मागील भागात आपण पाहिलं की, रिया च आणि आदित्य च्या आईच अजिबात पटत नव्हतं.... आता पाहूया पुढे......,
प्रथम रिया ने आदित्य जवळ त्याचा सगळाच पगार तिच्या हाती द्यावा म्हणून मागणी केली . त्यावर त्याने तिला नकार दिला ...आणि तो देत नाही ते पाहून आई च्या सांगण्या वरून तिने मुद्दाम भांडण उकरून काढायला सुरुवात केली . विद्या ने साधीशी गोष्ट म्हटली तरी ती मुद्दाम तिच्या विरोधात जात असे . त्यावरून ती सतत वाद घालायची आणि बोल बोल बोलत राहायची ....ऐकून घ्यायचं नाही अशीच शिकवण होती तिच्या आई ची ...बिचारी विद्या शांत आणि सोशीक स्वभावाची होती पण रिया च घाणेरड्या सारखं राहणे तिला पटत नव्हतं आणि सहन देखील व्हायचं नाही .
सकाळी उशिरा उठणे , खाणार तिथेच कचरा टाकणे , केस विंचरत मुद्दाम किचन मध्ये जाणे , दुसऱ्याचं जाऊदे पण स्वतःचे कपडे देखील ती दोन - तीन दिवस धुवत नसे , स्वयंपाक घरात काडीची मदत न करणे ..फ्रिज मधून सडे पर्यंत भाज्या काढत नसायची........आपल्या मुली सारखी म्हणून विद्या ताई तिला समजवायला जात तेही अगदी प्रेमाने परंतू रिया त्याचा पराचा कावळा करायची ...उगाच वाद घालायची ..आणि रुसून फुगून राहायची ...संध्याकाळी घरी आल्यावर आदित्य ला अगदी नकोसे व्हायचं ...तो सुद्धा कंटाळला होता ह्या सगळ्याला.......घरातील पूर्वीची शांताता, आनंद आता काही दिसत नव्हता जणू तो त्यांच्या घरातून पळून होता .
दुसरं म्हणजे आपली आवड म्हणून विद्या बाजूच्याच झोपडपट्टी मधल्या मुलांना मदत म्हणून शिकवायला जायची ...खरं तर आधी ती घरातच त्यांची शिकवणी घायची पण त्याचा सुद्धा रिया ला त्रास व्हायला लागला म्हणून त्या तिकडेच जाऊन शिकवू लागल्या तर आता त्या वरूनही तिची कटकट चालू झाली होती .
काय गरज आहे त्या घाणेरड्या वस्ती मध्ये जायची ..उगाचच जायचं ...असं ती बोलत राहत असे ....श्रीधर रावांचा आपल्या पत्नीवर अत्यन्त प्रेम होत...... तिचा शोषिक स्वभाव ते जाणून होते ...रिया कडून आपल्या पत्नीचा होणारा अपमान त्यांना आवडत नसे ..पण ते आपल्याच भांडखोर सुनेला काय समजवणार म्हणून ते विद्यालाच म्हणत,
"तू तिच्या तोंडाला लागू नकोस.... जेवढं दुर्लक्ष करता येईल कर....."
आपल्या नोकरीतून निवृत्त असून देखील त्यांनी घरातल्या वादापासून दूर राहावे म्हणून वाचमेन ची नोकरी स्वीकारली होती .
आदित्य ची देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती तो तर बिचारा कैचीत अडकला होता ...पूर्ण sandwitch झालं होत त्याच ...बायकोला तो काही बोलू शकत नव्हता आणि बायको कडून आईचा सतत होणारा देखील त्याला सहन होत नव्हता . त्यात रिया त्याला सतत त्रास द्यायची , त्याच्या कानाशी सतत भुणभुण करायची.......... तिने एकच पाळपुद लावल होत त्याच्या मागे......, एकतर वेगळे हो नाहीतर मला माहेरी सोडून ये ...रोजच्या ह्या कटकटीने तो देखील खूपच त्रस्त झाला होता .....
आज संध्याकाळच्या त्या ओल्या कपड्यावरून तर रामायण घडले होते ...रियाने ते कपडे कसे तरी धुवून आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेतले होते . रडून रडून आपले सुजलेले डोळे , विस्कलेटले केस अशा अवतारात तिला बघून संध्याकाळी ऑफिस मधून घरी परतलेल्या आदित्यने तिला विचारलं,
" अशी काय बसलीय आहेस रिया ? पुन्हा आईशी भांडण झालं का ? रडलेली वाटतेस.... "
एव्हाना घरात सुद्धा सगळ्यांना सवय झाली होती
" नाही तर काय तुझी आई माझ्याशी प्रेमाने कधी बोलली आहे का ? त्यांना सतत माझ्या चुका दाखवून द्यायच्या असतात..... "
चिडून रिया ने त्याला म्हंटल ..त्यावर आदित्यने तिला
" रिया.......आता काय झालं.....सांगशील का मला?.. "
म्हणून विचारलं.....
तस तिने तो संध्याकाळचा प्रसंग तिखटमीठ लावत आदित्य ला सांगितलं....
आणि सांगून झाल्यावर त्याला धमकी देखील दिली ..
"आदित्य मला या घरात राहायचं नाही ...तू काय तो निर्णय घे नाहीतर मी चालली माझ्या आई कडे आताच्या आता..... त्या बघ मी बॅग पण भरून ठेवल्या आहेत....."
तिने त्या बॅग कडे बोट दाखवत म्हटल.....
त्यावर आदित्य ला खूपच टेन्शन आलं...... काय कराव हेच त्याला समजत नव्हतं.....
