Login

अनुभूती —भाग -१

मुलगा आईची किंमत करत नाही. मग काय घडतं, कथेत वाचू.

जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी -२०२६


विषय - दुसरी बाजू



"हॅलो,डार्लिंग. अजून किती वेळ लागेल तुला पोहोचायला.मी अर्धा तास झालाय वाट बघतोय."मिहीर आपल्या गर्लफ्रेंड मिहिकासोबत फोनवर बोलत होता.

" हा, बस दहा मिनिटात येते . सॉरी बेबी जरा उशीर झाला." तिकडून आवाज आला.

मिहीर एक मोठ्या रेस्टॉरेंटमध्ये आपल्या गर्लफ्रेंडची वाट बघत बसला होता.
तो पुण्यातील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. आणि त्याची गर्लफ्रेंड —मिहिका आय.टी.कंपनीत इंजिनिअर होती.

दोघं दोन वर्षांपासून सोबत होते.

आज दोघं एका आठवड्यानंतर भेटणार होते.


तेवढ्यात मिहिका रेस्टॉरेंटला पोचली.

"हॅलो, बेबी. सॉरी माझ्यामुळे तुला वाट बघावी लागली."मिहिका, मिहीरला मिठी मारत म्हणाली.

" इट्स ओके ग. बस तू." मिहीर बोलला.

मिहीरने मिहिकासाठी वॉच आणली होती.

मिहिका ते बघून खूप खुश झाली.

"थँक यू सो मच. किती सुंदर आहे हे."

" बरं ऐक ना, तू मला आईला भेटायला कधी घेऊन जाणार?
कधीपासून आज उद्या चाललंय.
घरी पण स्थळ बघतायेत. आपण उशीर नको करायला. पुढच्या वीकएंडला ठरवू ना."मिहिकानी विचारलं.

"हो, तू बरोबर बोलतेस. पुढच्या वीकएंड डन." मिहीर म्हणाला.

मग दोघांनी जेवण केलं. आणि घरी जायला निघाले.

घरी पोचल्यावर मिहीरने मिहिकाला कॉल केला —" नीट पोहोचली ना? "

"हो, आत्ताच कॅबमधून उतरले." मिहिका म्हणाली.

"ठीक आहे. तू जा घरी, आराम कर. मी पण घरी पोहोचलो आता."

मिहीर मिहिकाची खूप काळजी घ्यायचा. तिला काय पाहिजे,काय नको. सगळं त्याला माहिती असायचं.
त्यांनी एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं होतं.


मिहीरच्या घरात फक्त त्याची आई होती.त्याचे वडील तो आठ वर्षाचा असतानाच अपघातात वारले होते.

तेव्हापासून आईने त्याला शिकवायला खूप कष्ट घेतले.

मिहीरला जेव्हा नोकरी लागली. तेव्हा आई सगळ्यात जास्त खुश झाली होती. मिहीरने पण खूप मेहनत केली आणि आता तो मॅनेजर झाला होता.

दोन वर्षात त्यानी मोठं घर घेतलं.
घरात सगळ्या सुखसुविधा होत्या.
तो आईला म्हणाला होता —"आई इतके वर्ष तू खूप कष्ट केले, आता तुझी आराम करायची वेळ आहे. आता तू निवांत रहा. मी तुला काही त्रास नाही होऊ देणार.


मिहीर गाडीतून उतरला.

गाडीचा आवाज ऐकून मिहीरची आई —सुषमाताई दार उघडायला आल्या.

मिहीरने बेल वाजवायच्या आधीच त्यांनी दार उघडले .

"आज उशीर केला. मी कधी पासून वाट पाहत बसले होते."सुषमाताईंनी विचारलं.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all