आभा, गोंधळली नाही..... निर्णय उचित घेत आहे मी.... त्यासाठी मला आई वडिलांच्या विचारांची आणि हिंमतीची पातळी वाढवावी लागेल..... बाबा समजून घेणार नाहीत.... काही दिवस माझ्याशी बोलणे ही टाकतील.... म्हणतील तू काय मोठी लागून गेलीस का.... आता तुझे निर्णय आम्ही मान्य करायचे काय.... घरातले मोठे मेलेत का.... तुला हा निर्णय संगण्याआधी जरा ही लाज वाटली नाही का..... अग ह्या वयात बापाला धक्का देशील का.... बाई तू शिकली आहेस मान्य आहे.... पण जगाचे ज्ञान तुला काडीचे ही नाही.... तू निव्वळ मूर्खपणाचा निर्णय घेत आहेस..... तू फसणार असे काही एक करू नकोस.... कृपा कर जरा सद्सद्विवेक बुद्दीचा वापर कर.... इतका practical पणा, म्हणजे नुसता उतावीळ पणा आहे बाकी मला ह्यात कोणत्याच प्रकारचे शहाणपण जाणवत नाही....... तो तुझा स्थळ बघणार काका तो तर माझ्या नजरेत मूर्ख ठरलाच आहे..... त्यासोबत तू ही बिनडोक वाटत आहे मला...... बाबा आता नको नको म्हणता खूप चिडले होते..... त्यांना कही केल्या आभा ऐकत नव्हती....
तिला ही काय सुचले की ह्या स्थळासाठी ती अधिकच positively विचार करू लागली होती.. आईने ही तिच्या परीने तिच्या ह्या मोठ्या परीला समजावण्याचा प्रयत्न केला.... तिला आभाने समजवले आणि ती गुपचूप तिचे म्हणणे तिने आईच्या गळी उतरवले..... आणि आई परत बाहेर आली आपल्या डोक्यावर हात मारून..... आता ही कार्टी आपला जीव घ्यायला टपली आहे..... सरळ सरळ.... आई वडिलांचा विचार ही करत नाही....ना त्यांचा विचार लक्षात येत.... ना त्यांना काही बोलू द्यावे वाटत..... आभा रूम मध्ये दार लावून बसली होती.... तिला शांतता हवी आहे.... त्यात जर मी कुठे ह्या निर्णयापर्यंत पोहचले की मला हाच नवरा म्हणून सूट होईल तर मी तुमचे म्हणणे नाही ऐकणार..... दुसरे म्हणजे जर तो नाही आवडला तर मी तुमच्या विचारासोबत जाईल... तर कृपया थोडा विश्वास माझ्या वर ही ठेवा..... वाढत चाललेली ही धुसमुस आता काय अंत दाखवेल कळत नव्हते.......
आभा विचार करत होती.... असे स्थळ खरंच का एक ही chance द्यावा असे नसतात, बायको मेली म्हणजे तिच्या मरण्यामागे ह्याचा हात असावा... त्यात त्याची बर काय चूक असावी.... मग काय परत कोणी माझ्यासारखी मुलीने त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून नको का पत्करायला.... खर असे ज्यांच्या बायका मरण पावला आहेत त्यांनी कोणा चांगल्या, शिक्षत मुली ची परत अपेक्षा नको करायला... त्यांनी अश्या या मुली ची स्वप्न नको का बघायला.... आणि काय इतके बिघडले की मी त्याला पसंती देते.... आता युग नवे आहे फक्त म्हणायचे आणि खुळपट विचाराने वागायचे... अरे ह्याला काय अर्थ आहे... मी शिकलेली आहे... मी जग नाही अनुभवले... मी ना समज आहे... मी बिनडोक आहे.... पण बाबा तुम्ही हे विसरत आहेत की मी practically सारासार विचारच करत आहे.... मी जग नौकरीच्या निमित्ताने थोडे का असेना पाहिले आणि अनुभवले आहे ...ती माणसे... त्यांची नजर.... तो त्यांच्या वागण्यातला रोख..... काही तर अशी पाहिली आहे की जे घराच्या बायकोशी ही प्रामाणिक आणि ऑफिस वालीशी ही प्रामाणिक.... एका वेळी दोन दोन डगरीवर हात फेरणारे...... बायकोशी बोलत असताना... assistent च्या कमरेत हात घालून बायकोला ...kiss देणारे.. एकाच वेळी दोघीना ही I love you darling म्हणणारे... मला जग चांगलेच कळते.... पारख तर मी करू शकते.... माणसे ही ओळखू शकते..... रहाता राहिला प्रश्न त्याला बघण्याचा आणि
