मागील भागात आपण पाहिलं की, रिया आदित्य ला वेगळे राहण्यासाठी फोर्स करते....आता पाहूया पुढे......
बिचारा आदित्य ह्या सगळ्या प्रकाराला आणि रोजच्या भांडणाला तसेच मुख्यता आपल्या आई च्या होणाऱ्या अपमानाला कंटाळला होता...... त्यामुळे त्याने जास्त विचार न करता त्वरित तिला होकार भरला.....
आणि त्या रात्री तो न जेवता तसाच झोपी गेला ...सकाळी लवकर उठून तो घराबाहेर पडला आणि काही तासांनी तो घरी परतला.......इकडे रिया ने आपल्या बॅग भरून ठेवल्या होत्या .
आदित्य आपल्या आई जवळ गेला आणि मान खाली घालून म्हणाला......
" आई आम्ही वेगळं घर भाड्याने घेतलं आहे ...मी व रिया आता पासून तिथेच राहू. "
ते ऐकून विद्या ताईंना ना धक्काच बसला पण त्याची जाणीव त्यांना होती कि कधी ना कधी हे होणारच होत तेव्हा स्वतःला सावरून त्या एवढंच म्हणाल्या.....,
" ठीक आहे ...बाबाना येऊ दे ..त्यांना भेटून जा ..."
श्रीधर राव जॉब वरून अजून परतले नव्हते म्हणून विद्या त्यांना म्हणाली....,
" नको आई , आता कुणालाच मी भेटत नाही ...काही पराक्रम करत नाही आहे मी ...रोजच्या या काळाला पेक्स वेगळं राहू ..त्यामुळे निदान तुम्ही दोघे आणि कदाचित आम्ही दोघे हि सुखाने राहू शकू "
आदित्य आधीच वैताकलेला होता तो त्याच स्वरात म्हणाला.....,
" ठीक आहे ..मी अडवणार नाही तुला ...तास हि तू क्काही आता लहान नाहीस , तुला जे योग्य वाटेल ते कर ...तुझं चांगलं वाईट तुला कळते..... पण तुला घरातलं काही सामान हवं असेल तर तेही न घाबरता घेऊन जा ..कारण हे सगळं तुम्हा दोघांचच आहे ..."
आपले अश्रू लपवत विद्या आपल्या रूम मध्ये जाऊन बसल्या . .... आणि ते ऐकून त्याचे डोळे आणि मन दोन्ही भरून आलं होते......पण आता त्याने निर्णय घेतला होता.... आणि त्यातच कदाचित सगळ्यांचे भले होते....
थोड्या वेळाने आदित्य एक छोटा ट्रक घेऊन आला ..त्याच्यासोबत दोन मजूर देखील होते ...... रिया ने पॅक केलेले सगळे सामान मजुरांनी ट्रक मध्ये ठेवलं आणि त्याच ट्रक मध्ये बसून दोघे हि नवरा बायको निघून गेले ...
त्यांना जाताना बघण्याचं धाडस काही विद्या ताईंना झालं नाही.....ती डोळे पुसत त्या बेड वरच बसून राहिली ...ट्रक च्या आवाजाने ती भानावर आली आणि हंबरडा फोडून रडू लागली ...त्यांनतर किती तरी वेळ ती तिथेच बसून होती......जेव्हा श्रीधर राव आले तेव्हा कुठे ती भानावर आली ...रडत रडत तिने ती बातमी आपल्या नवऱ्याला सांगितली ..त्यांना हि वाईट वाटलेच पण एक प्रकारे आता रोजची भांडणे होणार नाहीत ह्यावर त्यांनी समाधान मानले आणि विद्याला हि समजावले ,.पण ,.त्या रात्री ते दोघे न जेवताच झोपी गेले ...
*********************************
दिवाळी झाल्या झाल्या चं रिया आणि आदित्य ने घर सोडलं होत ..त्यालाही आत एक वर्ष उलटून गेलं होत ..
