आई चा राजीनामा (अंतिम भाग)
राजीनामा दिल्याच्या दुसऱ्या दिवशी नेहमी पेक्षा थोड उशिरा अलका उठली, पण ती किचनमध्ये गेलीच नाही....ती छान साडी नेसून, डोक्यात मोगऱ्याचा गजा माळून बाहेर आली... तिने स्वतःसाठी कडक चहा बनवला आणि बाल्कनीत बसून FM वरती गाणी ऐकू लागली.
तिकडे आत सतीश यांचा चहा कडू झाला होता....चिन्मयला त्याचे मोजे सापडत नव्हते आणि अनन्या मॅगी खाऊन कॉलेजला गेली... सतीश गडबडीत ऑफिस ला निघून गेले.. जाताना अलका ला म्हटले की," आमची एवढी फरफट तुला कशी बघवत आहे...आता तुझी जिद्द सोड" पण अलका ने लक्ष दिले नाही...
जेवण तर बनवता येत म्हणते म्हणून तिघेही हॉटेल मधून जेवण मागवायचे...हॉटेलचं जेवून जेवून तिघांचे पोट बिघडले. शेवटी सतीश यांनी जाहीर केलं, "आज आपण घरीच खिचडी बनवू या."
तिघेही किचनमध्ये उतरले. यूट्यूबवर रेसिपी लावली.
"बाबा, हळद टाका!" चिन्मय ओरडला.
"हळद कुठेय?" सतीश यांनी डबा शोधताना मिठाचा डबा उलथापालथ केला.
तितक्यात अनन्याने कुकरचं झाकण चुकीच्या पद्धतीने लावलं. १० मिनिटांनी कुकरची शिट्टी झाली नाही...काही वेळाने वास यायला लागला म्हणून गॅस बंद केला आणि कुकर ओपन केलं तर खिचडी पूर्णपणे जळाली होती...
हा सगळा राडा चालू असताना अलका बाहेर तिची जुनी मैत्रीण मंदासोबत थेटरमध्ये सिनेमा बघून आली होती. तिच्या हातात पॉपकॉर्नचं पाकीट होतं. किचनची अवस्था बघून ती एक शब्दही न बोलता, हसत स्वतःच्या खोलीत निघून गेली.
घराची अवस्था एखाद्या कचराकुंडीसारखी झाली होती. कपड्यांचे डोंगर साचले होते. चिन्मयला कळून चुकलं होतं की आई रोज घर कसं चकाचक ठेवायची.
एक दिवस चिन्मय त्याच्या कपाटात कपडे शोधत असताना त्याला तळाशी एक जुनी फाईल सापडली. त्या फाईलमध्ये आईने लिहिलेल्या काही जुन्या कविता, तिची कॉलेजची सर्टिफिकेट्स (ती कॉलेजमध्ये डिबेट चॅम्पियन होती) आणि तिची काही अर्धवट राहिलेली चित्रं होती.
एक दिवस चिन्मय त्याच्या कपाटात कपडे शोधत असताना त्याला तळाशी एक जुनी फाईल सापडली. त्या फाईलमध्ये आईने लिहिलेल्या काही जुन्या कविता, तिची कॉलेजची सर्टिफिकेट्स (ती कॉलेजमध्ये डिबेट चॅम्पियन होती) आणि तिची काही अर्धवट राहिलेली चित्रं होती.
चिन्मयने अनन्या आणि बाबांना बोलावून ते दाखवलं.
सतीश ते बघून सुन्न झाले. लग्न झाल्यापासून त्यांनी कधी अलकाला तिचे छंद काय आहेत, हे विचारलंच नव्हतं. ती एम.ए. फर्स्ट क्लास पास होती, पण गेली २० वर्ष ती फक्त "चपाती गोल कशी करायची" यातच तिचं आयुष्य घालवत होती आणि सतीश ने सुद्धा तिला कधीच तेवढ महत्व दिले नव्हते...
सतीश ते बघून सुन्न झाले. लग्न झाल्यापासून त्यांनी कधी अलकाला तिचे छंद काय आहेत, हे विचारलंच नव्हतं. ती एम.ए. फर्स्ट क्लास पास होती, पण गेली २० वर्ष ती फक्त "चपाती गोल कशी करायची" यातच तिचं आयुष्य घालवत होती आणि सतीश ने सुद्धा तिला कधीच तेवढ महत्व दिले नव्हते...
त्याच रात्री अनन्याला खूप ताप आला...ती तापाने फणफणली. नकळत तिच्या तोंडातून शब्द निघाला, "मम्मी..."
नियम विसरून तिघेही अलकाच्या खोलीकडे धावले. अलका बाहेर आली... तिने अनन्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, तिला औषध दिलं आणि रात्रभर तिच्या शेजारी बसून राहिली. आईचं 'राजीनामा पत्र' एका क्षणात बाजूला पडलं होतं, कारण शेवटी ती आई होती.
१५ दिवस पूर्ण झाले होते....अलका सकाळी तिच्या खोलीतून बाहेर आली. तिला वाटलं आज पुन्हा तीच सकाळ असेल. पण समोरचं दृश्य बघून ती थक्क झाली.
संपूर्ण घर आरशासारखं चमकत होतं. हॉलमध्ये एक मोठा टेबल सजवला होता. त्यावर अलकाचे आवडते पोहे, शिरा आणि चहा ठेवला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भिंतीवर अलकाने कॉलेजमध्ये काढलेलं एक जुनं चित्र छान फ्रेम करून लावलं होतं.
सतीश पुढे आले. त्यांनी कान पकडले, "अलका, आम्हांला माफ कर... या १५ दिवसांत आम्हांला समजलं की, तू या घराची कामवाली नाहीस, तर या घराचा पाया आहेस. आम्ही तुला कधी गृहीत धरू नये, हे समजायला आम्हांला हा धक्का गरजेचा होता."
चिन्मयने अलकाला एक नवीन लॅपटॉप गिफ्ट केला, "आई, तू आजपासून पुन्हा लिहिणं सुरू कर. तुझ्या कविता जगासमोर आल्या पाहिजेत."आणि लॅपटॉप शिकायला मी त्या मदत करेल...
अनन्याने अलकाची गळाभेट घेतली, "मम्मी, आता घरातलं काम फक्त तुझं नाही. आम्ही एक टाईमटेबल बनवलंय. बाबा भांडी घासतील, चिन्मय कपडे धुवेल, मी झाडू मारेन आणि तू फक्त आम्हांला गाईड करशील... आपली 'होम मिनिस्टर' म्हणून!"
अलकाच्या डोळ्यात आता आनंदाश्रू होते. तिने राजीनामा मागे घेतला, पण एका नव्या अटीवर"आता या घरात प्रत्येकाला आदर हा मिळायला पाहिजे आणि एकदम टाइम टेबल नुसार वागळे नाही चालेल पण मला थोडीफार मदत नक्की कराल... नाहीतर मी परत राजीनामा देईल बर...आणि सगळे हसायला लागले...
समाप्त
स्नेहा डाखरे
कथेची शिकवण - घरामध्ये गृहिणी किंवा आई जे काम करते, ते तिचे 'कर्तव्य' असू शकते, पण तिची 'लायकी' किंवा 'गुलामी' नाही. नात्यांमध्ये एकमेकांबद्दल कृतज्ञता (Gratitude) असणे खूप गरजेचे आहे....
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...
