त्याला असं घाबरलेले पाहून डॉक्टर नील ने त्याला पाणी द्यायला सांगितले. त्याचा चेहरा पाहून नील ला काही तरी संशय वाटला.
पेशंटचा थरथरता हात डॉक्टरनेच्या हाताला स्पर्श झाला. त्याच वेळी पेशंटने निलचा हात घट्ट पकडला.
तो पेशंट बोलू लागला, "डॉक्टर तुम्हाला समजत नाही, ती जिवंत नाही. कोणी चालती फिरती नाही. ती तर......"
डॉक्टर नील गंभीर पणे पाहत म्हणाले, "जिवंत व्यक्ती नाही, तर मग कोण आहे ती? का असे थांबला तुम्ही? सांगा तुम्ही काय पाहिलं ?"
वार्डमध्ये सर्वत्र शांतता पसरली होती. सर्व त्या पेशंटकडे स्तब्ध होऊन गंभीरपणे पाहत होते.
डॉ. नील, "शांतपणे सर्व हकीकत आम्हाला सांगा."
त्या माणसाने थापा टाकत बोलायला सुरुवात केली,
"मी नेहमीप्रमाणे कामावरून गाडी सोडून घरी परत जात होतो. पण त्या जुन्या पुलावर मला असे वाटले माझ्या मागे कोणीतरी आहे, जो माझा पाठलाग करत असल्याचा मला सारखं जाणवत होते. म्हणून मी मागे फिरून पाहिलं पण मला कोणी दिसले नाही कदाचित जास्त काम झाल्यामुळे असा भास होत असेल, असे समजून मी परत पुढे चालायला लागलो. पण काही क्षणात माझ्यामागे तोच पावलांचा आवाज जोरात आणि स्पष्ट मला ऐकू आला. म्हणून मी घाबरलो आणि मागे फिरून पाहिलं तर याही वेळेस मला कोणी दिसले नाही. पण आवाज कशाचा आहे हे माझ्या मनात भीती निर्माण करून गेले मी माझ्या चालण्याचा वेग वाढविला, चालण्यापेक्षा मी पळायला लागलो. आणि अचानक माझ्यासमोर एका लाईटाखाली मला कोणीतरी रोडच्या बाजूला दिसले. मी आवाज दिला कोण आहे तिकडे? पण कोणीही मला प्रतिसाद दिला नाही. म्हणून मी थोडं समोर जाऊन काय आहे? कोण आहे? ते पाहायला गेलो. तर ते पाहून माझ्या अंगाची लाही लाही झाली आणि माझ्या तोंडातून अनपेक्षित पणे किंचाळी निघाली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो.
डॉक्टर नील "असे काय पाहिले तुम्ही की त्यामुळे बेशुद्ध पडले पुढे काय झाले ते सांगा."
- त्या माणसाने परत बोलायला सुरुवात केली, "मी हळूहळू त्या दिशेने जाऊन लागलो आणि तिथे कोण आहे म्हणून आवाज देऊ लागलो. पण मला कोणीही प्रतिसाद दिला नाही म्हणून मी आणखी जवळ गेलो तर तिथे एक स्त्रीच्या शरीरयष्टीची आकृती उभी दिसली. ही आकृती पूर्ण सावली सारखी होती. जणू धुराने स्त्रीचा आकार घेतलेला असावा. तिचा चेहरा दिसत नव्हता. पण डोळे मात्र लाल रंगाचे दिसत होते."
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
