Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५९

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५९


आरवच्या घरात गौरवीला एक आठवडा पुर्ण झाला...

आता गौरवी रोज सकाळी चहा नाश्ता व आरवसाठी ऑफिस टिफीन आणि संध्याकाळी चहा नाश्ता... व जेवण करु लागली...
आणि घर सुद्धा निटनेटके राहू लागले...

अचानक एकेदिवशी गौरवी सर्व घरातली कामं आटोपून आपला अभ्यास करत बसली होती... तेव्हा अचानक तीला अस्वस्थ वाटू लागले...

तीने दुर्लक्ष केले... पण तीला सतत मळमळायला लागले... आणि कोरड्या उलट्या होऊ लागले...

गौरवी थकली आणि झोपी गेली...

संध्याकाळी गौरवी उठली तर तीला गरगरायला लागले... आणि ती खाली कोसळली...

थोड्या वेळात आरव घरी आला... आणि संध्याकाळ होऊनही घरातील लाईट लागलेली नव्हती म्हणून तो आश्चर्यचकित झाला... आणि घरातील लाईट लावत गौरवीला आवाज देऊ लागला...
…पण गौरवीचा काहीच प्रतिसाद आला नाही…
आरवच्या पावलांचा वेग आपोआप वाढला…

“गौरवी…?”
तो पुन्हा हाक मारतो… आता आवाजात काळजी मिसळलेली होती…

तो बेडरूम मध्ये जाताच...  त्याच्या नजरेस ती जमिनीवर निपचित पडलेली दिसते…

क्षणभर त्याचा श्वास अडकतो…
“गौरवी…! काय झालं तुला…?”

तो धावत तिच्याजवळ जातो… हलकेच तिचा खांदा हलवतो…
तिच्या कपाळावर हात ठेवतो… कपाळ तापलेलं… आणि चेहरा निस्तेज पडला होता…

आरव पटकन जाऊन पाणी आणतो… आणि तिच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडतो...
गौरवीच्या पापण्या हळूहळू हलतात… तेव्हा तो पटकन तिला उचलतो सोफ्यावर बसवतो… आणि तीच्या ओठांवर पाण्याचा ग्लास लावतो…

थोड्यावेळाने गौरवी डोळे किलकिले करुन बघते...
आरव…?”
ती क्षीण आवाजात म्हणते…

“हो… मीच आहे…”
तो सुटकेचा दीर्घ श्वास घेत म्हणतो…
“तुला काय झालं होतं...? लाईट पण लावलेली नव्हती… मी खूप घाबरलो होतो…”

ती उठायचा प्रयत्न करते… पण पुन्हा तीला गरगरायला होते…

आरव तिला थांबवतो…
“नको… आत्ता हलू नकोस…”

गौरवी हळूच सांगते…
“आज सकाळपासून मला मळमळ होतेय… उलट्यांसारखं वाटत होतं… आणि डोकं पण जड झालं होतं…”

आरव क्षणभर गप्प होतो… डोक्यात काही विचार चमकून जातात… तो तिच्याकडे नीट पाहतो… तीचं थकलेलं शरीर… आणि तो चेहऱ्यावरचा फिकटपणा पाहतो…
“गौरवी…”
तो थोडा सावधपणे विचारतो…
"आपल्याला डॉक्टरकडे जायला हवे..."

गौरवी सुद्धा तयार होते... आणि आरव तीला डॉक्टरकडे घेऊन जातो...

डॉक्टर गौरवीला तपासतात... आणि विचारतात...
“तुला… कधीपासून पाळी चुकली आहे…?”

ती प्रश्न ऐकून दचकते… क्षणभर शांतता पसरते…
मग तिच्या डोळ्यांत अचानक भीती चमकते…
“मला… मला नीट आठवत नाही…”
ती कुजबुजते…

"हरकत नाही... तुमचं अभिनंदन... तुम्ही आई होणार आहात..." डॉक्टर हसत हसत सांगतात...



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."