गैरसमज(भाग१)
कविता लग्न होऊन सासरी आली, तेव्हा घरातल्या मावशी, आत्या,आई,ताई यांनी सांगितले होते की "बाळा, सासू कधीच कुणाची होत नाही. ती फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करते. तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवू नकोस.... आपले काम करायचे फक्त...नवऱ्यासोबत चांगले रहायचे... अस तसं वैगरे बऱ्याच श्या टिपिकल सासू सुनेच्या गोष्टी"
सासरी आल्यावर सासू शालिनीताई वेगळ्याच वाटल्या. त्या सकाळी स्वतः चहा करून देत, "गोड की कडक?" असं आपुलकीने विचारत.... त्या तिला खायला काय नवीन बनाऊ का असे सुद्धा विचारायच्या...कविताला आश्चर्य वाटायचं, पण मनातला आवाज लगेच बोलायचा की "हे सगळं वरवरचं आहे."
एके दिवशी राहुलला ऑफिसला लवकर निघायचं होतं. आदल्या रात्री उशिरापर्यंत जागरण झाल्यामुळे कविताला जागच आली नाही...शालिनीताईंनी पाहिलं वेळ न दवडता स्वतः डबा तयार केला आणि राहुलच्या आवडीची भाजी, गरम पोळ्या केल्या आणि डब्बा हातात देत म्हणाल्या, "जा बाळा, उशीर होईल."
राहुल चक्रावून विचारता, "आई, कविताने नाही केला डबा?" शालिनीताई हसून म्हणाल्या, "दमली होती काल, झोपू दे तिला."
कविता उठल्यावर तिला कळलं, डबा आधीच केलाय सासूबाईंनी... तिच्या मनात विचार आला "मुद्दाम उठवलं नाही, नवऱ्याला हिच्या हातचं आवडावं म्हणून, आणि मला नावं ठेवायला कारण मिळालं." रागारागाने ती म्हणाली, "मला उठवलं का नाही? सगळ्यांना वाटेल मी आळशी आहे!"
शालिनीताई शांतपणे म्हणाल्या, "तुझी झोप मोडावी वाटलं नाही. कुणाला काय वाटेल याची चिंता कशाला करतेस तू ...आपण तिघे तर राहतो घरात?" कविताला हे शब्द पटले नाहीत, ती रागानेच निघून गेली.
दिवस जात होते.... शालिनीताई तिच्या आवडीनिवडी जपत, उदास दिसली की गप्पा मारत, नवीन साडी घेऊन देत... तेवढ्यापुरत तिला वाटायचं की खरंच आपली सासूबाई छान आहे..पण माहेरी एखाद्या बहिणीचा वैगरे कॉल आला आणि बोलणे झाले की कविता प्रत्येक गोष्टीत वाईट हेतू शोधत रहायची... "नातेवाईकांसमोर दाखवायला घेतली असेल, माझ्यासाठी थोडीच...अस म्हणायची"
ती त्यांच्याशी उलट बोलू लागली, सल्ल्याकडे दुर्लक्ष करू लागली. एकदा रागाच्या भरात म्हणालीही, "तुम्हाला काय गरज माझ्या आयुष्यात लुडबुड करायची!"
शालिनीताईंना वाईट वाटायचं, पण त्या कधीच उलट बोलल्या नाहीत. रात्री एकट्या बसून विचार करायच्या ... "पोरगी घाबरलेली आहे, कुणीतरी भीती भरवली आहे तिच्या मनात. वेळ येईल तेव्हा कळेल तिला."
शालिनीताईंना वाईट वाटायचं, पण त्या कधीच उलट बोलल्या नाहीत. रात्री एकट्या बसून विचार करायच्या ... "पोरगी घाबरलेली आहे, कुणीतरी भीती भरवली आहे तिच्या मनात. वेळ येईल तेव्हा कळेल तिला."
घरातल्यांनी तक्रार केली तरी त्या शांतपणे म्हणायच्या, "जाऊ द्या, नवीन आहे इथे, समजून घेईल हळूहळू." गैरसमज कमी होण्याऐवजी अधिकच घट्ट होत गेला. कविताला वाटायचं, हे प्रेम फक्त नाटक आहे, खरा चेहरा कधीतरी नक्की समोर येईल....आणि एक दिवस...
