हक्काची मोलकरीण (भाग २)
रात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर मृणाल घरी परतली. दिवसभराच्या धावपळीने तिच्या पायात गोळे आले होते. डोकं दुखत होतं आणि अंगात अजिबात ताकद उरली नव्हती.
तिला वाटलं, घरी आल्यावर निदान सासूबाई म्हणतील, "जा, आराम कर."
पण घरात पाऊल ठेवताच सासूबाईंचा आवाज कानावर पडला.
"आलीस? बरं झालं. स्वयंपाकघरातली भांडी तशीच आहेत. सकाळच्या नाश्त्याची तयारीही करायची आहे."
मृणाल काही क्षण त्यांच्याकडे बघतच राहिली.
"आई… मी सकाळपासून ताईच्या घरी काम करत होते. खूप थकले आहे."
"अगं, तिथे काय एवढं काम केलंस? वाढदिवस होता, दोन चार कामं केली असतील...एवढ्यातच ठाकली...आणि आता आपलं घर कोण बघणार?"
मृणालच्या डोळ्यांत पाणी आलं.ती काही बोलली नाही.
शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि भांडी घासायला सुरुवात केली.तिच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी झाली होती.
नणंदेच्या घरात तिची मदत करणं ही माझी जबाबदारी का बर ?
शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि भांडी घासायला सुरुवात केली.तिच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी झाली होती.
नणंदेच्या घरात तिची मदत करणं ही माझी जबाबदारी का बर ?
तिच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी दिवसभर काम करण्याचा दिवस का?आणि तिथून परत आल्यावर माझ्या थकव्याला किंमत का नाही?
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सासूबाईंचा आदेश आला.
"मृणाल, आज दुपारी प्रियाकडे जाऊन ये. काल सगळं आवरताना तिचं बरंच काम राहिलं असेल."
यावेळी मृणालने हातातलं काम थांबवलं.
"आई, काल दिवसभर मी तिच्याकडे होते. आज मला थोडा आराम करू द्या."
सासूबाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"लग्न करून घरात आलीस ना? मग घरची माणसं अडचणीत असताना कामाला यायचं नाही का?हे काय नवीन लावलं आहेस आता....
"कामाला यायचं आहे आई…आपलेच लोकं आहेत ते माहितेय मला पण प्रत्येक वेळी माझ्याकडूनच अपेक्षा का?"
"कारण तू सून आहेस!"
हे शब्द मृणालच्या काळजात घुसले.....सून असल्यामुळे घरची सगळी कामं तिची?सून असल्यामुळे नणंदेच्या घरची कामंही तिची?सून असल्यामुळे तिला थकण्याचा अधिकारही नाही?तेवढ्यात तिचा नवरा आदित्य आत आला...त्याने आईचं शेवटचं वाक्य ऐकलं होतं.
"आई, मृणालला आजही प्रियाकडे कशाला जायला सांगत?े
"हो. तिची मदत करायला....तिच्या एकटीवर भार पडेल कामांचा रे"
आदित्यने मृणालकडे पाहिलं.तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यांतील पाणी त्याच्यापासून लपलं नाही.
"मृणाल, काल नेमकं काय झालं होतं?"
मृणालने काही क्षण गप्प राहून त्याच्याकडे पाहिलं.
आज मात्र तिला सगळं सांगायचं होतं...कारण तिच्या सहनशीलतेलाही आता एक मर्यादा आली होती.... आणि हे नेहमी व्हायचं पण आज ती बोलणार होती...
आज मात्र तिला सगळं सांगायचं होतं...कारण तिच्या सहनशीलतेलाही आता एक मर्यादा आली होती.... आणि हे नेहमी व्हायचं पण आज ती बोलणार होती...
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
