सहनशीलतेची मर्यादा (भाग १)
"आता तर बरी झाली आहेस, थोडं थोडं काम कर आता...सारखं आराम करणे चांगले नाही...आळस तयार होतो" असं म्हणत नेहाच्या हातात कधी भाजी चिरायचं ताट, कधी कपड्यांची घडी येऊ लागली.
नवरा आदित्य सकाळी कामावर गेला की सासूबाई जणू घड्याळ लावल्यासारख्या नेहाला कामाला जुंपत आणि गंमत म्हणजे संध्याकाळी बरोबर आदित्य घरी यायच्या वेळेला मात्र सासूबाई स्वतः हातात एखादं काम घेऊन बसत ... जेणेकरून मुलाला वाटावं, "आई दिवसभर किती राबते!"
रीतीनुसार डिलिव्हरीसाठी नेहा माहेरी गेली होती.... बाळंतपणाचे दिवस माहेरी सुखात गेले, आईच्या मायेच्या छत्राखाली. पण सासरी परत आल्यावर मात्र चित्र वेगळंच होतं...४ महिन्याच्या बाळाला सांभाळणे साध न्हवत...
आदित्यला याची अजिबात कल्पना नव्हती. उलट एक दिवस बाळ सासूबाई कडे रडत असत तेव्हा नेहा थकून झोपेत असताना त्याने तिला हलकेच रागावलं, "नेहा, आता बाळाला तीन-चार महिने झाले. जरा तरी कामात मदत कर गं. या वयात आई किती दिवस तुझं काम करणार?"
नेहाला काय बोलावं सुचेना. डोळ्यात पाणी आलं, पण ती गप्प राहिली. घरातलं सत्य सांगून काय उपयोग? कोण विश्वास ठेवणार?
काही दिवसांनी नणंद स्वाती माहेरपणासाठी घरी आली आणि नेहाचं काम अजून वाढलं. स्वातीचं जेवण, तिचे कपडे, तिची खातिरदारी सगळं नेहाच्याच खांद्यावर येऊन पडलं. बाळाला भूक लागली की तेवढ्यापुरतं तिला दूध पाजायला वेळ दिला जाई, बाकी वेळ ती स्वयंपाकघरात किंवा नणंदेच्या सेवेत गुंतलेली असे.
रात्री बाळासाठी जागरण, दिवसा घरकाम नेहाची तब्येत ढासळत गेली. एक दिवस अचानक तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली....
रात्री बाळासाठी जागरण, दिवसा घरकाम नेहाची तब्येत ढासळत गेली. एक दिवस अचानक तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली....
आदित्य तिला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टर तपासून म्हणाले, "यांना प्रचंड थकवा आलेला आहे. काही दिवस पूर्ण आराम हवा. आराम नाही मिळाला तर बाळाच्या तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो...आणि त्यांच्याही...
हे ऐकून आदित्यच्या मनात पहिल्यांदाच शंकेची पाल चुकचुकली. गेले काही महिने रात्री उशिरा उठून बाळाला सांभाळणारी, दिवसा थकून भागून वावरणारी नेहा त्याला आठवली. काहीतरी चुकतंय, हे त्याला जाणवू लागलं.
घरी आल्यावर त्याने सरळ आईला सांगितलं, "आई, आजपासून हिला जास्त काम सांगू नकोस. डॉक्टरांनी सांगितलंय हिला पूर्ण थकवा आलाय. अशीच तब्येत बिघडत राहिली तर बाळाकडेही दुर्लक्ष होईल."....काही दिवस आराम करू दे तिला...
घरी आल्यावर त्याने सरळ आईला सांगितलं, "आई, आजपासून हिला जास्त काम सांगू नकोस. डॉक्टरांनी सांगितलंय हिला पूर्ण थकवा आलाय. अशीच तब्येत बिघडत राहिली तर बाळाकडेही दुर्लक्ष होईल."....काही दिवस आराम करू दे तिला...
