कौतुकाच्या पलिकडे (भाग १)
"अगं मीनाक्षी, माझा चहा झाला का गं?"
पहाटेचे सहा वाजले होते. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. मीनाक्षीने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि शांताबाईंसाठी चहा घेऊन आली.
"हा घ्या आई. आधी चहा घ्या, मग औषधं देते."
शांताबाई मोठ्या मुलगा सुनील आणि सून मीनाक्षीसोबत राहत होत्या. सुनील सकाळी कामावर निघण्यापूर्वी आईची औषधं, डॉक्टरांच्या भेटी आणि घरखर्च सगळं पाहायचा. मीनाक्षी दिवसभर शांताबाईंच्या सेवेत असायची.
आईच्या गुडघ्यांना दुखत असेल तर ती तेल चोळायची. त्यांना आवडणारी भाजी बनवायची. कधी रात्री ताप आला तर त्यांच्या उशाशी बसून रात्र काढायची.
पण शांताबाईंच्या तोंडावर मात्र नेहमी धाकट्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक असायचं.
"माझा अमोल किती गुणी आहे! मोठ्या शहरात नोकरी करूनही मला रोज फोन करतो."
"आणि नेहा? अगदी देवाने पाठवलेली सून आहे. मागच्या वेळी आली होती ना, माझ्यासाठी किती साड्या घेऊन आली!"
मीनाक्षी हसून ऐकायची.
एकदा सुनीलने गंमतीने विचारलं, "आई, मी आणि मीनाक्षी तुमची सेवा कमी करतो काय?"
शांताबाई लगेच म्हणाल्या, "तुम्ही तर माझ्यासोबतच राहता. पण अमोल आणि नेहा दूर राहून माझी काळजी घेतात, त्याचं कौतुक वाटतं मला."मीनाक्षीला ते शब्द लागले.
पण तिने उत्तर दिलं नाही.काही दिवसांनी अमोलचा फोन आला.
पण तिने उत्तर दिलं नाही.काही दिवसांनी अमोलचा फोन आला.
"आई, तू एक महिना आमच्याकडे ये ना. शहरात राहशील, फिरशील. नेहालाही तुला वेळ द्यायचा आहे."
शांताबाईंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
"ऐकलंस मीनाक्षी? माझा अमोल मला स्वतःहून घेऊन जाणार आहे!"
"ऐकलंस मीनाक्षी? माझा अमोल मला स्वतःहून घेऊन जाणार आहे!"
मीनाक्षीने मनापासून त्यांची बॅग भरली. औषधं, कपडे, चष्मा, सगळं नीट ठेवलं.
"आई, वेळेवर औषधं घ्या. आणि काही लागलं तर मला लगेच फोन करा."
शांताबाई म्हणाल्या, "आता नेहा माझी काळजी घेईल. तू काळजी करू नकोस."
शहरात पोहोचल्यावर नेहाने पहिल्या दोन दिवसांत खरंच त्यांना अगदी हातच्या फोडासारखं जपलं.
सकाळचा चहा, नाश्ता, औषधं सगळं वेळेवर.
शांताबाई मनात म्हणाल्या, मीनाक्षीपेक्षा नेहा किती प्रेमाने करते माझी सेवा!पण तिसऱ्या दिवशी सकाळी नेहा ऑफिसची तयारी करत म्हणाली,
सकाळचा चहा, नाश्ता, औषधं सगळं वेळेवर.
शांताबाई मनात म्हणाल्या, मीनाक्षीपेक्षा नेहा किती प्रेमाने करते माझी सेवा!पण तिसऱ्या दिवशी सकाळी नेहा ऑफिसची तयारी करत म्हणाली,
"आई, दूध फ्रिजमध्ये आहे. चहा तुम्ही करून घ्या. मला उशीर होतोय."
शांताबाई थोड्या गोंधळल्या.दुसऱ्या दिवशी नेहाने सहज सांगितलं,"आई, भाजी निवडून ठेवाल का? आणि कपडे वाळत घालून द्या. मला खूप काम आहे."
हळूहळू घरातील छोटी मोठी कामं शांताबाईंच्या अंगावर पडू लागली...आणि एक दिवस नेहाने ऑफिसला निघताना म्हटलं,
"आई, आज बाई आली नाहीये. घर जरा झाडून घ्या."
शांताबाईंनी तिच्याकडे पाहिलं."पण माझे गुडघे दुखतायत गं..."
नेहा खांदे उडवत म्हणाली,
"अहो, मीनाक्षीताई गावाकडे एवढं काम करते तेव्हा तुम्हाला आराम असतो...इथे तुम्ही थोडं केलंत तर काय होतं?"
"अहो, मीनाक्षीताई गावाकडे एवढं काम करते तेव्हा तुम्हाला आराम असतो...इथे तुम्ही थोडं केलंत तर काय होतं?"
मीनाक्षीचं नाव ऐकताच शांताबाई गप्प झाल्या....
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
