आईची जागा (भाग १)

सासु कधीतरी आईची जागा घेईल का?

सकाळपासूनच गीताला थोडं थकल्यासारखं वाटत होतं.
एक तर पावसाळी वातावरण त्यामुळे अंगामध्ये थोडीशी कणकण जाणवत होती. पण जर मी उठले नाही, तर विराजला बाहेरच खाव लागेल. या विचाराने गीता उठते व  विराज साठी पोळी भाजी बनवते .

विराज गीता आवाज देतो..... गीता टिफिन बनवून झाला का ? आवर पटकन माझी ट्रेन जाईल.....
गीता त्याला टिफिन आणून देते . गीताचा चेहरा बघून विराज बोलतो काय गं ....चेहरा उतरल्यासारखा वाटतोय? काय झालं?

गीता बोलते अंगात थोडी कणकण जाणवत आहे.

मग कशाला माझ्यासाठी टिफिन करायचा. मी खाल्ल असतं बाहेर काहीतरी. मला एकदा बोलायचं तरी, आता झोपून घे. काही काम करू नको.

हो ....

थांब मी तुला औषध देतो. विराज कणकणीवरची गोळी काढून गीताला खाण्यासाठी देतो.

गीता औषध घेऊन बेडरूम मध्ये जाऊन आडवी पडते. गोळी मुळे तिला गाढ झोप लागते. गीताच्या सासुबाई  उठून. आंघोळ करून देव पूजा करतात व बाहेर सोफ्यावर येऊन बसतात.

त्या किचनमध्ये वाकून बघतात तर गीता किचनमध्ये नसते.  त्या पुन्हा बेडरूम मध्ये जाऊन बघतात तर गीता झोपलेली असते. ते बघून गीताच्या सासूबाई नाकतोंड मुरडून बोलतात... अगं... बाई... गीता अजून झोपली आहे.

त्या लगेचच गीताला आवाज देतात . गीता..... गीता....
अगं वाजले बघ किती! उठ पटकन माझी चहाची वेळ झाली आहे.

हो हो उठते सासुबाई. मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून राहुलने मला औषध दिले होते .त्यामुळे मला झोप लागली.

गीताची सासूबाई बोलते ... आता बरं वाटतंय का?

हो हो आता बरं वाटतंय. गीता थकलेल्या स्वरात बोलते.

पटकन आंघोळ कर आणि माझ्यासाठी चहा ठेव.तो  पर्यंत मी माझा जप करते.

गीता चहा गाळून ठेवते. व कपडे धुण्यासाठी जाते. गीताची सासू  हॉलमध्ये येऊन बसते. गीता चहा आणून देतेस ना.

गीता  मनातच विचार करते...गाळलेला चहा घेऊन जाण्याची तसदी सुद्धा  सासूबाई घेत नाहीत. मी आजारी असून सुद्धा सासूबाईंना सर्व काही सोफ्यावर आणून द्यावे लागते.  याचे गीताला फार वाईट वाटते.
सासुबाई पुन्हा आवाज देतात .अगं... गीता ...झाला का चहा?

गीता मनातच विचार करते....मी प्रत्येक वेळी त्यांचा विचार करते. पण त्या मात्र माझा कधीच विचार करत नाही.  सासू कधीतरी आईची जागा घेईल का?

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →