अधिकार सोपवताना
भाग १
" हे बघ सायली, आजपर्यंत या घराची तिजोरी अन् कपाट माझ्या हुकुमावर चाललं. आता माझं थोडं वय झालंय, पायाचा त्रास वाढलाय म्हणून ही चाव्यांची जुडी तुझ्या स्वाधीन करतेय. पण लक्षात ठेव, प्रत्येक पैशाचा हिशोब चोख राहिला पाहिजे. आणि एक लक्षात ठेव... कपाटातल्या खालच्या कप्प्याला आणि लॉकरला अजिबात हात लावायचा नाही!
तिथे माझी वैयक्तिक कागदपत्रे आणि काही जुने दागिने आहेत. बाकी रोजच्या खर्चाचं काय ते तू बघून घे!"
तिथे माझी वैयक्तिक कागदपत्रे आणि काही जुने दागिने आहेत. बाकी रोजच्या खर्चाचं काय ते तू बघून घे!"
अनुराधाबाईंनी देव्हाऱ्यासमोर उभं राहून आपल्या करारी आवाजात सून सायलीला बजावलं. त्यांच्या हातातली ती जुनी, जाडजूड चाव्यांची जुडी सायलीच्या हातावर ठेवताना त्यांच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता. घरची जबाबदारी सोपवल्याचं समाधान कमी, पण आपला हक्काचा अधिकार सुटत असल्याचा संकोच जास्त दिसत होता.
सायलीने चावी हातात घेतली खरी, पण तिच्या मनाला अनुराधाबाईंचे शब्द खटकले. तिने चावीकडे पाहत विचार केला,
‘चावी तर दिली, पण अधिकाराचं कुलूप मात्र स्वतःकडेच ठेवलं. जर कपाटाच्या खालच्या कप्प्याला मला हातच लावायचा नसेल, तर मग ही चावी देऊन माझ्यावर कसला अधिकार सोपवलाय? ही तर फक्त एका मॅनेजरची नोकरी झाली, घराची मालकीण कुठे झाले मी?’
‘चावी तर दिली, पण अधिकाराचं कुलूप मात्र स्वतःकडेच ठेवलं. जर कपाटाच्या खालच्या कप्प्याला मला हातच लावायचा नसेल, तर मग ही चावी देऊन माझ्यावर कसला अधिकार सोपवलाय? ही तर फक्त एका मॅनेजरची नोकरी झाली, घराची मालकीण कुठे झाले मी?’
सायली शिकलेली, आधुनिक विचारांची , एका नामांकित आयटी कंपनीत काम करणारी स्वावलंबी मुलगी होती. तिला तिचं स्वातंत्र्य प्रिय होतं. पण लग्न होऊन या घरात आल्यापासून तिला प्रत्येक गोष्टीसाठी सासूच्या नियमांच्या चौकटीत राहावं लागत होतं.
कटु सत्य हेच होतं की, अनुराधाबाईंना वयानुसार घरच्या शारीरिक कष्टाच्या आणि धावपळीच्या जबाबदाऱ्या सुनेवर टाकायच्या होत्या.पण घरावरील आपला अबाधित अधिकार सोडायचा नव्हता. दुसरीकडे, सायलीची गल्लत वेगळीच होत होती. तिला घरात स्वतःचं स्वातंत्र्य हवं होतं, पण कौटुंबिक रीती-परंपरा, सण-वार आणि नातेवाईक सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी आणि कर्तव्य नको होतं. तिला फक्त स्वतःचे अधिकार हवे होते !
घरातल्या या कोल्ड वॉरची ठिणगी एका रविवारी पडली. अनुराधाबाईंच्या लाडक्या मावसबहिणीचे कुटुंब घरी येणार होते. सकाळी सकाळीच अनुराधाबाई सायलीला म्हणाल्या,
" सायली, अगं आज मावशी आणि तिचं कुटुंब येणार आहे. स्वयंपाक घरीच करायचा आहे. जरा वरची मोठी भांडी काढून घे, स्वयंपाक करायला लागतील. कामवाल्या बाईला सांगून ती सगळी मोठी भांडी घासून घे. त्यांच्या आवडीचे पुरणपोळीचे जेवण करायचे आहे. आणि कपाटातून त्यांच्यासाठी दोन नवीन चांगल्या साड्या काढून ठेव, त्यांना मानपान करावा लागेल."
सायली लॅपटॉपवर तिचं ऑफिसचं काही महत्त्वाचं काम करत होती. पाहुण्यांचं ऐकून ती कमालीची वैतागली आणि म्हणाली,
" आई, आज रविवार आहे. पण मला ऑफिसचं खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्ही अचानक एवढ्या मोठ्या जेवणाची जबाबदारी माझ्यावर कशी टाकू शकता ? आणि पाहुणे तुमचे आहेत, त्यांची आवड-निवड तुम्ही बघा. मला यातलं काही समजत नाही. मला एवढी सगळी जबाबदारी घेणं शक्य नाही."
अनुराधाबाईंचा पारा चढला,
" म्हणजे काय? घरात पाहुणे आले तर सून म्हणून तुझी काही कर्तव्यं आहेत की नाही ? नुसतं लॅपटॉपवर बोटं फिरवून घर चालतं का ? जबाबदारी नको असेल तर मग कपाटाच्या चाव्या कशाला घेतल्या हातावर ?"
सायलीही अब गप्प बसणार नव्हती. ती उठली. तावातावाने तिने पर्समधून ती चाव्यांची जुडी काढली.
" सासूबाई, चावी दिली म्हणजे सगळा मक्ता मीच करायचा का ? कपाटाची चावी दिली पण त्यातल्या महत्त्वाच्या कप्प्याला तर मला हात लावायची परवानगी नाही! अधिकार तुमच्याकडे आणि राबण्याची जबाबदारी माझ्यावर?
मला असं अर्धवट स्वातंत्र्य नकोय. ही घ्या तुमची चावी!" सायलीने ती चावी टेबलावर आपटली.
मला असं अर्धवट स्वातंत्र्य नकोय. ही घ्या तुमची चावी!" सायलीने ती चावी टेबलावर आपटली.
घरात पुन्हा एक शांत युद्ध सुरू झालं होतं. या घरगुती तणावामुळे घरातली शांतता पार भंग पावली होती. त्या दिवशी सासूबाईंनी स्वतःच्या देखरेखीखाली स्वयंपाक करून घेतला. मावशी आणि तिच्या कुटुंबाचा यथोचित पाहुणचार आणि मानपान केला.
अशातच एका महिन्याने सायलीचा नवरा अविला ऑफिसच्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी १५ दिवसांसाठी परदेशात गेला. जाताना तो घाईघाईत सायलीला पैशांची काही सोय सांगून गेला नव्हता. कधी त्याच्या गैरहजेरीत गरज पडली तर माहिती असावी म्हणून तरी सांगायला हवे होते, पण तो घाईगडबडीत सपशेल विसरून गेला. तो गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी घरात एक मोठा अनर्थ घडला.
दुपारच्या वेळी अनुराधाबाई बाथरूममध्ये गेल्या होत्या. तिथे पाणी पडल्यामुळे फरशी गुळगुळीत झाली होती. त्यांचा पाय अचानक घसरला. त्यांचा तोल जाऊन त्या जोरात मागच्या मागे कोसळल्या. पडताना स्वतःला सावरण्याच्या नादात त्यांचा सगळा भार उजव्या हातावर पडला. काड असा मोठा आवाज झाला. त्यांच्या रडण्याचा, वेदनेने विव्हळण्याचा मोठा आवाज संपूर्ण घरात घुमला.
हातातला लॅपटॉप बाजूला ठेवून सायली धावतच तिथे गेली. अनुराधाबाई जमिनीवर पडल्या होत्या. वेदनेने व्याकुळ होऊन उजवा हात धरून रडत होत्या. त्यांचा तो हात पूर्णपणे निकामी झाला होता. सायलीने कसलाही विचार न करता शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले.
तिथे डॉक्टरांनी एक्स-रे पाहून गंभीर चेहऱ्याने सांगितले,
"त्यांच्या हाताला मल्टीपल फ्रॅक्चर झालं आहे. वय जास्त असल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्रावाचा धोका आहे. आपल्याला इमर्जन्सीमध्ये तातडीने ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही लवकरात लवकर पैशांची सोय करा आणि फॉर्मवर सही करा."
सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. अविनाश परदेशात होता, त्याचा फोन लागत नव्हता. घरी पैशांची कोणतीही मोठी सोय नव्हती. आता सायली एकटी होती. आ वासून समोर उभं होतं सासूबाईंच्या आयुष्याचं आणि मोठ्या वैद्यकीय खर्चाचं संकट !
क्रमशः...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
