कॅटेगरी - जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय - खरा गुन्हेगार
या घटनेला जवळपासं महिना उलटला. निधी आणि मयंक आता बऱ्यापैकी सावरले होते पण सारंगच्या अशा गायब होण्याने त्यांच्यापुढे फार मोठ संकट उभं ठाकलं होतं.
एकीकडे त्याच्या आगामी लिखित वेब सीरिज चा ट्रेलर तुफान वेगाने व्हायरल झाला होता तर दुसरीकडे संबंधित लोकांना काय उत्तर देणार याचा विचार करून निधी आणि मयांकचं डोकं फुटायची वेळ आली होती.
सारंगच्या फोनमधील रेकॉर्डस, त्याच्या डायरीज, त्याचा लॅपटॉप यामधून संशयित म्हणून काहीच हाती लागलं नव्हतं.
शिवाय त्याने जवळचे नातेवाईक , मित्र किंवा इतर कोणत्याही मंडळींशी इथे आल्यापासून काहीच कॉन्टॅक्ट केला नव्हता आणि हेच कारण निधी आणि मयंकला अडकवायला पुरेसं होतं.

शेवटी आपल्याला ह्या परिस्थितीला तोंड द्यावंच लागेल हे सत्य स्वीकारून दोघांनी एक निर्णय घेतला.
सारंग आपल्या हेल्थची खूप काळजी घ्यायचा.
काल पहाटे रनिंगला जो गेला तो अजून आलाच नाही म्हणून आम्ही त्याचा शोध लागावा या काळजीने आलो आहोत असा बनाव करून निधी आणि मयंक जवळच्या पोलीस चौकीत पोहोचले.
काल पहाटे रनिंगला जो गेला तो अजून आलाच नाही म्हणून आम्ही त्याचा शोध लागावा या काळजीने आलो आहोत असा बनाव करून निधी आणि मयंक जवळच्या पोलीस चौकीत पोहोचले.
एवढ्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीचे असे न सांगता मोबाईल घरीच ठेवून निघून जाणे याची दखल पोलिसांनी लगेच घेतली आणि हळूहळू ही बातमी सर्वदूर पसरली.
निधीला लोकांचे एकामागोमाग एक धडाधड फोन येऊ लागले. तर दुसरीकडे लोटस लाईफ इन्शुरन्सचे चीफ अधिकारी आणि संबंधित लोकांनी मयंकला प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडले.
ठरल्याप्रमाणे दोघेही एकाच उत्तरावर ठाम होते.
पहाटे सारंग नेहमीच रनिंगला जायचा. नेहमीप्रमाणे काल ही तो गेला पण अजून आलाच नाही. त्याचा मोबाईल घरीच आहे . शिवाय तो भाग जरा जंगलाचा आहे म्हणून प्राण्यांचा वावर कधी कधी असायचा.
पहाटे सारंग नेहमीच रनिंगला जायचा. नेहमीप्रमाणे काल ही तो गेला पण अजून आलाच नाही. त्याचा मोबाईल घरीच आहे . शिवाय तो भाग जरा जंगलाचा आहे म्हणून प्राण्यांचा वावर कधी कधी असायचा.
दोघांचही हेच उत्तर सर्वांना तोंडपाठ झालं होतं.
चॅनलहेड संदीपला तर वेड लागायचंच बाकी होतं कारण सारंगच्या लिखितावर आधारित सीरिजसाठी त्याने मोठा पैसा लावला होता. शिवाय १०० करोडच्या पॉलिसी अगेन्स्ट त्याने खूप मोठी रक्कम प्रीमियम म्हणून भरली होती.
चॅनलहेड संदीपला तर वेड लागायचंच बाकी होतं कारण सारंगच्या लिखितावर आधारित सीरिजसाठी त्याने मोठा पैसा लावला होता. शिवाय १०० करोडच्या पॉलिसी अगेन्स्ट त्याने खूप मोठी रक्कम प्रीमियम म्हणून भरली होती.
इन्शुरन्स कंपनीला तसा काही फरक पडला नाही कारण त्यांच्यालेखी सारंग अजून गायब होता जर त्याचं बरं वाईट झालं असतं तरच ही रक्कम त्यांना ७५ करोड निधीला तर २५ करोड चॅनेल हेड संदीपला द्यावी लागली असती. आता तेवढ्यापुरते तरी ते निर्धास्त होते.
लागोपाठ एक दोन तीन वेळा दारावरची बेल वाजली. निधीने दार उघडताच ती व्यक्ती तिला ढकलून आत शिरली.
हा काय प्रकार आहे ? आणि तू आता यावेळी तुला माहीत आहे ना पोलिसांसकट सर्वांच्या नजरा माझ्या घराकडे लागल्या आहेत. निधी ओरडत म्हणाली.
मूर्ख कुठली . सारंगच्या मरण्याची बातमी ऐकायला कान उत्सुक झाले होते माझे आणि हे काय भलतचं लचांड मागे लावलस तू ? तुला कल्पना आहे ना गेली कित्येक वर्षं आपण हा प्लान करत होतो.
डोक्यावरची हॅट आणि डोळ्यांवरचा गॉगल दूर फेकत मिस्टर रंजित शर्मा निधीवर ओरडले.
डोक्यावरची हॅट आणि डोळ्यांवरचा गॉगल दूर फेकत मिस्टर रंजित शर्मा निधीवर ओरडले.
यावर निधीने आपण मयंकला कसं आपल्या जाळ्यात फसवून खून करायला राजी केलं होतं यापासून त्याच प्रेत गायब होण्याची कथा सांगितली.
हे बघं तुझ्या भाकडकथा ऐकण्यात मला काडीचाही रस नाही. खरं खरं सांग सारंग कुठे आहे ? - शर्मा
मला नाही माहित प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मयांकच्या हातून खून घडवून आणण्याआधीच सारंगचा खून झाला होता आणि त्याच प्रेत गायब होण्याचा धक्का मलाही बसला आहे. त्यामुळे परिस्थिती आवरेपर्यंत तरी मला संपर्क करू नकोस .
निधी विनवत म्हणाली तसा शर्मा आल्या पावली निघून गेला.
निधी विनवत म्हणाली तसा शर्मा आल्या पावली निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मयंकने निधीला फोन केला सुरुवातीला तिने फोन उचलले नाहीत त्यामुळे वैतागून मयंकने तिला msg टाकला.
आताच्या आता न्यूज चॅनेल बघं. - मयंक
" सुप्रसिद्ध कथालेखक सारंग
यांचा हार्ट अटॅकने मृत्यू.
ते बरेच दिवस रहस्यमयरित्या गायब होते. त्यांच्या मूळगावी ओसाड असणाऱ्या फार्महाऊसमधून गावकऱ्यांना दुर्गंधी येत होती.
आज जेव्हा पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांचं निधन झालं असल्याचे लक्षात आले.
डॉक्टरांचा अहवाल - मृत्यूचे कारण - हार्ट अटॅक.

ही बातमी ऐकून निधीसकट सर्वच संबंधित लोकांनी सारंगच्या मूळगावी गर्दी केली. त्याचं प्रेत तिथे कसं पोहोचलं हे ही एक रहस्य होतं.
सारंगला अस जवळचं कोणी नातेवाईक नव्हतंच. त्याचे आईवडील तो तेरा वर्षांचा असतानाच एका अपघातात मरण पावले होते. पण याच अपघातात त्याचा लहान भाऊ गंभीर जखमी होऊनही सुदैवाने वाचला होता. त्याची स्मृती कायमची जाऊन डोक्यावर थोडा परिणाम झाला होता.
शामुकाका एक पन्नाशीचे गृहस्थ त्याची काळजी घेत होते. सारंग त्यांना पैसे तसेच सर्व सोईसुविधा पुरवत होता. आजही शामुकाकांच्या मदतीने सारंगचा भाऊ वेडसरपणा करत अंतिम संस्काराला आला होता.
त्याला पाहून निधीसकट सर्वांनीच आपली बोटे आश्चर्याने तोंडांत घातली..कारण एक वेडसरपणाची झाक सोडली तर हुबेहूब तो सारंगची कॉपी होता.
त्याला पाहून निधीसकट सर्वांनीच आपली बोटे आश्चर्याने तोंडांत घातली..कारण एक वेडसरपणाची झाक सोडली तर हुबेहूब तो सारंगची कॉपी होता.
कधीकाळी एकदा सारंगने निधीला हे सांगितले होते पण रंजित शर्माच्या प्रेमात बुडालेल्या निधीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.
निधी आणि सारंगचं एकाच कॉलेजमध्ये असताना प्रेम जुळलेलं होतं.
सारंगकडे पैसा आणि प्रसिद्धी भरपूर होती फक्त त्या एकाच गोष्टीचं सुख तो निधीला देऊ शकत नव्हता.
निधी आणि सारंगचं एकाच कॉलेजमध्ये असताना प्रेम जुळलेलं होतं.
सारंगकडे पैसा आणि प्रसिद्धी भरपूर होती फक्त त्या एकाच गोष्टीचं सुख तो निधीला देऊ शकत नव्हता.
हळूहळू निधीने शर्माच्या रूपात आपली गरज भागवायला सुरुवात केली आणि सुरू झाला त्यांचा हा मास्टर प्लॅन.
इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी करून वैतागलेल्या शर्माने निधीला सारंगच्या प्रसिद्धीचा फायदा घेत पॉलिसी उतरवायला तयार करण्यास सांगितले आणि प्लॅन मर्डर करून ते पैसे निधीच्या नावे घेऊन उरलेलं आयुष्य ऐशो आरामात जगायची भुरळ घातली.
कारण पॉलिसी मंजूर करणारा मुख्य अधिकारी हा शर्माचं होता.

आणि इतके दिवस ज्याची वाट पाहत होते ते दिवस आला.
लोटस लाईफ इन्शुरन्स कंपनीला फार मोठे नुकसान झाले. निधी आणि चॅनलहेड संदीपमधे ही पॉलिसीची रक्कम त्यांना नाईलाजाने विभागून द्यावी लागणार होती त्यादृष्टीने त्यांच्या अंतर्गत हालचाली सुरू झाल्या.
लोटस लाईफ इन्शुरन्स कंपनीला फार मोठे नुकसान झाले. निधी आणि चॅनलहेड संदीपमधे ही पॉलिसीची रक्कम त्यांना नाईलाजाने विभागून द्यावी लागणार होती त्यादृष्टीने त्यांच्या अंतर्गत हालचाली सुरू झाल्या.
लोटस लाईफ इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये निधी आज ठरलेल्या वेळेत चेक घेण्यास पोहोचली.
सर्व सोपस्कार पार पाडून ती सही करायला शर्माकडून पेपर्स घेणार इतक्यात पोलीस ऑफिसर संजय आपल्या टीमसह पोहोचले.
सर्व सोपस्कार पार पाडून ती सही करायला शर्माकडून पेपर्स घेणार इतक्यात पोलीस ऑफिसर संजय आपल्या टीमसह पोहोचले.
थांबा निधी मॅडम. एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. पाटील घेऊन या त्यांना बरं.
काचेचं दार हलकेच उघडून सारंग आत आला पाठोपाठ मयांकदेखील.
काचेचं दार हलकेच उघडून सारंग आत आला पाठोपाठ मयांकदेखील.
निधी आणि शर्माला तर हा जबर धक्का बसला.
शक्य तितके चेहऱ्यावर हसू ठेवत निधी सारंगकडे धावली.
शक्य तितके चेहऱ्यावर हसू ठेवत निधी सारंगकडे धावली.
कुठे होतास तू ? काय अवस्था झाली माझी ? पण तू जिवंत आहेस तुझ्या मृत्यूची ती बातमी ? ते अग्नी संस्कार ? ? नाटक केलं का तू सर्व ? पण का?
सारंग तिला दूर ढकलत म्हणाला, बरोबर बोललीस तू मी नाटकचं केलं नाहीतर तुझ्या आणि शर्माच्या प्लॅन नुसार मी मेलोच असतो.
सारंग तिला दूर ढकलत म्हणाला, बरोबर बोललीस तू मी नाटकचं केलं नाहीतर तुझ्या आणि शर्माच्या प्लॅन नुसार मी मेलोच असतो.
एकदा कॉन्फरन्स आटोपून मी घरी येत असताना हायवे ला नेमकी माझी कार बंद पडली म्हणून मी एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलो . रजिस्टर पाहत असताना सहज माझी नजर गेली आणि मला धक्का बसला. निधी आणि शर्माच्या नावाने बऱ्याच एन्ट्री होत्या.
निधी आणि पॉलिसी हेडच्या संपर्कात ? माझा विश्वास बसेना.
निधी आणि पॉलिसी हेडच्या संपर्कात ? माझा विश्वास बसेना.
मग मी माझा विश्वासू मित्र मयंकला शर्माची माहिती काढायला त्याच्या कंपनीमध्ये नोकरी करायचं सुचवलं. शिवाय काही प्रायव्हेट डिटेक्टिव दोघांच्या मागे लावले. त्यांनी सांगितल्यानुसार शहरापासून दूरवर असणाऱ्या कॅफे , रिसॉर्ट्स तसेच हॉटेल्समध्ये त्यांचे नियमित येणे जाणे होते. ३५ वर्षाचा रंजीत शर्माला ऐशो आराम तसेच महागड्या गाड्या, उंची शौक भरपूर होते. तरुण असून तो अविवाहित होता. निधीचे आणि त्याचे ४ वर्षापासून संबंध होते.
माझ्या लिखाणाच्या प्रसिद्धीमुळे मला कधीनाकधी बिग बजेट सादरीकरणाची ऑफर मिळणार हे मला माहीत होते आणि चॅनलहेड संदीपच्या युवा चॅनेल कडून लवकरच ही संधी आली.
यावर निधीनेच मला पॉलिसी उतरवून ७५ करोडसाठी तिला भागीदारी देण्याची अट घालायचे सुचवले आणि इथूनच मी त्यांचा प्लॅन समजून गेलो.
मयंकनेही मला माहिती पुरवली होती की पॉलिसी मंजूर करायचा अंतिम निर्णय हा शर्माचाच असतो.

मग मी पण त्यांच्या नकळत माझ्याच मृत्यूचा प्लान आखला.
अरे पण मुर्खा, तुझाच खून दाखवून तुलाच कुठून आणि कसा पैसा मिळणार होता ? आणि मेलेला माणूस कोण होता ? शर्मा कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.
त्यावर सारंगने शांतपणे उत्तर दिले, मला कुठे पैसा हवा होता ?
तुम्हाला फायदा होऊ नये, तुमचं खरं रूप उघडकीस यावं म्हणून ही सर्व मेहनत.
आणि बरं का त्यादिवशी जो मेला तो माझा धाकटा भाऊ विहंग.
शामू काकांनी त्याच्या मेंदूला ज्वर होऊन तो सीरियस असल्याची मला कल्पना दिली होती.
फार्महाऊसवर मी एकटाच खोलीत लिखाण करत असताना त्यांनी मला त्याच्या दुर्दैवी निधनाची बातमी दिली.
मयंकला निधीला गुंतवत ठेवायचे सांगून मी त्या खोलीतून बाहेर पडून डॉक्टरांच्या परवानगीने विहंगचं प्रेत घेऊन आलो होतो.

निधी रनिंगला गेली असता मयांकच्या मदतीने ते भेसूर दिसेल असे भासवले होते. त्यावेळी मी फार्महाऊसमधेच एका दुसऱ्या खोलीत होतो. प्रेताच्या त्या धक्क्याने निधी खरच शॉक मध्ये गेली होती. त्यानंतर ही दोघे जेव्हा गावात फ्रीजर ची व्यवस्था करायला निघून गेले तेव्हा मी लगेच विहंगचे प्रेत शवागारात जमा केले.
दुसऱ्या दिवशी लगेच पुराव्यांसकट मी पोलिस आयुक्त संजय यांची भेट घेतली. यावर त्यांच्याच सल्ल्याने मी मीडियामध्ये मृत्यूची बातमी पसरवली. शर्माने क्लेम पास करावा म्हणून मी सारंग म्हणून विहंगचे अंतिम संस्कार पार पाडले. या कामी मला मयंकने मोलाची साथ दिली.

इन्स्पेक्टर संजय - हे तुमच्या दोघांविरुद्ध अटक वॉरंट. इन्शुरन्स कंपनीची फसवणूक आणि जीवे मारण्याचा प्लान या गुन्ह्यांतर्गत निधी आणि मिस्टर शर्मा तुम्हाला अटक केली जात आहे.
समाप्त.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने