गैरसमज(अंतिम भाग)
एका पावसाळी रात्री कविताला अचानक खूप ताप भरला. अंग विस्तवासारखं तापलेलं, डोकं दुखत होतं, अंथरुणातून उठताही येत नव्हतं. राहुल कामासाठी बाहेरगावी गेलेला, घरात फक्त शालिनीताई आणि कविता दोघीच होत्या...
विव्हळण्याचा आवाज ऐकून शालिनीताई धावतच आत गेल्या. कपाळाला हात लावला, अंग विस्तवासारखं. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांना फोन लावला, माणूस औषधं आणायला पाठवला, तोपर्यंत ओल्या पट्ट्या कपाळावर ठेवत बसल्या.रात्रभर त्या झोपल्या नाहीत. ताप उतरत नव्हता, कविता बरळत होती, कधी माहेरची आठवण काढत तर कधी घाबरून बडबडत. शालिनीताई डोक्यावरून हात फिरवत राहिल्या, धीर देत राहिल्या - "मी आहे इथे, घाबरू नकोस."
पहाटे डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन दिलं. पुढचे तीन-चार दिवस शालिनीताईंनी आईसारखी सेवा केली ...वेळच्या वेळी औषध, हलकं जेवण, अंग पुसणं, केसांना तेल लावणं. स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता उशाशी बसून राहिल्या.
कविताने झोपेतून डोळे उघडून पाहिलं तर शालिनीताई तिचा हात हातात घेऊन बसलेल्या, डोळ्यात पाणी. "तू बरी होशील गं? मी आहे तुझ्या सोबत आणि राहुल सुद्धा येण्यासाठी निघाला आहे...
त्याच क्षणी कविताच्या मनातला गैरसमज एका क्षणात विरघळून गेला. तिला डब्याची रात्रही आठवली ..तेव्हाही शालिनीताईंनी तिचीच काळजीच घेतली होती, पण आपण उलट अर्थ काढला होता. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. हात घट्ट धरत ती म्हणाली, "आई... मला माफ करा. मी तुम्हाला किती चुकीचं समजत होते."
शालिनीताईंनी तिला जवळ घेतलं, हसत म्हणाल्या, "वेडाबाई, आई कधी माफी मागायला सांगते का? तू बरी हो, बस एवढंच हवंय....तू बरी झालीस की आपण शॉपिंग ला जाऊ मस्त आणि पाणीपुरी खाऊ...आणि दोघी हसल्या"
त्या दिवसापासून कविताला कळलं की जगातली प्रत्येक सासू...खडुस सासू सारखी नसते. काही सासवा खरोखरच आईसारख्या प्रेम करणाऱ्या असतात, फक्त समजून घ्यायला आपणच उशीर करतो. तिने मनातून ठरवलं यापुढे शालिनीताई तिच्यासाठी सासू नाही, तर आईच असतील....आणि त्यानंतर माहेरवरून आलेल्या प्रत्येक कॉल मध्ये कविता तिच्या सासू च कौतुक करायचं थकायची नाही आणि ती कुणाच ऐकून घ्यायची नाही सासूबद्दल...दोघेही एकदम मैत्रिणी सारख्या रहायच्या पुढे...
समाप्त...
स्नेहा डाखरे
आजची कथा सासूबाई वर आधारित आहे.. ही वाचून तरी माझा वाचक वर्ग खुश होईल....( सासूबाई वर्ग...हा हा हा)
कथा आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा..
आजची कथा सासूबाई वर आधारित आहे.. ही वाचून तरी माझा वाचक वर्ग खुश होईल....( सासूबाई वर्ग...हा हा हा)
कथा आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा..
