Login

गुंत्यातून सुटकेचा मंत्र - भाग १

सासु सुनेच्या नात्यातील गुंता आणि तो सोडवायचा मार्ग..
" आई, ती बाईच नकोय मला डोळ्यापुढे."

" वीणा असं काय करतेस? तुझ्या सासूबाई आहेत त्या."

" असतील."

" वीणा अगं शिकलेली आहेस ना तू?"

" शिकलेली आहे म्हणून चांगुलपणाचा ससेमिरा घेऊन का फिरू?"

" वीणा,मान्य आहे इतक्या दिवस तुमच्या दोघींचं पटत नव्हतं पण आता त्या चांगल्या वागतात ना तुझ्याशी?"

" बाबा,एक सांगू? आता जरी त्या माझ्यासोबत गोडीगुलाबीने राहत असल्या तरीही माझ्या मनात मात्र त्यांच्याबद्दल काहीही जागा नाही."

" अगं पण का? उद्या तुझी आई सुद्धा कोणाची तरी सासू होईल.तिच्याशी असं कोणी वागलं तर?"

" त्याला सर्वस्वी आईच जबाबदार असेल."

" वीणा?" आई रागानेच म्हणाली.

" माफ कर आई मला, पण मी खरं तेच बोलतेय. जर तू घरात नवीन आलेल्या सुनबाईला सुरुवातीपासूनच समजून उमजून घेऊन वागलीस, उणेदुणे बोलणे केले नाहीस, सारखं पाण्यात पाहणार नाहीस तर तीही तुझ्याशी छानच वागेल.ती तुझ्याशी का म्हणून वाईट वागेल? "

" काय करावं या पोरीचं? कितीही समजावून सांगितलं तरीही का समजत नाहीये हिला?"

" शांत हो मीरा." पप्पा आईला समजावत म्हणाले.

" अहो,काय शांत होऊ? तिच्या नवऱ्याचे किती फोन येऊन गेलेत बघा जरा."

" मला वाटतं आपण वीणाला थोडा वेळ द्यायला हवा."

" बाबा प्लीज.उगीच माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका."

" अगं,सौरभला तरी फोन करशील की नाही?"

" करेल, पण योग्य वेळ आल्यावर."

तेवढ्यात, गप्पांचा गदारोळ ऐकून सौरभ,वीणाचा नवरा आत आला.
" झालं तरी काय पण एवढं? कळेल का मला इथे?"
सौरभ वीणाजवळ जात म्हणाला.

" बरं झालं सौरभ तू आलास.तुला सर्वांसमक्ष स्पष्टच सांगते,मला तुझ्या आईशी कामाव्यतिरिक्त बोलता येणार नाही."

" ऑफिस सुटलं आणि नेहमीप्रमाणे फोन उचलला नाहीस तेव्हा कळलं माझी महाराणी माहेरी गेली असेल म्हणून घाईतच आलो.बाकी आईबद्दल जे म्हणालीस,त्यात काही नावीन्य आहे?"
सौरभ देखील मस्करी करत बोलला.

"सौरभ, जोक चालू नाहीये इथे.जरा जबाबदारीने वाग."

" वीणा,मी तुझ्या आईवडिलांचा मनापासून आदर करतो पण तुझं वागणं मला असं वागायला भाग पाडतं."

" हम्म, घे तूही तुझ्या आईची बाजू. ममाज् बॉय .."

" ए,मी कधी माझ्या आईची बाजू घेतली? उलट आईला तिकडे एकटं सोडून बायकोच्या माहेरी धावतच आलो.आई पप्पा सांगा ना हिला.."

" सौरभ,आम्ही थकलो रे बाबा हिला सांगून.. आता तूच काय ते बघ."

" ठीक आहे. नाही या दोघींचं पॅच अप केलं तर नाव सांगणार नाही.."

" नाव बदलशील का मग?"

" बघू.."

" ठीक आहे मी नाव शोधून ठेवते,इथेच थोडे दिवस माहेरी थांबून.इथूनच ऑफिसला जात जाईन.काळजी घे माझ्या प्रिय सासूबाईंची.."

भाग एक समाप्त..

क्रमशः
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →