मुखवटा श्रीमंतीचा!
भाग १
" अगं बाई गं केतकी! हा गळ्यातला हार नवीन घेतलाय की काय? हिरे तर असे चमकतायत की लांबूनच डोळे दिपावेत!
मागच्याच महिन्यात तर सोन्याची ती घसघशीत बांगडी दाखवली होतीस, आता हा हिऱ्यांचा हार... काय तुमचे ते भाग्यवान माहेर आणि काय ती श्रीमंती!"
मागच्याच महिन्यात तर सोन्याची ती घसघशीत बांगडी दाखवली होतीस, आता हा हिऱ्यांचा हार... काय तुमचे ते भाग्यवान माहेर आणि काय ती श्रीमंती!"
पाटलांच्या घरच्या कौटुंबिक गेट-टुगेदरमध्ये केतकीने पाऊल ठेवताच नेहमीप्रमाणे तिच्या चुलत काकूंनी तिच्याभोवती कोंडाळं केलं. केतकीने अत्यंत गर्वाने तिच्या गळ्यातल्या नक्षीदार हिऱ्यांच्या हाराला हात लावला. तिच्या कपाळावरचा तोरा आणि चेहऱ्यावरचा अभिमान लपून राहत नव्हता.
ती सोफ्यावर अत्यंत रुबाबात बसत म्हणाली,
" काकू, माझ्या माहेरी पैशाची कधीच कमी नव्हती आणि लग्नानंतरही मी माझ्या राहणीमानात तडजोड करू शकत नाही. माणसानं समाजात वावरताना आपली पत दाखवून दिली पाहिजे. आजकालच्या जगात तुम्ही किती महागडे कपडे घालता आणि कसे दागिने मिरवता, यावरूनच लोक तुम्हाला मान देतात. स्टेटस समजून येतं ना !
जर आपणच साधं राहिलो, तर दुनिया आपल्याला बिचाऱ्या नजरेनं बघते."
जर आपणच साधं राहिलो, तर दुनिया आपल्याला बिचाऱ्या नजरेनं बघते."
केतकी बोलत असतानाच तिची नणंद मानसी एका साध्या, पण अत्यंत सुबक नक्षीदार साडीत हॉलमध्ये आली. तिच्या गळ्यात एक लांब सोन्याच मंगळसूत्र आणि हातात दोनच बांगड्या दुसऱ्या हातात घड्याळ. तसं बघायला गेलं तर मानसीचे सासर आणि माहेर दोन्ही अत्यंत गर्भश्रीमंत होते. पण तिचा स्वभाव अत्यंत साधा, सुसंस्कृत आणि जमिनीवर असलेला होता. मानसीला पाहून केतकीने नेहमीप्रमाणे नाक मुरडलं.
"मानसीताई, मी तर नेहमी विचार करते, देवाने तुम्हाला एवढं भरभरून दिलंय, पण तुम्ही नेहमी अशा साध्या राहता ? कधीतरी आमच्यासारखा थाटमाट करत जा, लोक तुम्हाला पाटलांची मुलगी म्हणून मान तरी देतील," केतकीने उपहासाने म्हटले.
मानसीने फक्त एक गोड हसू दिले. आपल्या सोज्वळ स्वरात शांतपणे म्हणाली,
"केतकी वहिनी, माणसाला त्याच्या स्थानावरून आणि पैशावरून समाजात तात्पुरता मान नक्कीच मिळतो, पण त्याची खरी इज्जत तर त्याचं चारित्र्य आणि संस्कार बघूनच मिळते. दागिने आणि कपडे भाड्यानेही आणता येतात, पण चांगलं चारित्र्य बाजारात विकत मिळत नाही."
"केतकी वहिनी, माणसाला त्याच्या स्थानावरून आणि पैशावरून समाजात तात्पुरता मान नक्कीच मिळतो, पण त्याची खरी इज्जत तर त्याचं चारित्र्य आणि संस्कार बघूनच मिळते. दागिने आणि कपडे भाड्यानेही आणता येतात, पण चांगलं चारित्र्य बाजारात विकत मिळत नाही."
केतकीने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तिला वाटत होते की मानसी फक्त तिच्या साधेपणाचे समर्थन करण्यासाठी हे तत्वज्ञान सांगत आहे. केतकीच्या मते, पैसा आणि त्याचा दिखावा हेच जगाचे अंतिम सत्य होते.
पण नियतीला केतकीचा हा अहंकार मान्य नव्हता. कदाचित एक महत्त्वाची गोष्ट केतकी विसरली होती, काळ कधी कधी बदलतो, हे मोठ्या मोठ्या श्रीमंतांनाही समजत नाही.
पण नियतीला केतकीचा हा अहंकार मान्य नव्हता. कदाचित एक महत्त्वाची गोष्ट केतकी विसरली होती, काळ कधी कधी बदलतो, हे मोठ्या मोठ्या श्रीमंतांनाही समजत नाही.
काही महिन्यांनी अचानक देशात आणि जागतिक बाजारात मोठी आर्थिक मंदी आली. या मंदीचा फटका केतकीच्या माहेरालाही बसला. तिच्या भावाचा जो इम्पोर्ट-एक्सपोर्टचा खूप मोठा बिझनेस होता, तो आर्थिक मंदीच्या कचाट्यात पुरता अडकला. एका मोठ्या करारात बरेच मोठे नुकसान झाले, बँकांची कर्जे वाढली. केतकीच्या भावावर दिवाळखोरीची वेळ आली.
ही बातमी वाऱ्यासारखी नातेवाईकांमध्ये आणि समाजात पसरली होती. मग सुरू झाला माणसांच्या बदलत्या स्वभावाचा विदारक खेळ. जे नातेवाईक कालपर्यंत केतकीच्या माहेरच्या पैशामुळे तिच्याभोवती घुटमळायचे, तिची स्तुती करायचे, त्यांनीच आता तिच्याकडे बघून नाकं मुरडायला सुरुवात केली.
काही महिन्यांनी,पाटलांच्याच घरी पुन्हा एकदा एका कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केतकीची इच्छा नव्हती, पण तिला सुनेच कर्तव्य पार पाडण्यासाठी तिथे जावे लागले. आज तिच्या अंगावर ना ते हिऱ्यांचे हार होते, ना तिच्या चेहऱ्यावर तो पूर्वीचा तोरा. ती एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती. पण समाज समजायला इतका सोपा कुठं असतो ? तो पडलेल्या माणसाला आणखी पायदळी तुडवण्याची फक्त एक संधी शोधत असतो.
त्याच काकू, ज्या कधीकाळी केतकीची स्तुती करायच्या, तिच्याजवळ बसायला आल्या. त्यांनी तिला खोचकपणे विचारलं,
" काय केतकी? आज खूप साध्या साडीत आलीस? आणि गळ्यातही काही विशेष दिसत नाहीये ? आम्ही ऐकलं की तुझ्या भावाचा बिझनेस पूर्ण बुडालाय, कोट्यवधींचं कर्ज झालंय म्हणे माहेरी ? कालपर्यंत तर खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारायचीस, आता काय झालं?"
त्या काकूंचे ते शब्द ऐकून हॉलमधील इतर महिलाही कुत्सितपणे हसू लागल्या. काही जणी कुजबुजू लागल्या,
" जाऊ दे गं बाई, माहेरच्या पैशावर खूप उड्या मारायची. आता कळाली असेल लायकी."
केतकीच्या काळजात काहीतरी टोचल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिची मान अपमानाने खाली गेली. तिचा माहेरच्या श्रीमंतीचा तोरा पूर्णपणे ढासळला होता. तिला समजले होते की ज्या पैशाच्या जोरावर तिने स्वतःचे स्थान निर्माण केले होते, तो पैसा जाताच तिचा तो मान एका सेकंदात राख झाला होता. ती तिथे अत्यंत असहाय्य होऊन उभी होती, आणि अशावेळी कोणीही तिच्या मदतीला पुढे येत नव्हते...
