिला. मग त्याने फोन काढला. राजनचा फोन आधीच येत होता.
पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला प्रशांत नाशिकला गेला आणि आईला घेऊन आला. रेवतीने त्या दिवशी घर सजवलं नाही, गोडधोड केलं नाही. फक्त बाबांच्या खोलीत दुसरी गादी टाकली आणि खिडकीत एक निरांजन ठेवलं.
यमुनाबाई दारात आल्या. नारायणराव हॉलमध्ये उभे होते. दोघं एकमेकांकडे बघत राहिली. कुणी काही बोललं नाही. मग यमुनाबाई आत आल्या आणि म्हणाल्या, "किती वाळलात हो. जेवत नव्हता ना नीट."
"जेवत होतो. एक पोळी उरायची फक्त," नारायणराव म्हणाले.
रात्री जेवायला सगळे बसले. रेवतीने बाबांना दोन पोळ्या वाढल्या. त्यांनी दोन्ही संपवल्या. यमुनाबाईंनी सुनेकडे बघितलं आणि काही न बोलता तिच्या हातावर थोपटलं.
रात्री जेवायला सगळे बसले. रेवतीने बाबांना दोन पोळ्या वाढल्या. त्यांनी दोन्ही संपवल्या. यमुनाबाईंनी सुनेकडे बघितलं आणि काही न बोलता तिच्या हातावर थोपटलं.
यमुनाबाईंनी पहिल्याच दिवशी बाबांच्या औषधांचा डबा तपासला. "बीपीची गोळी सकाळची आहे, ही रात्री का ठेवलीये?" रेवतीने मान खाली घातली, "बाबा म्हणाले सवय आहे रात्रीची.." "खोटं. सकाळचीच आहे. चाळीस वर्षं मी देतेय." आणि नारायणराव लहान मुलासारखे हसले.
नाशिकला त्याच रात्री पल्लवीने राजनला हेच सांगितलं होतं, आणि राजन म्हणाला होता, "आई कधी बोलली नाही ग हे." पल्लवीने विचारलं होतं, "तुम्ही कधी विचारलंत ?" आणि त्या प्रश्नानंतर राजनने फोन उचलून प्रशांतला लावला होता.
रात्री दोन वाजता रेवती जागी झाली. सवयीने. बाबांच्या खोलीकडे तिने कान दिला. आवाज होता. पण फोनचा नाही.
घोरण्याचा.
घोरण्याचा.
आणि त्या घोरण्याच्या तालावर, चाळीस वर्षांच्या सवयीने, यमुनाबाई शांत झोपल्या होत्या.
सकाळी चहा देताना रेवतीने विचारलं, "बाबा, रात्री फोन वाजला नाही ?"
सकाळी चहा देताना रेवतीने विचारलं, "बाबा, रात्री फोन वाजला नाही ?"
"नाही," नारायणराव म्हणाले. "आता नंबर घरातच आहे."