मेहनत एकाची.... मजा दुसऱ्याची (अंतिम भाग)
चुरचुर बोलत आहे हे ऐकून सोनाची बहीण शांतपणे पण ठामपणे म्हणाली,
"जर कामावर हक्क तिच्यापेक्षा जास्त मी दाखवलेला आहे, तर देण्याकरण्यावरही हक्क हवा.... फक्त हक्क सांगायला 'सख्खं' असायला हवं, पण काम करून घ्यायला मात्र सगळेच चालतात, हे कसं?"
सासूबाईंचा पारा चढला. त्या सुनेकडे वळून बडबडू लागल्या "बघ ग, ही कशी उलट उत्तरं देतीये.... हिला काही वाटते का नाही... एवढ आहे तर कशाला यायचं कामाला आणि दिलेय की तुला सुद्धा साडी" पण सोनाची बहीण डगमगली नाही....तिने आपली बाजू पूर्ण ठामपणे मांडली.
शेवटी सोना मध्ये पडली....बहिणीचा हात धरून ती कुजबुजली, "जेव्हा माझ्याजवळ पैसे असतील, तेव्हा मी तुला स्वतः घेऊन देईन. पण प्लीज, आता हे थांबव. नाहीतर माझी इथे नाचक्की होईल....उगाच वाद वाढेल"
हे ऐकून बहिणीचा स्वर आणखी शांत, पण अधिक टोचणारा झाला....निघता निघता ती म्हणाली,
हे ऐकून बहिणीचा स्वर आणखी शांत, पण अधिक टोचणारा झाला....निघता निघता ती म्हणाली,
"ठीक आहे.... यापुढे जर तुमची सगळ्यांना समान ठेवायचं असेल, तेव्हाच मला बोलवा... नाहीतर ज्या नणंदेला तुम्ही एवढं महागाचं देता, तिलाच पुढच्या वेळी कामाला बोलवा. मला नको... मी तिच्याइतकी अपेक्षा नाही करत, पण निदान थोडं तरी समान वागणं अपेक्षित आहे... कारण मीही सासरी जाताना रिकाम्या हाताने जाते आणि तिथेही मला जाब विचारणारी सासू आहेच अगदी तुमच्यासारखी."
एवढं बोलून ती निघून गेली. सोनाला वाटलं, आता बहीण रागावून कायमची दुरावणार....पण दुपारी सोनाचाच फोन वाजला....पलीकडून बहिणीचा आवाज होता ...
एवढं बोलून ती निघून गेली. सोनाला वाटलं, आता बहीण रागावून कायमची दुरावणार....पण दुपारी सोनाचाच फोन वाजला....पलीकडून बहिणीचा आवाज होता ...
"हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं....दरवेळी तू आपल्या माहेरच्यांना बोलावून, चांगल्या पद्धतीने सगळं देतेस करतेस, पण स्वतःसाठी मात्र तुला तुझा हक्क कधीच मागता येत नाही. ही लढाई माझ्या हक्कासाठी नव्हतीच सोना, ही लढाई तुझ्या हक्कासाठी होती की तूही तुझा हक्क मागून घेऊ शकतेस.... दिवसभर तू काम केलेस तुला त्यांनी साध जेवलीस का? हे सुद्धा विचारले नाही... तू तिथे रिकामी बसून खात नाहीस, उलट दुप्पट काम करतेस, तरीही तुला दुय्यम वागणूक मिळते हे चुकीचं आहे. स्वतःसाठी उभं राहायला शिक.... मी येईन किंवा नाही, त्याने फरक पडत नाही पण तू फक्त कष्टासाठीच वापरली जाऊ नयेस, इतकंच माझं म्हणणं आहे."
फोन कट झाला. सोना बराच वेळ स्तब्ध उभी राहिली ...
फोन कट झाला. सोना बराच वेळ स्तब्ध उभी राहिली ...
सामानाची आवरा आवर करायला गेलेला सोनाचा नवरा वापस आला तशी सासू त्याला झालं ते सगळ सांगू लागली आणि बडबड करू लागली...तेव्हा तो शांतपणे म्हणाला ,"आई काय चुकीच बोलली ती? खरं तेच बोलली..ती तिच्या बहिणीच्या मदतीला येते आणि आज म्हणून नाही तर नेहमीच येते तिला इथे येऊन सुद्धा ही अशी वागणूक दिसली तर कधी ना कधी बोलणारच ती"
त्यावर सासू म्हणते," आला मोठा बायकोच्या बहिणीचा भाग घेणारा, ती सुनेची बहीण आहे माझी मुलगी नाही...की तिला एवढा मान पाहिजे"
"आई ती एवढी हावरी नाही आहे...तिच्या सासरी आपल्या पेक्षा सगळच चांगलं आहे...पण स्वतःचा स्वाभिमान असतोच ना...तिने बऱ्याच वेळा बघितलं आणि एकदा बोलली...
मला तू एक सांग तुझ्या पूजा करण्याचा काय फायदा जर तुझ्यात सगळ्याविषयी दुजेभाव असेल तर"
मला तू एक सांग तुझ्या पूजा करण्याचा काय फायदा जर तुझ्यात सगळ्याविषयी दुजेभाव असेल तर"
मुलाचे हे शब्द ऐकून सासू एकदम चूप झाली...तेवढ्यात सोना पुढे येऊन बोलली..." सासूबाई तुम्हाला आता माझ्या माहेरच्यांना आणि बहिणीला काहीच मानपान देण्याची गरज नाही पडणार कारण आता त्या ताई सारख्याच वेळेवर येणार आणि जाणार...राहिली गोष्ट कामांची तर आज मी इथेच स्पष्ट सांगते..मला जमेल तेवढं मी करेल आणि बाकीच्या कामासाठी तुम्ही दुसरे लोकं बघा "
सुनेचे बोलणे ऐकून सासू एकदम चाचपून गेली...काय बोलाव तिला कळेना...पण तिच्या एवढ मात्र नक्की लक्षात आले होते की....तिची दुय्यम वागणूक तिच्या वाटेला आली होती....
समाप्त
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
