Login

मेहनत एकाची.... मजा दुसऱ्याची (भाग१)

...

मेहनत एकाची.... मजा दुसऱ्याची (भाग१)

सोनाच्या घरी आज मोठा कार्यक्रम होता.... कसलीतरी पूजा होती म्हणून सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती.सोनाच्या सासूबाईंनी मुलीला बोलावून घेतलं होतं 2 दिवसासाठी आणि त्यासोबतच सुनेच्या माहेरी आणि सुनेच्या लग्न झालेल्या बहिणीला सुद्धा आमंत्रण पाठवले होते...

नेहमी सारखी सोनाची नणंद घरात फक्त आराम करायला आली असेच वाटत होते तिच्या वागण्यावरून...पण सोनाची बहिण आपल्या बहिणीच्या मदतीसाठी आली असे दिसत होते... दोघींनीही सकाळपासून राबराब राबून स्वयंपाकापासून ते पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत सगळी कामं उरकली होती. फरक इतकाच होता की सासूबाईंची मुलगी मध्येच येऊन थोडं हसून, थोडं मिरवून पुन्हा गप्पांमध्ये रमत होती आणि इकडे तिकडे डुलत होती तर सोनाची बहीण सकाळपासून स्वयंपाकघरातच अडकलेली होती.

संध्याकाळी पाहुणे परतायला लागले, तेव्हा खरा रंग दिसला....सासूबाईंच्या मुलीच्या हातात एक जरीची महागडी साडी, मिठाईचा भरगच्च डबा आणि जाड लिफाफा ठेवला गेला...त्यानंतर ती निघाली सासरी आणि सोनाच्या बहिणीच्या हातात? अर्धा किलो पेढ्याचा छोटासा डबा, एक साधी जवळजवळ न घालण्यासारखी साडी आणि तिकिटापुरते पाचशे रुपये....

हे आजचं नव्हतं...गेल्या अनेक प्रसंगी असंच घडत आलं होतं....सासू नेहमी कुठला कार्यक्रम असला सोनाला सांगून तिच्या माहेरचाना कामानिमित्त बोलावून घ्यायची ...म्हणजे त्यांना हक्काची कामवाली मिळायची आणि बिचारे ते आपल्या लेकीच्या जीवासाठी कधीच मागे हटायचे नाही... सोनाने तिच्या नवऱ्याला बरेच दा सांगितले होते...तो सासूला म्हटला होता मागे पण सासू म्हणाली की," आपल्या लेकीला मदत करायची कसली लाज"

याउलट त्यांची मुलगी एक तर दिवसावर यायची किंवा २ divas अगोदर जरी आली तरी फक्त आराम करणे आणि ऑर्डर सोडणे या शिवाय दुसरे काही करायची नाही... सोनाला सुद्धा वाटायचं जाऊदे कुठे वाद घालायचा आणि बोलायचं...पण तिच्या याच स्वभावामुळे तिला घरातले गृहीत धरायला लागले होते...

पण आज सोनाच्या बहिणीच्या मनात साचलेला राग उफाळून आला....जाता जाता तिने साडीबद्दल थोडी जबरदस्ती केली,आणि म्हणाली...की त्यांना दिलेली साडी मला खूप आवडली आहे...मला तशीच साडी पाहिजे... तेव्हा सासूबाई तिखट बोलल्या,
"कमालच आहे बाई तुझी! आपल्या बहिणीच्या सासरवर एवढा हक्क कुणाचा असतो का? ती माझी मुलगी आहे म्हणून मी तिला एवढं दिलंय.... खूपच चुरुचुर बोलत आहेस आज तू....

क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →