मी काय म्हणते अधिक महिना जवळ आला आहे. आपण आपल्या लेकीला आणि जावईबापूंना अधिक मास साजरा करण्यासाठी आपल्या घरी बोलूया...
अगं पण सुरेखा आपल्या मुलीचे लग्न होऊन तीनच महिने झाले आहेत. आत्ताच लग्नात आपण इतका खर्च केला, या महिन्यात आपण सुरज च्या कॉलेजची फी देखील भरली आता पुन्हा अधिक महिन्यासाठी पैसे आणायचे तरी कुठून. मुलीला बोलवायचं म्हणजे दोघांसाठी पोशाख आणि आरोहीसाठी जोडवी तरी करावीच लागतील.
अहो बघा ना कुठून तरी पैसे जमतात का . आपल्या लेकीचा पहिलाच सण आहे .
अगं सुरेखा ते शक्य नाही . इतरांकडून पैसे घेऊन सन साजरे करणे मला अजिबात पटत नाही.
हे बघा ते मला काही माहिती नाही. मला माझ्या लेकीचा आणि जावयाचा सण साजरा करायचा आहे. त्यासाठी मला हे माझ्या गळ्यातलं डोरलं विकायला लागलं तरी चालेल ....
अगं काय म्हणतेस तू सुरेखा! असं काही केलं तर आरोहीला अजिबात आवडणार नाही.
मी बघतो काही पैशांची तजबीज होते का ?
इकडे मोबाईल स्क्रोल करत असताना आरोहीला अधिकमास साजरा करताना चे काही व्हिडिओ दिसतात.... आरोही मनातच विचार करते यावर्षी सर्वजण बोलत आहेत की या अधिक मासामध्ये आईची ओटी भरायची आहे. पण माझं लग्न होऊन तीनच महिने झाले आहेत, घरातल्यांशी जुळून घेण्याची कसरत सुरू असताना, सासूबाईंना जर सांगितलं तर त्या यासाठी तयार होतील का? असा मनात विचार करत असताना सासूबाई बाहेरून आवाज देतात ....
आरोही.... आरोही .....बाहेर ये पटकन ,बघ कोण आलंय.
आरोही पटकन बाहेर येऊन बघते तर आरोही ची ननंद आलेली असते. आरोही पटकन त्यांना पाणी आणून देते व पाया पडते.
पुनम ताई तुम्ही येऊन आम्हाला अचानक सरप्राईज दिल.
पुनम बोलते अगं .... अधिक महिना चालू आहे ना! मी वैभवला किती दिवसांपासून बोलते ... आईकडे जायचं आहे , पण वेळच मिळत नव्हता. हे बघ मी आईसाठी ओटी घेऊन आले आहे. आणि त्यासोबतही सोन्याची नथ.
सर्वजण बोलत आहेत की या वर्षी आईची ओटी भरायची आहे म्हणून मी तिच्यासाठी ही ओटी घेऊन आले आहे.
सर्वजण बोलत आहेत की या वर्षी आईची ओटी भरायची आहे म्हणून मी तिच्यासाठी ही ओटी घेऊन आले आहे.
आरोही आश्चर्यचकित होऊन बोलते बापरे सोन्याची नथ.
आता आरोहीलाही वाटू लागतं मलाही माहेरी जाता येईल का?
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