दिवाळीचा सन आला होता पण विद्या ताईंना कशातच आनंद वाटतं नव्हता ...आजूबाजूच्या घरात दिवाळीचे फराळ बनवले जात होते पण दिवाळी असून सुद्धा विद्या आणि श्रीधर राव उदास दुःखी होते ...त्यांनी काही बनवलं नव्हतं ....फक्त काही पणत्या लावल्या होत्या ......आदित्य आणि रिया घर सोडून गेल्यापासून त्यांनी जास्त कॉन्टॅक्ट ठेवलाच नव्हता ....एरवी त्या दोघांना काही वाटायचं नाही पण एखादा सन आला कि सगळं आठवून मन उदास व्हायचं दोघांचं ... अदिती सुद्धा बाहेर देशात असल्यामुळे तीच सुद्धा येणे व्हायचं नाही ....त्यांचे सन जसे यायचे आणि तसेच निघून सुद्धा जायचे ...हा हा म्हणता म्हणता दिवाळी आली तशी संपून गेली सुद्धा ....
श्रीधर राव त्यांच्या कामाला गेले असताना विद्या ताई सुद्धा मुलांना शिकायला गेल्या आणि तिकडून परत येत असताना बाजारात गेल्या तेव्हा त्यांना एक बाई भेटल्या . ज्या त्यांना ओळखत होत्या पण विद्या त्यांना ओळखत नव्हती ..ती बाई त्यांना म्हणाली ,
" अहो ताई ..., तुम्ही आदित्य च्या आई ना ?"
त्यावर तिने फक्त मन डोलावली आणि म्हणाली ...,
" हो , पण तुम्हाला कस माहित ? म्हणजे मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून ...आमच्या आदित्य ला ओळखता का तूम्ही ?"
" हो खर तर आदित्य ने तुमचा फोटो दाखवला होता एकदा...... तुम्हांला बघताच क्षणी लक्षात आलं...
.....आदित्य आणि रिया आमचे शेजारी आहेत....आज अचानक रिया ची तब्येत बिघडली म्हणून त्यांचे घरमालक तिला आई ह्या मॅटर्निटी होम मध्ये घेऊन गेलेत .तिचे दिवस भरलेत ना...... आणि ..तिच्या जवळ कुणीही नाही कारण आदित्य परदेशात गेला आहे.... "
त्या बाई म्हणाल्या....
" खर सांगत आहेत तुम्ही "
विद्या ने विचारलं.....
विद्या ला आपण आजी होणार हे कळताच खूप आनंद झाला ..एका शब्दने त्यांना कळवलं नाही हि गोष्ट सुद्धा तिच्या डोक्यात आली नाही......ती बाई हो म्हणून उत्तरली....
तशी लगेचच विद्या घरी आली आणि भराभरा तिने एका पिशवीत काही अत्यावश्यक वस्तू आणि एक मऊशार लुगडे भरले ...तसेच आपल्या पर्स मध्ये आणि कपाटात होते नव्हते तेवढे सगळे पैसे जमा करून एकत्र ठेवले ..आपल्या घराला लॉक केलं ....आणि रिक्षाने ती तडक त्या हॉस्पिटल ला गेली ...काही वेळातच ती त्या हॉस्पिटल मध्ये पोहचली ..reception वर तिने रिया ची चौकशी केली......तेव्हा रियाला सीझर करण्यासाठी नेण्यात आलं आहे हे तिला समजलं तशी ती पटकन ऑपेरेशन थिएटर कडे वळली ....
तिथे ऑपेरेशन थिएटर मध्ये असताना तिच्या सोबत कोण आहे हे पाहण्यासाठी एका नर्स ला बाहेर पाठविण्यात आलं तस ती बाहेर येऊन म्हणाली.....,
" रिया सोबत कोण आलं आहे ? ऑपेरेशन करण्याच्या आधी एका फॉर्म वर सही लागेल संमती म्हणून आणि काही अमाऊंट देखील भरावी लागेल ..तेव्हा तुम्हाला डॉक्टर बोलावीत आहेत.... "
काय करेल विद्या ते ऐकून? होईल का ती पुढे......?
क्रमश
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