पोरीला हुशार हुशार समजत होतो, तिने तर नाचक्की करायचे ठरवले आहे....खुद परख करण्याचा तो तर मी करणारच आहे....इकडे बाबा आई hall मध्ये... सगळे संपले असे चेहरे करून बसले होते... त्यांना तिच्या सोबत ही जायचे नव्हते आणि तिच्या निर्णयाला कुठे दुजोरा ही करण्याची तिने जागा सोडली नव्हती.... जाऊन आता विचारतोस मी तिला ठणकावून... तुला खरंच हे असले स्थळ योग्य वाटत असेल तर मी तुझ्या निर्णयाला साथ देईल पण पुढे जे काही परिणाम होतील त्याला मी सोबत करणार नाही.... तू मोठी झालीस... तू तुझे so called decision घेऊ शकतेस तर घे.... पण एक लक्षात ठेव आई वडील आपल्या मुलीच्या चांगळ्याचाच विचार करत असतात... ते जर म्हतारे झाले असतील तरी.... ते तुझ्या पेक्षा मोठेच आहेत... त्यांनी चार पावसाळे जास्तच बिघीतले आणि अनुभवले आहेत...
तू तुझ्या निर्णया सोबत जा.... इतके म्हणायला तिच्या खोलीत जाणार इतक्यात तीच दार उघडून बाहेर येते..... ओढणी चे टोक गोल गोल फिरवत.... काही confussed वाटते बाबाला.. त्यांना वाटते की तिने आपल्या बाजूने विचारपूर्वक निर्णय घेतला असेल... पण ती लगेच काही म्हणण्या आधी बाबा म्हणतात, तू आजच्या आज वसंत्याला फोन लाव.... मीच बोलतो त्याच्याशी...
ह्या वसांत्याने ह्या पोरीला भरीस घातले आहे.... आता होऊन जाऊदे त्याच्या ही मनाचे आणि हिच्या ही मनाचे..... आई तिकडून बाबांच्या खांद्यावरून शांत राहण्यासाठी हात फिरवत असते..... तुम्हाला bp आहे..... sugar आत्ताच normal आली आहे.... तिला आपल्या बाबाला त्रास व्हावा म्हणुन ती मुद्दाम असे वागत नाही...तिने खप सारासार विचार केला आहे... प्रत्येक वेळी तिने घेतलेले निर्णय हे तुमच्या त्या लहान चिमणीने घेतले असे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा जास्त वेगळे विचार येतात आणि मग ती चुक वाटू लागते.... आता असा विचार करू....दृष्टी अशी ठेवू की समोर एक 35 वर्षाची बाई आहे...आणि ह्या 10 वर्षात खूप जग बघितले आणि अनुभवले आहे.... आणि त्या अनुभवाची आता खरी परीक्षा आहे....
आणि ह्या परीक्षेत तिला आपली साथ फक्त coffee करून देण्याइतकी असावी असे वाटते..... जेव्हा तिला झोप लागायची तेव्हा तुम्ही म्हणायचे तिच्या सोबत जगू नकोस.... फक्त तिला कुठे तरी वाटू दे की आपण तिच्या सोबत आहो... आणि असे अंतर ठेवून रहा.....वाटले तर मधून मधून तिला विचारून coffee करून दे ....म्हणजे ती तल्लक राहील.... गळून पडणार नाही...
------------------/---------//--//////--------------/-/-/----------------
पुढच्या भागात काय होते.... कोण असेल तो ज्याच्यासाठी आभा आई वडिलांचा ही विरोध सहन करते ते नक्कीच पाहू...
आभाने हा निर्णय का घेतला असेल.... ते पाहू
क्रमशः......
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
