कौतुकाच्या पलिकडे (अंतिम भाग)
शहरात आल्याल आताा पंधरा दिवस झाले होते.शांताबाईंचा उत्साह आता पूर्णपणे मावळला होता.अमोल सकाळी ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा....नेहाही नोकरीवरून थकून यायची.... कधी कधी तर जेवण करूनच यायची
"आई, जेवण झालं का?" एवढं विचारून दोघं खोलीत जायचे.
एक दिवस शांताबाईंची तब्येत अचानक बिघडली. अंगात कणकण होती, डोकं गरगरत होतं.त्यांनी अमोलला फोन केला.
"बाळा, मला डॉक्टरांकडे घेऊन जाशील का?"
अमोल घाईत म्हणाला, "आई, आज खूप महत्त्वाचं काम आहे. उद्या जाऊया."
"पण मला आजच बरं वाटत नाहीये..."
"नेहाला सांग ना."
नेहाने ऐकल्यावर उत्तर दिलं,..."आई, माझी आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे. जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन या."
शांताबाईंच्या डोळ्यांसमोर अचानक मीनाक्षीचा चेहरा आला.एकदा त्यांना रात्री ताप आला होता. पहाटेपर्यंत मीनाक्षी त्यांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती. सकाळी सुनीलने सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे नेलं होतं.
तेव्हा शांताबाईंनी त्याला सहज म्हटलं होतं,
तेव्हा शांताबाईंनी त्याला सहज म्हटलं होतं,
"तुमचं कर्तव्य आहे हे....तुम्ही केलेच पाहिजे"
आज मात्र त्या वाक्याची टोचणी त्यांनाच लागली.
त्या रात्री त्यांनी खूप विचार केला...दूर राहणाऱ्या मुलाच्या दोन गोड शब्दांना आपण प्रेम मानलं... आणि रोज आपल्या सुखासाठी धावणाऱ्या मुलगा सुनेचं प्रेम आपण कर्तव्य समजलो.
त्या रात्री त्यांनी खूप विचार केला...दूर राहणाऱ्या मुलाच्या दोन गोड शब्दांना आपण प्रेम मानलं... आणि रोज आपल्या सुखासाठी धावणाऱ्या मुलगा सुनेचं प्रेम आपण कर्तव्य समजलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सुनीलला फोन केला.
"सुनील..."
आवाज ऐकताच सुनील म्हणाला, "काय झालं आई?"
"मला घरी यायचं आहे."
"आई, काही झालंय का?"
काही क्षण शांतता होती."नाही रे... फक्त मला माझ्या घरी यायचं आहे."
दोन दिवसांनी सुनील स्वतः शहरात आला....नेहाने सासूला एक साडी दिली आणि परत या असे म्हटले...
आईची बॅग सुनीलने उचलली आणि दोघे निघाले
"चल आई."
परतीच्या संपूर्ण प्रवासात शांताबाई शांत होत्या.
घरी पोहोचल्यावर दार उघडताच मीनाक्षी धावत आली.
घरी पोहोचल्यावर दार उघडताच मीनाक्षी धावत आली.
"आई! कधी आलात? थकला असाल. आधी बसा, मी चहा करते."
इतकं ऐकताच शांताबाईंचे डोळे भरून आले.त्यांनी मीनाक्षीचा हात धरला.
"मीनाक्षी... मला माफ कर गं."
मीनाक्षी आश्चर्याने म्हणाली, "कशासाठी आई?"
"तुझ्या सेवेला मी कधी किंमत दिली नाही. उलट दूर राहणाऱ्या नेहा अमोलचं गुणगान करत राहिले. पण जेव्हा मी त्यांच्या घरी राहिले, तेव्हा कळलं की फोनवरची काळजी आणि रोजच्या आयुष्यातली काळजी यात किती फरक असतो."
मीनाक्षीच्या डोळ्यांतही पाणी आलं.
शांताबाई पुढे म्हणाल्या,"तू सून म्हणून नाही, मुलगी म्हणून माझी सेवा केलीस. आणि सुनील... त्यानेही कधी मला एकटं पडू दिलं नाही. पण मी तुमच्या प्रेमाची किंमतच केली नाही."
सुनील हसत म्हणाला,"आई, आता तरी समजलं ना?.. आमच असं म्हणणे नाही की आमचंच नाव घे पण निदान जाणीव तरी...
शांताबाई म्हणाल्या,"हो रे. आणि आता एक गोष्टही समजली जवळ असणाऱ्याचं प्रेम गृहीत धरू नये. कारण रोजची सेवा करणाऱ्याच्या हाताला टाळ्या मिळत नाहीत, पण त्या हातांवरच घर उभं असतं."
त्या दिवसापासून शांताबाई बदलल्या.मीनाक्षी काम करत असताना त्या शक्य तितकी मदत करू लागल्या. तिच्या तब्येतीची काळजी घेऊ लागल्या.
आता कुणी अमोल नेहाचं कौतुक केलं तर त्या फक्त एवढंच म्हणायच्या
"माझ्या दोन्ही मुलांवर माझं प्रेम आहे; पण माझ्यासाठी रोज झिजणाऱ्यांची किंमत मला उशिरा का होईना, समजली."
मीनाक्षीच्या चेहऱ्यावर त्या दिवशी पहिल्यांदा समाधानाचं हसू उमटलं....
मीनाक्षीच्या चेहऱ्यावर त्या दिवशी पहिल्यांदा समाधानाचं हसू उमटलं....
समाप्त
स्नेहा डाखरे
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंट करा...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
